(काय आहे गुढीपाडव्याची सत्यता, का साजरा केला जातो गुढी पाडवा?) |
"इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे."
-प्राचार्य शिवाजीराव भोसले
सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतु पुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्याच्या बद्दलचे वास्तव काय आहे ते पाहुयात ...
म्हणे शंभुराजेंची हत्या ही मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी फाल्गुन वद्य अमावस्येला केली किॅवा ती औरंग्यास करायला सांगितली व त्याचदिवशी त्यांचं शीर हे ब्राह्नणांनी नाचविलं व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मणांनी तो चैत्र पाडव्याचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला व आनंदाप्रीत्यर्थ शंभुराजेंच्या शीराचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या व तेंव्हापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरु झाला. थोडक्यात आजची गुढी उभारायची पद्धत व प्रथा हा शंभुराजेंच्या हत्येशी संबंधित आहे असं ह्या आक्षेपकांचं म्हणणं आहे.
आता गुढी पाडव्याचा इतिहास पाहुयात...!
गुढी उभारल्याचा उल्लेख आपणांस रामायणात मिळतो हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्याची प्राचीनता आपल्या लक्षात येते.
- गुढी शब्दाचा अर्थ काठी पूजा
काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरां पैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवाकाठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित' महाराष्ट्र शब्दकोशा'चा तृतीय खंडाचा पृष्ठ क्रमांक ९९८ चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असेउदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्याशब्दकोशाने खोपटी; झोंपडी; अथवा पाल (रहाण्याची जागा) असादिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करूनउभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते. तरीही राहण्याचीजागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक,तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची)संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांचीयादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापरआणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहताहा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिकअसावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठीहा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पणआंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूडबांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असूशकते.
शिशुपाल वधामध्ये गुढीचा उल्लेख सापडतो तो असा,
तैवे आत्मा उभितावे गुढी ! रोमांचमिषे !
गुढी शब्द कौल देणे ह्या अर्थाने पण आहे. जसे देवाला काही प्रश्नविचारायचे झाल्यांस कौल मागणे व त्यावेळी गुढी उजवी दिली कीडावी दिली असाही संदर्भ आहे.
महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ
इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचितलीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथबाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंहीसडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली :उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... "असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीतअध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचींलिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ;
"ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविलीअनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥";
"माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं। गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात.
संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई(निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा(चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत,गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळीवाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"
१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक काव्याततर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्याकाव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची,वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्यागुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांचीअनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं,वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणीउभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्यालेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचाआहे.
महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल]म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावीदेणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असेसंकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्यानेवापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचितनिर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्धसंदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसूनयेते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्या समूहांतील एखादाचपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.
जगद्गुरु तुकोबारायही त्यांच्या अभंगांच्या गाथेत गुढीचे उल्लेखकरतात.
तुकारामांची गाथा
तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥ (अभंग क्र. ३५८३)
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥ (अभंगक्र. ४५२९)
संत नामदेवरायांचे गुढीचे अभंग
फोडा फोडारे भांडारें ।
आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारेगुढी ।
सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥ (श्रीराममाहात्म्य - रामजन्म :)
संत जनाबाईंचे गुढीचे अभंग (निर्वाण:इ.स. १३५०)
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्तीजाला पट । गुडी उभवी वसिष्ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान ।नामयाची जनी म्हण ॥९॥
आणखीही अनेक संतांचे अनेक उल्लेख देता येतील पण विस्तारभयास्तव देत नाही. थोडक्यात संतवांग्मयात हे गुढी उभारल्याचे उल्लेख शंभुराजेंच्या मृत्युच्या शेकडो वर्षे आधीचे आहेत हे स्पष्ट असल्याने गुढी ब्राम्हणांनी शंभुराजेंना मारल्यानंतर उभारली हा आरोप किती तथ्यहीन आहे हे कळते.
क्रमशः
लेखक-तुकाराम चिंचणीकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पंढरपूर विभाग
ज्ञानवर्धन करणारा लेख!!
ReplyDeleteधन्यवाद
।। जगदंब ।।
खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteमाहिती छान आहे..परंतु हिंदूचा हां सण पूर्ण भारतामध्ये सगळे हिंदू बांधव साजरा का करत नाहीत??
ReplyDeleteगुढी म्हणजे काठी/बांबूला जोडलेली पताका असावी त्यात काही वाद नाही परंतु साडीची गुढी त्याला उलटा कलश व कडूनींभाच्या काड्या अशी का उभी करावी???इ.सन १२७८ ते १६व्या शतकामध्ये साडीची गुढी उभा केली असल्याची काही माहिती असेल तर पाठवा..
चांगली माहिती आहे .
ReplyDeleteअतिशय उपयुक्त ठरेल अशी माहिती आहे. काही लोक उगाचच वर्णद्वेष पसरवून समाजात गैरसमज पसरवितात,व एकामेकांसमोर उभे करुन दंगली घडवितात.
ReplyDelete