• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

सर्वच्या सर्व उमेदवार हे....!? जाणून घ्या-काय म्हणाले संभाजी भिडे?






श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींनी सकाळी सांगली येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, ''मी नेहमीच प्रत्येक निवडणूकीत मतदान करतो. हे मतदान राजकीय नाही, तर ते देशाच्या समृद्धसाठी आहे. ते मतदान मातृभूमीच्या कल्याणासाठी आणि तिचे उपकार फेडण्यासाठी आहे. आपला देश राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी कोणतीही फालतू कारणे न सांगता आपले कर्तव्य केलेच पाहिजे. लेकरू रडायला लागल्यावर आई त्याला पदराखाली घेते. ते जसे तिचे सहजच कर्तव्य होऊन जाते; तसेच कर्तव्य मतदानाच्या बाबतीत लोकांनी केले पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. निवडणुकीला सगळ्याच पक्षातले लोकं उभी राहिली आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे - आपण सर्व मातृभूमीची लेकर आहोत. आपण मातृभूमीसाठी मिळून कार्य करायचे आहे. हा भाव लक्षात घेऊन अत्यंत आत्मीयतेने आणि बंधुभावाने काम करायचे. कोणी जिंकतील कोणी पराभुत होतील. पण, ते सगळेच मातृभूमीची लेकर आहेत, ते सगळे परमपवित्र भारतमातेसाठीच उभे राहिले आहेत. त्या सर्वांना माझ्या सदिच्छा आहेत''.

भिडे गुरुजींच्या अनेक वक्तव्य आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पाहून अनेक पक्षनेते त्यांच्यावर टीका करतात. परंतु राजकीय स्थितीवर काय वाटते या प्रश्नावर भिडे गुरुजींनी कोणावरही टीका न करता अत्यंत संयमित मत देऊन, सर्वांनी मतदानाचे कर्तव्य केलेच पाहिजे असे आवाहन देखील केले.
Share:

काश्मीरची शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांची शांती भंग करायची आहे...





  'पाकिस्तान अधिकृत कश्मीर' (पीओके)मध्ये असणाऱ्या दहशतवादी कॅम्पमध्ये भारतीय सेनेने हल्ला करून आतंकवादयांना ठार मारण्याची बातमी मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिकही मारले गेले आहेत. आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून चौथ्या कॅम्पचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तो हल्ला करताना पाकिस्तानचे 6 सैनिक मारल्याचेही समजत आहे.

 त्या घटनेबद्दल सांगताना भारतीय सेनेचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले, की ''आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे; त्यामध्ये चौथ्या कॅम्पला खूप मोठे नुकसान पोचले आहे''. जनरल रावत यांनी पुढे असेही सांगितले, की ''जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काश्मीर सीमेवर घूसखोरी आणि हल्ले होत होते. काश्मीरच्या शांततेसाठी हे पाऊल उचलले. राज्यात शांतता आहे तसेच व्यापारही सुरु आहेत. काश्मीरची शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांची शांती भंग करायची आहे''.

Share:

कोणत्या कोणत्या नेत्यांनी भरपावसात सभा घेतली? जाणून घ्या...!




शरद पवार यांनी सातारा येथे मुसळधार पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा प्रचार धुऊन टाकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यासोबतच विरोधी पक्षातून कार्यकर्ते आपल्या नेत्याने घेतलेल्या भर पावसातल्या सभेचे फोटो टाकताना दिसत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणत्या कोणत्या नेत्यांनी भर पावसात सभा घेतल्या आहेत.   

आजही स्व. प्रमोद महाजन यांचे नाव प्रत्येकाच्या मनात नेता म्हंटले की येतेच. कोणतीही राजकीय घटना घडली; की त्यांच्या काही आठवणींचा उजाळा होतोच. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा हा फोटो टाकून पुन्हा एकदा त्यांच्या सभेतल्या क्षणांची आठवण करून दिली आहे.


