• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

तरुणांच्या दिवसाची सुरूवात राष्ट्रचिंतनाने व्हावी म्हणून....



गेले दोन महिने अवघ्या महाराष्ट्राचे डोळे प्रतापगडाकडे लागले होते. त्याला कारण ही तसेच होते. श्री शिवप्रतिष्ठान ,हिंदुस्थान आयोजित धारातिर्थ यात्रा (मोहीम) दिनांक २६ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर (मार्गे जावळी अरण्य) अशी होती. महाराष्ट्रातील गावोगावचे धारकरी हजारोंच्या संख्येने या धारातिर्थ यात्रेत (मोहीमेत) सहभागी झाले होते.
(अभिनेते राहुल सोलापूरकर,
आ. सुधीर गाडगीळ व
आ. गुरुजी यांच्या हस्ते
श्लोक मालिकेचे
अनावरण) 
             चार दिवसाचा खडतर प्रवास करुन धारातिर्थ यात्रेचा समारोप रायरेश्वराचे दर्शन घेवुन पायथ्याला जांभळी या गावात झाला. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेते राहुल सोलापुरकर, संत साहीत्याचे अभ्यासक मुकूंद दातार, आमदार सुधीर गाडगीळ हे उपस्थित होते. ही मोहीम अनेक गोष्टीमुळे महाराष्ट्रातील तमाम धारक-यांच्या लक्षात राहील अशीच झाली. प्रतापगड परिसरातील अवघड घाटवाटा, एकेरी वाटा, उंचच्या उंच डोंगर रांगा, आणी उतरताना न संपणा-या खोल-खोल द-या ही एक तारुण्याची अग्निपरिक्षाच होती. पण अजुन एका गोष्टीमुळे ही मोहीम संस्मरणीय ठरली; धारकरी मनोमन सुखावला. गेल्या कित्येक वर्षांची धारक-यांची प्रतिक्षा संपली. कोणती गोष्ट बरं ती?
              गेल्या वीस वर्षात आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी शिवछत्रपती-संभाजी महाराजांचे अंतरंग सांगणारे, तरुण मनाची मरगळ झटकणारे, मराठा या शब्दाची व्याख्या सांगणारे असंख्य श्लोक लिहीलेत. त्या श्लोकांचे संगीतमय ध्वनीमुद्रण म्हणजेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रस्तुत "तमाला गिळोनी जगा उजळावे" ही श्लोक मालिका धारक-यांना व महाराष्ट्राला समर्पित करण्याचा अतिविलक्षण कार्यक्रम मोहीमेत समारोपाच्या वेळी झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे येथील सिंहगड रस्ता व मुळशीतील पिंरगुटच्या धारक-यांनी एकत्र येवुन ही एक सुखद धक्का देणारी सुवर्णभेट समस्त धारक-यांना दिली.
                महाराष्ट्रातील घरोघरी गुरूजींचे हे श्लोक प्रात:समयी एैकले जावेत, तरुणांच्या दिवसाची सुरूवात राष्ट्रचिंतनाने व्हावी हा एकमेव हेतु ठेवुन हा सर्व खटाटोप आम्ही केलाय. हे करत असताना गुरूजींच्या श्लोकांचा एवढा प्रभाव आमच्यावर आहे की ही गोष्ट केली म्हणून आम्हांस कोणत्याही प्रकारची अभिलाषा नाही. ना प्रसिद्धीची, ना नावाची, ना पैशांची, ना पदाची. गुरुजींच्या श्लोका प्रमाणेच,
   आम्हा ऐक देवा नको अन्य काही
   कृपा छत्र राहो तुझे नित्य डोई
 एवढीच काय ती आमची धारणा आहे. त्याच बरोबर आम्हाला याची जाणीव देखील आहे की, हे काम केलं की झाले, याच्यातच दंग होवुन आम्ही बसणार नाही. समाजामध्ये उतरुन काम करण्याचे जे व्रत आम्ही घेतलय ते पाळणारच. केवळ आपल्या कामास पुरक गोष्ट एवढीच काय ती श्लोक मालिकेची ईतिकर्तव्यता.
            दिनांक ५/०२/१८ पासुन www.shrishivpratishthan.org  या संकेत स्थळावर ही श्लोक मालिका आपल्या सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. ती भ्रमणध्वनीमध्ये उतरवुन घ्या. इतरांना सांगा. घरोघरी पोहचवा हीच विनंती !

                                 

                                                                  

  -श्री विनोदराव पाटणकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
धारकरी ( पिरंगुट )
ता. मुळशी जि. पुणे 

Share:

हिंदूंना मनुस्मृती जितकी प्रिय नाही तितकी प्रिय ती मनुस्मृती जाळणार्‍यांना आहे....

           

         प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. प्रभू रामचंद्र यांचे शौर्य आणि भगवान श्रीकृष्ण यांचे गीतेतील तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्यासाठी आपण रामायण आणि गीतेचे पारायणे करतो. कृष्णजन्माष्टमी आणि राम नवमी साजरी करतो. रामाने रावणाचा वध केला म्हणून आपण दसर्‍याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो. यामागे श्रीरामांच्या शौर्याचे स्मरण करणे हा हेतू आहे. रावणाचा पुतळा दहन करणे हा मूळ हेतू नसून जसे रामाने रावणाला मारले तसे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍या प्रत्येक शत्रूची भारतीय रक्षणा प्रणाली आणि न्याय प्रणाली हिच अवस्था करेल, हा संदेश त्यातून दिला जातो. रावणाचे दहन करताना सुद्धा त्याच्याविषयीचा द्वेषभाव लोकांच्या मनात नसतो. तो आनंद सोहळा म्हणूनच लोक साजरा करतात. रावण मेला त्याक्षणी त्याचे आणि आपले शत्रूत्व संपले अशी श्रीरामाची धरणा होती. इंग्रज देशातून निघून गेल्यास इंग्रज आपले शत्रू राहणार नाही, अशी भावना सावरकरांची होती. प्रवचनकार तर असे सांगतात की रावणाचा पुतळा दहन करताना आपल्या मनातील रावणाचे म्हणजेच दुष्ट विचारांचे दहन करतोय असा दिव्य हेतू मनात ठेवावा. आपल्या पूर्वजांचा इतिहास प्रेरणा घेण्यासाठी जीवंत ठेवला जातो. आपल्या पूर्वजांच्या शत्रूंचा द्वेष करण्यासाठी नव्हे. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, अनन्वित छळ केला म्हणून आपण आता त्यांच्या नावाने बोटे मोडत बसत नाही.

