श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली देताना त्यांच्या राष्ट्रीप्रेमाविषयी सांगताना पुढील उद्गार काढून श्रद्धांजली अर्पण केली.
''हे अति अति अति दुःखाची गोष्ट आहे. ही वार्ता ऐकल्यानंतर संबंध देशातल्या सगळ्याच लोकांच्या अंतकरणाला आपल्या घरातलं कोणीतरी गेला असच वाटतंय. आयुष्य ते जगले ते भारतमातेच्या पूजेसाठीच जगले. त्यांचा असा विश्वास होता की देशसेवा आणि भारतमातेची सेवा याच्यात फरक नाहीये.
जे कशासाठी वेली तरू फुल घ्यावे ।
स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावे ।।
असंख्यात पुष्पे हवी पूजनाला ।
म्हणा अर्पिला देह हा मायभूला ।।
या कठोर व्रताच आचरण करणारं त्यांच जीवन होतं. ते कर्मवंत होते, ज्ञानवंत होते, शिलवंत होते, बुद्धिवंत होते, आणि मुख्य म्हणजे भारतमातेचे विलक्षण कर्तबगार असे सुपुत्र होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गानी हा देश नेण्याचं उत्तरदायित्व भगवंताने तुम्हा आम्हा सर्वांवरती सोपवलेला आहे.
अग्नी कर्पूराचे मेळी । काय उरली काजळी ।।
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ।।
अग्नी आणि कापूर एकत्र आल्यानंतर खाली राख नाही वर धूर नाही, प्रकाश आणि सुंगध देऊन निघून जावं तसच त्यांचं जीवन आपल्यासमोर प्रत्यक्ष ते जगले ते आपण पाहतो. तो आदर्श घेऊन भविष्यात सगळ्या उगवत्या पिढीतल्या तरुणांनी जगावं आणि या भारतमातेला विश्वाचा बाप बनण्याची ताकद द्यावी असं भगवंताच्या पायाशी मागून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. विनम्र प्रार्थना करतो. "
असं म्हणून त्यांनी या देशाचे माजी पंतप्रधान व भारताच्या राजकारणात भीष्म पितामह तसेच अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणारे अटल बिहारी वाजपेयी यांना दाटलेल्या कंठानी भावपूरनी आदरांजली अर्पण केली.
असं म्हणून त्यांनी या देशाचे माजी पंतप्रधान व भारताच्या राजकारणात भीष्म पितामह तसेच अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणारे अटल बिहारी वाजपेयी यांना दाटलेल्या कंठानी भावपूरनी आदरांजली अर्पण केली.
विनम्र अभिवादन...!!
ReplyDeleteअश्रुपूरित श्रद्धांजलि...!!
विनम्र अभिवादन...
ReplyDeleteविनम्र अभिवादन...
ReplyDeleteविनम्र अभिवादन
ReplyDeleteविनम्र अभिवादन
ReplyDelete