• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

गुढीपाडवा विरोधाचे खंडन - भाग २



(कोणी केली संभाजी महाराजांची हत्या?? कोण होतं या संपूर्ण कटा मागे??)


शंभुराजेंची हत्या मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी केली आहे काय ???

उत्तर - धादांत खोटं !
   खरंतर मनुस्मृतीचं अध्ययन हा वेगळा विषय असल्याने प्रस्तुत लेखाविषयासंदर्भात एकच सांगु इच्छितो की, शंभुराजेंनी स्वत: त्यांच्या बुधभूषणम् ग्रंथांमध्ये मनस्मृतीतले बावीस श्लोक आहे तसे घेतलेले आहेत, म्हणजे आजच्या भाषेत काॅपी केले आहेत. आहे तसे !!!

  • मनुस्मृतीतले बावीस श्लोक नक्की कोणते हे अभ्यासण्यासाठी जिज्ञासुंसाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल.
बुधभूषणमच्या दुसर्या अध्यायात शंभुराजेंनी मनुस्मृतीतले खालील श्लोक आहे तसे घेतलेले आहेत. ह्यात प्रथम बुधभूषणममधले श्लोक व नंतर त्याची मनुस्मृतीतली अध्याय व श्लोक संख्या असा माहितीपूर्ण संदर्भ दिला आहे.

श्लोक क्रमांक         मनुस्मृती अध्याय व श्लोक क्रमांक

४१-४२                        ७(६१-६२)
५६९                           ७(८९)
६२८                           ७(१११)
६३०                           ७(११५)
४६५                           ८(३१०)
४६६-४६७                    ८(१२४-१२५)
४६८                            ८(३७९)
४७९                            ८(३३५)
४८३-४८५                      ७(३-५)
२२२                              ७(११६)
२४४-२४७                      ७(१५१-१५४)
२४३                              ७(१४७)
१११                              ७(७४)
११४                              ७(७०)
११७                              ७(७६)


थोडक्यात हे वरील बावीस श्लोक स्वत: शंभुराजेनी स्वत: मनुस्मृतीतून आपल्या बुधभूषणम ग्रंथात आहे तसे घेतले आहेत, हे दोन्ही ग्रंथांची तुलना केल्यावर आपल्या सहज लक्षात येते.
जिज्ञासूंनी अधिक अभ्यासासाठी ह्या दोन्ही ग्रंथांच्या मुळ संस्कृत संहितेचं तुलनात्मक अध्ययन करावे किॅवा डाॅ. गोविॅदराव कदम लिखित बुधभूषणम् भाष्य अभ्यासावे किॅवा डाॅ. वेलणकरांनी संपादित केलेली बुधभूषणम् ची पहिली आवृत्ती अभ्यासावी म्हणजे आमच्या पुराव्यांचा संदर्भ लक्षात येईल. वस्तुत: आम्ही स्वत: दोन्ही ग्रंथ मुळातून अभ्यासले आहेतच हेही सूज्ञांस सांगणे न लगे !


आता मनुस्मृतीनुसार हत्या केलीय काय?

असा आरोप करणारे एकही जण त्यातल्या एकाही श्लोकाचा साधा पुसटसा संदर्भही देत नाहीत. जो काही तथ्यहीन आरोप लावला जातो तो असा की ब्राह्मणेतरांना संस्कृतचा अधिकार नसल्यामुळे व शंभुराजेंनी संस्कृतमधूनच ग्रंथरचना केल्यामुळे ब्राम्हणांनी त्यांची मनुस्मृतीनुसार हत्या केली.
वस्तुत हे धादांत खोटं आहे खालील पुराव्यावरून कळेल.

गागाभट्टांनी आपला संस्कृत ग्रंथ शंभुराजेंनाच अर्पण केलाय

गागाभट्टांनी शके १६०२ म्हणजे इ. स. १६८० साली त्यांचा "समयनय" हा ज्योतिषशास्त्रपर व धर्मशास्त्रपर ग्रंथ साक्षात् श्रीशंभुराजेंनाच अर्पण केलाय. त्यात ते लिहितात

दिनकरतनयेन तेन गागाभिधविबूधेन् निरीक्ष्य सन्निबन्धान् |
रघुवरकृपयाsमुना निबद्ध: समयनय: सुखमेतु शंभुराज: | २६७ |

"दिनकराचा पुत्र असणार्या बुद्धिमान अशा गागाभट्टांनी इतर ग्रंथांचं अवलोकन करून श्रीरामचंद्राच्या कृपेने समयनय हा ग्रंथ रचला.
त्याने श्रीशंभुराजे आनंदी होवोत !"

पण त्याआधी एक साधा प्रश्न

औरंगजेब कुराणाचे ऐकेल की मनुस्मृतीचे?
तो काय हिॅदु होता का की त्याने ब्राह्मणांचे ऐकुन शंभुराजेंची हत्या करावी???
जो औरंग्या कट्टर सून्नी मुसलमान होता, ज्याने आपल्या सख्ख्या भावांना व बापालाही मारलं, तो ब्राह्मणांचे कशावरून ऐकेल?
उलट ब्राह्मण हे तर त्याचे एक नंबरचे शत्रु कारण ते हिॅदु ! मग तो त्यांचं कसं काय ऐकेल?
पण आक्षेपकांना केवळ विषच पसरवायचं आहे, त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे तंत्र आहे ! असो !

शंभुराजेंची हत्या ही कुराणानुसारच झाली आहे.  (पुढे पुरावे देत आहे)

ज्यांनी आयुष्यात एकदा तरी कुराणाचा अभ्यास केला असेल, त्यांना कुराणात काफीरांसाठी अर्थात हिॅदुंसाठी काय शिक्षा आहेत हे लक्षात येईल तरीही जिज्ञासुंसाठी आम्ही खालील संदर्भ देतो 
औरंगजेबाने भीमा कोरेगावच्या छावणीमध्ये त्यांना हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांचा प्राण गेल्यावरही मुसलमान सरदारांनी त्यांचा देह छिन्नविच्छिन्न करून विटंबना केली व आपली इस्लामी क्रूरता दाखवली आणि ही क्रूरता दाखविण्याचे मूळ मनुस्मृतीमध्ये नव्हे तर कुराणामध्ये दडलेले आहे. कारगिलच्या युद्धानंतर आपल्या भारतीय सैन्याची विटंबना पाकड्यांनी कशी करून पाठविली होती, हे सर्वांस माहिती आहे.


शेवटी औरंगजेब हा सतत कुराणाचे पठण करणारा कट्टर मुसलमान होता. संभाजीराजांची हत्या ही कुराणाच्या खालील आज्ञांप्रमाणे झाली.