आता रावण दहन आणि मनुस्मृती दहन यावर आपण विचार करुया. २५ डिसेंबर रोजी काही लोक मनुस्मृतीचे दहन करतात. या गोष्टीचा विचार करण्याचे कारण म्हणजे गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी, मोदींचा संविधानावर नाही, तर मनुस्मृतीवर विश्वास आहे असे म्हणाले. त्यांना मोदींना मनुस्मृती आणि संविधान यांच्यातून एकाची निवड करण्यास सांगायचे आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे जिग्नेश मेवाणी यांचे प्रथम कर्त्यव्य ते गुजरातच्या ज्या विभागातून निवडून आले आहेत, त्या विभागात त्यांनी लक्ष दिले पाहिजे. कारण ते आता आमदार आहेत. याचे भान त्यांना बर्‍याचदा राहत नाही. पण तो त्यांचा प्रश्न आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. तर मला असे वाटते की खरे मनुवादी हे जिग्नेश मेवाणीच आहेत आणि मेवाणींसोबत जे जे मनुस्मृतीचे दहन करतात ते ते सर्व खरे मनुवादी आहेत. 

एखादा वाद म्हणजे विचारप्रणाली जीवंत ठेवण्याचे काम जे लोक करतात तेच खरे त्या विचारांचे पाईक असतात. असे बोलले जाते की पूर्वी मनुस्मृतीप्रमाणे भारताची रचना चालायची. खरे खोटे मला माहित नाही. मी त्या विषयीचा अभ्यासक नाही. मी मनुस्मृती वाचलेली नाही. त्यामुळे मनुस्मृतीवर टिका किंवा स्तुती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण जे जे मनुस्मृतीवर टिका करतात त्या सर्वांनीच मनुस्मृती वाचलेली आहे, असे आपण गृहित धरायला हरकत नाही. कारण अभ्यासाशिवाय बोलणे हे आंबेडकरी विचाराप्रणालीला अशोभनीय आहे. त्यामुळे त्या सर्वांनी मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेतले आहे व त्यातील फोलपणा समाजास दाखण्याचे उदात्त कार्य केले आहे. हे उदात्त कार्य मनुस्मृती जाळण्यापर्यंत गेले आहे. रावणाचे दहन करताना रामाच्या शौर्याचे स्मरण असा विचार आहे. पण मनुस्मृती जाळणार्‍यांच्या मते मनुस्मृतीने लोकांवर अन्याय केला आहे आणि मनुस्मृती हे अन्यायाचे प्रतीक आहे, असे ते मानतात. मग मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्याचे प्रयोजन काय आहे? जनतेवर झालेल्या अन्यायाची आठवण म्हणून मनुस्मृती जाळली जाते का? कारण मनूच्या विरोधात कुणीही बंडखोर उभा राहिला आणि त्याने मनूला आव्हान दिले असे ऐकीवात नाही. आता वॉट्सअपी नवइतिहासकारांचे युग आहे. कोणताही पुरावा, कोणतेही तर्क न लावता इतिहास सांगण्याची किंवा बदलण्याची एक नवी पद्धत नव्याचे जन्माला येत आहे. त्यामुळे भविष्यकाळात कुण्या मूलनिवासी क्रांतिकाराने मनूच्या विरुद्ध बंड केले असा इतिहास जर सांगितला गेला तर नवल वाटून घेण्याचे कोणतेही कारण नसावे. पण आता तरी असा नवइतिहास कुणी सांगोतलेला नसल्यामुळे मनूच्या विरोधात कुणीही बंड केले नाही, असे मानायला हरकत नसावी. तर मनुस्मृती जाळण्यात असा कोणताही उदात्त हेतू सध्या तरी दिसत नाही. एकेकाळी भीमरावांनी मनुस्मृती जाळून घेतली, म्हणून स्वतःस त्यांचे अनुयायी म्हणवणारे मनुस्मृती जाळतात का? मग गांधींनी विदेशी कपड्यांची होळी केली हा पराक्रम समजून सर्व गांधीवाद्यांनी दरवर्षी विदेशी कपडे जाळण्याचे प्रयोजन केले तर कोण प्रसंग उभा राहिल याची कल्पना न केलेलीच बरी. 

मी स्वतःस हिंदूत्ववादी म्हणवून घेतो. त्या योग्य मी आहे की नाही हे समाज ठरवेल. पण हिंदूत्ववादी म्हणवून घेताना अनेक हिंदूत्ववादी लोक भेटतात. तसेच जन्माने हिंदू असलेल्या अनेक लोकांना मी ओळखतो. ब्राह्मणांनाही ओळखतो. त्यापैकी एकानेही मनुस्मृती वाचल्याचे जाणवले नाही किंवा मनुस्मृतीवर आम्हा हिंदूत्ववाद्यांची कधीच चर्चा रंगली नाही. मनुस्मृती ही खरोखरच योग्य होती की अयोग्य होती हा अभ्यासाचा विषय आहे. मी सावरकरांच्या विचारांनी प्रेरीत असल्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की जुने कोणतेही ग्रंथ मग ती गीता असो, मनुस्मृती असो, कुराण किंवा बायबल असो हे सर्व ग्रंथ फार फार तर वाचनीय असतील पण अनुकरणीय मुळीच नाहीत. त्या त्या ग्रंथात जर असे कोणतेही विचार असतील जे आजच्या युगासाठी कालबाह्य आहेत तर ते विचार केवळ वाचनीयच आहेत, अनुकरणीय होऊ शकत नाहीत. हिंदू म्हणून विचार करताना मला अतिशय अभिमान वाटतो की हिंदूंनी वेळोवेळी आपल्या कालबाह्य या तत्वानुसार अनिष्ट प्रथा मुळतून काढून टाकल्या आहेत. बाल विवाह, एकापेक्षा अनेक विवाह, विधवेस पुनर्विवाह न करु देण्याची प्रथा असो. या सर्व प्रथा स्वतः हिंदूंनी झिडकारुन लावल्या आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये मनुस्मृती-वृत्ती आहे असा आरोप लावणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य जनतेने जशी मनुस्मृती वाचली नाही, तसे त्यांनी संविधानही वाचलेले नसते. सामान्य माणसाला फक्त रोजच्या आयुष्यातील अडचणी सतावत असतात. आता हे भारत सरकारचे कर्तव्य आहे की संविधानाबद्दलचे धडे मुलांना शालेय जीवनापासून गिरवायला लावले पाहिजे. 

हिंदूंना मनुस्मृती जितकी प्रिय नाही तितकी प्रिय ती मनुस्मृती जाळणार्‍यांना आहे. कारण आपल्याकडे एक फॅड आहे की पाश्चात्य जगताने आपल्याच एखाद्या गोष्टीला मान्यता दिली तर ती आपण डोक्यावर घेतो. कुणाही हिंदूच्या मनात मनुस्मृती नाही. मग तरीही मनुस्मृती जाळली जाते, जिग्नेश मेवाणी सारख्या अनेक लोकांकडून तिची वारंवार स्मृती जागवली जाते, तर ही मनुस्मृती नेमकी काय भानगड आहे? हे जाणून घेण्याचे दुष्ट विचार जर एखाद्या पाश्चात्य माणसाच्या मनात आले आणि त्याने मनुस्मृतीचा अभ्यास करुन त्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर करुन गोडवे गायले तर बिच्चार्‍या मनुस्मृती जाळणार्‍यांना ती पाश्चात्य आवृत्ती सुद्धा जाळावी लागणार आहे. असे होऊ नये आणि जगभरातल्या लोकांना मनुस्मृतीचे आकर्षण वाटू नये म्हणून मनुस्मृती जाळणार्‍यांनी मनुस्मृती हा शब्द मनात सुद्धा उच्चारता कामा नये. नाहीतर जगात मनुस्मृतीविषयीचे आकर्षण वाढले जाईल आणि मनुस्मृती अजरामर होईल. ती आताही अजरामर करण्यात येत आहे, पण हे कृत्य हिंदूंकडून होत नसून मनुस्मृतीचा द्वेष करणार्‍यांकडून होत आहे. आता जिग्नेश मेवाणींना नरेंद्र मोदींसमोर मनुस्मृती आणि संविधान ठेवून दोहोंपैकी एकाची निवड करायला सांगायचे आहे. नरेंद्र मोदी संविधान निवडतील यात तीळमात्र शंका नाही. पण जिग्नेश मेवाणींना एक गोष्ट कळत नाही की मोदींनी संविधान निवडल्यानंतर जिग्नेश मेवाणींच्या हातात मनुस्मृतीच राहणार आहे आणि मग त्यांना आपल्या हातातील मनुस्मृती जाळावी लागणार आहे. ते जाळत राहतील व मनुस्मृती अजरामर करत राहतील. म्हणूनच मी म्हणतो हिंदूत्ववादी हे संविधान मानणारे आहेत आणि जिग्नेश मेवाणी व मनुस्मृती जाळून व वारंवार त्याबद्दल बोलून मनुस्मृतीस जगभरातल्या लोकांचे लक्ष जावे असे प्रयत्न करणारे खरे सनातनी आहेत. असो...!   

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Share:

कारण त्यांच्या रक्तामध्ये ती धमक नाही....


