• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

माता यशोधेला श्री कृष्णाने दाखवलेले ब्रह्मांडच !


                                        

मोहीम म्हणजे सुखाचा सागर..
मोहीम म्हणजे भारतमातेच्या उपासनेचा जागर...
मोहीम म्हणजे एका राष्ट्रऋषी योगी संताने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आई भवानीचा केलेला गजर..
मोहीम म्हणजे असंख्य पावलांनी गतकाळातील पावलांना घातलेलं आलिंगन....
मोहीम म्हणजे #हिंदवी #स्वराज्य उभं करताना ज्या शूर वीरांचे सह्याद्रीच्या मातीत रक्त सांडले त्या मातीला अंगाखांद्यावर कपाळी मिरवण्याचं सौभाग्य.

गतजन्म होता पावन । लाभले गुरुचे चरण ।।
                          भगवामय अंत:करण । गुरुजी केवळ तुम्हाकारण ।। ( कवी- गणेश पावले )

          मोहीम म्हणजे काय? हे जर सांगायला लागलो तर अनंत उपमा, लक्ष लक्ष शब्दपंक्ती अपुऱ्या पडतील. मोहीम लिहिण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा अनुभवन्यात जे काही  स्वर्गसुख आहे ते अवर्णनीयच..!
           गुरुजींच्या पदस्पर्शाचे सौभाग्य मोहिमेत लाभणे म्हणजे मोक्षप्राप्तीच.  विठुरायाचे चरण कुरवाळण्यात जितके सुख, तितकेच गुरुमाऊलीच्या चरणी लीन होण्यात सुख. मोहीम समारोपाच्या वेळी अनुभवलेले गुरुजींचे विराट रूप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माता यशोधेला श्री कृष्णाने दाखवलेले ब्रह्मांडच !
           तब्बेत बरी नसतानाही जावळीच्या दऱ्याखोऱ्यात गुरुजींचे न थकता चालणे, भर हिवाळ्यात ७ अंश से. च्या कडाक्याच्या थंडीतही पहाटे साडेचार वाजता उठून हजारो धारकऱ्यांसहित सूर्यनमस्कार, बैठका मारणारे गुरुजी पाहिले की जन्म धन्य होतो. विसावा - आराम विसरलेले. तहान-भुक विसरलेले ८४ वर्षांचे योगी, त्यागी, वैरागी जीवन जगणारे आदरणीय भिडे गुरुजी जवळून अनुभवले की अंगावर काटा उभा राहतो.
           शिवभक्तीने लोटपोट झालेली. अंगात श्री शिवसूर्यजाळाची आग चेतलेली, गतजन्माला आठवणारी, या जन्मात आपल्या जीवनाचे सोने करून घेणारी, श्री शिवाजी - संभाजी रक्तगटाची लाखो तरणीताट पोरं गुरुजींच्या एका हाकेने सह्याद्रीच्या कुशीत एकत्र येतात. गुरुजींनी ठरवून दिलेला दंडक आणि शिस्त पाळत या मोहिमेत सहभागी होतात हे सामान्य कार्य नाही.
            महाराष्ट्रासोबच दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, काश्मीर, उत्तराखंड येथून मोहिमेत सहभागी झालेले धारकरी गुरुजींच्या कार्याची, त्यांच्या श्री शिवशंभुवरील दृढ भक्तिची अनुभूती देतात. गुरुजी नेहमीच सांगतात की, शिवाजी संभाजी हाच बीजमंत्र हिंदुस्थानाला जगाचा बाप बनवू शकतो हेच सत्य आहे.
        आ.  श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहिम देव, देश आणि धर्माप्रति जागरूकता जागवणारी पवित्र गंगा आहे. जी सह्याद्रीच्या अंगाखाद्यावर उगम पावते.
         ज्या गंगेत सर्व धारकरी हिंदू म्हणूनच स्नान करतात. ती पवित्र गंगा प्राशन करतात. यात कोणीच कोणाला तुझी जात कोणती?  हे विचारत नाही. पुरोगाम्यांच्या विषारी दंशाला बळी पडलेला हिंदू समाज खडबडून जागा व्हावा. त्याला त्याच्या कुळाची आठवण व्हावी. समस्त जातींनी भेदाभेद विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन शिवाजी - संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी. जी पिढी अंतरबाह्य शत्रूचा नायनाट करेल; गुरुजींना असा महाराष्ट्र घडवायचाय जो भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल. देशाच्या सिमा ओलांडून घातक शत्रूच्या नरडीचा घोट घेईल. गुरुजींची ही इच्छा आई भवानी नक्कीच पूर्ण करील यात काहीच शंका नाही.