तरुण तडफदार हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी वाळवा येथे वैभव नायकवाडी यांच्या आमदारकीच्या प्रचारासाठी पावसात सभा घेतली. ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यासाठी झटणारा नेता म्हणून पुन्हा चर्चेत आले आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनीही आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी सातारा येथे भर पावसात सभा घेतली आहे. उदयनराजे यांचा फॅन वर्ग फार मोठा आहे. ते आपल्या चाहत्यांसाठी अशा बेधडक कारणाने फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या खासदारकीनंतर भाजप प्रवेश केल्याने त्यांना पुन्हा आमदारकीची निवडणूक द्यावी लागत आहे.



पावसातल्या सभेच्या चर्चेच्या रिंगणात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचेही नाव आले आहे. त्यांनी गडमुड शिंगी येथे 18 ऑक्टोबरच्या सभेत भर पावसात भाषण केले. त्यांच्या फॅनक्लबने दोघेही बरसले पाऊस आणि बंटीसाहेबसुद्धा अशा आशयाचे फोटो व्हायरल केले आहेत.



आपल्या आजोबांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी सुद्धा सातारा येथे पावसात भाषण केले आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांचे फोटो पाहून केवळ स्टंटबाजी आहे, लोकांसाठी नाही घरातल्यासाठी सोय यासाठी नाटक अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर, एकीकडे त्यांच्या चाहत्यावर्गाने त्यांच्या जिद्दीला सलाम दिला आहे. 




Share:

कमलेश तिवारी यांच्या हत्येत इसीसचा सहभाग? गुजरात मध्ये तीन संशयित आरोपी ताब्यात...!



हिंदू महासभाई कमलेश तिवारी यांची काल हत्या करण्यात आली. आज त्या केससंदर्भात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी बिजनौर येथून आरोपी मौलाना अनवारुल हक याला अटक केली आहे. मौलाना अनवारुल हक याने 2015 साली कमलेश तिवारी यांचा खून करण्यासाठी 51 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सोबतच त्या केससंदर्भात गुजरातमध्ये एटीएसने लोकांना अटक केली आहे.  
          कमलेश तिवारी यांचा मृतदेह 'नाका
हिंडोलायेथील 'खुर्शीद बागया ठिकाणी ते वास्तव्यास असलेल्या घरी मिळाला. त्यांना दोन व्यक्ती दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यास आले होते. त्या दरम्यान  कमलेश यांनी आपल्या सहकार्याला पान आणण्यास पाठवले. जेव्हा त्यांचा सहकारी पान घेऊन परत आला; तोपर्यंत कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. कमलेश तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. कमलेश तिवारी हत्याकांड संदर्भात राज्य शासनाने रात्री उशिरा लखनऊचे पोलीस महानिरीक्षक एस के भगत यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यीय विशेष शोध टीम तयार केली आहे. त्यामध्ये लखनऊचे पोलीस अधिक्षक दिनेश पुरी आणि एसटीएफचे क्षेत्राधिकारी पीके मिश्र यांचाही समावेश आहे. डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले की ही असैंविधानिक घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास लवकरात लवकर करतील. 


         ज्या लोकांनी कमलेश यांची हत्या केलीत्यांची ओळख पटत आहे. हल्ल्याआधी ते लोक अर्धा तास कमलेशसोबतच होते. कमलेश यांना गेल्या काही महिन्यापासून सुरक्षा दिली जात होती. घटनेवेळीही सुरक्षारक्षक त्यांच्या घराखाली तैनात होता. त्याने हत्यारांना थांबवले आणि कमलेश यांना विचारूनच आत सोडले. पोलिसांना सीसीटीवी फुटेज आणि अन्य पुरावांच्या आधारे ठोस पुरावे मिळाले आहेत. तसेच स्पेशल टास्क फोर्सचीही मदत घेतली जात आहे. कमलेश यांनी पूर्वी मोहंमद पैगंबर यांच्यावर अपमानास्पद टिपण्णी केली होती. त्यातून ते निर्दोष मुक्तही झाले.