१)
ﻭَﻗَﺎﺗِﻠُﻮﻫُﻢْ ﺣَﺘَّﻰٰ ﻟَﺎ ﺗَﻜُﻮﻥَ ﻓِﺘْﻨَﺔٌ ﻭَﻳَﻜُﻮﻥَ
ﺍﻟﺪِّﻳﻦُ ﻟِﻠَّﻪِ ۖ ﻓَﺈِﻥِ ﺍﻧْﺘَﻬَﻮْﺍ ﻓَﻠَﺎ ﻋُﺪْﻭَﺍﻥَ ﺇِﻟَّﺎ ﻋَﻠَﻰ
ﺍﻟﻈَّﺎﻟِﻤِﻴﻦ
َ
Fight against them until there is no
more disorder and Allah's supremacy is established. If they
desist, let there be no hostility except against the oppressors.

उनके खिलाफ (गैर मुस्लीम, मूर्तिपूजक, हिंदू) तब तक लडते रहो जब तक मूर्तीपूजा खत्म न हो जाये और अल्लाह का मजहब सबपर हावी न हो जाये|
(सुरा २, अल -बकरा, आयात १९३)

२)
ﻓَﺈِﺫَﺍ ﺍﻧْﺴَﻠَﺦَ ﺍﻟْﺄَﺷْﻬُﺮُ ﺍﻟْﺤُﺮُﻡُ ﻓَﺎﻗْﺘُﻠُﻮﺍ ﺍﻟْﻤُﺸْﺮِﻛِﻴﻦَ ﺣَﻴْﺚُ ﻭَﺟَﺪْﺗُﻤُﻮﻫُﻢْ ﻭَﺧُﺬُﻭﻫُﻢْ
ﻭَﺍﺣْﺼُﺮُﻭﻫُﻢْ ﻭَﺍﻗْﻌُﺪُﻭﺍ ﻟَﻬُﻢْ ﻛُﻞَّ ﻣَﺮْﺻَﺪٍ ۚ ﻓَﺈِﻥْ ﺗَﺎﺑُﻮﺍ ﻭَﺃَﻗَﺎﻣُﻮﺍ ﺍﻟﺼَّﻠَﺎﺓَ ﻭَﺁﺗَﻮُﺍ ﺍﻟﺰَّﻛَﺎﺓَ ﻓَﺨَﻠُّﻮﺍ ﺳَﺒِﻴﻠَﻬُﻢْ ۚ ﺇِﻥَّ ﺍﻟﻠَّﻪَ ﻏَﻔُﻮﺭٌ ﺭَﺣِﻴﻢ
ٌ
Then, when the sacred months have
passed, slay the idolaters wherever
ye find them, and take them (captive), and besiege them, and
prepare for them each ambush. But if they repent and establish
worship and pay the poor due, then
leave their way free. Lo! Allah is Forgiving, Merciful.

पवित्र महिनो के खत्म होने के बाद मुर्तीपुजको को जहां कही वे मिले कत्ल करो, उन्हे
गिरफ्तार करो, उनकी घेराबंदी करो|
(सुरा ९, अल-तौबा, आयात ५)

३)
ﻭَﺇِﻥْ ﻧَﻜَﺜُﻮﺍ ﺃَﻳْﻤَﺎﻧَﻬُﻢْ ﻣِﻦْ ﺑَﻌْﺪِ ﻋَﻬْﺪِﻫِﻢْ
ﻭَﻃَﻌَﻨُﻮﺍ ﻓِﻲ ﺩِﻳﻨِﻜُﻢْ ﻓَﻘَﺎﺗِﻠُﻮﺍ ﺃَﺋِﻤَّﺔَ ﺍﻟْﻜُﻔْﺮِ ۙ
ﺇِﻧَّﻬُﻢْ ﻟَﺎ ﺃَﻳْﻤَﺎﻥَ ﻟَﻬُﻢْ ﻟَﻌَﻠَّﻬُﻢْ ﻳَﻨْﺘَﻬُﻮﻥ
َ
And if they break their pledges after their treaty (hath been made
with you) and assail your religion, then fight the heads of disbelief Lo!
they have no binding oaths in order
that they may desist.

उनका (मुर्तीपुजको) अंग काटो, सर धड से अलग कर दो! याह हत्याकांड तब तक चलना चाहिये, जब तक अंतिम काफिर खत्म न हो जाये|
(सुरा ९, अल-तौबा, आयात १२)

Surah 8: ayat 12

I shall cast terror into the hearts of the infidels.  Strike off their heads, maim them in every limb

४) मी श्रद्धाहीनांमध्ये (काफीरांमध्ये) दहशत पैदा करेन व त्यांचे शीर कलम करेन व त्यांचे सर्व अवयव पंगु करेन !

. 
Surah 69: ayats 30-33
We shall say, Lay hold of him and bind him.  Bum him in the fire of Hell, then fasten him with a chain seventy cubits long.  For he did not believe in Allah, the Most High.


५) 
आम्ही तर त्यांना (श्रद्धाहीनांना) पकडायला सांगतो व बांधायला सांगतो ! त्यांना नरकाग्नीत जळूद्या, नंतर त्यांना सत्तर घनफुट लांब अशा साखळीने बांधून टाकू ! कारण त्यांनी आल्लाह, जो सर्वोत्तम आहे, त्याच्याशी द्रोह केला !


असे अनेक पुरावे कुराणातले देता येतील.
 वरील आयतींत शीर कलम करा व अवयव पंगु करा अशी स्पष्ट आज्ञा आहे. तेंव्हा हत्या ही कुराणानुसारच हे स्पष्ट आहे.



आता तत्कालीन मुसलमानी संदर्भ काय म्हणताहेत ते पाहुयात !


ह्या तत्कालीन संदर्भात आम्ही औरंग्याचे म्हणजेच त्याच्या तत्कालीन मुसलमान सरदारांचेच व इतिहासकारांचेच संदर्भ देणार आहोत.
ह्यात काही हिॅदु इतिहासकारांचाही संदर्भ देणार आहोत.

१. मासिर इ आलमगिरी - लेखक साकी मुस्तैदखान!  हा मोंगलाच्या सेवेत मुश्रीफ अर्थात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने ह्या ग्रंथात शंभुराजेंची कैद, धिॅड, वध ह्या गोष्टी सविस्तर लिहिल्या आहेत, ज्या पुराव्याच्या दृष्टीने अतिशय अभ्यसनीय आहेत. मुळ फार्सी ग्रंथांचा आंग्ल अनुवाद जदुनाथ सरकार व मराठी अनुवाद ग ह खरेंनी व सेतुमाधवराव पगडींनी ह्याचा अनुवाद "औरंगजेब व मराठे" ह्या ग्रंथात मराठीत केला आहे.


२. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा - औरंग्याच्या राज्यकारभाराची पत्रे जी मराठीत महाराष्ट्र राज्य साहित्य नि सांस्कृतिक महामंडळाने "मोंगल दरबारची बातमीपत्रे" म्हणुन प्रसिद्ध केली आहेत.

३. फतुआते आलमगिरी - मुळ फार्सी ईश्वरदास नागर नावाच्या लेखकाने केलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

३. तारीखे दिलकुशा - इ स १६८५ ते १७०९ ह्या काळातील घटनांच्या आठवणी भीमसेन सक्सेना नावाच्या मोंगल सरदाराने लिहिलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

४. मुन्तखबुललएबाबए महंमदशाही  - मुळ फार्सी लेखक खाफीखान मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ह्या ग्रंथात

हे सगळे मोंगल व फार्सी ग्रंथच आहेत ह्याच्या अनुसारच आपण आता शंभुराजेंची कैद व त्यांची धिॅड व त्यांचे अनन्वित हाल व शेवटी मृत्यु हे सर्व अभ्यासणार आहोत.

शंभुराजेंची कैद

मुकर्रबखानाने संगमेश्वरी शंभुराजेंस व कवी कलशांस पकडिले दिनांक ३ फेब्रुवारी, १६८९ !
मातबरखानाचे पत्र फेब्रुवारी, १६८९
"आल्लाहच्या कृपेने त्या मुकर्रबखानाने संगमेश्वरांस पोहोचून दुष्ट संभाजीस जिवंत पकडले आहे"
इथे दुष्ट हा शब्द त्यांचा म्हणजे मातबरखानाचा आहे, माझा नाहीये!
जेधे शकावलीतीली नोंद - विभव नाम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवारी


बादशहांस बातमी
औरंग्या त्यावेळी अकलुज येथे होता. त्याला ती बातमी कळताच त्याने आपला मुक्काम हलवण्याची व कैद्यांना बहादुरगडावर आणायची आज्ञा केली. १५ फेब्रुवारी, १६८९ ला औरंग्या अकलुजहून बहादुरगडास पोहोचला.
बादशहाच्या आज्ञेप्रमाणे शंभूराजांना बहादूरगड येथे आणण्यात आले. शंभूराजांसोबत कवी कलश आणि इतर अनेकांना अटक करुन साखळदंडाने बांधले होते. हा सर्व लवाजमा १५ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या छावणीत पोहोचला .
शंभूराजांच्या अंगावरील राजवस्त्रे उतरवून त्यांना इराणात गुन्हेगारांच्या अंगावर घालतात, तसा विदुषकी अंगरखा व लाकडी उंच टोपी (तख्ताकुलाह) चढवून इतरांनाही तसाच पोशाख चढवून सर्वाँची धिँड छावणीच्या परिसरात ११ मैलपर्यँत काढण्यात आली. शंभूराजांना उंटावर उलटे बसविण्यात आले आणि पुढे ढोल, कर्णे वाजवीत, लष्करातून मिरवीत नंतर औरंग्याच्या दरबारात आणण्यात आले.

संदर्भ - मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अर्थात मासिरे ए आलमगिरी. (लेखक- साकी मुस्तैदखान)



क्रमशः 

लेखक- तुकाराम चिंचणीकर 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
पंढरपूर विभाग 
Share:

गुढीपाडवा विरोधाचे खंडन भाग -०१


(काय आहे गुढीपाडव्याची सत्यता, का साजरा केला जातो गुढी पाडवा?)










"इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे."
-प्राचार्य शिवाजीराव भोसले

सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतु पुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्याच्या बद्दलचे वास्तव काय आहे ते पाहुयात ... 
म्हणे शंभुराजेंची हत्या ही मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी फाल्गुन वद्य अमावस्येला केली किॅवा ती औरंग्यास करायला सांगितली व त्याचदिवशी त्यांचं शीर हे ब्राह्नणांनी नाचविलं व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मणांनी तो चैत्र पाडव्याचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला व आनंदाप्रीत्यर्थ शंभुराजेंच्या शीराचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या व तेंव्हापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरु झाला. थोडक्यात आजची गुढी उभारायची पद्धत व प्रथा हा शंभुराजेंच्या हत्येशी संबंधित आहे असं ह्या आक्षेपकांचं म्हणणं आहे.

आता गुढी पाडव्याचा इतिहास पाहुयात...!
गुढी उभारल्याचा उल्लेख आपणांस रामायणात मिळतो हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्याची प्राचीनता आपल्या लक्षात येते.

  • गुढी शब्दाचा अर्थ काठी पूजा


काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरां पैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवाकाठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित' महाराष्ट्र शब्दकोशा'चा तृतीय खंडाचा पृष्ठ क्रमांक ९९८ चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असेउदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्याशब्दकोशाने खोपटी; झोंपडी; अथवा पाल (रहाण्याची जागा) असादिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करूनउभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते. तरीही राहण्याचीजागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक,तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची)संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांचीयादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापरआणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहताहा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिकअसावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठीहा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पणआंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूडबांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असूशकते.


शिशुपाल वधामध्ये गुढीचा उल्लेख सापडतो तो असा,

तैवे आत्मा उभितावे गुढी ! रोमांचमिषे !

गुढी शब्द कौल देणे ह्या अर्थाने पण आहे. जसे देवाला काही प्रश्नविचारायचे झाल्यांस कौल मागणे व त्यावेळी गुढी उजवी दिली कीडावी दिली असाही संदर्भ आहे. 

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचितलीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथबाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंहीसडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली :उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... "असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीतअध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचींलिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; 
"ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविलीअनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; 
"माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं। गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. 
संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई(निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा(चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत,गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळीवाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" 
१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक काव्याततर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्याकाव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची,वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्यागुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांचीअनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं,वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणीउभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्यालेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचाआहे. 
महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल]म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावीदेणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असेसंकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्यानेवापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचितनिर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्धसंदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसूनयेते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्‍या समूहांतील एखादाचपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. 
जगद्गुरु तुकोबारायही त्यांच्या अभंगांच्या गाथेत गुढीचे उल्लेखकरतात.

