( कोण कोणत्या यमयातना संभाजी महाराजांना कैदेत असताना दिल्या गेल्या असतील ? ) |
शंभुराजेंची अपमानास्पद धिंड औरंग्याच्या आदेशानुसारच काढलेली होती
शंभुराजेंना आसनरहित अशा उंटावर बसविण्यात आले व दोराने घट्ट बांधले व त्यांच्या तख्ताकुलाहला घुंगरं खुळखुळे बांधण्यात आले व कर्णे, शिॅगे व ढोल वाजवत धिॅड काढण्यात आली.
छावणीतल्या मुसलमानांना तो दिवस ईदच्या सणासारखा वाटला. शंभूराजांची अशी घोर विटंबना करण्यात आली. वाटेत कुणी उंटाला टोची, कुणी दगड मारी, तर कुणी शंभूराजांना अपशब्द ऐकवीत.
साकी मुस्तैदखान ह्या दृश्यांस मनोरंजन म्हणतो तर खाफीखान विजयसूचक व नगार्यांचा सुचक
म्हणतो.
अखेर दोन्ही कैद्यांना दरबारात आणले गेले. त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरुन खाली उतरला, अल्लाच्या कृपेनेच हा विजय आपल्याला लाभला या कृतज्ञभावनेने औरंग्याने बिछायतीच्या खाली येऊन जमिनीवर डोके टेकून अल्लाचे आभार मानू लागला .
'मसिरे ए आलमगिरी'चा लेखक साकी मुस्तैदखान त्यावेळी तिथे उपस्थित होता. हा प्रसंग पाहून त्याने पुढील काव्यपंक्ती औरंग्याबद्दल लिहिल्या....
"कुलाह गोशा बर आसमाने बरीन,
हनूज अज तवाजो सरश बर जमीन"
त्याचा अर्थ असा-
ज्याच्या मुकुटाचे टोक आकाशापर्यंत पोहचले आहे. पण त्याचे मस्तक मात्र परमेश्वराच्या आराधनेत जमिनीवर टेकले आहे असा औरंग्या
हे पाहताच शंभूराजे आणि कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिले. त्या जखडलेल्या स्थितीत शीघ्रकवी कवी कलश याने या प्रसंगी एक कवन रचून शंभूराजांच्या चरणी अर्पण केले .
"यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिँदूरसम खुब खेल्यो रनरंग ॥
जो रवि छवि लछत ही खद्योत होत बजरंग ।
त्यो तुव तेज निहारी ते तख्त तज्यो अवरंग ॥
अर्थ-
(रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते, त्याप्रमाणे शंभूराजास औरंगजेबासमोर बांधून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेँदूर शोभून दिसतो तसे घनघोर युध्दामध्ये रक्ताने अंग माखल्याने, हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सुर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिँहासनाचा त्याग केला आहे.)
औरंग्यापुढे उभे करण्यात आल्यानंतर इखलासखानाने मुजरा करण्यात सांगूनही शंभूराजांनी यत्किंचितही मान लवविली नाही. उलट संतप्त नजरेने औरंग्याकडे पहात होते. संतापलेल्या औरंग्याने त्यांना कैदेत टाकण्याचा हुकूम दिला. हालअपेष्टानंतरही शंभुराजेंचे ते अलौकिक रुप पाहून तो औरंग्या तख्त सोडून खाली उतरला व त्याने आमच्या धाकल्या धनींचे हे अलौकिक रुप पाहून त्यांना ताजीम दिली !
तेंव्हा त्या मृत्यु समोर असलेल्या अवस्थेतही कवी कलशांस वरील ओळी सुचल्या
त्या ऐकुन आमचे शंभुराजे सुद्धा आनंदित झाले असतील व म्हणाले असतील
"वाह, कविराज वाह ! काय तुमची प्रतिभा !
समोर मृत्य असूनही मराठे कधी झुकले नाहीत !
काय म्हणावं ह्या असीमित शौर्याला, त्यागाला नि पराक्रमाला !!!
मृत्यु समोर असूनही त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटताहेत ! ह्यालाच मराठ्यांचे तेज म्हणतात !!!
हा आहे आमचा पराक्रम व परमोज्वल इतिहास !!!
शंभुराजेंच्या स्वत:च्याच शब्दांत सांगायचं झालं तर
जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति।।
~धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज..
बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११
अर्थ-
धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जिवंत असून मृतवत् मानावे तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो !
