क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे...

( क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे या समर्थांच्या ओळी प्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , मुळशी तालुक्यातील पिरंगुट विभागाने धर्मवीर ज्वाळा सायकल यात्रा हा उपक्रम पूर्ण करून हिंदू समाजापुढे केवळ भक्ती करणे नव्हे तर ती सत्यात उतरवण्याचा एक वेगळा आदर्श समाजाला दिला )


            शिवछत्रपतिं रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासुन शेवटचा श्वास सोडेपर्यंत देव-देश-धर्मासाठी अखंड झुंजत, झगडत, दौडत राहीले. त्यांनी अथक, अविरत कष्टातुन हिंदवी स्वराज्य योग साधला. अगदी त्याच मार्गावरती चालुन धर्मवीर छ.संभाजी महाराजांनी नऊ वर्षांच्या राजकीय कालावधीत आपल्या मस्तकी काटेरी मुकुट धारण करुन हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली. आणि आपला धर्म टिकविण्यासाठी क्रुर औरंग्याच्या अत्याचारी, अनन्वित छळास न डगमगता सामोरे जावुन प्राणार्पन केले.
          त्यांचे बलिदान हिंदुमनात सतत धगधगत रहावे, त्यांच्या म्रुत्युचे शल्य सदैव हिंदु ह्रुदयात टोचत रहावे म्हनुन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास गावोगावी पाळला जातो.

            दि.१० मार्च २०१८ रोजी मुळशीतील धारक-यांनी एक अभिनव उपक्रम पुर्ण केला. धर्मवीर ज्वाला सायकल वरती जावुन संभाजी महाराजांच्या समाधीस्थळापासुन पिरंगुट मध्ये आणली.
कधी ना कधी देव देईल भेटी |
तपाने धरावे स्वत:लाच वेठी |
हरी अन्य नाही स्वत:हुन जाणा |
वसे सद्गुणांच्या रुपे देवराणा ||
        आ. संभाजीराव भिडे गुरूजींच्या या श्लोकाला स्मरुन तरुणांनी शिवछत्रपति संभाजी महाराजांसारखे कष्टप्रद जीवन अंगीकारले पाहीजे, सुखासिनता लाथाडली पाहीजे. घरी बसुन देव शोधण्यापेक्षा तपश्चर्या करुन महापुरूषांचे सद्गुण अंगिकारले पाहीजेत. तरच आपणांस हरीदर्शन होईल. हाच भाव मनात ठेवुन मुळशीतील ५२ धारक-यांनी धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी १२०कि.मी. सायकल वर जाण्याचा अट्टाहास धरला आणी तो पुर्ण केला. योगायोग म्हणजे आंग्ल दि.११ मार्चच्या पहाटे संभाजी महाराजांच्या समाधीची पुजा, तो सहवास आणी तेथील चिंतन हा एक विलक्षण योग होता. याच दिवशी १६८९ साली औरंग्यांने संभाजी महाराजांची क्रुर हत्या केली होती. अतिशय धीर- गंभीर वातावरणात पुजा सुरू असताना घेतलेले संभाजी सुर्यह्रदय, शिवसुर्यह्रदय, अभिषेक मंत्र हे श्लोक आम्हां उपस्थित धारक-यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणारे ठरतील.
         ज्वाला प्रज्वलित करुन पिरंगुटकडे मार्गस्थ होताना रस्त्यावरील अनेक गावातील धारक-यांचे ज्वालेचे स्वागत, प्रेम, सहवास, शुभेच्छा व सहकार्य राहीले. त्यात अनुक्रमे श्री.गणेशजी निम्हण, श्री.निखिल दादा निम्हण ,श्री.मोहन दादा सातव, श्री.क्रुष्णकांत सातव, श्री.प्रमोदजी सातव, श्री.राजेश दादा आव्हाळे, वढु मधील नवनाथ कुंभार, श्री.अविनाश बापू मरकळे आणी यांचे सर्व सहकारी सहभागी होते. पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सायकलयात्रा आल्यावरती श्री.संजयबापु जढर, प्रा.पराशर मोने, श्री.अविनाश मरकळे, राकेश गुंड हे सर्वजण आवर्जुन उपस्थित होते. तिथेही स्मारकास अभिवादन करुन ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली.
        सदरच्या सायकल यात्रेचा मुख्य हेतु म्हणजे कोणतीही गोष्ट सांगुन, बौद्धिक घेवुन, व्याख्याने देवुन, परिसंवाद भरवुन चालत नाही. आधी केले मग सांगितले या उक्तिप्रमाणे समाजा समोर प्रत्यक्ष कृतीतून तो संदेश देणे हेच महत्वाचे असते. आदरणीय संभाजीराव गुरूजींनी घडवलेला श्री शिवप्रतिष्ठानचा धारकरी कृतीविन वाचाळ हिंदु नसावा याच हेतुने काम करत असतो. आमची खात्री आहे या तपश्चर्येतुन एक ना एक दिवस आम्हा धारक-यांना हरी दर्शन होणार. म्हणजेच शिवछत्रपति-संभाजी महाराज सद्गुणांच्या रुपाने आमच्या उरात वास करणार हे नक्की; असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुळशी धारकर्यांनी व्यक्त केले.


Share:

Related Posts:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

82212

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)