छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राच आराध्य दैवत असं आपण म्हणतो. हे शिवछत्रपती आम्हाला कळले का ? महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आम्ही त्यांना सीमित करून टाकलं. पण महाराष्ट्रात गेल्या नऊ दशकात एक असा व्यक्ति राहतो ज्यांनी वसा घेतलाय संपुर्ण महाराष्ट्राचा उगवत्या तरुणपिढिचा रक्तगट श्री शिवाजी श्री संभाजी करायचा. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं आपण केवळ ऐकतो पण त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी. “जगावे मातृभुमीसाठि आम्हा वेड हे एक” या ओळीप्रमाणे गुरुजींनी आपले सर्व आयुष्य मायभुच्या चरणाशी अर्पण केले आहे. कौटिल्यप्रमाणे बुद्धि चातुर्य, मुखी तुकाराम-गाथा, समर्थ रामदास स्वामी प्रमाणे ज्ञान असे गुण गुरुजींमध्ये आहेत. तसेच, श्री शिवछत्रपतींची जगदंबा (तलवार) जशी म्लेंच्छाना ज्या वाऱ्याच्या वेगानं घायाळ करत होती, हो ती वाऱ्याची गतिमानता आणि आदित्य तेजस्विता त्याच वेगानं आणि तेजान गुरुजींच कार्य देशभरात सुरु आहे.
भिडे गुरुजी महाराष्ट्रात निर्माण झालेल हे अजब रसायन. अत्यंत तल्लख स्मरणशक्ति, स्तिमित करणारी बुद्धिमता, एखाद्या दगडाच्या अंगावरहि रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने २४ तास-तिन्हि त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय. हि व्यक्ति जिथे उभी राहते तिथे तरुणांची गर्दि जमते. ज्यांच्या संपर्कात आली त्यांची गुरु सदगुरु, विठुमाऊली, समर्थ बनली. आपल्या आयुष्याचा ज्याप्रमाणे सोबतीला त्रास होऊ नये म्हणुन लग्न-संसारापासुन समर्थ रामदास स्वामी दुर गेले त्याच तत्त्वाला धरुन गुरुवर्यांनी गृहस्थ संसार नाकारुन अखंड भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार पुनरपि संस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. गुरुजींचे संपुर्ण नाव श्री संभाजीराव विनायकराव भिडे. समस्त धारकरी नव्हे तर महाराष्ट्र गुरुजी या नावे ओळखतात. डोक्यावर वारकरी टोपी, अंगात सदरा अन् धोतर हि या व्यक्तिमत्त्वाची वेशभुषा. गुरुजी रोज सांगली मध्ये सायकल ने भ्रमंती करतात.
गावाबाहेर जायचे असल्यास स्वखर्चाने एसटि किंवा ट्रेनचा वापर करतात. गुरुजींच्या दिवसाची सुरुवात हि पहाटे १५० ते २०० सुर्यनमस्कार अन् व्यायामाने होते. वयाने जरी शरीर थकले असते तरी मन मात्र अजुनहि अखंड भारत हा अभेद्य हिंदुस्थान करण्याच्या दिशेनेच कार्य करीत आहे. गुरुजींचे शिक्षण हे एखाद्या राज्यकर्त्याला हि लाजवेल इतके आहे. गुरुजी फिजिक्स या विषयात गोल्ड मेडिलिस्ट आहेत. एकेकाळी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक हि होते. कालांतराने प्राध्यापक नोकरी सोडुन गुरुजींनी सांगली गाठली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना स्थापन करुण उगवत्या पिढिला देवदेशधर्माची शिकवण गुरुजींनी या माध्यमातुन दिली. येणारी तरुण पिढि हि शिवाजी-संभाजी रक्तगटाची व्हावी, भारतमातेचा उध्वस्त झालेला संसार पुन्रप्रस्थापित करुण हा देश जागतिक पातळीवरती महासत्ता म्हणुन उभा रहावा यासाठि गुरुजींनी खेडेपाडे पालथी घालायला सुरुवात केली. गावोगाव गुरुजी अनवानी पायाने फिरण्याचे कारण म्हणजे संपुर्ण हिंदु समाज दोन मंत्रावर चालला पाहिजे, जर जगाच्या संघर्षात राष्ट्र म्हणुन टिकायचे असेल तर दोनच मंत्र उपयुक्त आहे. ते दोन महामृत्युंजयमंत्र म्हणजे श्री शिवाजीमंत्र व श्री संभाजीमंत्र या दोन मंत्राचा वापर करुण गुरुजी गेले ३० ते ३५ वर्ष अविरतपणे अखंड महाराष्ट्र पालथा घालत आहेत. गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे देशाचा सीमा ओलांडुन जाणारा हिंदुस्थान उभा करायचा आहे. हा हिंदुस्थान उभा करण्याचे काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी करीत आहेत.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे उपक्रम-
कशासाठि आणि जगावे कसे मी |
विचारा स्वतः ला असा प्रश्न नेहमी |
