जुचंद्र पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील 'हिंदु - आगरी' लोकवस्ती असलेलं हे गाव तसे रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तसच इथे उत्साहात साजरा केल्या जाणारया पारंपारिक सणांमुळे हि प्रसिद्ध आहे.
हे गाव मुंबईपासुन (पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनच्या पुर्वेस) असलं तरी आणि गावा शेजारी बाहेर येणारया लोंकाची वस्ती वाढत असली तरी संस्कृती परंपरा टिकवुन आहे. त्याच परंपरेतील येथे साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी.
(होळी दहनाच्या आधी केली जाणारी पूजा) |
इथल्या स्थानिक आगरी बोली भाषेतील 'हावली' हा वलय माता किंवा हावलुबाय (बाय म्हणजे मोठी बहिण) असं संबोधलं जातं. होळी पौर्णिमा पुर्वी दहा दिवस अगोदर गावभर गल्लीगल्लीत लहान मुलांच्या होळी लावल्या जातात. मुख्य होळ्या दोन दिवस लावल्या जातात. पहिल्या दिवशीच्या होळीला कोंबड्या बांधण्याची पद्धत आहे. म्हणुन तील कोंबडी होळी किंवा कोंबर हावली असे म्हणतात. तर दुसरया दिवशीच्या होळीला मोठी हावली असं म्हणतात. पुर्वी पासुन आलेली एक गाव एक होळी हि पद्धत आजही इथे जोपासली जाते. होळीसाठी लागणारं झाड खास मानपान देऊन जंगलात आणलं जात. गावच्या वेशीवर आल्यावर त्याला सजवुन गाडीत बसवुन बॅंडबाजाच्या तालावर नाचत गाजत गावभर फिरवलं जातं. या मिरवणुकीत स्त्री-पुरुष अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
(चित्रकार शैलेश केदारनाथ पाटील यांनी काढलेले अप्रतिम चित्र ) |
या हावलुबायच्या पुजेचा मान परंपरेपासुन म्हात्रे कुंटुबियांकडे चालत आलेला आहे. त्यात गावात नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला हि सहभागी केलं जातं. व इतर नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांनी हावलुबायला प्रदिक्षिणा घालण्याची पद्धत आहे. होळी हा मुख्यता खाण्यापिण्याचा सण समजला गेला असला तरी इथे मात्र होळीचा खास उपवास पकडला जातो. प्रत्येक घरात पुरणपोळ्या, केल्या जातात. रात्री होळीच्या होमात पोळी, नारळ, उस अर्पुनच उपवास सोडला जातो.
पुर्वी ग्रामीण भाग असल्याने होळीसाठी प्रत्येक घरातुन लाकुड आणि हार नेण्याची पद्धत होती. मधल्या काळात बर्याच गोष्टि बदलल्या मात्र उत्साह तोच. आजही इथल्या महिला पारंपारिक गाणी गातात, नाचगाणी, मनोरंजनाचे कार्यक्रम यातुन सण उत्तरोत्तर इतका रंगत जातो कि रंगपंचमीचा दिवस कधी उजाडतो हे कळत देखील नाही.
लेखक - चित्रकार शैलेश पाटील
(जुचंद्र)
No comments:
Post a Comment