शक्ती उपासकांचे पुण्यस्मरण

(समर्थ रामदास स्वामी )
(सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे )
आज माघ कृ. नवमी म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी नवमी तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी.  समर्थांनी आपल्या हयातीत राष्ट्र व धर्म संरक्षणासाठी तरून पिढी शत्रूविरोधी लढण्यास  सक्षम बनवण्यासाठी व्यायामचे महत्व ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ११००  च्या वर जागोजागी मठ तसेच व्यायाम शाळा काढल्या. सुभेदार  नरवीर तानाजी मालुसरे शत्रू विरोधी  लढता लढता धारातीर्थ पडले. त्यांचा देह हा जिद्द तसेच इच्छा शक्ती युक्त असा बलवान होता. ह्या दोन महापुरुषांची शिकवण व आठवण म्हणून आज सांगली मधील  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टा शहर यांचेवतीने जोर मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आ. संभाजीराव भिडे गुरुजी हे नेहमी तरुणांना व्यायाम व कुस्तीचे महत्व सांगतातच नव्हे तर आचरणात आणतात.
(स्पर्धेतील क्षण चित्रे )


श्री समर्थ रामदास स्वामी व श्री नरवीर तानाजी मालुसरे हे शक्तीचे उपासक होते म्हणूनच आज त्यांचे पुण्यस्मरण म्हणून आ. संभाजीराव भिडे गुरुजींच्या धारकर्यांनी त्यांच्या शिकवणीला अनुसरून या स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धेत १०० च्या वर युवकांनी सहभाग घेतला. 


स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजवर्धन सुर्यवंशी (१,२१३ जोर) पटकवला तर , द्वितीय क्रमांक प्रशांत जाधव (१,०२५ जोर), तृतीय क्रमांक रोहित भानुसे (१,०१६ जोर) यांनी मिळवला. 
 प्रथम ३ क्रमांकाना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन , तसेच १०० च्या वर जोर मारणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  तसेच लहान गटाने देखील सहभाग दर्शवला.  पहिल्या ३ क्रमांकाना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व १०० पेक्षा जास्त जोर मारणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.


Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive