( श्री कांचीकामकोटि पीठाचे पीठाधीश गुरुवर्य शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती हे अनंतात विलीन ) |
"श्रध्येय 'धर्म' म्हणजे काय?" हा प्रश्न मी शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना एकदा विचारला. आजवर इतक्या सोप्या, सरळ आणि अत्यल्प शब्दात मला
कुणीही उत्तर दिले नव्हतं ; त्यांचे
उत्तर होते,
"धर्म म्हणजे कर्तव्यपरायणता"
त्या उत्तरा नंतर मी थोड़ा
अनपेक्षित भावाने श्री शंकराचार्यांकड़े पाहू लागलो, बहुतेक त्यांना कळले असेल की
मला ते उत्तर समजले नाही. पुढील क्षणात ते बोलले एका व्यक्तिचे स्वतःचे परिवार, समाज, देव आणि राष्ट्राप्रती जी
हितकारक कर्तव्य म्हणजे 'धर्म' आहे आणि त्यांच्या पूर्ततेकरिता
सदैव झटत रहाने म्हणजेच 'धार्मिक' किंवा 'धर्मनिष्ठ' असणे आहे.
आज
सकाळी जेव्हा ही अत्यंत दुःखद बातमी कळाली की; श्री कांचीकामकोटि पीठाचे
शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे निधन झाले. प्रथमतः विश्वासच बसला नाही.
म्हणुन दुरचित्रवाहिनी वरील सगळ्या बातम्या देणाऱ्या वाहिन्या बघितल्या पण सगळीकड़े अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंतिमदर्शानाच्या बातम्यांचे अधिराज्य होते, खुप वेळे नंतर कुठे तरी एका
कोपर्यात शंकराचार्य यांच्या निधानची बातमी काही सेकंदा करिता आली, आणि योग्यच होते
धर्मनिरपेक्षतेच्या अफुच्या गोळीने बेधुंद झालेल्या या बहुसंख्य धर्मनिरपेक्ष हिंदू समाजाकरीताच जर शंकराचार्य महत्वपुर्ण नसतील तर त्यांच्या मृत्युची बातमी
दखावण्यास का कुणाला रस राहणार आहे ? पण आहेत; काही धर्मनिष्ठ लोक
ज्यांची मनं ही बातमी दुःखी झाली असतील.
शंकराचार्य
जयेंद्र सरस्वती हि काही सामान्य हस्ती नव्हे. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी आपल्या
बुद्धीचातुर्यावर, वेद, पुराण, हिंदू धर्मशास्त्र बाबतीत
असलेल्या प्रचंड ज्ञानाच्या जोरावर पीठाधीश पद भूषविण्याचे भाग्य त्यांना लाभले.
बहुत लोक
मिळवावे। एक विचारे भरावे।
कष्ट करूनी
घसरावे। म्लेंछावरी।।
समर्थ रामदास स्वामींच्या या
ओळींप्रमाणे शंकराचार्यांच्या नेतृत्वात कांचीकामकोटि पीठाने ख्रिश्चन आणि मिशनर्यांच्या
धर्मविस्ताराच्या वादळाशी फक्त झुंजच दिली नाही तर आजवर कितीतरी ख्रिश्चन धर्मात
धर्मांतरीत झालेल्या हिंदूना पुन्हा विधी पुर्वक हिंदू धर्मात सामिल करुण
घेतले. परंतु त्यांचे हे कार्य ख्रिश्चन आणि म्लेंच्छ सत्तांच्या डोळ्यात
खुपनारे होतेच. त्याचे परिणाम कितीही भयंकर असले तरी, वेळे प्रसंगी तुरुंगात जावे
लागले तरी त्यांनी आपले धर्मकार्य अबाधित सुरु ठेवले. बाबरी विध्वंस असो किंवा
तिरुपति बालाजी मंदिरातील ख्रिस्ती लोकांची लुडबूड़ बंद करणे असो, श्री जयेंद्र
सरस्वतींनी आपली 'कर्तव्यपरायणता' सिद्ध केली आहे. पैसापायी हिंदू
धर्माचा आधार घेऊन उपदेश करणार्या धोतांड मंडळीचा बाजार आपल्याला कलियुगात दिसतोच.
पण समर्थ रामदास स्वामींनी म्हंटले आहे कि,
महंतें महंत करावे। युक्तिबुद्धीने भरावे।
जाणते
करून विखरावे। नाना देशीं।।
समर्थांच्या या युक्तीप्रमाणेच आचार्य शंकराचार्य जीवन
जगले. ज्या प्रमाणे हिंदू धर्म कर्तव्यासाठी ते जगले त्याच प्रमाणे आधी केले मग
सांगितले...त्यांनी केलेल्या या हिंदू धर्माप्रती कर्तव्यासाठी ते भगवद चरणी
पोहचलेच असतीलच यात शंका नाही...शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वतींनी सांगितलेल्या 'धर्म'
म्हणजे 'कर्तव्यपरायणता' या
शिकवणीचे पालन करण्यचा निर्धार प्रत्येक हिंदूने करणे हिच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल....!!!!!
- धारकरी विशालराव शर्मा,
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (मलकापूर विभाग)
No comments:
Post a Comment