सुखाला त्वरें देऊनि सोडचिठ्ठी ।
धरूं मुंगीवत् राष्ट्रकार्यीं चिकाटी ।।
झिजू चंदनासारिखे रात्रदिन ।
जगूं हिंदुराष्ट्रास करण्या महान ।।
    
        गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभाग
Share:

केवळ ५ दिवस १०,०००हून अधिक डाऊनलोड....

(ह्या वेबसाईट विषयी जाणून घेतलंच पाहिजे)

( श्लोक मालिकेच्या अनावरण होतानाचा क्षण )

"तमाला गिळोनी जगा उजळावे"
       गेल्या कित्येक वर्षांची उत्कंठा असलेल्या 'आदरणीय गुरूजींच्या श्लोकांचे' ध्वनिमुद्रण, रायरेश्वराच्या साक्षीने संपुर्ण महाराष्ट्राला समर्पित करण्यात आले.गुरूजींचे श्लोक म्हणजे धारक-यांसाठी 'संजीवनीच.' देव-देश-धर्मासाठी जगण्याची प्रेरक उर्जा मिळविण्यासाठी श्लोकांच्या रुपाने साक्षात गुरूजींच जवळ असल्याचा भास आम्हा धारक-यांना होत असतो.खरं सागायचं म्हणजे,
अलंकार-वस्त्रे तनु भुषविती |
तनु प्राणशक्ति न ते वाढविती ||

      गुरूजींच्या या श्लोकास प्रमाण मानुन गुरूजींच्या या श्लोकमालिकेवर स्वर व संगित साज चढवलाय खरा पण त्याही पेक्षा गुरूजींची भावना,अंतकरणच त्या श्लोकांत उतरलय.आणी तेच आपल्यासाठी प्रेरक आहे.
               आम्हास सांगावयास आनंद होतोय की, *तमाला गिळोनि जगा उजळावे* ही श्लोक मालिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या पासुन केवळ *पाचच दिवसात दहा हजार जणांनी* ती उतरवुन घेतली.
            ती श्लोकमालिका एैकुन अनेकांचे फोन आले तर अनेकांनी संकेतस्थळावर सुद्धा प्रतिक्रिया पाठवली.विशेष म्हणजे जर्मनी,अमेरिका,इंग्लंड,चीन येथील सुद्धा आपल्या बांधवानी ती उतरवुन घेतली आहे.
          आपल्या सर्वांचा हा प्रयत्न असला पाहीजे की,हे श्लोक प्रात:समयी महाराष्ट्राच्या घरोघरी एेकले जावेत.आपण हे ध्वनिमुद्रण जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवुया.


www.shrishivpratishthan.org  हे संकेतस्थळ प्रत्येकाच्या मोबाईलवरती पोहचवुया.
राष्ट्रार्थ निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ🚩

Share:

माझी हि पहिलीच मोहीम

मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी.  "हो मी धारकरीच कारण की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मला धारकरी बनवलं आहे. ' श्रीप्रतापगड ते श्रीरायरेश्वर (मार्ग जावळी अरण्य)'  ही माझी पहिली मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे  श्रीरायरेश्वर,  आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला ते ठिकाण म्हणजे श्रीप्रतापगड.

