तरुणांच्या दिवसाची सुरूवात राष्ट्रचिंतनाने व्हावी म्हणून....



गेले दोन महिने अवघ्या महाराष्ट्राचे डोळे प्रतापगडाकडे लागले होते. त्याला कारण ही तसेच होते. श्री शिवप्रतिष्ठान ,हिंदुस्थान आयोजित धारातिर्थ यात्रा (मोहीम) दिनांक २६ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर (मार्गे जावळी अरण्य) अशी होती. महाराष्ट्रातील गावोगावचे धारकरी हजारोंच्या संख्येने या धारातिर्थ यात्रेत (मोहीमेत) सहभागी झाले होते.
(अभिनेते राहुल सोलापूरकर,
आ. सुधीर गाडगीळ व
आ. गुरुजी यांच्या हस्ते
श्लोक मालिकेचे
अनावरण) 
             चार दिवसाचा खडतर प्रवास करुन धारातिर्थ यात्रेचा समारोप रायरेश्वराचे दर्शन घेवुन पायथ्याला जांभळी या गावात झाला. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेते राहुल सोलापुरकर, संत साहीत्याचे अभ्यासक मुकूंद दातार, आमदार सुधीर गाडगीळ हे उपस्थित होते. ही मोहीम अनेक गोष्टीमुळे महाराष्ट्रातील तमाम धारक-यांच्या लक्षात राहील अशीच झाली. प्रतापगड परिसरातील अवघड घाटवाटा, एकेरी वाटा, उंचच्या उंच डोंगर रांगा, आणी उतरताना न संपणा-या खोल-खोल द-या ही एक तारुण्याची अग्निपरिक्षाच होती. पण अजुन एका गोष्टीमुळे ही मोहीम संस्मरणीय ठरली; धारकरी मनोमन सुखावला. गेल्या कित्येक वर्षांची धारक-यांची प्रतिक्षा संपली. कोणती गोष्ट बरं ती?
              गेल्या वीस वर्षात आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी शिवछत्रपती-संभाजी महाराजांचे अंतरंग सांगणारे, तरुण मनाची मरगळ झटकणारे, मराठा या शब्दाची व्याख्या सांगणारे असंख्य श्लोक लिहीलेत. त्या श्लोकांचे संगीतमय ध्वनीमुद्रण म्हणजेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रस्तुत "तमाला गिळोनी जगा उजळावे" ही श्लोक मालिका धारक-यांना व महाराष्ट्राला समर्पित करण्याचा अतिविलक्षण कार्यक्रम मोहीमेत समारोपाच्या वेळी झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे येथील सिंहगड रस्ता व मुळशीतील पिंरगुटच्या धारक-यांनी एकत्र येवुन ही एक सुखद धक्का देणारी सुवर्णभेट समस्त धारक-यांना दिली.
                महाराष्ट्रातील घरोघरी गुरूजींचे हे श्लोक प्रात:समयी एैकले जावेत, तरुणांच्या दिवसाची सुरूवात राष्ट्रचिंतनाने व्हावी हा एकमेव हेतु ठेवुन हा सर्व खटाटोप आम्ही केलाय. हे करत असताना गुरूजींच्या श्लोकांचा एवढा प्रभाव आमच्यावर आहे की ही गोष्ट केली म्हणून आम्हांस कोणत्याही प्रकारची अभिलाषा नाही. ना प्रसिद्धीची, ना नावाची, ना पैशांची, ना पदाची. गुरुजींच्या श्लोका प्रमाणेच,
   आम्हा ऐक देवा नको अन्य काही
   कृपा छत्र राहो तुझे नित्य डोई
 एवढीच काय ती आमची धारणा आहे. त्याच बरोबर आम्हाला याची जाणीव देखील आहे की, हे काम केलं की झाले, याच्यातच दंग होवुन आम्ही बसणार नाही. समाजामध्ये उतरुन काम करण्याचे जे व्रत आम्ही घेतलय ते पाळणारच. केवळ आपल्या कामास पुरक गोष्ट एवढीच काय ती श्लोक मालिकेची ईतिकर्तव्यता.
            दिनांक ५/०२/१८ पासुन www.shrishivpratishthan.org  या संकेत स्थळावर ही श्लोक मालिका आपल्या सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. ती भ्रमणध्वनीमध्ये उतरवुन घ्या. इतरांना सांगा. घरोघरी पोहचवा हीच विनंती !

                                 

                                                                  

  -श्री विनोदराव पाटणकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
धारकरी ( पिरंगुट )
ता. मुळशी जि. पुणे 

Share:

1 comment:

  1. "राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ"

    ReplyDelete

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)