दिनांक 17 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकरता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेला महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण राज्यात याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्या सभेचे लक्ष वेधून घेतले ते भगव्या फेट्यात आलेल्या 10,000 युवकांनी.
ते युवक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत पदभ्रमण करत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानवंदना देण्यासाठी सभास्थळी पोचले. त्या तरुणांनी जमलेल्या लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते लाखो तरुण कोणाच्या नेतृत्वाखाली जमले होते हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
ती आश्चर्याची बाब म्हणजे त्या भगव्या फेट्यातल्या तरुणांचे नेतृत्व चक्क संभाजीराव भिडे गुरुजींनी केले. महामहिम पंतप्रधान आणि भिडे गुरुजी यांचे नाते सर्वश्रुत आहेच. पंतप्रधान भिडे गुरुजींच्या आदेशावरून रायगड येथे गेले असल्याचे पंतप्रधानांनी स्वतः सांगितले आहे. त्या जमावाला पाहून ती गोष्ट पंतप्रधान मोदी यांच्यासाठीही धक्कादायकच होती. विशेष म्हणजे याही वेळी भिडे गुरुजींनी आपले व्यासपीठावर न जाण्याचे धोरण कायम ठेवले आणि छत्रपतींची मानवंदना पूर्ण होताच त्यांनी तिथून आपल्या पुढील सभा व बैठकांकरता
धारकर्यांसहित मार्गस्थ झाले.
धारकर्यांसहित मार्गस्थ झाले.
सभा संपल्यावर पत्रकारांनी छत्रपती उदयनराजेंना गुरुजींच्या उपस्थितीबाबत विचारले असता; ते म्हणाले, की "भिडे गुरुजी कायमच आदरणीय-वंदनीय आहेत. त्यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली." मोदींनी भिडे गुरुजींना दिल्लीला येण्याचा निमंत्रण दिल्याची सामान्य वर्तुळात चर्चा आहे. परंतु अजून ही दोन्ही गटांकडून याची पुष्टी मात्र झालेली नाही.
No comments:
Post a Comment