हिंदुस्थानचे पावित्र्य हे हिंदुस्थानमध्ये पुरातनापासुन प्राचीन काळापासुन चालत आलेल्या हिंदु संस्कृतीमुळेच आबाधित आहे. या देशावर अनेक मुघलांनी आक्रमण करुण भगव्या ध्वजावर रक्ताचे फवारे उडवले. या मुघलांनी पवित्रभुमीचे पावित्र्य हिन करण्याचा अतोनात प्रयत्न केला.यासाठि या भुमीचे जागोजागी लचके तोडले.पण हेच चारित्र्य अबाधित राखण्यासाठि हिंदुची प्रतिष्ठा राखण्यासाठि राणी लक्ष्मीबाई असो वा राजमाता जिजामाता असो अनेक स्त्रीयांनी आपल्या पतीप्रमाणे पतीव्रता धर्म पाळुन मुघलांशी व इंग्रजाशी आपल्या परिने संघर्ष केला. हिंदु धर्मातील स्त्रीया इतक्या कठोर आणि ज्वलंत मनाच्या होत्या कि पती युद्धाला जायच्या आधीच आपले कुंकु पुसुन टाकायच्या.इतके कठोर मन...!! त्यांना खात्री असायची कि जीव गेला तरी बेहद्दर आपला संसार ओसाड पडला तरी चालेल पण भरतभुमीचा संसार हा अबाधित राखलाच पाहिजे. खुद्द राजमाता जिजाऊंनी छ.शिवाजी महाराजांकडुन मृत्युपत्र लिहिले होते. अश्याच ज्वलंत,पराक्रमी पाश्वर्भुमीवर राजपुतांची पगडी अभिमानाने उंचावेल असा दिव्य पराक्रम राजपुतांची चितोडची राणी पद्मावती हिने केला. बाईलंपट पुरुषजातीला कलंक अश्या खिलजीच्या अधिन न जाता अग्नित उडी मारून देहत्याग करुण समस्त पुरुष नव्हे तर स्त्रीजातीला हिंदुत्व तसेच स्त्रीच्या चारित्र्यशील पराक्रामाची शिकवण राणी पद्मावतींनी दिली.१६ सहस्त्र नारी आणि महाराणी पद्मावतींच्या जोहाराने १३ व्या शतकात भव्य प्रचंड अग्नी यज्ञ हिंदुस्थान ने पाहिला असेल अन् भरतभु आपल्या कन्येच्या अग्नी यज्ञाने पवित्र झाली असेल.
    महाराणी पद्मावती च्या बलिदानाची कथा ऐकली तर अंगावर शहारे आणि मनात अभिमानाचे तसेच खिलजी सारख्या नंपुसक इस्लामी राजाच्या विरोधात रागाचे फव्वारे उडतात. परंतु या महापराक्रमाचा खुद्द हिंदुस्थानात अपमान होईल असे या भरतभु ने तरी मनात केले होते काय? हिंदुस्थानच्या जनतेच्या पैसावर व प्रसिद्धिवर माजलेल्या भन्साली सारखे खिलजीच्या प्रवृत्तीची लोकं आज अभिव्यक्ति स्वांतत्र्याच्या नावाखाली असले घाणेरडे प्रकार करतात तेव्हा हृद्य खिन्न होते.राणी पद्मावतीचा गैरसंबंध खिलजी सोबत दाखवणे म्हणजे आपल्या आईने आयुष्यभर मुलांसाठि काबाडकष्ट करुण हि मुलं तिच्यावर परपुरुषाचा आव आणतात हिच गोष्ट झाली.पण त्यामुळे ज्या हिंदुचे मन विरघळत नसेल राग येत नसेल तर तो हिंदु नंपुसकच ठरेल. या वादावर फ्रांन्स चा एक प्रसंग आठवला.फ्रांन्समध्ये शार्ली आब्दो पत्रिका नामक वर्तमानपत्रात मोहम्मद पैंगबर यांचे कार्टुन छापण्यात आले.या प्रसंगाच्या बरोबर दोन दिवसानंतर इसिस च्या ४ आतंकवाद्यांनी शार्ली आब्दो पत्रिकाच्या कार्यालयात घुसुन १३ पत्रकारांना गोळ्या घातल्या. याचा संबंध आपण या घटनेशी जोडुया. राणी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात कारणी सेनेना उठाव केला.. हिंदुत्ववादि संघटनांनी भन्साळी विरोधात धमक्या दिल्या. तर काहि गैर नाहि.पण ह्या धमक्या आपण सत्यात उतरवु शकत नाहि. हिंदुस्थान मध्ये राहुन हिंदु उठाव करेल तर पुरोगाम्यांच्या मते भगवा आतंकवाद नाहि का निर्माण होईल? आणि त्याच रितिने चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख पुढे ढकलली नव्हे नव्हे तर हिंदुस्थानचे चरित्र हनन करण्यासाठि टपलेले ब्रिटिश कसे मागे राहतील.या वादाची संधी पाहुन ब्रिटिश बोर्ड ऑफ फ्लिम क्लासिफिकेशन ने चित्रपट निर्मितीसाठि परवानगी हि दिली. या पेक्षा तर इस्लामला साजेशी गोष्ट म्हणजे नाहरगड येथे चित्रपट विरोधी हिंदुत्ववादि संस्थेच्या कार्यकर्ताचा खुन करून " हम पुतले नहि जलाते हम लटकाते है; पद्मावती फ्लिम का विरोध करने वाले हर काफिर का यहि हश्र किया जाएगा" असे लिहिले होते. लिखाणावरुन धर्म तर समजुनच घ्या.
   इतकं सगळं होऊन हि हिंदु नव्हे नव्हे सरकार गप्प बसले नाही तर चित्रपट प्रदर्शित होयाला परवानी हि दिली.  याची खंत आहे. भीमा-कोरेगाव या घटनेत मृत्यू न झालेल्या अफवेला धरून अख्या महाराष्ट्रात हिंसक दंगल उसळली. पण त्यांच्यात  कोणत्याही माध्यमांना गुंड दिसले नाही. पण आज करणी सेना आपले हक्क मागायला विनवण्या करून झाल्यांनतर शेवटच्या क्षणी जर हाती शस्त्र घेतेय तर गैर काय ? हक्क शांत पद्धतीने मागितले तर ते दिले जात नाही पण ते हिंसेने सुद्धा मिळवू नये का ? आणि हि हिंसा कसली ? जर आपले हक्क मागण्यासाठी काश्मीर मध्ये झालेली सैनिकांवर दगडफेक हि नागरिकत्व म्हणून मान्य केली जाते. तर मग तो हक्क करणी सेनेला नाही का? एका तरी माध्यमांना वाटले का कि खरा इतिहास जगासमोर आणावा? हे वाटले नाही कारण त्यांच्या रक्तामध्ये ती धमक नाही. आणि कदाचित भविष्यात हि ते रक्त निर्माण होईलं असे वाटत नाही. बस वर झालेली दगडफेक हि करणी सेनेच्या नावावरून जाहीर करून कोणत्याही शहानिशा न करण्याइतपत  माध्यमे चुकार झाली आहेत. .जो आपल्या आईचा अपमान करेल त्याला या भुमीवर जिवंत राहण्याचा काहि एक अधिकार नाहि.अधर्मावर धर्माने शस्त्र व शास्त्राने मात करावी हे सत्यात उतरावे. या पुढे जो भन्साळीसारख्या नंपुसक पुरुषासारखी पावले उचलेल तेव्हा हिंदुंनी केलेल्या उठावामुळे हजार वेळा आधी जिवाचा विचार करेल.
राणी पद्मावती चित्रपटाविरोधात आ.संभाजीराव भिडे गुरुजींचा पुढिल श्लोक जर आपण सत्यात उतरवला तर खर्या अर्थी महाराणी पद्मावती व सोळा सहस्त्र स्त्रींयाना श्रद्धांजली प्राप्त होईल.

मृत्युजिभेवरी जिणे जगले अखंड
उध्वस्त नष्ट करण्या रणी म्लेंच्छबंड
शिवसिंहसदृश्य करु अवघा स्वदेश
हिंन्दुत्वशत्रु सगळे करुं नामशेष
-गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी 


-नेहा जाधव 

Share:

गडकोट मोहिमेसाठी राज्यभरात उत्साह.....


