( श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर विभागच्या धारकर्याने पटकवला कवितेत प्रथम क्रमांक त्याचे यश आणि कविता पुढील प्रमाणे) |
मुक्त व्यासपीठ या संस्थेकडुन आंतरजालिय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातुन अनेक कवीं या स्पर्धेत सहभागी होते. परिक्षकांनी त्यातील २४ कवितांची निवड केली. या २४ कवितांमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर विभाग मधील अक्षयराव कट्टी यांची सैनिकी व्यथा मांडणारी कविता हि निवडण्यात आली. या स्पर्धेत आंतरजालावरील मतदानाच्या आधारे पहिले ५ उत्तम कवी निवडले. त्यातील अक्षय कट्टी यांच्या कवितेला १५८५ इतकी मते मिळाली. महाराष्ट्रभरातुन रसिक, धारकरी आणि अभाविप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मत देउन अक्षय कट्टी यांच्या कवितेला प्रथम क्रंमाक मिळवुन दिला. या कवितेमध्ये अक्षयराव कट्टी यांनी सध्या हिंदुस्थानामध्ये सुरु असलेला वादविवाद या सर्वामध्ये दुर्लक्षित झालेला देशाचा रक्षणकर्ता, तारणहर्ता सैनिक यांच्या व्यथा मांडल्या आहेत. हि कविता हिंदू वार्ता ब्लॉग वर पुढील प्रमाणे सादर करत आहोत.
माझा राजहंस
साजण बोहल्यावर नाही आज सरणावर चढलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
जातीसाठी नाही तर मातीसाठी लढला माझा साजण
मागुन सुद्धा असं मिळत नाही मरण
तिरंग्याचा अंतरपाट त्याच्या देहावर घातलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
शत्रूच्या गोळ्यांचा अलंकार त्याने केलाय
ऱक्ताच्या हळदीने देह पुनीत झालाय
वरमाईचा मान भारतमातेने घेतलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
वऱ्हाड्यांच्या डोळ्यात पाणी मांडव आहे शांत
अभिमान वाटतोय त्याचा आता मी का करु आकांत
अमर रहेच्या मंगलाष्टकांचा घोष वाढत चाललाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
त्याच्या नावचे कुंकु लावायचे स्वप्न मात्र राहुन गेले
लग्न न होताच विधवेचे जिणे सामोरे आले
देशप्रेमाचा खरा अर्थ आज तो शिकवुन गेलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
ऱचना : कवी कटाक्ष(अक्षय कट्टी)
(सूचना- कवितेचे सर्व अधिकार कविवर्यांकडे असतील. सदर कवितेसाठी संपर्क करा ९७६३८११४३७)
No comments:
Post a Comment