जगूं पांग फेडावया मायभुचे |
आम्हि मार्ग चालु जिजाऊ सूताचे ||
हि शिकवण प्रत्येकाच्या तनामनात रुजली पाहिजे. हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उद्देश्य असतो. त्यासाठि वर्षभरात गुरुजींच्या शब्दाला प्रमाण समजुन धारकरी उपक्रम पुर्ण करतात. ह्या उपक्रमाद्वारे धारकरी जोडण्याचे आणि मायभुचे कर्तव्य पार पाडण्याचे कार्य होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे १९९२ पासुन शिवतीर्थ रायगडावर श्री शिवछत्रपतींच्या मुर्तीची आणि समाधीची पुजा धारकरी रोज स्वखर्चाने करीत आहेत. श्री शिवछत्रपतींच्या जन्माआधी देशावर पारंतत्र्याचा अधंकार अति दाट होत चालला होता. अश्या वेळी जिजाऊंच्या पोटि शिवराय असताना नवरात्रीत घट बसवुन जिजाऊंनी श्री भवानीमातेकडे देशाचा उध्वस्त होणारा संसार पुर्नप्रस्थापित करण्यासाठी जे मागणं मागितलं तेच मागणं रोज सकाळी पहाटे दौडत जाऊन पदर पसरवुन देशकल्याणाकरीता मागणं मागण्याचा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड. हिंदुत्वाचे कुंकु अबाधित राहण्यासाठि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी एक नाहि दोन नाहि तब्बल ४० दिवस आनन्वित अत्याचार सहन केला. मृत्युच्या दिशेने बलिदान होण्याच्या मार्गावर फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधित मरणाशी झुंज देत राहिले म्हणुन प्रत्येकाने सुतक म्हणुन पाळायचा उपक्रम म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास.
गुरुजी म्हणतात, घडली धारातीर्थे म्हणुन टिकली तिर्थक्षेत्रे. काशीजी कि कला जाती मथुरा मस्जिद होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी या ओळी प्रमाणे आज हिंदुस्थान मुघलांच्या तावडीतुन मुक्त आहे त्याचे कारण श्री शिवाजी महाराज व श्री संभाजी महाराज आणि मावळे यांच्या अपार कष्टातुन. त्यामुळे त्यांच्यासारखी धर्मनिष्ठा जर आपल्या अंगी यावी असे वाटत असेल तर मोहिम करणे गरजेचे. श्री शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक मावळ्यांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या गडकोटांच्या महिमा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. यंदाची मोहिम श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर (२६ जानेवारी २०१८ ते ३० जानेवारी २०१८ ) आहे. हिंदुसमाजातील तरुणपिढि मृतवत् अंतकरणाची तसेच ध्येयवादी, प्रखर देशधर्मवादी बनवायची असेल तर मोहिम हा एकमेव उपाय.
४ जुन २०१७ रोजी गुरुजींच्या शब्दाला प्रमाण समजुन लाखो धारकरयांच्या उपस्थितीमध्ये श्री रायगडावर ‘३२ मण सुवर्ण सिंहसन पुन्रस्थापना’ हा संकल्प पार पडला. शिवरायांनी निर्माण केलेले सुवर्ण सिंहासन हि हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठा श्री संभाजी राजेंच्या मृत्युनंतर मुघलांनी आक्रमण करुण मोडुन टाकली. हि हिंदुची प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करण्यासाठि लवकरच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे ३२ मण सुवर्ण सिंहासनाची स्थापना करण्यात येणार आहे.
श्रद्धेय संभाजीराव भिडे गुरुजी म्हणजे प्रचंड दाहकता असलेले अग्निकुंड. जे धारकरी बनले ते या देशधर्मभक्तिच्या अग्निकुंडात जळाले. जर आपल्याला हि या देव-धर्म भक्तिचे धडे शिकायचे असतील तर एकदा तरी गुरुजींना भेट द्या. सदगुरुच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सदगुरुची झाला
असे बोलुन आज लाखो धारकरी गुरुजींच्या उपदेशावर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुरे करीत आहे.
एक मात्र चिंतन आतां,एकची विचार
भाग्यपुर्ण होईल केव्हा,हिंदुभुमी थोर
दुःख दैन्य जाऊनी विलया, होऊ दे स्वंतत्र
भाग्यपुर्ण आई ध्यानीं मनी हाची मंत्र
या ओळीप्रमाणे भिडे गुरुजी हा व्यक्ति अविरत अखंड निव्वळ देव-देश-धर्म या स्वार्थासाठि अखंड अविरत जगत आहे.
- नेहा जाधव
राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ
ReplyDelete