मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी. "हो मी धारकरीच कारण की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मला धारकरी बनवलं आहे. ' श्रीप्रतापगड ते श्रीरायरेश्वर (मार्ग जावळी अरण्य)' ही माझी पहिली मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे श्रीरायरेश्वर, आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला ते ठिकाण म्हणजे श्रीप्रतापगड.
माझी हि पहिलीच मोहीम. मोहीमेबद्दल सर्व धारकऱ्यांच्या तोंडून अनुभव ऐकायला उत्सुक होतोच पण जास्त उत्सुकता गुरुजींच्या दर्शनाची होती. लाखो धारकऱ्यांसोबत आणि गुरुजींसोबत मी ही पाच दिवसाची मोहीम करणार होतो आणि अनुभवनणार होतो. हा अनुभव अभूतपूर्व होता. कारण मी असे कधी अनुभवलेच नव्हते.
पनवेल वरून आमची बस मुक्कामी उशिरा पोहोचल्यामूळे आम्ही पार गावात मुक्कामाला उशिरा पोहोचलो. शिदोरी उघडली. थोडेसे खाल्यावर असह्य थंडीत थकव्याने झोप लागली.
सकाळी ४ च्या सुमारास महाजन गुरुजींच्या मधुर आवाजातील 'उठा उठा सकळीक' असे बोल कानावर पडले. पण थंडी मुळे पांघरूण अंगावरुन काढायची हिम्मत होत नव्हती. पुन्हा महाजन गुरुजींच्या मधुर आवाजाने गीत सुरू झाले 'ही अनादी भरत भु ही अनादी संस्कृती' हे गीताने गुरुजी सर्व धारकऱ्याना उठवत होते हे मी पहिल्यांदाच अनुभवले होते. आई जशी आपल्या मुलांना उठवते ती माया मी अनुभवली. सर्व धारकरी सूर्यनमस्कार व जोर बैठकासाठी सज्ज झाले होते. धारकरी आपले अंगावरचे कपडे काढून सूर्यनमस्कार मारत होते. एवढ्या थंडीत ही भिडे गुरुजी व धारकरी सूर्यनमस्कार व जोर बैठका मारत होते. मी ही सूर्यनमस्कार व बैठका मारले. त्यानंतर गुरुजींच्या काही सूचना कानावर पडल्या आणि ध्वज निघाला. त्यामागे सर्व धारकरी चालू लागले. आम्हीही सर्व आवरून निघालो. बॅग खूपच वजनदार होती. परंतु वयाने १० ते १२ वर्षाच्या लहान-लहान धारकर्यांना आणि ८० च्या वर वय असलेल्या भिडे गुरुजींना पहिल्यावर बॅगचे वजन जाणवले नाही. आम्ही थोडं थांबत, थोडं आराम करत चालत होतो पण गुरुजी मात्र न थांबता मुक्कामा जवळ पोहोचले. आम्हाला वाटेत अनेक ठिकाणाहून आलेले धारकरी भेटत. त्यांचा सोबत विचारपुस करून पुढे चालत होतो. दुपारचे जेवण खाऊन परत मार्गस्थ व्हायचो व मुक्कामी पोहोचायचो. त्या दिवशी मुक्कामी सु.ग.शेवडे गुरुजींचे हिंदू धर्म व साहित्य या विषयावर व्याखान झाले.
गुरुजींनी सर्व धारकऱ्याना श्रीरायरेश्वरला जाऊन शपथ घेण्याचा आदेश दिला होता. तो आदेश असा होता की आपण यापुढे कोणतेच व्यसन करणार नाही अशी शपथ आपण श्रीरायरेश्वरावर घेणार आहोत. सर्व तरुण मंडळी श्रीशिवजी व श्रीसंभाजी रक्तगटाची व्हावीत यासाठीच चाललेला हा खटाटोप. त्यासाठीची गुरुजींची ही तळमळ....!
पुन्हा सकाळी सूर्यनमस्कार व जोर बैठका असा व्यायाम झाला. मिलिंद दादा तनवडे यांच्या आवाजात
एक मात्र चिंतन आता एकची विचार । भाग्य पूर्ण होईल केव्हा हिंदुभूमी थोर । हे गीत मी ओडीओ स्वरूपात ऐकलं होत पण प्रत्यक्षात ऐकल्यावर अंगावर काटा आला. मोहिमेत चालत असताना राष्ट्रभक्तीधारा मधील गीत, श्र्लोक, पद्य घेत असताना वेगळीच ऊर्जा मिळत होती. मोहिमेत एका ठिकाणी श्री संदीपराव (दादा) भिंगुर्डे यांनी मोहीम काय असते ते सांगितले, श्री शिवछत्रपतीच्या मोहिमा त्यांचे युद्धतंत्र आणि युद्धतंत्राचा वापर जगातील मोठं मोठे देश व त्याचे लष्कर सैन्य शिवयुद्धनितीचा कशा प्रकारे वापर करत असे याबद्दल उत्तम माहिती दिली. तिसऱ्या दिवशी मुक्कामी श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी गोमातेचे महत्त्व सांगितले. फार छान वाटले त्याना ऐकल्यावर माझ्या आयुष्यात गोमातेचे महत्व आजून वाढले. आ. भिडे गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवण्याचा योग मला लाभला. मोहिमेला आल्याचे मला फळ भेटले. गुरुजींचे दर्शन घेऊन मी तृप्त झालो. त्या दिवशी गुरुजींचे दर्शन झाले, आनंदाने रात्री झोप शांत लागली आणि थंडी पण जाणवली नाही.
