महाराजांची कीर्ती ऐकून
उत्तरेतला एक कवी म्हणजे ‘कवी भूषण’ आपल्या एका काव्यात अस म्हणतो कि,
"काशिजी कि कला जाती,
मथुरा मस्जिद होती,
सिवाजी न होते तो,
सुन्नत होत सबकी "
त्यांनी जे काही लिहिलय ते सत्य आहे. त्याच कारण, शिवछत्रपतींच्या काळात पाच
हि पातशाह्यांचा काश्मीर ते कन्याकुमारी, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान चालणारा इस्लामी नंगानाच त्याने ऐकला आणि
पहिला होता. महाराजांची कीर्ती ऐकून तो महाराष्ट्रात आला आणि त्याने काही काव्य
केली. त्यात हे म्हणतोय "सिवाजी न होते तो, सुन्नत होत सबकी" हे जितक सत्य आहे, "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज न होते तो सुन्नत
होती सबकी" हे तितकच सत्य आहे. त्याकाळापासूनच आपली देवालय टिकली ती ह्याच पिता-पुत्रांच्या पुण्याईमुळेच..!
हिंदुस्थानला हजारो लाखो
वर्षाची देवा-धर्माची परंपरा आहे. त्यात आपल्याकडे पद्धत आहे; बारा ज्योर्तिलिंगाची
यात्रा करणे. हि बारा ज्योर्तिलिंग म्हणजे भगवान शंकराचे स्वयंभू (प्रगट) स्वरूप. त्यांची यात्रा हि पवित्र मानली जाते. हि बाराच्या बारा ज्योर्तिलिंग आजही शाबूत
आहेत. त्याचं कारण म्हणजे १३ वे आणि १४ वे ज्योर्तिलिंग. होय, त्या रायगडावर असणारी श्री
शिवछत्रपतींची समाधी आणि त्या वढू-तुळापुरला असणारी धर्मवीर संभाजी महाराजंची
समाधी हि दोन्ही क्षेत्रे उभ्या हिंदुस्थानासाठी १३ वे आणि १४ वे जोतिर्लिंग आहेत.
हेच कवी भूषण नी आपल्या काव्यात सांगितलं आहे. आपली तीर्थक्षेत्र राखायची असतील तर
आपल्याला एकच मार्ग अवलंबावा लागेल; तो म्हणजे शिवाजी-संभाजी मार्ग. घडली धारातीर्थ
म्हणूनच टिकली तीर्थक्षेत्र.
ह्याचं उदाहरण द्यायचं झाल तर, भागानगरला
म्हणजे आताच्या हैद्राबादला जुनं मंदिर आहे. मंदिरावर इराणवरून सतत हल्ले
व्हायचे. लुटा-लुट आणि तोडफोड हे नित्याच झालं होत. त्यांनी मराठ्यांना म्हणजे
शिवछत्रपतींना पत्र पाठवलं. आणि मंदिरासाठी संरक्षण मागितलं. शिवछत्रपतींनी त्या
पत्राला दिलेल्या उत्तरात "आजपासून ह्या मंदिराला मराठे संरक्षण देतील..!" असा शब्द दिला. हि बातमी इराणी आक्रमकांना समजताच, त्या मंदिराचे हल्ले कायमचे थांबले. तसेच, गोव्याच्या एका मंदिराबाबत
प्रसंग आपल्याला आढळतो. ह्यावरून श्री शिवछत्रपतींची देवा-धर्मावरची माया लक्षात
येते कि, मंदिरावर होणारी आक्रमणे हा मुद्दा त्यांनी किती गंभीरतेने हाताळला. धर्माबाबतची
तत्परता , भगवंतावर
असलेली श्रद्धा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची तळमळ ह्या सगळ्याचा सार म्हणजे
भगवान श्री शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज...!
राष्ट्राच्या
पुनरुद्धारासाठी तसेच भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी
शिवाजी- संभाजी रक्तगटाचे तरुणपिढी उत्पन्न होणे, अत्यंत आवश्यक आहे. विश्वाच्या संघर्षात हिंदुस्थानला
जगाचा बाप म्हणून उभं राहायचं असेल तर एकच बीजमंत्र आहे. तो म्हणजे, शिवाजीमंत्र
आणि संभाजीमंत्र. जो देश आपला इतिहास विसरतो, तो देश कधीच विश्वाच्या संघर्षात टिकू शकत नाही. हिंदुस्थानला
राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हाच मार्ग
स्वीकारावा लागेल. हिंदू मध्ये पौरुषत्व, राष्ट्रीयत्व, स्वराज्याची
रग-धग, साहस, शौर्य, चैतन्य निर्माण करणारा हा मार्ग आहे. ज्याप्रमाणे मुघलांनी मंदिर पाडून
मशिदी उभ्या करून एक विषारी डंख भारतमातेच्या शरीरावर मारला. त्या डंखातील विष
मारण्याचे काम श्री शिवछत्रपतीनी केले. म्हणजे मुघलांनी बांधलेल्या मशिदी पाडून पुनश्चः मंदिरे उभारली. आणि भारतमातेला हिंदवी स्वराज्याचा
सूर्यप्रकाश दाखवला. म्हणूनच कवी भूषण म्हणतात, "सिवाजी
न होते तो, सुन्नत
होत सबकी ."
'संभाजीजाळ' तद्वत 'शिवसूर्यजाळ' |
निर्मुनी हिंदूहृदयी बनू
म्लेंच्छकाळ |
हे हिंदूराष्ट्र करुनी यवनांतकांचे |
संकल्प पूर्ण करु या
शिवभूपतींचे ||
- संपादकीय
- संपादकीय
व्वा...
ReplyDeleteजगदंब