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारतीर्थ गडकोट मोहीम अवघ्या दोन दिवसांवर आहे. या मोहिमेकरिता महाराष्ट्रभरातील शिवभक्त आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्यापासून श्री प्रतापगडाकडे येणाऱ्या शिवभक्तांची रीघ सुरु होईल. श्री प्रतापगडाने इतिहासात कधीही पहिली नसेल इतकी शिवाजी आणि संभाजी रक्तगटाची, इच्छा-आकांक्षेची, ध्येय धोरणाची, कार्य-कर्तुत्वाची व भारतमातेसाठी जगण्या मरण्यात आनंद मानणारी शिवभक्त-धारकर्यांची संख्या पाहणार आहे. आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने,
 भगवान श्री शिवछत्रपतींच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रेरणेने या धारतीर्थ गडकोट मोहिमेचा प्रारंभ माघ शु. नवमी दिनांक २६  जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता यंदाच्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.  पुढे चार दिवस घर दार गोत्र कुळ प्रपंच जात पात प्रांत विसरून सारे धारकरी एकत्र होऊन हिंदवी स्वराज्याच्या शिवाजी मार्ग आणि संभाजी मार्ग चालण्यासाठी सज्ज झाले. भारतमातेचा संसार दुरुस्त करण्यासाठी आणि या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काम करणारे तरूण मंडळी चार दिवस आपल्याला लागणारे अन्न पाणी अंथरून पांघरून सह्याद्रीच्या कुशीत प्रवास करणार आहे.  सह्याद्रीच्या प्रवासाबरोबरच दरवर्षी प्रमाणे यंदाही मोहिमेत व्याख्यान होणार आहेत. ऐतिहासिक स्थळाबरोबरच ऐतिहासिक घटनांचे हि मार्गदर्शन असणार आहे. याचीच ओढ लागलेले लाखो धारकरी वर्ष भर चातकाप्रमाणे मोहिमेची वाट पाहतात. त्यात भर म्हणून यंदाच्या मोहिमेत महाराष्ट्राबरोबर इतर हि अनेक राज्यातून धारकरी मोहिमेकरिता येणार आहेत. यंदाच्या मोहिमेचा आकडा हा संपूर्ण देशाच लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यंदा मोहिमेत प्रसार माध्यमांची रेलचेल हि पाहयला मिळेल. या मोहिमेतून संपूर्ण देशाला विलक्षण शिस्तीच दर्शन घडणार आहे. या गडकोटांनाच आपली दुर्गपंढरी मानून आ. गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींना विठ्ठलरूप मानून भगव्या ध्वजाचे वारकरी म्हणजेच शिवछत्रपतींचे धारकरी या विलक्षण चेतना देणाऱ्या शक्ती देणाऱ्या सामर्थ्य देणाऱ्या धारतीर्थ यात्रेत सहभागी होणार आहेत. 
मोहिमेत सभागी होणारे छोटे धारकरी 

यंदाच्या धारतीर्थ  गडकोट मोहिमेचा समारोप श्री रायरेश्वर येथे होणार आहे...
मग तुम्ही केली का मोहिमेच्या प्रस्थानासाठी  तयारी...
.


Share:

"लेखण्या मोडायच्या आणि बंदुका हातात घ्या" म्हणजे नेमकं काय ?



सावरकरी वाक्यांचा विपर्यास करण्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभली आहे. आपण कोणता संदर्भ कुठे लावतो याचा साधा विचार ही लोकांना करवत नाही. हा त्यांच्या करंटेपणा समजावा की भाबडेपणासावरकरांचेलेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या ! हे वाक्य सर्रास कुणीही वापरतो. हे वाक्य इतक्या सहज स्वतः सावरकरांनीही उच्चारले नसेल. सावरकरांचे काही वाक्ये अनेक लोक आधार म्हणून वापरतात. काही दिवसांपूर्वी शरद पवारांना 'गाय ही उपयुक्त पशू आहे' या सावरकरी वाक्याचा साक्षात्कार झाला होता.

स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी नेहमी या वाक्याचे रवंथ करीत असतात. तसेच स्वतःस हिंदूत्ववादी म्हणवून घेणारी मंडळी "लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या" हे वाक्य चघळत बसतात. पण सावरकरांनी हे वाक्य काकोणत्या परिस्थितीतव कोणत्या अर्थाने म्हटले होतेयाचा विचार कुणीही करत नाही. सोशल मिडीयावर अनेक हिंदुत्वाचे तारणहार दिसून येतात. काही झाले तरी त्यांना सावरकरांच्या या वाक्याची आठवण सतत होत असते. म्हणजे कुठेही एखादी धार्मिक तणावाची घटना घडली तर लगेच "लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या" किंवा सैनिकांवर हल्ले झाले तर "लगेच लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या" किंवा गोरक्षकांनी कायदा हातात घेतलातर त्याचे समर्थन करण्यासाठी सुद्धा "लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या". सावरकर आज असते तर उपहासाने म्हणाले असतेएक वेळ बंदुका मोडा होपण ह्यांना आवराअसो. बरे हे सांगणारे कोणतर तासनतास फेसबुकवर घुटमळणारे तथाकथिक हिंदुत्वाचे रक्षक. मग लेखण्याच जर मोडायच्या आहेत. तर सुरुवात स्वतःपासून नको का करायलामुळात हा मुर्खपणाच आहे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत नागरिकांनी बंदुका हातात घ्यायच्या नसतात. तसे स्वतः सावरकरांनी सांगून ठेवले आहे.

