*सार्थ श्रीतिलकसूर्यहृदय स्तोत्रम्*
श्री गणेशाय नम:।
श्री रामाय नम:।
श्री स्वातन्त्र्यदेवतायै नम:।
अथ ध्यानम्।
अम्बा भारतभूमिभालतिलकं राष्ट्रस्य उध्दारकम्।
सञ्जातो निजलोकभारहरणे यो भूतले कोङ्कणे।।
यो वास: अकरोत् प्रधाननगरे: कल्याणहेतो: जना:।
तं वन्दे प्रभु देशवीर द्विजवर् श्रीलोकमान्याभिदम्।।
अर्थ:
(ध्यानाचा श्लोक)
आई भारतभूमीच्या भालावरील तिलक (म्हणूनच शोभणारे), राष्ट्राचा उध्दार करणारे, जे आपल्या लोकांचा भार (गुलामगीरीचा) हरण्यासाठी भूतली कोंकणांत (रत्नागीरीत) जन्मले, ज्यांनी प्रधानांच्या (पेशव्यांची नगरी म्हणून नावाजलेल्या पुण्यात) नगरीत जनांचे कल्याण करण्यासाठी वास केला, त्या देशवीर श्रेष्ठ देशवीर लोकमान्यांना वन्दन असो.
(हा श्लोक शार्दुलविक्रिडीतांत आहे).
इति ध्यानम्।
नमस्ते केसरि: मूर्ते नमस्ते गणितप्रियम्।
नमस्ते धर्मविद् विद्वान् लोकमान्य नमोsस्तुते।।
अर्थ:
सिंहाचीच (जणू) मूर्ति असणार्या, गणित ज्यांना प्रिय होते अशा, धर्मज्ञाते असणारे विद्वान लोकमान्यांना नमस्कार असो.
************
नमस्ते राष्ट्रभक्ताय वेदान्ताध्ययनाय च।
नमस्ते मातृकार्यार्थे अर्पिताय तनु नीज।।
अर्थ:
राष्ट्रभक्ताला आणि वेदान्ताचे अध्ययन करणार्याला नमस्कार असो. (तसेच) मातृभुमीच्या कार्यासाठी स्वत:चे शरिर अर्पण करणार्याला नमस्कार असोत.
************
नमोस्तु बलवान् देही नमस्तेsस्तु जनप्रियम्।
य: प्राप्तवान् स्वकर्मेण उपाधि: 'लोकमान्य'धि:।।
अर्थ:
बलदंड देहयष्टीचे स्वामी, लोकांना प्रिय असलेल्यांना नमस्कार असोत. ज्यांनी स्वत:च्या कर्मांनी आपल्याला लोकमान्य ही उपाधी मिळवून घेतली.
**************
स्थापको डेक्कनसंस्थायां पञ्चाङ्गं रचिताय च।
खगोले कार्य कृतवान् य: तं नमामि महामुनिम्।।
अर्थ:
डेक्कनसंस्थेचे संस्थापक, पंचांगाचे (टिळक पंचांग) रचयिते ज्यांनी खगोलशास्त्रांत कार्य केले त्या महामुनींना नमस्कार असो.
******************
सहाय्यकश्च क्रान्तीणां नेमस्ताणां विरोधक:।
नमामि तेजमूर्तिश्च नमामि वेदविद् विभो।।
अर्थ:
क्रांतीचे (क्रांतीकारकांचे) सहाय्यक, मवाळांचे विरोधक, तेजाचीच जणू मूर्ति अशा वेदज्ञ विभूतीस नमस्कार असोत.
***************
पत्रेषु ताडितं येन आंग्ललोका: स्वभाषया।
नमामि केसरिकारं पुण्यपत्तन भूषणम्।।
अर्थ:
पत्रांत (वृत्तपत्रांत) ज्यांने इंग्रजजनांना आपल्या स्वभाषेतून सुनावले, त्या पुण्याचे भूषण असणार्या केसरीकर्त्यांना नमस्कार असोत.
**************
भाष्यकाराय वन्देहं गीताज्ञानं प्रकाशकम्।
नुतनर्थं प्रदत्तं यो: नमामि लोकमान्यपाद्।।
अर्थ:
गीतेचे ज्ञान प्रकाशित करणार्या टिकाकारांना वन्दन असो. ज्यांनी (गीतेचा) नवा अर्थ दिला, त्या लोकमान्यांच्या चरणांना नमस्कार असो.
***************
स्वत्ववृध्दि: तत्वप्रिति: कार्यतत्परप्रत्यया।
पठामि चरितं भगवन् स्वाभिमानस्य वृध्द्यया।।
अर्थ:
स्वत्वाची वाढ, तत्वाबद्दलचे प्रेम (तत्वपालन) कार्यतत्परतेच्या अनुभवासाठी, स्वाभिमानाच्या वाढीसाठी हे भगवन्, मी आपल्या चरित्राचे पठण करतो.
*************
अष्टश्लोका: पाठयित्वा लोकमान्यस्तुतिपरम्।
देशभक्ते तु प्राविण्यं सदैवं प्राप्त स: भवेत्।।
अर्थ:
लोकमान्यांची स्तुति करणार्या या आठ श्लोकांचा पाठ करणार्यास देशभक्तीत नेहमीच प्राविण्य मिळते.
नित्यनैमित्तिका पूजा स्तोत्रेण लोकमान्यया।
करोति तस्य मेधा: कुशाग्रो भवति सर्वदा।।
अर्थ:
(या) स्तोत्रानें लोकमान्यांची दररोज पूजा करणार्याची बुध्दी तिक्ष्ण (कुशाग्र) होईल.
**************
कौण्डिण्यगोत्रभृत् अस्मि कुलेषु कविमण्डने।
प्रार्थयामि भवान् दास: सुधांशू: सुधीर: सुतम्।।
अर्थ:
मी कौंडिण्य गोत्रात जन्मलेलो कविमंडन कुळातील सुधीर यांचा मुलगा सुधांशू आपला (लोकमान्यांचा) दास आपणांस प्रार्थना करित आहे.
इति श्री तिलकसूर्यहृदयस्तोत्रम् सम्पूर्णम्।।
(असे हे श्री तिलकसूर्यहृदय स्तोत्र पूर्ण झाले)
©सुधांशू सुधीर कविमंडन
(कृपया प्रस्तुत काव्य कविचे नांवासहच शेअर करावे)