|
( माणगाव तालुक्यातील तळेगावात लोकमान्य टिळकांच्या आदर्शावर कशाप्रकारे सुरु झाली 'एक गाव एक शिवजयंती') |
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य हे हिंदवी होते. हिंदू धर्म संस्थापक अशी ज्यांना उपमा दिली जाते ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराजांनी जन्मापासून मरेपर्यंत हिंदू धर्म संस्कृती, सण, प्रथा, परंपरा यांचे फक्त पालन केले नाही तर ते आचरणात देखील आणले. तसेच लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी लोकांनी भेद विसरून एकत्र यावे, संघटीत व्हावे तसेच शिवरायांचा आदर्श व प्रेरणा घेऊन शत्रूविरोधी लढावे म्हणून 'एक गाव, एक शिवजयंती' सुरु केली. म्हणूनच त्यांचा जन्मोत्सव हा शिवरायांच्या तिथीला व लोकमान्य टिळकांच्या विचारधारणेला स्मरून झाली पाहिजे. आज सर्वत्र खेड्यापाड्यात एकाच गावात अनेक शिवजयंती साजरी केल्या जातात. पण या विचारला शह देत माणगाव तालुक्यातील तळेगाव ने लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन एक गाव एक शिवजयंती साजरी केली. फाल्गुन कृ. ३ शके १९३९ रोजी म्हणजेच आंग्ल दिनांक ४ मार्च २०१८ ला हि एक गाव एक शिवजयंती मोठ्या थाटात पार पडली. यावेळी संपूर्ण गाव सांस्कृतिक पद्धतीने सजून शिवजयंती उत्सवात सामील झाला. यावेळी १००० हून जास्त गावकरी सामील झाले.
|
( शिवभक्त सुजित पाशिलकर) |
छत्रपती श्री शिवाजी महाराजंची प्रेरणा आपल्या उरी, मनी, ध्यानी ठेवून हिंदू समाजासाठी शक्ती उत्पन्न करण्याकरिता ३ मार्च रोजी गावातल्या तरुणांकडून शिवतीर्थ रायगडहून शिवज्योत आणण्यात आली. यादरम्यान तळा तालुक्यात प्रथमच रायगड पायथ्यासून ४ किलोमीटर अंतर नंतर पुढे माणगांव पर्यंत २६ किमी. न थांबता मशाल दौडत घेऊन येण्याचा शिवभक्त सुजित पाशीलकर यांनी विक्रमच केला दुसर्या दिवशी म्हणजेच ४ मार्च ला शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. शिवज्योत दुचाकी फेरी ने सकाळी मानाने गावात आणण्यात आली. त्यानंतर शिवरायांच्या आरती ने शिवज्योतीची सांगता झाली. सायंकाळी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
|
( पारंपारिक वेशात गावकरी ) |
यामध्ये आपल्या लाडक्या राजाला मानवंदना देण्यासाठी लेझीम पथकाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये केवळ तरुणच नव्हे तर प्रौढ सुद्धा आनंदाने सहभागी झाले. त्याच प्रमाणे शिवभंडाराचे हि आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सांगता हि रायगडाने पाहिलेले शिवछत्रपती आणि ३२ मण सुवर्ण सिंहासन या व्याखानाने झाली.
No comments:
Post a Comment