भारतीय संविधान किती काळ टिकून राहिल ?

(काही दिवसापूर्वी एका साध्वींनी राष्ट्रकार्याच्या दृष्टीने हिंदू लोकसंख्येच्यावाढी बाबत वक्तव्य केल्यावर पुरोगाम्यांनी फोडलेल्या किंकाळी विरोधात थोडं जाणून घेऊया) 



मूर्तिपूजेविरोधात दीर्घकाळ चाललेले अजून एक धर्मयुद्ध संपुष्टात आले होते. हिंदुकुशाच्या पूर्वेकडील प्रांतात, हिंदुस्थान आणि तुर्कस्तानास अलग करणा-या नारदेन या भारताच्या तत्कालीन सीमेवर महमूदाने सातव्या धर्मयुद्धाची सुरूवात केली. हा प्रांत समृद्ध होता. ज्या देशावर गझनीचे सैन्य चाल करुन गेले तो देश अजूनही त्याच स्थितीत होता आणि आता तो 'काफीरस्थान' म्हणून ओळखला जाई. येथील रहिवासी काळे कपडे परिधान करणारे मूर्तिपूजक होते ज्यांना नंतरचे मुस्लिम 'स्याह-पोश' म्हणून ओळखत. नारदेनमधील एक मंदिर गझनीच्या सैन्याने लुटले आणि तेथून एक शिळा सोबत घेऊन गेले. हिंदुंच्या मते त्या शिळेवर महत्वाची प्राचीन माहिती कोरलेली होती.( फरीश्ता : मध्ययुगीन इतिहासकार )
तर इतिहासात काही शेकडा वर्षे मागे गेल्यावर आज आपण ज्याला अफगानीस्तान, पाकिस्तान, काश्मीर, बांगलादेश, म्यानमार म्हणून ओळखतो तेथे हिंदू व बौद्ध शाह्या राज्य करताना आढळतील. त्या त्या राज्यातील लोक हिंदू, बौद्ध, जैन अशा पंथाचे उपासक दिसतील. ( थोडी पुस्तकं किंवा आंतरजाल चाळा सविस्तर माहिती मिळेल.)
मोहम्मद बीन कासीमच्या रूपाने या उपखंडात मुस्लिम धर्म पहिल्यांदा अवतीर्ण झाला. या धर्माचा हा पहिला प्रवेश ते आजपर्यंतचा दिवस यादरम्यान हजार बाराशे वर्षे मध्ये पसरलेली आहेत.
आज ज्याला अफगाणिस्तान म्हणून ओळखले जाते त्या हिंदू व बौद्धांच्या हिंदुकूश पर्वतांच्या रांगांत आज ९९.९९ टक्के लोकसंख्या फक्त मुस्लिम आहे. ज्या सिंधुच्या खोऱ्यात हिंदू संस्कृतीचा उगम झाला त्या आजच्या पाकिस्तानात जवळपास ९७ टक्के लोकसंख्या फक्त मुस्लिम आहे. वंग, मौर्य आणि पौंड्रकाच्या हिंदू व बौद्ध संस्कृतीच्या प्रदेशात आज ९० टक्के मुस्लिम राहतात व आज त्या प्रदेशाला बांगलादेश म्हणून ओळखले जाते. भारतातील परिस्थिती विषयी तुम्हाला कल्पना आहेच त्यामुळे इथली टक्केवारी मी सांगत नाही.
यानुसार गेल्या आठशे हजार वर्षांपूर्वी फक्त हिंदू, बौद्ध, जैन वारसा असणाऱ्या या संपूर्ण प्रदेशातील एक भाग असलेल्या अफगाणिस्तान मध्ये आज तीन कोटी मुस्लिम व पाच पन्नास हजार हिंदू आहेत. ( ते उरलेले हिंदू म्हणजे हिंदूंच्या कनिष्ठ जातीतले किंवा शिख आहेत ) आज पाकिस्तानात जवळपास सोळा कोटी मुस्लिम आहेत व पन्नास एक लाख हिंदू आहेत. आज बांगलादेशात एवढेच म्हणजे सोळा सतरा कोटी मुस्लिम आहेत. आज भारतातही एवढेच म्हणजे सोळा सतरा कोटी मुस्लिम आहेत. आणि आज या उपखंडातील चार देशात मिळून हिंदू किती आहेत तर ऐंशी पंचाऐंशी कोटी. 
बरं बौद्ध धम्माच काय ? तर बाबासाहेबांनी तो स्विकारला नसता तर तो या चार देशातून मृत झालेला धर्म ( धम्म ला त्यांच्या अनुययांनी दिलेले धर्माचे केवळ रूप) म्हणून ओळखला गेला असता हे समोर येते.
या उपखंडातील सगळी आकडेवारी काढली तर गेल्या पाच हजार वर्षात ऐंशी कोटी हिंदूच्या पुढे मुस्लिम धर्माने शुन्यापासुन सुरुवात करुन जवळपास पासष्ट कोटी लोकसंख्या हि फक्त गेल्या एक हजार वर्षात तयार केली आहे.
बरं आता इतिहासात काय घडलं, कसं घडलं यावर कुणाचा इलाज नाही. पण आपल्यासाठी चिंतेचा विषय वेगळाच आहे.
मी नेहमी म्हणतो कि पाकिस्तान अफगाणिस्तान येथे कधी दोन धर्मात दंगली होत नाहीत हि कौतुकाची बाब आहे. कारण दोन धर्मात दंगली होण्यासाठी त्यांनी दुसरा धर्म शिल्लकच ठेवला नाही. ही माझ्यासाठी आणखी कौतुकाची बाब आहे. बरं या चार देशांतील हिंदू किंवा बौद्धांच काय झालं ते सोडा पण मुस्लिमांची परिस्थिती काय म्हणते ते आपण पाहू.
भारत सोडून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या सगळ्या देशांत मशीदींमध्ये, शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी महिन्याला बाँबस्फोट होतात. आठवड्याला मुस्लिम धर्मातील इतर जाती पंथियांचे देखिल खून पाडले जातात. बरं या इतर देशांमधील कायदे आणि स्त्रियांची परिस्थिती सर्वश्रुत आहे. शैक्षणिक आर्थिक परिस्थिती काय आहे ती देखिल आपल्यापुढे आहे.
बरं मग या घटना भारतात का घडत नाहीत ? 
कारण भारत देश शरीया ऐवजी भारतीय संविधानानुसार चालतो .

