हिन्दुस्थानच्या आधुनिक इतिहासाचा विचार करता, गेल्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या मांदियाळीतील अबाधित स्थान माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांचे आहे. अटलजी हे त्या मोजक्या राजकारण्यांपैकी होते, ज्यांनी राष्ट्रभक्तीचा दिपक आपल्या चित्तांत सदोदित प्रज्वलीत ठेवला. त्यांच्या देशप्रेमास, राष्ट्रभक्तीस तुलना नाही. आपल्या जीवनाच्या अंतकालापूर्वी बरीच वर्षे ते आजारी होते, पण तरीही 'अटलजी आहेत' ही बातमीच प्रचंड धीर देणारी होती.
ग्वाल्हेरास पंडित कृष्णबिहारी वाजपेयीजी यांचे घरात अटलजींचा दि.२५डिसेंबर१९२४ रोजी जन्म झाला. त्यांच्या अंगी उपजतच नेतृत्वाचे गुण होते. प्रारंभी कुमार सभा व आर्य समाजापासून त्यांच्या नेतृत्वास व कार्यास सुरूवात झाली. पुढे आपल्या प्रखर विद्वत्ता व कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी संस्कृत व हिंदीत उत्कृष्ट गुणांनी पदवी संपादन केली. बाबासाहेब आपटे यांच्या प्रभावाने अटलजी संघप्रवाहात आले. सन १९३९ मध्ये त्यांचा संघाशी परिचय झाला. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले अटलजी व त्यांचे ज्येष्ठ बंधू तेवीस दिवसांसाठी चले जाव आंदोलनात तुरूंगात गेले. पुढे त्यांची मुक्तता करण्यात आली. उत्तर प्रदेशात विस्तारक म्हणून गेलेले अटलजी पं. दिनदयालजी उपाध्याय यांचे संपर्कात आले व त्यांच्या पत्रांमध्ये लेखन करू लागले.
सन १९५१ मध्ये ते भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते बनले. पुढे पं.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सह काश्मिरप्रश्नी पंडीतजींबरोबर १९५४ मध्ये उपोषणास बसले होते. पंडितजींचा या आंदोलनादरम्यान अंत झाला. त्यानंतर भारतीय जनसंघास अटलजींनी वाहून घेतले. आपली प्रथम निवडणूक सन १९५७ मध्ये बलरामपूर येथे ते जिंकले. पुढे या महापुरूषाने खस्ता खाल्ल्या परंतु मागे वळून पाहीले नाही.
१९७५-७७ दरम्यान आणिबाणीच्या कालावधीत इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांसह अटलजी तुरूंगात होते.
सन १९७७ च्या निवडणूकीतील विजयानंतर
अटलजी मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळांत परराष्ट्रमंत्री म्हणून पदाधीष्ठित झाले. अभिमानाची बाब ही, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत भाषण करणारे ते प्रथम भारतीय होत. त्याग तपस्येमूळे अटलजी लवकरच भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाले.
सन १९८० साली भारतीय जनता पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह प्रविष्ट होवून अटलजी भाजपचे प्रथम अध्यक्ष बनले. या पक्षाने पुढे अनेक कार्ये सिध्दीस नेली.
सन १९९६ साली ते तेरा दिवसांकरिता पहिल्यांदा प्रधानमंत्री बनले. तेरा दिवसांनी त्यांनी पदत्याग केला. १९९८-९९ ला दुसऱ्यांदा तर १९९९ -२००४ या कालावधीत तिसऱ्यांदा अटलजींनी पंतप्रधानपदाच्या आसनास सुशोभित केले. या सर्व कालावधीदरम्यान अनेक अभिमानास्पद घटना घडल्या, अनेक दु:खद घटनाही घडल्या परंतु अटलजींच्याच,
'ना हार मे ना जित मे
किंचीत् नही भयभीत मै'
या ओळींनुसार आपले धैर्य त्यांनी कधीच सांडले नाही. पोखरण च्या अणूस्फोटात असो वा कारगीलच्या समरात, वा गुजरातच्या भूकंपात, अटलजींनी संपूर्ण धैर्याने कार्य केले. त्यांनी आपल्या सेवाकार्यास एकनिष्ठेने पार पाडले.
हिन्दुस्थानचा हा प्रधानमंत्री कडवा राष्ट्रभक्त होता, परंतु हळव्या कवीमनाचा होता. चंद्राच्या शितल छायेसारखा शांत होता. ते आपल्या काव्यातून ठायीठायी राष्ट्रभक्तीचे झरे निर्माण करत असत.
यह वन्दन की भूमि है,
अभिनन्दन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है,
यह अर्पण की भूमि है,
इसका कंकर कंकर शंकर है,
बुन्द बुन्द गंगाजल है
हम जियेंगे तो भी इसिके लिए
मरेंगे तो भी इसीके लिए।।
आपल्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीपर कवितांमधून देशप्रिती जागृत करणारा या पुण्यपुरूषास 'भारतरत्न' पुरस्कार मिळावयास अंमळ विलंबच लागला खरा, पण काही व्यक्तीमत्वे अशीही असतात, की ज्यांच्यामूळे पुरस्काराचाच सम्मान होतो. अटलजी त्यांतीलच एक होते.
अटलजींच्या जाण्याने तमाम हिन्दुस्थानाची जी हानी झाली आहे, तिजला शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. या भरतभूमीच्या सुपुत्रास इश्वर सद्गति देवो व अक्षय्य मोक्ष प्रदान करो, हिच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे!
वन्दे मातरम्
- सुधांशू सुधीर कविमंडन,
बुलढाणा
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteअसा नेता परत होने नाहि
ईश्वर त्यांच्या आत्मेस शांती देवो .
Khup chan lekh Sudhanshu....
ReplyDeleteपू.अटलजी,वीर सावरकर,लो.तिलक यांच्याच तोडीचे जाज्वल्य राष्ट्रभक्त होते यात कुणाला शंका नसावी..........
ReplyDeleteKhupch sunder
ReplyDeleteआदरणीय पंतप्रधान अटलजी या दृढनिश्चयी,संयमी,सत्वशील, समृद्ध व्यक्तिमत्वाला सश्रद्ध आदरांजली,,
ReplyDeleteसुधांशु जी,, आपल्या शब्दांनी स्तब्ध नि निशब्द केलं,,
Prernadai व्यक्तिमत्व हरवल
ReplyDeleteCasino Game For Sale by Hoyle - Filmfile Europe
ReplyDelete› casino-games https://septcasino.com/review/merit-casino/ › casino-games › casino-games › casino-games Casino Game for sale by casino-roll.com Hoyle on Filmfile Europe. Free shipping for most countries, no download nba매니아 required. febcasino Check the deals หาเงินออนไลน์ we have.