'पाकिस्तान अधिकृत कश्मीर' (पीओके)मध्ये असणाऱ्या दहशतवादी कॅम्पमध्ये भारतीय सेनेने हल्ला करून आतंकवादयांना ठार मारण्याची बातमी मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिकही मारले गेले आहेत. आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून चौथ्या कॅम्पचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तो हल्ला करताना पाकिस्तानचे 6 सैनिक मारल्याचेही समजत आहे.
त्या घटनेबद्दल सांगताना भारतीय सेनेचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले, की ''आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे; त्यामध्ये चौथ्या कॅम्पला खूप मोठे नुकसान पोचले आहे''. जनरल रावत यांनी पुढे असेही सांगितले, की ''जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काश्मीर सीमेवर घूसखोरी आणि हल्ले होत होते. काश्मीरच्या शांततेसाठी हे पाऊल उचलले. राज्यात शांतता आहे तसेच व्यापारही सुरु आहेत. काश्मीरची शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांची शांती भंग करायची आहे''.
No comments:
Post a Comment