                                                              तुकारामांची गाथा
तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥  (अभंग क्र. ३५८३)
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥   (अभंगक्र. ४५२९)

संत नामदेवरायांचे गुढीचे अभंग
फोडा फोडारे भांडारें । 
     आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥ 
उभवा उभवारेगुढी । 
                                                सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥    (श्रीराममाहात्म्य - रामजन्म :)



संत जनाबाईंचे गुढीचे अभंग (निर्वाण:इ.स. १३५०)
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥
 राया प्राप्‍तीजाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥
 येथुनी हरिश्चंद्र आख्यान ।नामयाची जनी म्हण ॥९॥

आणखीही अनेक संतांचे अनेक उल्लेख देता येतील पण विस्तारभयास्तव देत नाही. थोडक्यात संतवांग्मयात हे गुढी उभारल्याचे उल्लेख शंभुराजेंच्या मृत्युच्या शेकडो वर्षे आधीचे आहेत हे स्पष्ट असल्याने गुढी ब्राम्हणांनी शंभुराजेंना मारल्यानंतर उभारली हा आरोप किती तथ्यहीन आहे हे कळते.


क्रमशः 

लेखक-तुकाराम चिंचणीकर 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
पंढरपूर विभाग 
Share:






🔶धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास

संभाजी महाराजांचे बलिदान हे निश्चित हिंदू धर्मासाठी आणि या देशासाठीच होते. त्यावेळी शंभूराजे देशातील एकमेव हिंदू छत्रपती सिंहासिनाधीश्वर महाराज होते "जसा राजा तशी प्रजा" या न्यायने जर या राजाने मुसलमान धर्म स्विकारला असता तर या देशातील हिंदू प्रजेने भयापोटी, भीतीपोटी मुसलमान धर्म स्विकारला असता, तर  सर्व धर्मच नाहीसा झाला असता. पण त्यांच्या अभूतपुर्व बलिदानामुळे हिंदू धर्म आणि हिंदूस्थान टिकला. संभाजी महाराजांचे बलिदान झाले, पण त्यांचे बलिदान एका क्षणात, एका निमिषात, एका घटनेत झाले नव्हते तर पकडल्या गेल्या दिवसापासुन, फाल्गून अमावस्याला बलिदान झालेल्या दिवसापर्यंत ते रोजच मरणांतिक यातना भोगत होते. म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान दरवर्षी संपूर्ण फाल्गून महिना ।। धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास ।। दुःखाचा, शोकाचा म्हणून पाळतो. महाराष्ट्रातील असंख्य गावोगावी, शहरात, तालुक्यात त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्लोक म्हणून संपुर्ण महिनाभर श्रद्धांजली अर्पण केली जाते.

फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच, सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळणे. 
या संपूर्ण काळात; एकवेळचे जेवण करणे, मिष्टान्न न खाणे, चहा, पान-तंबाखू सेवन, टीव्ही अथवा चित्रपट   पाहणे, पायात पादत्राणे घालणे हे सर्व किंवा यामधील एक गोष्ट सोडणे. हा सुतकाचा महिना असल्याने आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे. रोज चौकात धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची प्रतिमा लावून, त्यास रोज पुष्प अर्पण करून, त्यासमोर प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र आदी म्हणून, श्री संभाजीसूर्यहृदय म्हणून रोज श्रद्धांजली वहावी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून निघणाऱ्या मूकपदयात्रेत सहभागी होऊन व संपूर्ण दिवस उपवास ठेवून, सर्वानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वहावी. मूकपदयात्रेनंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मंत्राग्नी मिळालेला नाही, त्यामुळे प्रतिकात्मक चिता पेटवून त्या चितेच्या साक्षीने पुढील प्रतिज्ञा घ्यावी.

  • बरं हा बलिदान मास उपक्रम केवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकार्यासाठीच आहे का ओ?

तर नाही, हा उपक्रम ज्या कोणास वाटते कि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जे बलिदान केले ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या धर्मासाठी, माझ्या राष्ट्रासाठी केलेले आहे, आणि त्याचे स्मरण म्हणून, ते सुतक मी महिनाभर पाळेन, हि भावना ज्या ज्या हिंदूंच्या मनात आहे, त्यासर्वांसाठीच हा पायंडा आहे... हे लक्षात घेऊन सर्वच हिंदू बांधवांनी, आपापल्या भागात चारचौघे एकत्र करून गल्लीगल्लीत बलिदान मासानिमित्त धर्मवीर श्री संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहावी ....


  • धर्मवीर बलिदान मास समाप्ती ,मुकपदयात्रा तथा प्रतीकात्मक चितेचे दहन....!



फाल्गुन वद्य अमावास्या हा आपण महिनाभर मोठ्या श्रद्धेने पाळलेल्या धर्मवीर बलिदान मासाचा शेवटचा दिवस 

ठरल्या प्रमाणे आपण शेवटच्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची न निघालेली अंतयात्रा काढतो. 
वढू बुद्रुक मधून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीपासून आपण प्रतिवर्षी ज्वाला आणतो व जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या मुख्य चौकात ठेवतो. तिथून ती ज्वाला तालुक्यातील सर्व गावात युवक नेतात व शेवटच्या दिवशी त्याच ज्वालेला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे प्रतिक समजून त्याची अंतयात्रा काढतात व गावातील मुख्य चौकात प्रतीकात्मक चिता रचून त्या ज्वालेने ती चिता पेटवली जाते व मंत्राग्नी दिला जातो. 

१) मूकपदयात्रा म्हणजे काय असते ?

- ज्या दिवशी मूक पदयात्रा असेल त्या दिवशी कडकडीत उपवास करावा तेव्हा आपल्याला या कार्यक्रमाची तीव्रता व गांभीर्य समजेल. धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज याना औरंग्याने क्रूरपणे हाल हाल करून प्रतिदिवस एक एक अवयव तोडत एक महिनाभर छळ करत मारून टाकले, त्यांचे तुकडे वढू बुद्रुक च्या वाळवंटात कोळ्यां कुत्र्यासारखे फेकून दिले. 
हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची हि अवस्था केली तरी आजवर कोणाला काहीच वाटले नाही. 
म्हणून धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या या धगधगत्या बलिदानाचे स्मरण राहावे व त्यांच्या हत्येचा सूड घ्यायला समस्त हिंदू समाज मनाने तयार व्हावा यासाठी धर्मवीर बलिदान मास आपण पाळतो. 
शेवटच्या दिवशी वढूबुद्रुकहून आणलेल्या ज्वालेची आपण ती ज्वाला म्हणजे संभाजी महाराज आहेत असे स्मरून तिची अंतयात्रा काढतो जी ३५० वर्षापूर्वी निघाली नव्हती. या अंतयात्रेत सामील होणारा तमाम हिंदू समाज न बोलता मूकपणे यात सामील होतो, या सर्व कार्यक्रमास आपण मूक पदयात्रा म्हणतो. 

