गेल्या काही दिवसांपासून आपल्या शेजारील राज्यावर मोठी आपत्ती आली आहे. ती आपत्ती म्हणजे 'केरळ महापूर'. यासाठी सरकारने संपूर्ण यंत्रणा तत्काळ कार्यरत केली आहे. परंतु या देशाप्रती आणि समाजाप्रती आपण ही काहीतरी देणे लागतो. नेहमी आपण माणुसकी धर्म महत्त्वाचा अश्या प्रकारचे वक्तव्य सहज करतो. पण ज्यावेळी ते सत्यात उतरवण्याची वेळ येते त्यावेळी मात्र मागे सरतो. आज केरळ मध्ये महापूर आल्यावर अशीच सामाजिक जाणिवा असलेले व्यक्ती पुढे सरसावतात. अश्याच एका व्यक्तीने आज आपले कर्तव्य पूर्ण करण्यास एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचे नाव आहे, डॉक्टर रविंद्र मराठे. ते फूड आर्मी एनजीओ मार्फत सोमवारी संध्याकाळ पर्यंत मदत पोहचवणार आहेत. सोमवारी काही वस्तूसकट एनजीओ केरळमध्ये मदत करण्यास जाणार आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यास तयारी दाखवली पण आपले काय?
आपल्याला तिथे जाणे शक्य नसले तरी त्यांच्या मार्फत आपण काही वस्तू पोहचवु शकतो. त्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. खाली दिलेल्या फोटो प्रमाणे त्यांना खाद्यपदार्थचे पाकीट पोहचवावे.
अधिक माहितीसाठी संपर्क-
डॉक्टर रविंद्र मराठे
९२२११०७२३६
No comments:
Post a Comment