(११०० वर्षाहून अधिक काळा पासून बोलली जाणारी, ज्ञानोबा-तुकोबांनी आपल्या विचारांच्या पाऊलखुणा ज्या भाषेत कोरल्या, ती भाषा.......) |
एका कार्यक्रमात ऐकले कि "नमस्कार बोलण हे किती 'चिप लो स्टॅडर्ड' वाटत, पण 'लव यु' पासुन सुरुवात केली कि प्रेमाच वाटतं". ते ऐकून आचार्य अत्रे यांचे शब्द आठवले, "ज्याला आपल्या मातृभाषेची लाज वाटते त्याला आईच्या दुधाची हि लाज वाटायला पाहिजे". आज जर कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे जिवंत असते तर त्यांनी म्हंटल असत, कि हा आमचा महाराष्ट्र नाही.... ज्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या लेखणीत, तुकोबांच्या मुखात, समर्थांच्या श्लोकात, शिवरायांच्या मनगटात आणि शंभू राजेंच्या तलवारीत, टिळक-सावरकरांच्या आवाजात तर खुद्द महाराष्ट्राच्या मातीत मनपूर्वक रमली तीच माय मराठी आज ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्यातूनच हरवत चालली आहे? ती परत मिळवण्यासाठी 'मराठी बोला चळवळ' आपण उभारतो, हि बाब किती लज्जास्पद आहे? माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट...माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित....या ओळि कालानुरुप नष्ट होत चालल्या आहेत. आता माझ्या मराठीची अगोडी मला वाटते अविट आणि इंग्रजीचा छंद मना नित्य मोहवित...म्हणुन आमची मुलं हि अमराठी व्रत घेतलेल्यांच्या भाषेत लो क्लास मराठी पेक्षा हाय क्लास इंग्लिश ला शोभतात. आ. संभाजीराव भिडे गुरुजी पुढील श्लोकात म्हणतात,
नसे इंग्रजी दूध हे वाघिणीचे ।
खरे पाहता विष ते दास्यचेचे ।।
असे देववाणी झरा अमृताचा । (देववाणी- संस्कृत)
पिऊनी बने देश मृत्यूंजयांचा ।।
शिवरायांनी शत्रूला पत्र पाठवताना फारसी आणि उर्दूचा वापर केला, पण राज्यभिषेका नंतर मात्र मराठी भाषा त्यांनी अंगिकारली आहे. धर्मवीर संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. ज्या राजाचे ३६५ दिवस आपण गोडवे गातो, त्या राजाने स्वीकारलेली भाषा मात्र आपल्याला स्वीकारता आली नाही. भारतावर हुकुमत चालवणार्या इंग्रजांचा शेवटचा व्होईसरॉय एलफिस्टन जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने आधी इंग्रजी आणि मराठी शिक्षकांची मागणी केली. आज भारताबाहेरील देशात संस्कृतचा अभ्यास केला जातो, पण आज मराठी मातीत मात्र तिला टिकवण्याचे प्रयत्न केले जातात. कलियुगात जसा आपल्याला एकसंघाचा श्राप आहे तसा आपल्याला भाषेचा हि श्राप आहे. म्हणून इतरांनी जे स्विकारल ते मात्र आपण स्वीकारू शकत नाही...! परकीयांनी आपल्यावर कब्जा केलाय पण आपण कितपत त्यांना सोडलाय? आज दुरदर्शनवर दाखवणाऱ्या कार्यक्रमामुळे आपण स्वतःला पाश्चिमात्य संस्कृतीला झोकुन दिलय...पण ज्या दुरदर्शनवर पाहून आपण आपले राहणीमान बदलतोय त्याची मुळात सुरुवात दादासाहेब फाळके, पु.ल.देशपांडे या मराठी जणांनी केली, हे मात्र विसरतो. मराठी भाषा दिन आला कि आमचा मराठीबाणा जागा होतो...आमच्यातला मराठी माणुस जागा होतो...आमच्या शुभेच्छा मात्र रात्री बारा वाजल्यापासून , लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कुसुमाग्रजांच्या सुंदर ओळीने दिल्या जातात, पण त्याच संध्याकाळी मात्र अंत हा इंग्रजीतून होतो.
स्वर्गलोकी सरस्वतीच्या विणेत जी संगीत बद्ध झाली ती मराठी , भूतलावर विठ्ठल हि भक्ती रंगात दंगलेती मराठी, जात्यावर धान्य दळते ती मराठी, मराठांच्या तलवारीच्या म्यानात उसळते ती मराठी, सौंदर्याच्या तालावर नाचते ती मराठी, पावसाच्या थेंबावर कवींच्या कवितेत भिजते ती मराठी....मराठीची गोडी खरच अवीट आहे..तिची कास सोडू नका.....!!!!
-नेहा सुनिल जाधव
No comments:
Post a Comment