( महाराष्ट्र सरकार ने संभाजीराव भिडे यांच्या वरील ६ गुन्हे मागे घेतले )
शकील अहमद शेख या आरटीआय कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र राज्यशासनाने कोणते गुन्हे माफ केले? हे जाणून घेण्यासाठी या संदर्भात महाराष्ट्र राज्यशासनाकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या उत्तरामध्ये राज्यशासनाने एकूण
४१ राजकीय गुन्हे माफ केल्याचे उघडकीस केले आहे.
|
(शकील अहमद शेख) |
यामध्ये
शिवसेना-भाजप या राजकीय कार्यकर्त्यांसोबतच
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक - अध्यक्ष संभाजीराव भिडे यांच्यावरील
६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. संभाजीराव भिडे यांच्या वरील गुन्हे मागे घेण्याची पुष्टी जरी राज्यसरकार ने केली नसली तरीही ते कोणत्याही गुन्ह्यात दोषी सापडले नसल्याची माहिती आरटीआय ने दिली आहे.
महाराष्ट्राचे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अहवालाबाबत बोलताना सांगितले की,
"संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे हे केवळ त्यांच्यावरील गुन्हे नसून ते शेकडो सांगलीकरावरील गुन्हे होते, त्यातलेच एक संभाजी भिडे होते."
अश्या प्रकारे संभाजीराव भिडे यांच्यासोबतच अनेक राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना न्यायालयीन खटल्यातून तात्काळ दिलासा मिळाला आहे. तसेच संभाजीराव भिडेंचा मास्टर माईंड समजल्या जाणारा भगवान श्री कृष्ण याचीच जणू कृपा त्यांच्यावर झाली असे अनेक सामान्य लोकांचे मत आहे.