मोहीमे नंतर काल पुन्हा एकदा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने निर्माण केलेल्या शिवसुर्याच्या स्वच्छ,निष्कलंक,निरभ्र अवकाशातील दोन स्वयंभु, तेजस्वी तारे निखळले.....होय तेजस्वी तारेच ते ! स्वत:चा रुढ मार्ग सोडुन देव-देश-धर्म अक्षय्य टिकविण्यासाठी शिवछत्रपती -संभाजी महाराज हे बीजमंत्र उरात धरुन सतत कार्यप्रवण असणारे ओंकार दादा माने व सागर ढवळे हे दोन धारकरी आपल्या सर्वांना सोडुन निघुन गेले ते कायमचेच.......!
मोहीमेनंतरच्या तिस-याच दिवशी ईचलकरंजी जवळील तानाजीराव भुयेकरांनी तर सर्वांनाचा धक्का दिला. या वर्षीची मोहीम पुर्ण करुन घरी परतल्यावर. तिस-याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली. असे अनेक तेजस्वी तारे असतील त्यापैकी सागरदादा मालुसरे, अजय तोडकर, श्री महेशदादा सपकाळे ही मोजकीच नावे माझ्या लक्षात राहीली. मला अपरिचित असणारी किती तरी नावे निघतील.
का? नियतीचा असा अट्टाहास का? शिवछत्रपति-संभाजी महाराज यांच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करणा-या धारक-यांच्याच वाट्याला का हे दुःख ? महाराष्ट्रातील कुठल्याही परिचित-अपरिचीत धारक-यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आम्ही सर्वजण अशी दुःखे\ पचवु शकत नाही. कारण ही फक्त आमचीच हानी नसुन समाजाची देखील आहे. समर्थांच्या श्लोका प्रमाने,
आपण अवचित निघोनी जावे | तरी मग भजन कोण करावे |
त्या कारणे भजनासि लावावे | कित्येक लोक ||
असाच भाव मनात धरुन देव-देश-धर्म कार्याच्या या शिवगंगेत अनेक तरुणांना अक्षरश: खेचुन आणणारे अभ्यासु, कुशल संघटक, निर्भिड, चारित्र्यवान असे धारकरी आज मितीस हा सगळा डाव सोडुन जाणे आम्हास मंजुर नाही. आदरणीय गुरूजींनी असे एक-एक रत्ने घडवुन ती भरतभुमीच्या चरणकमलावर अर्पण करायची मनिषा मनात ठेवलीय. जर का ती रत्ने अशी अवचित गळुन पडली तर त्यांना किती दुःख होत असेल, हे शब्दात ही सांगु शकत नाही. म्हणुन धारक-यांनो स्वत:ला जपा. आम्हाला मान्य आहे की,
देवाजीच्या आले मना | तेथे कोणाचे चालेना ||
पण हे जर का कार्य निरंतर व्रुद्धींगत करायचे असेल तर आपल्या सारखे मोती गळुन पडता कामा नये. कुठे ही जरी असु तरी अखंड सावधान असावे ही उक्ती मनात धरुनच काम करुया. याचा अर्थ असा नाही की घरीच बसा. पण रस्त्यावरती प्रवासात कोणतीही घाई-गडबड करणे टाळा. आपला जीव लाख मोलाचा आहे. आज महाराष्ट्राला आपली गरज आहे. भंगवंता कडे ही आमचे एकच मागणे आहे, तेही आम्हास गुरूजींनी शिकवलय;
आम्हा एेक देवा, नको अन्य काही |
क्रुपाछत्र राहो तुझे नित्य डोई, |
ह्रूदि भक्ति आणी तनी कर्म शक्ति |
आणि अंतरा माजी आत्मप्रचिती ||
हे भगवंता तु आम्हास पैसा-आडका, सुख हे सर्व नाही दिलस तरी ही चालेल पण हा शिवसुर्यजाळ पसरवण्यास दिर्घायुष्य मात्र नक्की दे......
हे लिहीत असताना साश्रु नयनांनी ओंकार दादा, सागर, व तानाजीराव, अजय आणि महेश दादा यांचे स्मरण करतो. व ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हेच मागणं मागतो.
आणखी काय लिहु..........!
-विनोद पाटणकर
-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,मुळशी.
राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ
खरच धारकरयांनो जपा स्वताला...
ReplyDelete