२) अंतयात्रा कुठून सुरु करावी व कुठे समाप्त करावी ?

- गावातील शिवाजी महाराज यांची मूर्ती असेल तर तिथून नसेल तर गावातील मुख्य चौकातून सुरु करून गावातील सर्व गल्ली बोळ, प्रमुख रस्ते जिथून मागे न वळावे लागेल अश्या प्रकारे संपूर्ण गाव / प्रभाग / शहर यातून मूकपद यात्रा काढावी व जिथून सुरु केली तिथेच समाप्त करावी. 

३) प्रतीकात्मक चिता म्हणजे काय ? 

- प्रतीकात्मक चिता म्हणजे प्रत्यक्ष देहरूपी संभाजी महाराजांना आपण अग्नी देत नसून त्यांची सामाधीस्थाळापासून आणलेली ज्वाला आपण पेटवत आहे. त्याचप्रमाणे त्या चितेवर संभाजी महाराज सुप्त पाने आहेत अशी पवित्र भावना आमच्या सर्वांची असते. प्रतीकात्मक चिता म्हणजे प्रतिक म्हणून रचलेली. या चितेत चंदनाचे लाकूड, गाईच्या गोवर्या व इतर पवित्र लाकडे रचून एक छोटीशी चिता रचावी. 

४) चितेला मंत्राग्नी दिल्यानंतर काय करावे ?

- ज्या दिवशी मूक पदयात्रा असेल त्या दिवशी कडकडीत उपवास करावा तेव्हा आपल्याला या कार्यक्रमाची तीव्रता व गांभीर्य समजेल. चितेला सर्व हिंदू समाजाने मूकपदयात्रा झाल्यानंतर मंत्राग्नी द्यावा म्हणजे आणलेल्या ज्वालेने ती चिता पेटवावी. चिता प्रदीप्त झाल्यावर आपण जी शपथ वाहायाची आहे ती पुढीलप्रमाणे; 

''आदिशक्ती माता श्री तुळजा भवानी व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरूण पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शाना साक्षी ठेवून हिंदुस्थान, हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांच्या आंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगत्जननी भारतमातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत ''

हि शपथ त्या चितेच्या साक्षीने हात पुढे करून वहावी. यानंतर गावातील प्रमुख धारकर्याने संभाजी महाराजाना औरंग्या ने कसे क्रूरपणे मारले व बलिदान मास म्हणजे का पाळला जातो हे दिर्घरूपाने सांगावे. आलेल्या सर्व धारकरी मंडळीनी मनोगत व्यक्त करावे. पुढील कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगून कार्यक्रम समाप्त करावा.


-श्री शिवदिनदर्शिका २०१८
Share:

धारक-यानो स्वत:ला जपा...




         मोहीमे नंतर काल पुन्हा एकदा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने निर्माण केलेल्या शिवसुर्याच्या स्वच्छ,निष्कलंक,निरभ्र अवकाशातील दोन स्वयंभु, तेजस्वी तारे निखळले.....होय तेजस्वी तारेच ते ! स्वत:चा रुढ मार्ग सोडुन देव-देश-धर्म अक्षय्य टिकविण्यासाठी शिवछत्रपती -संभाजी महाराज हे बीजमंत्र उरात धरुन सतत कार्यप्रवण असणारे ओंकार दादा माने व सागर ढवळे हे दोन धारकरी आपल्या सर्वांना सोडुन निघुन गेले ते कायमचेच.......!
              मोहीमेनंतरच्या तिस-याच दिवशी ईचलकरंजी जवळील तानाजीराव भुयेकरांनी तर सर्वांनाचा धक्का दिला. या वर्षीची मोहीम पुर्ण करुन घरी परतल्यावर. तिस-याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली. असे अनेक तेजस्वी तारे असतील त्यापैकी सागरदादा मालुसरे, अजय तोडकर, श्री महेशदादा सपकाळे ही मोजकीच नावे माझ्या लक्षात राहीली. मला अपरिचित असणारी किती तरी नावे निघतील.
                  का? नियतीचा असा अट्टाहास का? शिवछत्रपति-संभाजी महाराज यांच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करणा-या धारक-यांच्याच वाट्याला का हे दुःख ? महाराष्ट्रातील कुठल्याही परिचित-अपरिचीत धारक-यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आम्ही सर्वजण अशी दुःखे\ पचवु शकत नाही. कारण ही फक्त आमचीच हानी नसुन समाजाची देखील आहे. समर्थांच्या श्लोका प्रमाने,

   आपण अवचित निघोनी जावे | तरी मग भजन कोण करावे |
   त्या कारणे भजनासि लावावे | कित्येक लोक ||

             असाच भाव मनात धरुन देव-देश-धर्म कार्याच्या या शिवगंगेत अनेक तरुणांना अक्षरश: खेचुन आणणारे अभ्यासु, कुशल संघटक, निर्भिड, चारित्र्यवान असे धारकरी आज मितीस हा सगळा डाव सोडुन जाणे आम्हास मंजुर नाही. आदरणीय गुरूजींनी असे एक-एक रत्ने घडवुन ती भरतभुमीच्या चरणकमलावर अर्पण करायची मनिषा मनात ठेवलीय. जर का ती रत्ने अशी अवचित गळुन पडली तर त्यांना किती दुःख  होत असेल, हे शब्दात ही सांगु शकत नाही. म्हणुन धारक-यांनो स्वत:ला जपा. आम्हाला मान्य आहे की, 

देवाजीच्या आले मना | तेथे कोणाचे चालेना ||

पण हे जर का कार्य निरंतर व्रुद्धींगत करायचे असेल तर आपल्या सारखे मोती गळुन पडता कामा नये. कुठे ही जरी असु तरी अखंड सावधान असावे ही उक्ती मनात धरुनच काम करुया. याचा अर्थ असा नाही की घरीच बसा. पण रस्त्यावरती प्रवासात कोणतीही घाई-गडबड करणे टाळा. आपला जीव लाख मोलाचा आहे. आज महाराष्ट्राला आपली गरज आहे. भंगवंता कडे ही आमचे एकच मागणे आहे, तेही आम्हास गुरूजींनी शिकवलय;

        आम्हा एेक देवा, नको अन्य काही |
    क्रुपाछत्र राहो तुझे नित्य डोई, |
          ह्रूदि भक्ति आणी तनी कर्म शक्ति |
         आणि अंतरा माजी आत्मप्रचिती ||

           हे भगवंता तु आम्हास पैसा-आडका, सुख हे सर्व नाही दिलस तरी ही चालेल पण हा शिवसुर्यजाळ पसरवण्यास दिर्घायुष्य मात्र नक्की दे......
        हे लिहीत असताना साश्रु नयनांनी ओंकार दादा, सागर, व तानाजीराव, अजय आणि महेश दादा यांचे स्मरण करतो. व ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हेच मागणं मागतो.