सावरकरांनी हे वाक्य उच्चारले ते १९३७ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना. सावरकर हे पहिले आणि शेवटचे साहित्यिक अध्यक्ष असावे ज्यांनी अशा प्रकारचे वक्यव्य थेट साहित्य संमेलनात केले. पहिली गोष्ट त्यांनी हे वक्यव्य केलेत्याआधी ते स्वतः सशस्त्र क्रांतीकारक होते. वातानुकूलित खोलीत बसून त्यांनी दिवस काढलेले नाहीत. त्यामुळे असे वक्यव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार होता. दुसरी गोष्ट म्हणजे लेखण्या मोडून बंदुका हातात घ्यायच्या म्हणजे प्रत्येक नागरिकाने बंदुका घेऊन रस्त्यावरुन येड्यागबाळ्या सारखे फिरायचे नाही. तर सैन्यात भरती व्हायचे आहे. या वक्तव्याला दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी सुद्धा आहे. "आमच्यावेळी शस्त्र मिळत नव्हतीपण आता ब्रिटीश स्वत:च तुम्हाला महिना पंचविस रुपये पगार देऊन तुमच्या हातात बंदुका देत आहेत या संधीचा फायदा घ्या" असे सावरकरांचे म्हणणे आहे. म्हणजे आता देश स्वतंत्र्य होण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यावेळी हिंदू तरुणांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. उद्या जर देश स्वतंत्र झाला तर आपले सैन्यबळ मजबूत असले पाहिजे. त्याचप्रमाणे ब्रिटिंशांच्या पक्षातून जरी बंदुका हातात घेतल्यातरी योग्य वेळ आल्यास बंदुकीचे टोक कुठे वळवायचे हे पाहता येईल. एवढा परिपक्व विचार सावरकरांनी केलेला होता. पण स्वतःस सावरकर भक्त किंवा सावरकरवादी म्हणवून घेणारे हिंदूत्ववादी उठसुठ या वाक्याचा जप करीत राहतात. पण त्यामागे त्यांचा असा कोणताही परिपक्व विचार नसतो. मुळात ते परिपक्व नसतात म्हणूनच हे वाक्य उच्चारत बसतात. महापुरुषांच्या विचारांचे दहन त्यांचेच अनुयायी करतातअसे वारंवार दिसून आले आहे. सावरकर सुद्धा अपवाद नाहीत.

या वाक्याला अनुसरुन सुभाषचंद्र बोस व हिंदुमहासभेचे जपान शाखेचे अध्यक्ष रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिंशांशी दोन हात केले आहे. म्हणजे सावरकरांनी हे वाक्य उच्चारण्यामागे जो विचार केला होता तो किती व्यापक होता. बंदुका हातात घ्यायच्या त्या राष्ट्र रक्षणासाठीराष्ट्रात अराजकता माजवण्यासाठी नव्हे. सावरकरांवर टीका करण्यासाठी विरोधकही या वाक्याचा आधार घेतात. सावरकर कसे अराजक होते हा त्यांचा आरोप. पण मूळ पार्श्वभूमी वेगळीच आहे. सावरकर भक्त आणि विरोधाक दोघांनीही सावरकरी वाक्यांचा अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे असले उथळ विधाने होत राहतात. सोशल मिडीयावर असले विधाने करणारे मोठ्या संख्येने आहेत. आपण अशा आशयाच्या पोस्ट्स वाचल्या असतील की लेखनाने क्रांती होत नाहीशस्त्रानेच होते. पण हे वाक्य ते फेसबुकवर पोस्ट करुन नंतर तृप्त ढेकर देतात. मुळात हिंदूंच्या तत्वज्ञानानुसार सशस्त्र क्रांती हा केवळ एक पर्याय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे लोटलेली आहेत. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे इथे क्रांती केवळ मतपेटीतूनच होणार आहेबंदुकीच्या नळीतून नव्हे. सावरकरांनीही लोकशाहील अपाठिंबा देत असे वक्तव्य केले आहे. दुसरी गोष्ट बंदुकीच्या नळीचा आग्रह हा कम्युनिस्टांचा आहे. त्यामुळे उगाच कुणीही आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणे करु नये आणि ते करायचे असल्यास तर स्वतःच्या बळावर करावेसावरकरांना मध्ये आणू नये. सावरकरवादाचा पाया बुद्धीवादावर उभा आहेनिर्बुद्धवादावर नव्हे. त्यामुळे आपल्या वैचारिक दिवाळखोरीत कुणीही सावरकरांना मध्ये आणू नये. त्यांना उगाच बदनाम करु नये. ही बाब सावरकर समर्थक आणि सावरकर विरोधक दोघांनाही लागू पडते. असो...!

 - जयेश शत्रुघ्न मेस्त्री
 9967796254
Share:

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट

   
( डावीकडून भरतदादा माळी, अधिवक्ता चेतनराव  बारस्कर, बळवंतराव दळवी )
१ जानेवारी  २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे  घडलेल्या दुर्दैवी दंगलीबाबत अनिता रवींद्र साळवे या स्त्रीने खोटी साक्ष देऊन आ.संभाजीराव भिडे गुरुजींविरुद्ध पुणे येथे  खोटा गुन्हा दाखल केला.  त्या नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद च्या हाके नंतर महाराष्ट्रात तणावाचे वातवरण निर्माण झाले. या बंद मुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोटींचा विध्वंस झाला. गेले काही दिवस मुंबई येथे हिंसक घडामोडी पाहता यामागे देशविघातक , नक्षलवादी संघटनाचा हात असावा असा संशय निर्माण झाला आहे. आ. संभाजीराव भिडे गुरुजी गेले कित्येक वर्ष देव-देश-धर्मासाठी निर्व्यसनी तरूण पिढी निर्माण करण्यासाठी दिवस-रात्र अनवाणी झटत आहेत. त्यांच्या वर केलेले आरोप हे पूर्वनियोजित कट असून तक्रारकर्त्या स्त्रीच्या मागे कोणाचा हात आहे हे शोधण्याची गरज आहे.      आ. संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री रायगडावर पुनर्स्थापना होणार्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाचे काम महाराष्ट्रात उभं राहत आहे. या कार्यात श्री शिवछत्रपती आणि श्री संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारी पिढी मोठ्या जोमाने हे कार्य करत आहे. या सोबतच येणारी श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर अशी आहे. मुंबईतून यंदा हजारोंच्या  संख्येने  धारकरी या मोहिमेला जाणार आहेत. त्याकरिता आ. संभाजीराव भिडे गुरुंजीची सभा आयोजित केली होती. परंतु  मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून  रविवार, ७ जानेवारी २०१८ रोजी लालबाग  येथे होणारी  गुरुजींची हि सभा रद्द न करता पुढे ढकलण्यात येत आहे. याकरिता आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागा तर्फे पत्रकार परिषद भरवण्यात आली. झालेल्या दंगलीचा जास्त पडसाद हा मुंबई येथे उमटल्याने देशविघातक शक्तींना दंगल करण्याची पुन्हा संधी मिळू नये म्हणून हि सभा पुढे ढकलण्यात आली आहे. 


