( संभाजी भिडे गुरुजींनी तरुणांना नोकऱ्या द्याव्या) |
केवळ सिंहासन उभे राहिल्यावर गुरुजींचे काम संपणार नसून उलट ती कार्याची सुरुवात आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन हजार मुले जेव्हा सिंहासनाला जागता पहारा देण्याच्या निमित्ताने रायगडावर अनवाणी चढत येतील आणि तिथल्या पावित्र मातीचा स्पर्श त्यांच्या शरीराला होईल सकाळी भरघोस व्यायाम करून नंतर शिवचरित्राचे पारायण करून एक संपूर्ण दिवस निर्व्यसनी राहून उदात्त विचारांच्या संपर्कात ती मुले जेव्हा राहतील तेव्हा निश्चितच त्यांच्या आयुष्याला काहीतरी नवी दिशा मिळेल आणि कुठल्याही कार्यात हात घातल्यावर यश मिळवण्याची एक विजिगीषू वृत्ती त्यांना तेथे प्राप्त होईल जी कुठल्याही एका फडतुस नोकरीपेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे.
गुरुजींचे धारकरी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत. फक्त त्याची कुठे जाहिरात ना धारकरी करतात ना गुरुजी करतात. आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा असेल आणि त्याचे मूळ स्थान हे 32 मण सोन्याचे सिंहासन असणार आहे यात आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही. गुरुजींना विरोध करण्यापेक्षा गुरुजींच्या या उदात्त कार्यामध्ये जर आपण सर्व सहभागी झालो तर ते कार्य अधिक गतीने पूर्णत्वाला नेता येईल. कारण तुम्ही विरोध केलात तर तुमच्या शिवाय हे कार्य तडीला जाणार आहेत यात शंकाच नाही.
No comments:
Post a Comment