आणखी काय लिहु..........!
-विनोद पाटणकर 
-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,मुळशी.
 राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ
Share:

एका हिंदी भाषिक धारकर्याने अनुभवलेली मोहीम...

(एका हिंदी भाषिक धारकर्याने पहिल्यांदा मोहीम अनुभवल्या नंतर आपल्याला आलेला अनुभव सांगितला. )


भिड़े गुरुजी के बारे में मैंने आज तक सुना था कि; वह साधारण सामान्य जीवन जीते है | सुख सुविधाओं का त्याग पूर्ण समर्पण निष्ठा से देश-धर्म-देव की सेवा में लगे हुए है | यह सब मेरे हुपरि के मित्र  प्रविण प्रकाश पाटील दादा के प्रेरणा से गडकोट मोहिम मे जाकर देखने मिला ....!
(धीरज कुमार रामनवल गौड) 

गुरुजी क़ा आत्मबल किसी देव पुरुष से कम नही हैं | गुरुजी की तबियत कुछ दिनों से खराब थी | ज्यादा चल नही पा रहे थे | उनके धारकरीयो ने उन्हें यह श्रीप्रतापगड_ते_श्रीरायरेश्वर का प्रवास गाड़ी द्वारा करने की विनंती किए थे | लेकिन गुरुजी नही माने, यह पूरा प्रवास हम लोगो के साथ पहाड़ से ही तय किए | गुरुजी चलते वक्त बिल्कुल भी नही रुकते है | औऱ हम सबसे पहले गढ़ पर पहुँच जाते हैं | गुरुजी को चलता देख थके हारे हम लोगो को भी ऊर्जा मिलती है | हम भी जयकारा लगाते हुए कदम बढ़ाने लगते है, घन्टो व्याख्यान भी देते हैं, सबसे मिलते है, प्रवास की व्यवस्था देखते है, सबकी खबर रखते है | 86 वर्ष की उम्र में भी उनकी स्मरण शक्ति तेज है | दूर दूर तक निगाहें जाती है | अनुशासन प्रिय गुरु जी के साथ आई तुळजा भवानी का आशीर्वाद है | गुरुजी में मुझे छत्रपति शिवाजी महाराज एवं संभाजी महाराज का भाव दिखता हैं | वो वर्तमान के सबसे बड़े चाणक्य है | लाखो की तादाद में चन्द्रगुप्त तैयार कर रहे है | उनके सिर्फ एक आवाज से पूरी भीड़ शांत हो जाती है | उनके गुस्से में भी लोगो के प्रति बहुत प्रेम है | धारकरी अपने गुरु जी के लिए कुछ भी कर सकते हैं | गजब कि सद्भावना है, प्रेम है, समर्पण है ऐसे महान कार्य से जुड़े सभी बन्धुओ एवं गुरुजी के चरणों मे प्रणाम.....|

- धीरज कुमार रामनवल गौड 
-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,
-घाटकोपर विभाग  
Share:

"खानास गर्दीस मिळवणे बिगर तोंड दाखवू नये.."

("खानास गर्दीस मिळवणे बिगर तोंड दाखवू नये,  राव खानास ऐसेच सोडलात ? तुम्ही सरदारकी नाही सिपाईगिरी केली ..शिवछत्रपतींच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य हे कोणासाठी होत?) 






अपेक्षा न करावी तू सोबतीची | तुझी नाळ आहे रवीच्या कुळीची ||
स्वयंभू स्वयंदिप्त तू का भियावे | तमाला गिळोनी जगा उजळावे || 


- गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी

वरील श्लोक वाचला की लगेच अर्थ उमगतो, सामान्य वाचक हा एक सुविचार असेल आणि चांगला संदेश देणारे या ओळी आहेत असा समजेल आणि सोडून देईल. पण जो शिवाजी-संभाजी रक्तगटाचा आहे तो मात्र या श्लोकाकडे कानाडोळा करणार नाही. वाचताच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतील , ते असामान्य असे कार्यकर्तुत्व ज्यांचे , संपूर्ण हिंदु कुळाचे बाप असणारे असे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब , असंख्य असे मावळे व त्यांचा जाज्वल्य इतिहास. बघा ना वरील श्लोक आपण जर पुन्हा एकदा बारकाईने वाचला तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल हा विचार राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवबाच्या डोक्यात त्यांच्या लहानपणीच भिनवला होता पुढे महाराजांनी हाच आपल्या आईचा म्हणजे जिजामातेच्या रूपाने जन्म घेतलेल्या भारतमातेचा विचार सर्व मावळे व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अंगी भिनवला. आता हा लेख लिहित असताना शिवचरित्रातील एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आहे तो सांगायचा मला मोह आवरत नाही म्हणून सांगतो; “जेव्हा स्वराज्याचे सरसेनापती म्हणून प्रतापराव गुजर कार्यरत होते त्यावेळेसचा हा प्रसंग. राज्याभिषेकासाठी काही महिन्यांचा अवधी उरला होता पण बहलोलखान यांच्या रूपाने स्वराज्यावर नवे संकट उभे ठाकले होते. तेव्हा महाराजांनी आपल्या सैन्याला त्या बहलोलखानाचा बिमोड करण्यासाठी सैन्याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली धाडले. मग काय जे व्हायचे ते झाले मराठ्यांनी त्या हरामखोर बहलोलखानला शरण येण्यास भाग पाडले. त्यावेळेस युद्धातील एका संस्काराप्रमाणे त्या बहलोलखानास प्रतापरावानी सोडून दिले. ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळली त्या वेळेस ते भयंकर संतापले आणि त्यांनी प्रतापरावाना एक खरमरीत पत्र लिहले त्या मध्ये एक वाक्य असे होते “जो पर्यंत तुम्ही बहलोलखानास संपवणार नाही तो पर्यंत आम्हास तोंड दाखवु नये” आणि हेच वाक्य सरसेनापती प्रतापराव गुजर यांना जिव्हारी लागले. मनात बहलोलखानाविषयी प्रचंड चीड निर्माण झाली होती आणि अशातच त्यांना एक खबर लागली की ‘खान जवळच आहे’ सैन्याची जुळवाजुळव करण्यात त्यांनी वेळ दवडला नाही सोबत असणारे सहा मावळे घेऊन ते स्वतः बहलोलखानावर चालून गेले , शेवटी काय झाले तर स्वराज्यातील आणखी सात हिरे धारातीर्थी पडले. पुढे त्यांच्या मृत्याचा बदला मराठ्यांनी काही दिवसातच घेतला तेही बहलोलखानास मारूनच.”


वरील प्रसंग वाचता आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेस सहा मावळे व प्रतापराव गुजर स्वतः बहलोलखानावर चालून गेले त्यावेळेस एक क्षण तरी या सातजणाच्या मनात हा विचार आला असेल का? की , आपण सातच जण कसे जाणार ? आपण हरणार ? हो आला असेल की पण ‘पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजाना तोंड न दाखवणे’ या पेक्षा त्यांना मृत्युची शिक्षा परवडणारी होती. महाराजांनी त्यांना तोंड नका दाखवु असे म्हणणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने साक्षात विठोबाने तुकोबारायांना सांगणे की “माझे नाव आता तुझ्या मुखी घेऊ नकोस”. त्या बह्लोलखानावर चालुन जाताना एक त्यांच्या मनी हाच श्लोक जागृत झाला असणार यात शंका नाही.

अपेक्षा न करावी तू सोबतीची | तुझी नाळ आहे रवीच्या कुळीची ||
स्वयंभू स्वयंदिप्त तू का भियावे | तमाला गिळोनी जगा उजळावे ||


नुसते सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांच्याच मनात असा श्लोक जागृत नाही झाला याची असंख्य उदाहरणे शिवचरित्राचे एक-एक पान उलटताना आपल्याला नक्की जाणवतील. बाजीप्रभु देशपांडे आणि घोडखिंड, नरवीर तानाजी मालुसरे आणि तो कोंढाणा, शिवा काशीद आणि पन्हाळगड, फिरंगोजी नरसाळा आणि चाकण, मुरारबाजी आणि तो पुरंदर अशी असंख्य, अगणित त्याग असणारे मावळे त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जेव्हा त्यांचा मृत्यु उभा ठाकला होता त्या वेळेस नुसते तेच नाही तर साक्षात यमराज सुद्धा हा श्लोक जरूर म्हणले असतील.


हे माझे अब्जावधी जन्माचे पुण्य म्हणून या भूमीत मी जन्माला आलो. नुसता जन्मालाच नाही तर या मातेचे मी काही तरी देणे लागतो म्हणून “देव-देश-धर्म याच काम माझ्या हातून घडावं म्हणून मी धारकरी बनु पाहतोय.” ‘धारकरी’ जसा विठ्ठलाला आपल्या देहाचे अंग समजणारा ‘वारकरी’ असतो अगदी तसाच असतो धारकरी. फक्त फरक इतकाच तो भगव्या ध्वजाला , ध्वजाचे रक्षण करणाऱ्याला आपला विठ्ठल समजतो म्हणजेच पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व असंख्य असे मावळे यांना आपला विठ्ठल समजतो आणि का समजवू नये ? वरीलपैकी जर कोणच नसते तर मी आज विठ्ठल हा शब्द सुद्धा उच्चारू शकलो नसतो. वारकरी जसा रोज विठ्ठल भेटावा म्हणुन भक्ती करत असतो , पंढरपूरची वारी करत असतो अगदी त्याच प्रमाणे नुसता मीच नाही तर माझ्यासारखे महाराष्ट्रातील असंख्य जण धारकरी बनण्यासाठी “धारातीर्थ गडकोट मोहीम” करतात. गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे दरवर्षी धारातीर्थ गडकोट मोहीम महाराष्ट्रातील अनेक धारातीर्थे म्हणजे गड्कोटापैकी दोन गडादरम्यान हि मोहीम आयोजित केली जाते. मी आतापर्यंत एकूण तीन मोहिमा केल्या आहेत २०१६ ची श्री क्षेत्र भुदरगड ते श्री क्षेत्र रांगणागड , २०१७ ची श्री क्षेत्र पन्हाळगड ते श्री क्षेत्र विशाळगड व नुकतीच पार पडलेली २०१८ ची श्री क्षेत्र प्रतापगड ते श्री क्षेत्र रायरेश्वर . पहिल्यावर्षी जेव्हा मोहिमेत गेलो त्यावेळेस अस वाटला की काय बोबलत हिंडायचं ? काय मिळणार यातून ? नंतर घरी जेव्हा आलो काही महिन्यांनी स्टार प्रवाह वर लागणारी महारांजांची मालिका नंतर त्याचा एक चित्रपट पण झाला तो माझ्या पाहण्यात आला नंतर एक विचार आला की , कसे जगले असतील ना महाराज आणि मावळे ? उत्तर लगेच क्षणात मिळाले तसेच की जसे आपण काही एक महिन्यांपूर्वी मोहिमेत जगलो होतो त्याही पेक्षा कठीण प्रसंगात ते जगले पण १% तरी आपण त्याच्या सारख जगलो खरच का ? चार दिवस पुरेल एवढ अन्न आणायला सांगितले तेव्हा ३० शेंगापोळ्या, २० चपात्या, १० बाजरीच्या कडक भाकऱ्या सोबत चिवडा, फरसाण, चटणी इ. सोबत नेले होते, थंडीपासून बचावासाठी म्हणून मफलर, जर्किन, कानटोपी, ग्लोज अंथरून पांघरून एवढ सोबत होते. हे आठवलं आणि माझी मान शरमेने खाली गेली. मग मी ठरवल की पुढच्या मोहिमेत म्हणजे २०१७ च्या मोहिमेत थोडी सुखासीनता कमी करू पण त्याही वर्षी ते शक्य झाल नाही. यंदाच्या मोहिमेतही ते शक्य होणार नव्हते पण नियतीच्या मनात भलतेच होते दुसऱ्याच मुक्कामाला अंथरायचे ताडपत्री
आणि पांघरायचे चादर हरवली त्यातही प्रवीण कामठे याच्या अंथरुणात मी त्या मुक्कामाला सामावलो. म्हणजे थोडी का होईना मी सुखासीनतेचा मोह टाळू नाही शकलो म्हणून खरच मी अजूनही धारकरी म्हणवुन घ्यायच्या लायक नाही असा मी समजतो.