          कमलेश यांच्या पत्नी किरण यांनी त्या
प्रकरणामध्ये मुफ्ती नईम काजमीअनवारुल हक आणि एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.किरण यांचे आरोप आहेतकी काजमी आणि हक याने कमलेश यांचे शीर कापण्यासाठी 51 लाख आणि दीड करोड रुपये बक्षीस घोषित केले होते. ''त्याच लोकांनी माझ्या पतीला मारले आहे'', असा आरोप किरण यांनी केला आहे. त्यासोबतच कमलेश तिवारी यांच्या नातेवाईकांनी कुटुंबांतील सदस्यांच्या नोकरीची मागणी केली आहे. कमलेश यांच्या काही मित्रांचे म्हणणे आहेया प्रकरणात इसीसचाही हात असल्याची शक्यता आहे.

Share:

हजारो तरुण भगवे फेटे घालून कोणासाठी निघाले ?? ते निघाले फक्त....

दिनांक 17 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकरता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेला महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण राज्यात याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्या सभेचे लक्ष वेधून घेतले ते भगव्या फेट्यात आलेल्या 10,000 युवकांनी. 

ते युवक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत पदभ्रमण करत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानवंदना देण्यासाठी सभास्थळी पोचले. त्या तरुणांनी जमलेल्या लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते लाखो तरुण कोणाच्या नेतृत्वाखाली जमले होते हे ऐकून तुम्हाला धक्काच  बसेल. 







ती आश्चर्याची बाब म्हणजे त्या भगव्या फेट्यातल्या तरुणांचे नेतृत्व चक्क संभाजीराव भिडे गुरुजींनी केले. महामहिम पंतप्रधान आणि भिडे गुरुजी यांचे नाते सर्वश्रुत आहेच. पंतप्रधान भिडे गुरुजींच्या आदेशावरून रायगड येथे गेले असल्याचे पंतप्रधानांनी स्वतः सांगितले आहे. त्या जमावाला पाहून ती गोष्ट पंतप्रधान मोदी यांच्यासाठीही धक्कादायकच होती. विशेष म्हणजे याही वेळी भिडे गुरुजींनी आपले व्यासपीठावर न जाण्याचे धोरण कायम ठेवले आणि छत्रपतींची मानवंदना पूर्ण होताच त्यांनी तिथून आपल्या पुढील सभा व बैठकांकरता
                                                  धारकर्यांसहित  मार्गस्थ झाले.
सभा संपल्यावर पत्रकारांनी छत्रपती उदयनराजेंना गुरुजींच्या उपस्थितीबाबत विचारले असता; ते म्हणाले, की "भिडे गुरुजी कायमच आदरणीय-वंदनीय आहेत. त्यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली." मोदींनी भिडे गुरुजींना दिल्लीला येण्याचा निमंत्रण दिल्याची सामान्य वर्तुळात चर्चा आहे. परंतु अजून ही दोन्ही गटांकडून याची पुष्टी मात्र झालेली नाही. 
Share:

हिंदू महासभाई नेत्याची गळा चिरून हत्या.!


कमलेश तिवारी हे व्यवसायाने वकिली करत होते, तसेच हिंदू महासभेच्या माध्यमातून 
भारतमातेच्या चरणी आपली सेवा करत होते. तसेच त्यांनी स्वतः हिंदू समाज पक्षाची स्थापना करून राजकीय पातळीवर सक्रिय कार्य करत होते. आज अचानक काही जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याची बातमी समोर येतेय. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कमलेश तिवारींची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली आहे, आरोपी दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाई देण्यासाठी आलोय असे कारण सांगून कार्यलयात भेटायला आले होते.  आरोपींबाबत पोलिसांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही. पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत.





 देशभरातून या हत्येचा निषेध नोंदवला जातोय. हिंदू वार्ता परिवाराकडून कमलेशजी ना भावपूर्ण श्रद्धांजली.
Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)