मोहीम म्हणजे सुखाचा सागर..
मोहीम म्हणजे भारतमातेच्या उपासनेचा जागर...
मोहीम म्हणजे एका राष्ट्रऋषी योगी संताने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आई भवानीचा केलेला गजर..
मोहीम म्हणजे असंख्य पावलांनी गतकाळातील पावलांना घातलेलं आलिंगन....
मोहीम म्हणजे #हिंदवी #स्वराज्य उभं करताना ज्या शूर वीरांचे सह्याद्रीच्या मातीत रक्त सांडले त्या मातीला अंगाखांद्यावर कपाळी मिरवण्याचं सौभाग्य.
गतजन्म होता पावन । लाभले गुरुचे चरण ।।
भगवामय अंत:करण । गुरुजी केवळ तुम्हाकारण ।। ( कवी- गणेश पावले )
मोहीम म्हणजे काय? हे जर सांगायला लागलो तर अनंत उपमा, लक्ष लक्ष शब्दपंक्ती अपुऱ्या पडतील. मोहीम लिहिण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा अनुभवन्यात जे काही स्वर्गसुख आहे ते अवर्णनीयच..!
गुरुजींच्या पदस्पर्शाचे सौभाग्य मोहिमेत लाभणे म्हणजे मोक्षप्राप्तीच. विठुरायाचे चरण कुरवाळण्यात जितके सुख, तितकेच गुरुमाऊलीच्या चरणी लीन होण्यात सुख. मोहीम समारोपाच्या वेळी अनुभवलेले गुरुजींचे विराट रूप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माता यशोधेला श्री कृष्णाने दाखवलेले ब्रह्मांडच !
तब्बेत बरी नसतानाही जावळीच्या दऱ्याखोऱ्यात गुरुजींचे न थकता चालणे, भर हिवाळ्यात ७ अंश से. च्या कडाक्याच्या थंडीतही पहाटे साडेचार वाजता उठून हजारो धारकऱ्यांसहित सूर्यनमस्कार, बैठका मारणारे गुरुजी पाहिले की जन्म धन्य होतो. विसावा - आराम विसरलेले. तहान-भुक विसरलेले ८४ वर्षांचे योगी, त्यागी, वैरागी जीवन जगणारे आदरणीय भिडे गुरुजी जवळून अनुभवले की अंगावर काटा उभा राहतो.
शिवभक्तीने लोटपोट झालेली. अंगात श्री शिवसूर्यजाळाची आग चेतलेली, गतजन्माला आठवणारी, या जन्मात आपल्या जीवनाचे सोने करून घेणारी, श्री शिवाजी - संभाजी रक्तगटाची लाखो तरणीताट पोरं गुरुजींच्या एका हाकेने सह्याद्रीच्या कुशीत एकत्र येतात. गुरुजींनी ठरवून दिलेला दंडक आणि शिस्त पाळत या मोहिमेत सहभागी होतात हे सामान्य कार्य नाही.
महाराष्ट्रासोबच दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, काश्मीर, उत्तराखंड येथून मोहिमेत सहभागी झालेले धारकरी गुरुजींच्या कार्याची, त्यांच्या श्री शिवशंभुवरील दृढ भक्तिची अनुभूती देतात. गुरुजी नेहमीच सांगतात की, शिवाजी संभाजी हाच बीजमंत्र हिंदुस्थानाला जगाचा बाप बनवू शकतो हेच सत्य आहे.
आ. श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहिम देव, देश आणि धर्माप्रति जागरूकता जागवणारी पवित्र गंगा आहे. जी सह्याद्रीच्या अंगाखाद्यावर उगम पावते.
ज्या गंगेत सर्व धारकरी हिंदू म्हणूनच स्नान करतात. ती पवित्र गंगा प्राशन करतात. यात कोणीच कोणाला तुझी जात कोणती? हे विचारत नाही. पुरोगाम्यांच्या विषारी दंशाला बळी पडलेला हिंदू समाज खडबडून जागा व्हावा. त्याला त्याच्या कुळाची आठवण व्हावी. समस्त जातींनी भेदाभेद विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन शिवाजी - संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी. जी पिढी अंतरबाह्य शत्रूचा नायनाट करेल; गुरुजींना असा महाराष्ट्र घडवायचाय जो भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल. देशाच्या सिमा ओलांडून घातक शत्रूच्या नरडीचा घोट घेईल. गुरुजींची ही इच्छा आई भवानी नक्कीच पूर्ण करील यात काहीच शंका नाही.
सुखाला त्वरें देऊनि सोडचिठ्ठी ।
धरूं मुंगीवत् राष्ट्रकार्यीं चिकाटी ।।
झिजू चंदनासारिखे रात्रदिन ।
जगूं हिंदुराष्ट्रास करण्या महान ।।
गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभाग
।। जगदंब ।।
ReplyDeleteजय श्री राम
ReplyDelete