Hinduwarta : दिल्लीहून गाझियाबादच्या (Delhi Crime) मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नाज हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्याचा किळसवाना प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या एका व्यक्तीने संशय आला म्हणून व्हिडिओ बनवला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्या व्यक्तीने हॉटेल मालकाकडे तक्रार केली असता त्यालाही मारहाण करण्यात आली. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी हॉटेल मालक आणि आरोपीला अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडितेने मोदीनगर पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोटी बनविणाऱ्या अल्पवयीन मुलाला तसेच त्याला मदत करणाऱ्या अबिदला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णा नगर कॉलनीतील गल्ली क्रमांक 2 जवळ नाज चिकन पॉइंट नावाचे हॉटेल आहे. इकडे गोविंदपुरी येथे राहणारा भीम सिंह यांचा मुलगा प्रकाश सिंह त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला असता दीपकची नजर रोटी बनवणाऱ्या (Delhi Crime) व्यक्तीकडे गेली जिथे तो थुंकून रोटी बनवत होता. दीपकने ही माहिती प्रकाशला दिली असता हॉटेल मालकाने त्याला चुकीचे ठरवून मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
No comments:
Post a Comment