कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी (Durgadi Fort) किल्ल्याला तब्बल ४८ वर्षांनी न्याय मिळाला आहे. मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने केलेला दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने अखेर फेटाळला आणि या मंदिराची जागा राज्य शासनाच्या मालकीचीच आहे असे ठामपणे सांगितले. यासोबतच या किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचा दावा कोर्टाने केला आहे.
या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या संघटनेनी केली होती. परंतु, ही विनंतीही न्यायालयाने फेटाळली.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचं ऐतिहासिक मंदिर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ देखील आहे. या किल्ल्यावर (Durgadi Fort) मुजलिसे मुसावरीन औकाफ या संघटनेने ही जागा मुस्लिम धर्माच्या ईदगा आणि मशीद यांच्या मालकीची आहे. त्यांची मालकी घोषित करावी, असा दावा 1974 साली कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
No comments:
Post a Comment