श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींनी सकाळी सांगली येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, ''मी नेहमीच प्रत्येक निवडणूकीत मतदान करतो. हे मतदान राजकीय नाही, तर ते देशाच्या समृद्धसाठी आहे. ते मतदान मातृभूमीच्या कल्याणासाठी आणि तिचे उपकार फेडण्यासाठी आहे. आपला देश राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी कोणतीही फालतू कारणे न सांगता आपले कर्तव्य केलेच पाहिजे. लेकरू रडायला लागल्यावर आई त्याला पदराखाली घेते. ते जसे तिचे सहजच कर्तव्य होऊन जाते; तसेच कर्तव्य मतदानाच्या बाबतीत लोकांनी केले पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. निवडणुकीला सगळ्याच पक्षातले लोकं उभी राहिली आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे - आपण सर्व मातृभूमीची लेकर आहोत. आपण मातृभूमीसाठी मिळून कार्य करायचे आहे. हा भाव लक्षात घेऊन अत्यंत आत्मीयतेने आणि बंधुभावाने काम करायचे. कोणी जिंकतील कोणी पराभुत होतील. पण, ते सगळेच मातृभूमीची लेकर आहेत, ते सगळे परमपवित्र भारतमातेसाठीच उभे राहिले आहेत. त्या सर्वांना माझ्या सदिच्छा आहेत''.
भिडे गुरुजींच्या अनेक वक्तव्य आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पाहून अनेक पक्षनेते त्यांच्यावर टीका करतात. परंतु राजकीय स्थितीवर काय वाटते या प्रश्नावर भिडे गुरुजींनी कोणावरही टीका न करता अत्यंत संयमित मत देऊन, सर्वांनी मतदानाचे कर्तव्य केलेच पाहिजे असे आवाहन देखील केले.

No comments:
Post a Comment