आशीर्वाद देण्यापेक्षा हिंदवी स्वराज्यातील गड मिळवणे हे त्यांना महत्वाचे वाटले.

देव देश धर्मामध्ये झोकून काम करणारी व्यक्ती हि वेगळीच असतात. त्यांचा प्रवाह हा इतिहासापासून वर्तमान नव्हे तर भविष्यकाळापर्यंत वाहतच असतो. संसार-प्रपंचाचा त्याग करून अखंड हिंदू धर्म टिकवणारी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीने पाहिलीच नव्हे तर हि माती त्यांच्या रक्ताने पावन झाली. या मातीचे सौख्य राखणारा राजा व त्याची प्रजा जगाने ३५० वर्षानंतर पाहिलाच नाही. तो राजा म्हणजे साक्षत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. जगाने एकमेव असे छत्रपती पाहिले ज्यांच्या एका शब्दा खातीर त्यांच्या मावळ्यांनी अखंड हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण त्यागले. घरा-दाराचा त्याग करून या हिंदवी स्वराज्याचा पाया या मावळ्यांनी भक्कम केला. शिवछत्रपतींचा हर एक मावळा भावनेपेक्षा कर्तव्याला नेहमी जास्त महत्व देतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे.
  सुभेदार तानाजी मालुसरे  हे मुळचे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावाचे. लहानपणापासून शिवरायांसोबत असल्याने ते शिवरायंचे सवंगडी होतेच पण त्याही पेक्षा  विश्वसनीय मावळा होते. अफजल खानच्या सैन्यावर तुटून पाडण्यामध्ये इतर मावळ्यामध्ये तानाजी मालुसरे हि होते. स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचा हि हात होता. महाराजांनी जेव्हा कोकण प्रांतात संगमेश्वर काबीज केले तेव्हा तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. ज्यावेळी सुर्वे संगमेश्वर चालून आले तेव्हा शत्रू डोळ्यासमोर असताना पिलाजी सारखे पळून जाणे त्यांनी स्वीकारले नाही. अश्या पराक्रमामुळेच रायगडाच्या बाजूलाकोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी त्यांच्यावर सोपविली. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. त्यानंतर त्यांचे नाव स्मरणात राहिले ते एका प्रसंगाने. घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असताना त्याला आशीर्वाद देण्यापेक्षा हिंदवी स्वराज्यातील गड मिळवणे हे त्यांना महत्वाचे वाटले. कारण त्यांना ठावूक होते, जर हे लग्न आधी केले तर भविष्यात हिंदू चा निकाह होईल. हा हिंदू रक्षण्यासाठी इतका मोठा त्याग हा शिवरायांच्या पदरीच पाहायला मिळतो.
         आपला मुलगा रायबा याचे लग्न ठरवून ऐन लग्न काही दिवसावर असताना पत्रिका देयला दरबारी ते पोहचले. आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय उद्गारले, “ आलो असतो पण...”
या ‘पण’ शब्दाला जागून जिजाऊच्या इच्छा आकांक्षापोटी  जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.  “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे” असे धाडस केवळ आणि केवळ देव देश धर्मासाठी वाहिलेली लोकच करु शकतात. त्यागसमर्पण आणि स्वामीनिष्ठा या सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे सुभेदारसाहेबांचे हे शब्द!

या युद्धात तानाजीराव पडले आणि मावळे सैरावैरा पळू लागले. त्यावेळी तानाजीरावांचे कनिष्ठ बंधू सुर्याजीराव यांनी माघारी पळणाऱ्या मावळ्यांना उद्देशून म्हटले, "दोर कापलेले आहेतकड्यावरून पडून मरण्यापेक्षा इथं लढून मरा." 

आपला सख्खा ज्येष्ठ बंधू काही क्षणांपूर्वीच रणांगणात धारातीर्थी पडलेला असताना सुर्याजीरावांनी उच्चारलेले हे शब्द म्हणजे टोकाच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि धैर्याचे प्रकटीकरण आहे.

तानाजीराव पडले पण सिंहगड स्वराज्यात आला. प्रसंगी प्राणांची बाजी लावून सुभेदारांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला. महाराज तातडीने गडावर आले पण गड जिंकल्याचा त्यांचा आनंद क्षणार्धात मावळला कारण तानाजीरावांच्या बलिदानाचे वृत्त त्यांना समजले. त्यावर महाराज बोलले, "गड आला पण माझा सिंह गेला."

"आधी लगीन कोंढाण्याचंमंग माझ्या रायबाचं."

"दोर कापलेले आहेत."

आणि "गड आला पण माझा सिंह गेला." 

मराठी भाषेमध्ये वैशिष्ठय प्राप्त झालेले हे तीन उद्गार तानाजीरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवतील आणि येणाऱ्या मराठी भाषिक पिढ्यांना राष्ट्रभक्तीपराक्रम त्याग आणि समर्पण याचा संदेश देत राहतील यात शंका नाही.

आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला।
मुलाचे त्यजून धाव घेई गडाला।
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला।
मराठा म्हणावे अशा वाघराला।।
- आ. श्री संभाजीराव भिडे गुरुजी (श्लोक)



(श्री पराशरदादा मोने (पुणे ) यांच्या लेखातील काहीसा भाग घेण्यात आला आहे. ) 






-- 

Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive