ज्यावेळी भाजप निवडणुकीत एका मोठ्या पराभवाला समोरा गेला, त्यांनतर एका सभेत मंचावरती भाजपचे काही उमेदवार आणि नेते उपस्थित होते. त्यांचे नेतृत्व 'अटल बिहारी वाजपेयी' करत होते. मंचावरती ध्वनिक्षेपकासमोर जमलेल्या संपूर्ण जनसमुदायावरती एक नजर फिरवत मोठा श्वास घेऊन भाषणाला 'अटलजींनी' सुरवात केली,
"क्यो आये हो आप यहा?
आप किसीं के सभा मे नही आए हो,
आप हारा हुआ वाजपेयीं कैसे दिखता है,
ये देखने आये हो"
असा संवाद करून जमलेल्या लोकांच्या काळजाला हात घालून आपल्या अभिभाषणाला त्यांनी सुरवात केली.
आज दिनांक १६ ऑगस्ट २०१८, रोजी सायंकाळी 'अटल बिहारी वाजपेयी' यांनी डोळे मिटून आपला प्रवास थांबवला. ही बातमी ज्यावेळी समजली त्यावेळी त्यांचे हे शब्द कानात घुमायला लागले. अन् अश्रूंनी डोळ्यांच्या कडा पानवल्या. आज आपल्यातून केवळ राजकीय नेताच नाही तर देशा-धर्माला वाहिलेला नेता, एक प्रभावशाली, नेतृत्वाशाली नेता तसेच प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात असलेला आधारस्तंभ निखळला. एक राजकीय नेता, एक पत्रकार, एक लेखक, एक कवी, आणि उत्कृष्ट वक्ता आज हिंदुस्थानने गमावला. 'अटलजींच्या कार्य-कर्तृत्वाबद्दल लिहावे तितके कमीच. आज श्रीकृष्ण च्या काही ओळी आठवतात,
परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम ।
धर्म संस्थापणार्थाय संभवामि युगे युगे ।।
ज्यावेळी धर्मावर आघात होतो त्यावेळीच प्रत्येक युगात गरजा पूर्ण करणारा नेता नियतीनुसार तयार होतो. आणि हिंदुस्थानसाठी अटल बिहारी वाजपेयी हा काळाने लोकांना अर्पण केलेला नेता होते. ते राजकारणी म्हणून सुजाण होतेच. श्री कृष्णांच्या वाक्याप्रमाणे जनतेबद्दल जिव्हाळा आणि सामान्याबद्दल आपुलकी असलेला नेता होते.
अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ साली झाला. त्यांच्या पत्रकार, लेखक, वक्ता आणि नेता अश्या अनेक छटा होत्या. स्वातंत्र्यानंतर देशभरात घराणेशाहीचे राजकारण असताना एका सामान्य घरातून आलेले 'अटलजी' २०व्या शतकाच्या अखेरीस आणि २१ व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच १९९६ साली हिंदुस्थानचे दहावे पंतप्रधान झाले. त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, तसेच भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९६८ ते १९७३ पर्यंत त्यांनी भारतीय जनसंघाचे अध्यक्षपद ही भूषविले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. तसेच राष्ट्रधर्म, पाञ्चजन्य, वीर अर्जुन या राष्ट्रीय भावना असलेल्या पत्रकांचे संपादक पद ही भूषविले. त्यांची राजकीय भूमिका प्रखर आणि स्पष्ट होती. त्याकाळी सोनिया गांधीविरोधात बोलणारे एकमेव अटलजी होते, १९ ऑगस्ट २००३ साली ज्यावेळी सोनिया गांधी यांनी 'अविश्वासाच्या ठरावाचे' षड्यंत्र रचले त्यावेळी आप पाच मिनिटं मे आपणा बाल नही ठीक कर सकती, हमसे कैसे निपटोगी? असे खडे बोल सुनावले. १९८८ मध्ये त्यांनी एक भविष्यवाणी केली होती, संपूर्ण देश भाजपाला उपहासात्मक नजरेने बघेल पण त्यावेळी पूर्व भागात कमळ फुललेले असेल. ही भविष्यवाणी आसाम आणि पूर्वांचलाच्या विजयाने खरी ठरली. तसेच १९९६ साली पाहिलेली प्रत्येक स्वप्न नरेंद्र मोदींच्या रुपात पूर्ण होताना त्यांनी पाहिली आहेत. म्हणून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरू संबोधले जातात.
ते देशाचे राष्ट्रनिष्ठ नेता होतेच तसेच त्यांचे साहित्य धर्मप्रेमा ने वाहिले होते. त्यांच्या हर एक कवितेत धर्म आणि राष्ट्राचे प्रकट दर्शन होते. त्यांच्या कविता पुढे संसदेत मत मांडताना वापरल्या गेल्या. ज्यावेळी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी 'भारत मुर्दाबाद' च्या घोषणा दिल्या. त्यावेळी स्मृती इराणी नी त्यांच्या कवितेने संसदेतील नेत्यांची बोलती बंद केली, ती कविता अशी की,
भारत कोई भूमी का तुकडा नही है,
एक जिता जागता राष्ट्रपुरुष है ।
ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है ।
ये अर्पण की भूमी है, ये तर्पण की भूमी है ।
इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है,
इसका कंकड कंकड हमारे लिए शंकर है ।
हम जिएंगे तो इस भारत के लिए,
और मरेंगे तो भी इस भारत के लिए ।
बेहती हुई अस्तियो को कोई कान लगाकर सूनेगा
तो एक ही आवाज आयेगी, भारतमाता की जय ।।
ते राष्ट्रच्या बाबतीत द्रष्टे होते. गझणीचा इतिहास त्यांनी किशोरवयात वाचला होता. त्यामुळे त्यांचे हृदय गझणीच्या आक्रमनाणे फार विरघळून जाई. त्यांच्या मनावर आज ही त्या जखमा होत्या. अफगाणिस्तान, इंडोनेशिया च उदाहरण ते नेहमी आपल्याला देत. त्या देशाचे परिवर्तन जरी इस्लाम मध्ये झाले तरी ही आज ही तिथे श्री रामाचं अस्तित्व आढळतच नाहीतर तेथिल लोकं आज ही आपला पूर्वज श्री राम असल्याची कबुली देतात. ही गोष्ट त्यांनी हिंदुस्थाना समोर आणली आणि श्री राम जन्मभूमीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. सोरटी सोमनाथ मंदिराच्या उभारणीतही त्यांचा हात होता. धर्मासोबत राष्ट्र ही महत्वाचे मानले. म्हणून पोखरणची चाचणी यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली.
धर्म-राष्ट्रासाठी खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र झरा आज थांबला. आज प्रत्येकाच्या मनावर त्यांच्या कविता कोरल्या आहेत. त्यांच्या बद्दल लिहावे तितके कमीच. पण शेवट करताना त्यांच्या ठन गई! मौत से ठन गई! या कवितेतील ओळी आठवतात त्या म्हणजे,
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई।
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?
....अटलजी आज तुमचे पर्व संपले नाही तर थांबले, तुम्हाला ते सुरू करण्यास पुन्हा जन्म घ्यावा लागेलच...!!!
'अटल बिहारी वाजपेयींना' हिंदू वार्ता समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!!!
-संपादकीय
No comments:
Post a Comment