 आम्ही पोलीस प्रशासनाला सर्व बाबतीत सहकार्य करत असल्याने हा निर्णय घेतला.
-श्री बळवंतराव दळवी 
 ( श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई कार्यवाह )


गुरुजींवर केलेले आरोप हे कटकारस्थान आहे. यामागे काही जातीयवादी संघटनाचा हात आहे. आणि ते  पोलीस प्रशासनाने आणि सरकारने लवकरात लवकर शोधून काढावेत.
- अधिवक्ता श्री चेतनराव बारस्कर
  (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे
(पत्रकार परिषद, मुंबई)

Share:

जगदंबा (तलवार) जशी म्लेंच्छाना ज्या वाऱ्याच्या वेगानं....

   

छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राच आराध्य दैवत असं आपण म्हणतो. हे शिवछत्रपती आम्हाला कळले का ? महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आम्ही त्यांना सीमित करून टाकलं. पण महाराष्ट्रात गेल्या नऊ दशकात एक असा व्यक्ति राहतो ज्यांनी वसा घेतलाय संपुर्ण महाराष्ट्राचा उगवत्या तरुणपिढिचा रक्तगट श्री शिवाजी श्री संभाजी करायचा. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं आपण केवळ ऐकतो पण त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी. “जगावे मातृभुमीसाठि आम्हा वेड हे एक” या ओळीप्रमाणे गुरुजींनी आपले सर्व आयुष्य मायभुच्या चरणाशी अर्पण केले आहे. कौटिल्यप्रमाणे बुद्धि चातुर्य, मुखी तुकाराम-गाथा, समर्थ रामदास स्वामी प्रमाणे ज्ञान असे गुण गुरुजींमध्ये आहेत. तसेच, श्री शिवछत्रपतींची जगदंबा (तलवार) जशी म्लेंच्छाना ज्या वाऱ्याच्या वेगानं घायाळ करत होती, हो ती वाऱ्याची गतिमानता आणि आदित्य तेजस्विता त्याच वेगानं आणि तेजान गुरुजींच कार्य देशभरात सुरु आहे.   
(आ. संभाजीराव भिडे गुरुजी)

   भिडे गुरुजी महाराष्ट्रात निर्माण झालेल हे अजब रसायन. अत्यंत तल्लख स्मरणशक्ति, स्तिमित करणारी बुद्धिमता, एखाद्या दगडाच्या अंगावरहि रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने २४ तास-तिन्हि त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय. हि व्यक्ति जिथे उभी राहते तिथे तरुणांची गर्दि जमते. ज्यांच्या संपर्कात आली त्यांची गुरु सदगुरु, विठुमाऊली, समर्थ बनली. आपल्या आयुष्याचा ज्याप्रमाणे सोबतीला त्रास होऊ नये म्हणुन लग्न-संसारापासुन समर्थ रामदास स्वामी दुर गेले त्याच तत्त्वाला धरुन गुरुवर्यांनी गृहस्थ संसार नाकारुन अखंड भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार पुनरपि संस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. गुरुजींचे संपुर्ण नाव श्री संभाजीराव विनायकराव भिडे. समस्त धारकरी नव्हे तर महाराष्ट्र गुरुजी या नावे ओळखतात. डोक्यावर वारकरी टोपी, अंगात सदरा अन् धोतर हि या व्यक्तिमत्त्वाची वेशभुषा. गुरुजी रोज सांगली मध्ये सायकल ने भ्रमंती करतात.

गावाबाहेर जायचे असल्यास स्वखर्चाने एसटि किंवा ट्रेनचा वापर करतात. गुरुजींच्या दिवसाची सुरुवात हि पहाटे १५० ते २०० सुर्यनमस्कार अन् व्यायामाने होते.  वयाने जरी शरीर थकले असते तरी मन मात्र अजुनहि अखंड भारत हा अभेद्य हिंदुस्थान करण्याच्या दिशेनेच कार्य करीत आहे. गुरुजींचे शिक्षण हे एखाद्या राज्यकर्त्याला हि लाजवेल इतके आहे. गुरुजी फिजिक्स या विषयात गोल्ड मेडिलिस्ट आहेत. एकेकाळी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक हि होते. कालांतराने प्राध्यापक नोकरी सोडुन गुरुजींनी सांगली गाठली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना स्थापन करुण उगवत्या पिढिला देवदेशधर्माची शिकवण गुरुजींनी या माध्यमातुन दिली. येणारी तरुण पिढि हि शिवाजी-संभाजी रक्तगटाची व्हावी, भारतमातेचा उध्वस्त झालेला संसार पुन्रप्रस्थापित करुण हा देश जागतिक पातळीवरती महासत्ता म्हणुन उभा रहावा यासाठि गुरुजींनी खेडेपाडे पालथी घालायला सुरुवात केली. गावोगाव गुरुजी अनवानी पायाने फिरण्याचे कारण म्हणजे संपुर्ण हिंदु समाज दोन मंत्रावर चालला पाहिजे, जर जगाच्या संघर्षात राष्ट्र म्हणुन टिकायचे असेल तर दोनच मंत्र उपयुक्त आहे. ते दोन महामृत्युंजयमंत्र म्हणजे श्री शिवाजीमंत्र व श्री संभाजीमंत्र या दोन मंत्राचा वापर करुण गुरुजी गेले ३० ते ३५ वर्ष अविरतपणे अखंड महाराष्ट्र पालथा घालत आहेत. गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे देशाचा सीमा ओलांडुन जाणारा हिंदुस्थान उभा करायचा आहे. हा हिंदुस्थान उभा करण्याचे काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी करीत आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे उपक्रम-