रायरेश्वरच्या पायथ्याशी आजून ३-४ सांगलीचे धारकरी भेटले. त्यांच्या सोबत रायरेश्वरवर जाण्याचा प्रयत्न केला पण गर्दी खूप असल्याने वर जाणे झाले नाही मग आम्ही पायथ्याशीच मुक्काम करायचे ठरवले. आपली शिदोरी सोडली थोडी फार खाऊन झोपण्याची तयारी केली व झोपी गेलो.
पाचवा दिवस समारोपाचा दिवस समारोपाच्या ठिकाणी पोहोचताच तेथे पनवेलचे बाकीचे धारकरी भेटले मग आम्ही डोक्यावर फेटे बांधून पनवेलच्या बाकी धारकाऱ्यांसोबत थांबलो, संदीपदादा जायगुडे यांच्या आवाजातील लववेना हे शीर माते हे पद्य त्यातले एकेक शब्द एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं. थोड्या वेळाने समारोपाचा कार्यक्रम सुरू झाला
गुरुजींनी समारोपाच्या भाषणात सांगितले; "आपली धरती,आपली माती आपली संस्कृती, आपला धर्म, आपले पूर्वज आपल्या परंपरा, आपले आदर्श, आपला इतिहास, याबद्दल आपल्या अंतःकरणात अति अति अति प्रमाणापेक्षा तीव्र अभिमान असला पाहिजे तरच त्या व्यक्ती मध्ये राष्ट्रीयत्व येईल. राष्टीयत्वाची भूक हिंदूंच्या तांबडया-पांढऱ्या पेशीत, डाव्या-उजव्या काळजात,लहान-मोठ्या मेंदूत रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवनं, बिंबवणे आणि निर्माण करणे हे खरं देशाला राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती या गडकोट मोहिमांमध्ये आहे. ३५० वर्षांपूर्वी श्रीशिवछत्रपतींनी हे काम केलंय ज्यामुळे आज आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत."
शेवटी इतिहास सांगताना गुरुजींच्या डोळ्यांत आलेलं पाणी आणि आम्ही ऐकत असताना आमच्या अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले गुरुजी जे सांगत होते ते चित्र समोर दिसत होतं सर्जेराव जेधे त्यांचा १८-१९ वर्षाचा मुलगा नागोजी जेधे लढाईत धारतीर्थ पडले हे जेव्हा सर्जेराव जेध्याना कळलं तर ते आले त्यांच्या मुलाच्या अस्ति आपल्या एका मावळ्यासोबत पाठवले आणि ते महाराजांसोबत लढायला मोहिमेत सामील झाले. काय ती निष्ठा, काय तो त्याग. भारत मातेचा विस्कळीत झालेला संसार मार्गी लावण्यासाठी आशा अनेक मावळ्यांनी आपले रक्त या मातीत सांडले आहे आणि आपण मात्र एशो-आरामात आपलं जीवन जगत आहोत, पण आता पुढचं जीवन आपलं घर-दार सांभाळून देव देश आणि धर्मासाठीच देणार असा निर्धार केला आहे. गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे हिंदू धर्मासाठी श्रीशंभूछत्रपतींनी दिलेलं बलिदान आपण विसरता कामा नये आपण जेवढया उत्साहात शिवजयंती साजरी करतो तेव्हढ्याच निष्ठेने शंभूराजे धर्मवीर बलिदान मास पळायचं आहे जिथं सूर्य उगवतो अशा प्रत्येक गावात ते झालं पाहिजे. आणि त्याचा प्रचार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. उभा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याची उपासना, म्हणजे हिंदुराष्टाची उपासना म्हणून आपण महाराष्ट्र संभाजी महाराजांचं धर्मवीर बलिदान मास पाळणारा समाज तयार करण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे.
शिवबासंभाजी बीजमंत्र पुरुषार्थदाता ।
गांढयाळ वृत्ती अवती क्षणी भस्मकता ।
हा बीजमंत्र जरी चित्ती क्षणी धरेल कोणी ।
येऊन राहतील उभय उरी खडगपणी ।।
या मोहिमेतुन भरपूर काही शिकायला मिळालं त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करता येईल याकडे आमचं लक्ष राहील
भगव्या ध्वजास्तव लढू रणी शत्रू मारू ।
झुंझोनी लाख समरे आम्ही धर्म तारू ।।
खाली न खड्ग कधींही कधीं ठेवनार ।
शिवपुत्र पाईक आम्ही जग जिंकणार ।।
श्री मिथुनराव बळीराम म्हात्रे, धारकरी
पारगाव पनवेल विभाग
जय श्रीराम
ReplyDeleteजय श्रीराम दादा
ReplyDeleteजय श्रीराम दादा
ReplyDeleteजगावं कसं, मरावं कसं आणि आम्हाला कशाचं वेड असावं हे मोहीम अर्थात ही सह्याद्रीच्या कुशीत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक वीरांच्या पराक्रमाच्या धैर्य व पराक्रमाची साक्ष ही भूमी आणि भरलेली ही धारातीर्थी यात्राच देऊ शकते
ReplyDelete