शरद पवार यांनी सातारा येथे मुसळधार पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा प्रचार धुऊन टाकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यासोबतच विरोधी पक्षातून कार्यकर्ते आपल्या नेत्याने घेतलेल्या भर पावसातल्या सभेचे फोटो टाकताना दिसत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणत्या कोणत्या नेत्यांनी भर पावसात सभा घेतल्या आहेत.
आजही स्व. प्रमोद महाजन यांचे नाव प्रत्येकाच्या मनात नेता म्हंटले की येतेच. कोणतीही राजकीय घटना घडली; की त्यांच्या काही आठवणींचा उजाळा होतोच. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा हा फोटो टाकून पुन्हा एकदा त्यांच्या सभेतल्या क्षणांची आठवण करून दिली आहे.
तरुण तडफदार हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी वाळवा येथे वैभव नायकवाडी यांच्या आमदारकीच्या प्रचारासाठी पावसात सभा घेतली. ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यासाठी झटणारा नेता म्हणून पुन्हा चर्चेत आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनीही आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी सातारा येथे भर पावसात सभा घेतली आहे. उदयनराजे यांचा फॅन वर्ग फार मोठा आहे. ते आपल्या चाहत्यांसाठी अशा बेधडक कारणाने फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या खासदारकीनंतर भाजप प्रवेश केल्याने त्यांना पुन्हा आमदारकीची निवडणूक द्यावी लागत आहे.
पावसातल्या सभेच्या चर्चेच्या रिंगणात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचेही नाव आले आहे. त्यांनी गडमुड शिंगी येथे 18 ऑक्टोबरच्या सभेत भर पावसात भाषण केले. त्यांच्या फॅनक्लबने दोघेही बरसले पाऊस आणि बंटीसाहेबसुद्धा अशा आशयाचे फोटो व्हायरल केले आहेत.
आपल्या आजोबांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी सुद्धा सातारा येथे पावसात भाषण केले आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांचे फोटो पाहून केवळ स्टंटबाजी आहे, लोकांसाठी नाही घरातल्यासाठी सोय यासाठी नाटक अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर, एकीकडे त्यांच्या चाहत्यावर्गाने त्यांच्या जिद्दीला सलाम दिला आहे.
No comments:
Post a Comment