मग या चार प्रदेशात फक्त भारतातच असं संविधान का लागू आहे ? 
कारण कुठलाही प्रदेश मुस्लिम बहुसंख्याक झाल्यावर तिथे इस्लामि कायदे असणं नैसर्गिकरीत्या मान्य करण्यात आलं आहे.

मग सगळेच भारतीय मुस्लिम हिंसक आहेत का ? 
अजिबात नाही, परंतु चांगले मुस्लिम धार्मिक विषयांवर किंवा धर्माचा आधार घेऊन कत्तली, बाँबस्फोट, हिंसा करणाऱ्यांपुढे हतबल आहेत. त्यांना मुस्लिम म्हणून कसलीही धार्मिक चिकित्सा करण्याचा किंवा धार्मिक ग्रंथातील आदेश नाकारण्याचा अधिकार नाही त्यामुळे इतर धर्मियांसाठी ते असून नसल्यासारखेच आहेत.

मग भारतात भारतीय संविधान किती काळ टिकून राहिल ? 
जोपर्यंत भारतात हिंदू बहुसंख्याक आहे तोपर्यंतच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या काश्मीरात भारतीय संविधान कचऱ्याच्या डब्यात फेकलेलं आहे.

मग जे हिंदू सोडून इतर धर्मिय, ब्रिगेडी शिवधर्मिय किंवा नास्तिक आहेत त्यांचे काय होईल ? 
हे सगळं करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देतं. अहो अफगाणिस्तानात हिंदू आणि बौद्धांचं धर्मांतर करुन देखिल भागले नाही म्हणून बामियानच्या डोंगरात उभ्या केलेल्या त्या निर्जीव बुद्ध मुर्त्या देखिल ड्रिल लावून तोडण्यात आल्या तिथे कसला शिवधर्म आणि कसला नास्तिक धर्म ? त्यांच्या पुढे देखिल पर्याय दोनच. मृत्यू किंवा धर्मांतर !


लेखक - तुषार दामगुडे
Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive