Home »
» मोहीम मांडली मोठी....
नमस्कार,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजित धारातिर्थ गडकोट मोहिम नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली आहे. यंदाची मोहिम हि श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर(मार्गे जावळी अरण्य) अशी होती. हि मोहिम केवळ गड-किल्ले फिरणे नसुन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच धारातिर्थ मावळ्यांच्या रक्ताने पवित्र पावलेल्या मातीत देव-देश-धर्मासाठी जगण्या-मरण्याचे धडे घेणारा मार्ग आहे. या मोहिमेत अनेकांना वेगवेगळे अनुभव येतात. धारकरयांना जगण्याचा दृष्टिकोन बदलतात, देश धर्मा ची व्याख्या उमजते, वाईट संगती तर व्यसन सुटतात, काहिंना जगण्याचा हेतु स्पष्ट होतो. हे असे अनेक अनुभव उराशी घेऊन आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजींचा धारकरी देव-देश-धर्मासाठी जगत असतात. हे अनुभव इतरांना हि समजावे. इतरांना हि त्यातुन देव-देश-धर्माप्रती प्रेम, आस्था, कर्तव्य जागृत व्हावी. म्हणुन हिंदु वार्ता धारकरयांसाठी एक सदर घेऊन येत आहे. या सदरचे नाव आहे, 'मोहीम मांडली मोठी'
दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ हा दिवस नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीचा आहे तसेच १३ फेब्रुवारी २०१८ या दिवशी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी ६ मावळ्यांसह आत्मयज्ञ केला. त्यांच्या बलिदानाचे पुण्यस्मरण म्हणुन आम्हि हा सदर दोन आठवडे सुरु केला आहे. या अंतर्गत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकर्यांनी आपल्याला आलेल्या या मोहिमेच्या अनुभवाचे वर्णन आपल्या शब्दात करायचे आहे. तुमचा हा लेख काहींचे मन परिवर्तन करणारा ठरेल. त्यामुळे लेख पाठवुन आम्हाला सहकार्य करा.
धारातिर्थ मावळ्यांचा आदर्श आणि पुण्यस्मरण म्हणुन आपला अनुभव आमच्या पर्यंत पोहचवा. जेणे करुण इतर शिवपाईकांना पुढच्या वर्षी मोहिमेत येण्याची आवड निर्माण होईल. धारातिर्थ मोहिमेत सहभाग वाढवण्याचा हिंदु वार्ताचा हा छोटासा प्रयत्न राहिल.
टिप-
* अनुभव आम्हाला हिंदु वार्ताच्या ई-पत्त्यावर पाठवा.
* अनुभव आम्हि तुमच्या नावानिशी प्रसारित करु.
*तुमचा अनुभव तुम्हि तुमच्या शब्दात मांडा.
*शुद्धलेखनाची अथवा प्रमाण भाषेची अट नाही.
*शब्द मर्यादा किमान १०० ते अमर्याद.
*अनुभवासोबत तुमचा फोटो, नाव, पत्ता, व्यवसाय, विभाग,संपर्क पाठवणे.
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मध्ये किती वर्ष कार्यरत आहात हे जोडणे. (किमान एक मोहीम झाली असेल तरी आपण अनुभव पाठवू शकता.)
*तुमच्या अनुभवा सोबत तुमचा मोहिमेतील फोटो असल्यास अतिउत्तम.*दिनांक ९ फेब्रुवारी पर्यंत आम्हाला लेख पाठवणे.
-हिंदु वार्ता
hinduwarta001@gmail.com
No comments:
Post a Comment