धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आपले पिता पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजाप्रमाणेच हिंदवी स्वराज्याकरिता संपूर्ण आयुष्य अखंड अविरत जगले, लढले, झगडले. हिंदू धर्मासाठी त्यांनी अत्यंत दाहक यातनेचे मरण हि स्वीकारले. औरंगजेब ने पकडल्या क्षणापासून ते मरेपर्यंत त्यांना मृत्यू समान दाहक यातना दिल्या. त्या सर्व यातना त्यांनी सहन केल्या पण हिंदू धर्म सोडला नाही. सरतेशेवटी फाल्गुन अमावस्येला त्यांनी आपला श्वास ह्या हिंदू धर्माकरिता सोडून दिला. हे दाहक मरण त्यांनी आपल्यासाठी स्वीकारले. ते अखंड हिंदू समाजाचे पिता आहेत. आणि आपल्या पित्याने सहन केलेल्या या यातनेसाठी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या आपण सुतक पाळणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी आपआपल्या विभागात सामूहिकरीत्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात. धर्मवीर संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी येथील पिरंगुट विभागाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
कशासाठी आणि मरावे कसे मी? |
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी |
लढू पांग फेडावया धर्मभूचे |
आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे ||
- गुरुवर्य आ. संभाजीराव भिडे
(वढू-बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी) |
नवनाथ पवळे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पिरंगुट (मुळशी )
No comments:
Post a Comment