आता तुम्ही म्हणाल की मोहिमेला सुखासीनतेचा एवढा तिटकारा का ? उत्तर सोप्प आहे कारण आमच्या मोहिमेच्या आद्यप्रवर्तकाला म्हणजेच पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज , राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, असंख्य असे मावळे आणि गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना सुखासीनतेचा तिटकारा आहे. कारण भारतमातेचा संसार उघडा पडलेला असताना स्वताचा संसार सुखी करण्याच्या मागे लागलेली करंटी पिढी यांना कधीच अपेक्षित नाही यांना अपेक्षित आहे ती देव-देश-धर्म याचा क्षणोक्षणी विचार करणारी एक निस्वार्थी धारकऱ्याची पिढी आणि हो मी माझ्या पुढच्या मोहिमेत थोडा सुखासीनतेचा मोह टाळून धारकरी जरूर बनणार पण तुम्ही मात्र तुमच्या पहिल्याच मोहिमेत धारकरी जरूर बनाल अशी इच्छा मनी ठेऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित २०१९ च्या मोहिमेत कोणताही जातीभेद, प्रांतभेद, पक्षभेद, वर्णभेद बाजूला टाकुन जरूर सहभागी व्हा .....कारण धारातीर्थे तुम्हाला बोलवतायत.....!





-कु. प्रतिक कि. पाटील 
-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 
 सोलापुर विभाग

Share:

त्या डंखातील विष मारण्याचे काम श्री शिवछत्रपतीनी केले.



महाराजांची कीर्ती ऐकून उत्तरेतला एक कवी म्हणजे ‘कवी भूषण’ आपल्या एका काव्यात अस म्हणतो कि, 

"काशिजी कि कला जाती,  
मथुरा मस्जिद होती,
  सिवाजी न होते तो, 
सुन्नत होत सबकी "

 त्यांनी जे काही लिहिलय ते सत्य आहे. त्याच कारण, शिवछत्रपतींच्या काळात पाच हि पातशाह्यांचा काश्मीर ते कन्याकुमारी, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान चालणारा इस्लामी नंगानाच त्याने ऐकला आणि पहिला होता. महाराजांची कीर्ती ऐकून तो महाराष्ट्रात आला आणि त्याने काही काव्य केली. त्यात हे म्हणतोय "सिवाजी न होते तो, सुन्नत होत सबकी" हे जितक सत्य आहे, "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज न होते तो सुन्नत होती सबकी" हे तितकच सत्य आहे. त्याकाळापासूनच आपली देवालय टिकली ती ह्याच पिता-पुत्रांच्या पुण्याईमुळेच..!
      हिंदुस्थानला हजारो लाखो वर्षाची देवा-धर्माची परंपरा आहे. त्यात आपल्याकडे पद्धत आहे; बारा ज्योर्तिलिंगाची यात्रा करणे. हि बारा ज्योर्तिलिंग म्हणजे भगवान शंकराचे स्वयंभू (प्रगट) स्वरूप. त्यांची यात्रा हि पवित्र मानली जाते. हि बाराच्या बारा ज्योर्तिलिंग आजही शाबूत आहेत. त्याचं कारण म्हणजे १३ वे आणि १४ वे ज्योर्तिलिंग. होय, त्या रायगडावर असणारी श्री शिवछत्रपतींची समाधी आणि त्या वढू-तुळापुरला असणारी धर्मवीर संभाजी महाराजंची समाधी हि दोन्ही क्षेत्रे उभ्या हिंदुस्थानासाठी १३ वे आणि १४ वे जोतिर्लिंग आहेत. हेच कवी भूषण नी आपल्या काव्यात सांगितलं आहे. आपली तीर्थक्षेत्र राखायची असतील तर आपल्याला एकच मार्ग अवलंबावा लागेल; तो म्हणजे शिवाजी-संभाजी मार्ग. घडली धारातीर्थ म्हणूनच टिकली तीर्थक्षेत्र.
          ह्याचं उदाहरण द्यायचं झाल तर,  भागानगरला म्हणजे आताच्या हैद्राबादला जुनं मंदिर आहे. मंदिरावर इराणवरून सतत हल्ले व्हायचे. लुटा-लुट आणि तोडफोड हे नित्याच झालं होत. त्यांनी मराठ्यांना म्हणजे शिवछत्रपतींना पत्र पाठवलं. आणि मंदिरासाठी संरक्षण मागितलं. शिवछत्रपतींनी त्या पत्राला दिलेल्या उत्तरात "आजपासून ह्या मंदिराला मराठे संरक्षण देतील..!" असा शब्द दिला. हि बातमी इराणी आक्रमकांना समजताच, त्या मंदिराचे हल्ले कायमचे थांबले. तसेच, गोव्याच्या एका मंदिराबाबत प्रसंग आपल्याला आढळतो. ह्यावरून श्री शिवछत्रपतींची देवा-धर्मावरची माया लक्षात येते कि, मंदिरावर होणारी आक्रमणे हा मुद्दा त्यांनी किती गंभीरतेने हाताळला. धर्माबाबतची तत्परता , भगवंतावर असलेली श्रद्धा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची तळमळ ह्या सगळ्याचा सार म्हणजे भगवान श्री शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज...!
      राष्ट्राच्या पुनरुद्धारासाठी तसेच भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी शिवाजी- संभाजी रक्तगटाचे तरुणपिढी उत्पन्न होणे, अत्यंत आवश्यक आहे. विश्वाच्या संघर्षात हिंदुस्थानला जगाचा बाप म्हणून उभं राहायचं असेल तर एकच बीजमंत्र आहे. तो म्हणजे, शिवाजीमंत्र आणि संभाजीमंत्र. जो देश आपला इतिहास विसरतो, तो देश कधीच विश्वाच्या संघर्षात टिकू शकत नाही. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हाच मार्ग स्वीकारावा लागेल. हिंदू मध्ये पौरुषत्व, राष्ट्रीयत्व, स्वराज्याची रग-धग, साहस, शौर्य, चैतन्य निर्माण करणारा हा मार्ग आहे. ज्याप्रमाणे मुघलांनी मंदिर पाडून मशिदी उभ्या करून एक विषारी डंख भारतमातेच्या शरीरावर मारला. त्या डंखातील विष मारण्याचे काम श्री शिवछत्रपतीनी केले. म्हणजे मुघलांनी बांधलेल्या मशिदी पाडून पुनश्चः मंदिरे उभारली. आणि भारतमातेला हिंदवी स्वराज्याचा सूर्यप्रकाश दाखवला. म्हणूनच कवी भूषण म्हणतात, "सिवाजी न होते तो, सुन्नत होत सबकी ."

'संभाजीजाळ' तद्वत 'शिवसूर्यजाळ' |
निर्मुनी हिंदूहृदयी बनू म्लेंच्छकाळ |
हे हिंदूराष्ट्र करुनी यवनांतकांचे |
संकल्प पूर्ण करु या शिवभूपतींचे ||  


- संपादकीय 
Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)