कमलेश तिवारी यांच्या हत्येत इसीसचा सहभाग? गुजरात मध्ये तीन संशयित आरोपी ताब्यात...!



हिंदू महासभाई कमलेश तिवारी यांची काल हत्या करण्यात आली. आज त्या केससंदर्भात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी बिजनौर येथून आरोपी मौलाना अनवारुल हक याला अटक केली आहे. मौलाना अनवारुल हक याने 2015 साली कमलेश तिवारी यांचा खून करण्यासाठी 51 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सोबतच त्या केससंदर्भात गुजरातमध्ये एटीएसने लोकांना अटक केली आहे.  
          कमलेश तिवारी यांचा मृतदेह 'नाका
हिंडोलायेथील 'खुर्शीद बागया ठिकाणी ते वास्तव्यास असलेल्या घरी मिळाला. त्यांना दोन व्यक्ती दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यास आले होते. त्या दरम्यान  कमलेश यांनी आपल्या सहकार्याला पान आणण्यास पाठवले. जेव्हा त्यांचा सहकारी पान घेऊन परत आला; तोपर्यंत कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. कमलेश तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. कमलेश तिवारी हत्याकांड संदर्भात राज्य शासनाने रात्री उशिरा लखनऊचे पोलीस महानिरीक्षक एस के भगत यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यीय विशेष शोध टीम तयार केली आहे. त्यामध्ये लखनऊचे पोलीस अधिक्षक दिनेश पुरी आणि एसटीएफचे क्षेत्राधिकारी पीके मिश्र यांचाही समावेश आहे. डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले की ही असैंविधानिक घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास लवकरात लवकर करतील. 


         ज्या लोकांनी कमलेश यांची हत्या केलीत्यांची ओळख पटत आहे. हल्ल्याआधी ते लोक अर्धा तास कमलेशसोबतच होते. कमलेश यांना गेल्या काही महिन्यापासून सुरक्षा दिली जात होती. घटनेवेळीही सुरक्षारक्षक त्यांच्या घराखाली तैनात होता. त्याने हत्यारांना थांबवले आणि कमलेश यांना विचारूनच आत सोडले. पोलिसांना सीसीटीवी फुटेज आणि अन्य पुरावांच्या आधारे ठोस पुरावे मिळाले आहेत. तसेच स्पेशल टास्क फोर्सचीही मदत घेतली जात आहे. कमलेश यांनी पूर्वी मोहंमद पैगंबर यांच्यावर अपमानास्पद टिपण्णी केली होती. त्यातून ते निर्दोष मुक्तही झाले.

          कमलेश यांच्या पत्नी किरण यांनी त्या
प्रकरणामध्ये मुफ्ती नईम काजमीअनवारुल हक आणि एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.किरण यांचे आरोप आहेतकी काजमी आणि हक याने कमलेश यांचे शीर कापण्यासाठी 51 लाख आणि दीड करोड रुपये बक्षीस घोषित केले होते. ''त्याच लोकांनी माझ्या पतीला मारले आहे'', असा आरोप किरण यांनी केला आहे. त्यासोबतच कमलेश तिवारी यांच्या नातेवाईकांनी कुटुंबांतील सदस्यांच्या नोकरीची मागणी केली आहे. कमलेश यांच्या काही मित्रांचे म्हणणे आहेया प्रकरणात इसीसचाही हात असल्याची शक्यता आहे.

Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)