दोन दिवसांनी औरंग्याने रहुल्लाखानामार्फत शंभूराजांना दोन प्रश्न विचारण्यात आले. "तुझे खजिने, जडजवाहिर कोठे आहे ? बादशाही सरदारांपैकी कोणी कोणी तुझ्याशी संपर्क ठेवला होता? शंभूराजांनी या प्रश्नांना उत्तर न देता औरंग्याला शिवागीळ केली .
औरंग्याला हे कळताच तो संतापला , त्याने आज्ञा केली की , 'यांचे डोळे फोडा , जीभ कापून टाका '
डोळे फोडा व जीभ कापा ही आज्ञा औरंग्याची आहे. ब्राह्मणांची नव्हे !
शंभूराजांच्या आणि कविकलशाच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या फिरवून त्यांचे डोळे फोडण्यात आले आणि नंतर त्या दोघांच्या जीव्हा (जीभ) कापण्यात आल्या. त्या दिवसापासून त्या दोघांनी अन्नपाणी वर्ज्य केले .
मुसलमानी सत्तांच्या परंपरेमध्ये यात नवीन काहीच नव्हते. त्यांच्या धर्मग्रंथात 'कुराणात' अत्यंत क्रूर व निर्दय पध्दतीने शत्रूंचा नायनाट करण्याची त्यांना धर्माज्ञाच आहे .
हत्येची आज्ञा
तीन मार्च ह्या दिवशी औरंग्याच्या मंचकारोहणाचे बत्तीसावे वर्ष होते व त्याच दिवशी शंभुराजेंचे वयही बत्तीसच होते ह्याच दिवशी औंरग्याने शंभुराजेंस व कली कलशांस हालहाल करून मारण्यांची आज्ञा दिली
शंभुराजेंचे डोळे काढले जीभ उपटली. कवी कलशाचीही जीभ उपटली. जीभ उपटण्याची व डोळे काढायची आज्ञा औरंग्याने बहादुरगड येथे पंधरा फेब्रुवारीलाच दरबारात दिली होती.
शंभुराजेंचा दुर्दायक अंत दाहक भीषण नि भयंकर दृश्य (A dire scene of Horror)
विभव नाम संवत्सर शके १६१० फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च, १६८९ ह्या दिवशी त्या दोघांचे प्राण अनंतात विलीन झाले
मुसलमानी इतिहासकार त्यांचं वर्णन खालील निंदनीय शब्दात करतात
"काफर बच्चा जहमी रफ्त"
म्हणजे संभा नरकात गेला
असं त्यांच्या मुस्लीम लेखकांचे वर्णन आहे
औरंग्याने शंभूराजेंस धर्मांतराची आज्ञा दिली की नाही ह्याबद्दल वाद करण्यांचं कारणच नाही कारण तो त्याच लायकीचा होता कारण तो धर्मांध म्हणूनच चिटणीस बखर सांगते की धर्मांतराची आज्ञा दिल्यावर शंभुराजेंनी उलट उत्तर स्वाभिमानाने व बाणेदारपणे दिले
ते म्हणाले
"बाटा म्हणता तरी ही गोष्ट घडावयाची नाही
ज्या अर्थी ह्या कैदेत आलो, तेंव्हा वाचणे ते काय ?? तुमचे विचारांस येईल ते करावे!
तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटितो"
(इथे बेटी द्यावी असे औरंग्यास महाराज म्हणताहेत ह्याचा अर्थ हे त्यांस निंदास्पद रीतीने बोलण्याचे व शिवी दर्शक आहे हे सुज्ञांस कळेलच. ह्यावरून जर कुणी त्यावर स्त्रीलंपटपणाचा आरोप करेल तर तो मूर्खच असेल. कारण कुठल्याही बापाला मुलगी मागणं व ते औरंग्यासारख्या शत्रुला मागणं हे अपमान करण्याचंच लक्षण आहे हे लहान पोराला देखील कळेल.)
ईश्वरदास नागर हा इतिहासकार लिहितो,
की त्यांचे कुर्हाडीने ह्रदय फोडले, शरीराचे तुकडे केले व कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले
आणि हे शक्यही आहे कारण औरंग्या इतका नालायकच होता कारण तो कट्टर जिहादी मुसलमान होता
ह्या सर्वांचं मुळ आहे ते कुराणात हे वर आपण पाहिलेलंच आहे.
जाॅर्ज बर्नार्ड शाॅ एकेठिकाणी ह्या अशाच एका क्रूरतेचे वर्णन करताना म्हणतो
A dire scene of Horror which no pen can trace nor rolloging years from the memories of ages efface.
