श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारतीर्थ गडकोट मोहीम अवघ्या दोन दिवसांवर आहे. या मोहिमेकरिता महाराष्ट्रभरातील शिवभक्त आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्यापासून
श्री प्रतापगडाकडे येणाऱ्या शिवभक्तांची रीघ सुरु होईल. श्री प्रतापगडाने इतिहासात
कधीही पहिली नसेल इतकी शिवाजी आणि संभाजी रक्तगटाची, इच्छा-आकांक्षेची, ध्येय धोरणाची,
कार्य-कर्तुत्वाची व भारतमातेसाठी जगण्या मरण्यात आनंद मानणारी शिवभक्त-धारकर्यांची
संख्या पाहणार आहे. आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने,
भगवान श्री शिवछत्रपतींच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या
प्रेरणेने या धारतीर्थ गडकोट मोहिमेचा प्रारंभ माघ शु. नवमी दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता यंदाच्या मोहिमेला
प्रारंभ होणार आहे. पुढे चार दिवस घर दार
गोत्र कुळ प्रपंच जात पात प्रांत विसरून सारे धारकरी एकत्र होऊन हिंदवी स्वराज्याच्या
शिवाजी मार्ग आणि संभाजी मार्ग चालण्यासाठी सज्ज झाले. भारतमातेचा संसार दुरुस्त करण्यासाठी
आणि या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काम करणारे तरूण मंडळी चार दिवस आपल्याला
लागणारे अन्न पाणी अंथरून पांघरून सह्याद्रीच्या कुशीत प्रवास करणार आहे. सह्याद्रीच्या प्रवासाबरोबरच दरवर्षी प्रमाणे
यंदाही मोहिमेत व्याख्यान होणार आहेत. ऐतिहासिक स्थळाबरोबरच ऐतिहासिक घटनांचे हि
मार्गदर्शन असणार आहे. याचीच ओढ लागलेले लाखो धारकरी वर्ष भर चातकाप्रमाणे
मोहिमेची वाट पाहतात. त्यात भर म्हणून यंदाच्या मोहिमेत महाराष्ट्राबरोबर इतर हि अनेक
राज्यातून धारकरी मोहिमेकरिता येणार आहेत. यंदाच्या मोहिमेचा आकडा हा संपूर्ण
देशाच लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यंदा मोहिमेत प्रसार माध्यमांची रेलचेल हि
पाहयला मिळेल. या मोहिमेतून संपूर्ण देशाला विलक्षण शिस्तीच दर्शन घडणार आहे. या
गडकोटांनाच आपली दुर्गपंढरी मानून आ. गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींना
विठ्ठलरूप मानून भगव्या ध्वजाचे वारकरी म्हणजेच शिवछत्रपतींचे धारकरी या विलक्षण
चेतना देणाऱ्या शक्ती देणाऱ्या सामर्थ्य देणाऱ्या धारतीर्थ यात्रेत सहभागी होणार
आहेत.
|
मोहिमेत सभागी होणारे छोटे धारकरी |
यंदाच्या धारतीर्थ गडकोट मोहिमेचा समारोप श्री रायरेश्वर येथे होणार आहे...
मग तुम्ही केली का मोहिमेच्या प्रस्थानासाठी तयारी....
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय
ReplyDeleteधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
भारत माता की जय
हिंदू धर्म की जय
राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ
ReplyDeleteआपणही या! मोहिमेच्या समारोपाला!