|
( डावीकडून भरतदादा माळी, अधिवक्ता चेतनराव बारस्कर, बळवंतराव दळवी ) |
१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी दंगलीबाबत अनिता रवींद्र साळवे या स्त्रीने खोटी साक्ष देऊन आ.संभाजीराव भिडे गुरुजींविरुद्ध पुणे येथे खोटा गुन्हा दाखल केला. त्या नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद च्या हाके नंतर महाराष्ट्रात तणावाचे वातवरण निर्माण झाले. या बंद मुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोटींचा विध्वंस झाला. गेले काही दिवस मुंबई येथे हिंसक घडामोडी पाहता यामागे देशविघातक , नक्षलवादी संघटनाचा हात असावा असा संशय निर्माण झाला आहे. आ. संभाजीराव भिडे गुरुजी गेले कित्येक वर्ष देव-देश-धर्मासाठी निर्व्यसनी तरूण पिढी निर्माण करण्यासाठी दिवस-रात्र अनवाणी झटत आहेत. त्यांच्या वर केलेले आरोप हे पूर्वनियोजित कट असून तक्रारकर्त्या स्त्रीच्या मागे कोणाचा हात आहे हे शोधण्याची गरज आहे. आ. संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री रायगडावर पुनर्स्थापना होणार्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाचे काम महाराष्ट्रात उभं राहत आहे. या कार्यात श्री शिवछत्रपती आणि श्री संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारी पिढी मोठ्या जोमाने हे कार्य करत आहे. या सोबतच येणारी श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर अशी आहे. मुंबईतून यंदा हजारोंच्या संख्येने धारकरी या मोहिमेला जाणार आहेत. त्याकरिता आ. संभाजीराव भिडे गुरुंजीची सभा आयोजित केली होती. परंतु मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून रविवार, ७ जानेवारी २०१८ रोजी लालबाग येथे होणारी गुरुजींची हि सभा रद्द न करता पुढे ढकलण्यात येत आहे. याकरिता आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागा तर्फे पत्रकार परिषद भरवण्यात आली. झालेल्या दंगलीचा जास्त पडसाद हा मुंबई येथे उमटल्याने देशविघातक शक्तींना दंगल करण्याची पुन्हा संधी मिळू नये म्हणून हि सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
आम्ही पोलीस प्रशासनाला सर्व बाबतीत सहकार्य करत असल्याने हा निर्णय घेतला.
-श्री बळवंतराव दळवी
( श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई कार्यवाह )
गुरुजींवर केलेले आरोप हे कटकारस्थान आहे. यामागे काही जातीयवादी संघटनाचा हात आहे. आणि ते पोलीस प्रशासनाने आणि सरकारने लवकरात लवकर शोधून काढावेत.
- अधिवक्ता श्री चेतनराव बारस्कर
(श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे
|
(पत्रकार परिषद, मुंबई)
|
No comments:
Post a Comment