असा दाहक भीषण नि भयंकर दृश्य की कोणतीही लेखणी ती आपल्या सामर्थ्याने टिपु शकणार नाही
स्मृतीची पानेही अशी की कितीही वर्षे झाली तरी ती पुसली जाणार नाहीत
औरंग्याच्या अशाच शिक्षांचा इतिहास
औरंग्याने अशाच प्रकारच्या अमानवी व नृशंस हत्या व अत्याचार आधीही अनेकांवर केलेले आहेत. औरंग्याने अशाच शिक्षा आधी तिघांना केल्या होत्या व त्याही कुराणानुसार हे स्पष्ट आहे
शीखगुरुंना दिलेल्या अतिक्रूर शिक्षा
औरंग्याने शीखांचे गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे दिवाण मतिदास, भाऊ सतिदास, दयालदास व गुरु दिता ह्यांना पकडले व ९ नोव्हेंबर, १६७५ रोजी सर्वांना शिक्षा देण्यात आंली. भाई मतिदासाला चांदणी चौकात आणण्यात आले व लाकडी फळ्यांची रचना मांडली व त्यावर त्यांना झोपविलं. त्यानंतर त्यांना लाकुड कापता, त्याप्रमाणे करवतीने डोक्यापासून पायापर्यंत कापण्यात आले व शरीराचे तुकडेतुकडे केले. दुसर्या दिवशी दयालदासाला तापत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आले व प्राण जाईपर्यंत मारण्यात आले व त्यांचे प्रेत चांदणीचौकात फिरविण्यात आले.
ह्याच्यासंदर्भात एका शीख ग्रंथात म्हटलंय,
मतिराम चिराया फाड्या
दयाला देगविच साड्या
अर्थ - मतिरामला चिरलं व फाडलं
व दयालदासला तापत्या तेलात जाळलं !
तिसर्या दिवशी सतिदासालाही एका तुळईस हात बांधून ठेवले व पाय घट्ट बांधले व पुढे एक वाघनघा घेतलेला माणूस व मागे वाघनखे घेतलेला माणुस असं करून चालत असताना त्यांची कातडी त्या वाघनख्यांनी सोलण्यात आली, मांस ओरबाडण्यात आले, रक्ताची कारंजी उडाली !
काय अनंत यातना झाल्या असतील ! किती अनन्वित अत्याचार हा ! कल्पना तरी करवते काय???
गुरुतेगबहाद्दुरांचीही अशीच हत्या
शेवटी नोव्हेंबरला गुरु तेगबहाद्दुरांनाही असंच ठार करण्यात आलं. त्यांना विचारण्यात आलं की मुसलमान होताल काय?
तेंव्हा त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले की
"मति मलीन मुरखमति जोई
इसको त्यागोही पामर तो सोई
म्हणजे हिॅदुधर्माचा त्याग करणारा मनुष्य हा सामान्य व मुर्ख आहे !
ह्याला म्हणतात स्वधर्माभिमान नि अतुलनीय स्वधर्मनिष्ठा !
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: !
ह्या आमच्या गीतेतले तत्वज्ञान तर हेच सांगते
आता कुठे कुठे गेले ते सर्वधर्मसमभाववाले? आता बोला की सर्वधर्मसमभाव आहे म्हणून...!!!!
इतकी क्रूर नि अमानवी नि नृशंस हत्या कुणी स्वप्नात तरी करेल काय? पण मुसलमान ते करणारच कारण त्यांचे कुराण ते करायला सांगतं.
पण मुसलमान ते करतीलच व करताहेत.
ईसिसची चलतचित्रे म्हणजे व्हिडिओ आपण पाहिल्याच असतील व्हाॅट्सप फेसबुक ह्या समाजमाध्यमांवर व आंतरजालांवर. ते कशा प्रकारे हत्याकांड करताहेत हे पाहतो आहोत आपण नेहमीच. तरीही शंभुराजेंची हत्या आता कुणी मनुस्मृतीनुसार व ब्राह्मणांनी केली असं म्हणत असेल तर त्याला काय म्हणावं???
शेवटी जाता जाता शंभुराजेंचेच ब्राह्नणाबद्दलचे बुधभूषणममधले श्लोक देतो.
शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण
ब्राह्णण समाजाचा द्वेष करणार्यांना शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात
अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !
(खालील) ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,
ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ रा अध्याय - १२ ते १४ श्लोक
दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.
ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....
इति श्रीशंभुराजे
शेवटी त्या परमश्रद्धेय धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र प्रणाम करून लेखणीला विराम देतो !!!
धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज की जय |
छत्रपती शिवाजी महाराजकी जय |
हिॅदुधर्म कीजय |
भारतमाता की जय |
लेखक- तुकाराम चिंचणीकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पंढरपूर विभाग
No comments:
Post a Comment