   प्रत्येक हिंदुने, श्रीशिवछत्रपती व श्री संभाजी महाराज यांच्यासारखी देश, देव व धर्मासाठि, जगण्याची, मरण्याची क्षमता व तीव्रता रक्ताच्या थेंबाथेबात बिंबावी म्हणुन गुरुजींनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची स्थापना केली. गुरुजी स्वतः ला हि धारकरी म्हणुनच संबोधतात. प्रत्येक गावातुन, खेडेपाड्यातुन हरएक तरुणांच्या मनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे गुरुजी राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा, धर्मनिष्ठा रुजवण्याचे कार्य करित आहोत.

   कशासाठि आणि जगावे कसे मी |
      विचारा स्वतः ला असा प्रश्न नेहमी |
जगूं पांग फेडावया मायभुचे |
 आम्हि मार्ग चालु जिजाऊ सूताचे ||

    हि शिकवण प्रत्येकाच्या तनामनात रुजली पाहिजे. हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उद्देश्य असतो. त्यासाठि वर्षभरात गुरुजींच्या शब्दाला प्रमाण समजुन धारकरी उपक्रम पुर्ण करतात. ह्या उपक्रमाद्वारे धारकरी जोडण्याचे आणि मायभुचे कर्तव्य पार पाडण्याचे कार्य होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे १९९२ पासुन शिवतीर्थ रायगडावर श्री शिवछत्रपतींच्या मुर्तीची आणि समाधीची पुजा धारकरी रोज स्वखर्चाने करीत आहेत. श्री शिवछत्रपतींच्या जन्माआधी देशावर पारंतत्र्याचा अधंकार अति दाट होत चालला होता. अश्या वेळी जिजाऊंच्या पोटि शिवराय असताना नवरात्रीत घट बसवुन जिजाऊंनी श्री भवानीमातेकडे देशाचा उध्वस्त होणारा संसार पुर्नप्रस्थापित करण्यासाठी जे मागणं मागितलं तेच मागणं रोज सकाळी पहाटे दौडत जाऊन पदर पसरवुन देशकल्याणाकरीता मागणं मागण्याचा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड. हिंदुत्वाचे कुंकु अबाधित राहण्यासाठि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी एक नाहि दोन नाहि तब्बल ४० दिवस आनन्वित अत्याचार सहन केला. मृत्युच्या दिशेने बलिदान होण्याच्या मार्गावर फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधित मरणाशी झुंज देत राहिले म्हणुन प्रत्येकाने सुतक म्हणुन पाळायचा उपक्रम म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास.

     गुरुजी म्हणतात, घडली धारातीर्थे म्हणुन टिकली तिर्थक्षेत्रे. काशीजी कि कला जाती मथुरा मस्जिद होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी या ओळी प्रमाणे आज हिंदुस्थान मुघलांच्या तावडीतुन मुक्त आहे त्याचे कारण श्री शिवाजी महाराज व श्री संभाजी महाराज आणि मावळे यांच्या अपार कष्टातुन. त्यामुळे त्यांच्यासारखी धर्मनिष्ठा जर आपल्या अंगी यावी असे वाटत असेल तर मोहिम करणे गरजेचे. श्री शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक मावळ्यांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या गडकोटांच्या महिमा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. यंदाची मोहिम श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर (२६ जानेवारी २०१८  ते ३० जानेवारी २०१८ ) आहे. हिंदुसमाजातील तरुणपिढि मृतवत् अंतकरणाची तसेच ध्येयवादी, प्रखर देशधर्मवादी बनवायची असेल तर मोहिम हा एकमेव उपाय.
(‘३२ मण सुवर्ण सिंहसन पुन्रस्थापना’ संकल्पासाठी गुरुजींच्या हाकेवर जमलेले धारकरी )

      ४ जुन २०१७ रोजी  गुरुजींच्या शब्दाला प्रमाण समजुन लाखो धारकरयांच्या उपस्थितीमध्ये श्री रायगडावर ‘३२ मण सुवर्ण सिंहसन पुन्रस्थापना’ हा संकल्प पार पडला. शिवरायांनी निर्माण केलेले सुवर्ण सिंहासन हि हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठा श्री संभाजी राजेंच्या मृत्युनंतर मुघलांनी आक्रमण करुण मोडुन टाकली. हि हिंदुची प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करण्यासाठि लवकरच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे ३२ मण सुवर्ण सिंहासनाची स्थापना करण्यात येणार आहे.
( परमपूज्य संभाजीराव भिडे गुरुजी )

   श्रद्धेय संभाजीराव भिडे गुरुजी म्हणजे प्रचंड दाहकता असलेले अग्निकुंड. जे धारकरी बनले ते या देशधर्मभक्तिच्या अग्निकुंडात जळाले. जर आपल्याला हि या देव-धर्म भक्तिचे धडे शिकायचे असतील तर एकदा तरी गुरुजींना भेट द्या. सदगुरुच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सदगुरुची झाला

 असे बोलुन आज लाखो धारकरी गुरुजींच्या उपदेशावर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुरे करीत आहे.

एक मात्र चिंतन आतां,एकची विचार
भाग्यपुर्ण होईल केव्हा,हिंदुभुमी थोर
दुःख दैन्य जाऊनी विलया, होऊ दे स्वंतत्र
भाग्यपुर्ण आई ध्यानीं मनी हाची मंत्र 
 या ओळीप्रमाणे भिडे गुरुजी हा व्यक्ति अविरत अखंड निव्वळ देव-देश-धर्म या स्वार्थासाठि अखंड अविरत  जगत आहे.
- नेहा जाधव

Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)