     माझी हि पहिलीच मोहीम.  मोहीमेबद्दल सर्व धारकऱ्यांच्या तोंडून अनुभव  ऐकायला उत्सुक  होतोच पण जास्त उत्सुकता गुरुजींच्या  दर्शनाची होती.  लाखो धारकऱ्यांसोबत आणि गुरुजींसोबत मी ही पाच दिवसाची मोहीम करणार होतो आणि अनुभवनणार होतो. हा अनुभव अभूतपूर्व होता. कारण मी असे कधी अनुभवलेच नव्हते.
        पनवेल वरून आमची बस मुक्कामी उशिरा पोहोचल्यामूळे आम्ही पार गावात मुक्कामाला उशिरा पोहोचलो. शिदोरी उघडली. थोडेसे खाल्यावर असह्य थंडीत थकव्याने झोप लागली.
        सकाळी ४ च्या  सुमारास महाजन गुरुजींच्या मधुर आवाजातील 'उठा उठा सकळीक' असे बोल कानावर पडले.  पण थंडी मुळे पांघरूण अंगावरुन काढायची हिम्मत होत नव्हती.  पुन्हा महाजन गुरुजींच्या मधुर आवाजाने गीत सुरू झाले 'ही अनादी भरत भु ही अनादी संस्कृती'  हे गीताने गुरुजी सर्व धारकऱ्याना उठवत होते हे मी पहिल्यांदाच अनुभवले होते. आई जशी आपल्या मुलांना उठवते ती माया मी अनुभवली. सर्व धारकरी सूर्यनमस्कार व जोर बैठकासाठी सज्ज झाले होते. धारकरी आपले अंगावरचे कपडे काढून सूर्यनमस्कार मारत होते. एवढ्या थंडीत ही भिडे गुरुजी व धारकरी सूर्यनमस्कार व जोर बैठका मारत होते. मी ही सूर्यनमस्कार व बैठका मारले.  त्यानंतर गुरुजींच्या काही सूचना कानावर पडल्या आणि ध्वज निघाला. त्यामागे सर्व धारकरी चालू लागले. आम्हीही सर्व आवरून निघालो. बॅग खूपच वजनदार होती. परंतु वयाने १० ते १२ वर्षाच्या लहान-लहान धारकर्यांना आणि ८० च्या वर वय असलेल्या  भिडे गुरुजींना पहिल्यावर बॅगचे वजन जाणवले नाही.  आम्ही थोडं थांबत, थोडं आराम करत चालत होतो पण गुरुजी मात्र न थांबता मुक्कामा जवळ पोहोचले. आम्हाला  वाटेत अनेक ठिकाणाहून आलेले धारकरी भेटत. त्यांचा सोबत विचारपुस करून पुढे चालत होतो. दुपारचे जेवण खाऊन परत मार्गस्थ व्हायचो व मुक्कामी पोहोचायचो. त्या दिवशी मुक्कामी सु.ग.शेवडे  गुरुजींचे हिंदू धर्म व साहित्य या विषयावर व्याखान झाले.
           गुरुजींनी सर्व धारकऱ्याना श्रीरायरेश्वरला जाऊन शपथ घेण्याचा आदेश दिला होता. तो आदेश असा होता की आपण यापुढे कोणतेच व्यसन करणार नाही अशी शपथ आपण श्रीरायरेश्वरावर घेणार आहोत. सर्व तरुण मंडळी श्रीशिवजी व श्रीसंभाजी रक्तगटाची व्हावीत यासाठीच चाललेला हा खटाटोप. त्यासाठीची गुरुजींची ही तळमळ....!
      पुन्हा सकाळी सूर्यनमस्कार व जोर बैठका असा व्यायाम झाला.  मिलिंद दादा तनवडे यांच्या आवाजात
एक मात्र चिंतन आता एकची विचार । भाग्य पूर्ण होईल केव्हा हिंदुभूमी थोर । हे गीत मी ओडीओ स्वरूपात  ऐकलं होत पण प्रत्यक्षात ऐकल्यावर अंगावर काटा आला.  मोहिमेत चालत असताना राष्ट्रभक्तीधारा मधील गीत, श्र्लोक, पद्य घेत असताना वेगळीच ऊर्जा मिळत होती. मोहिमेत एका ठिकाणी श्री संदीपराव (दादा) भिंगुर्डे  यांनी मोहीम काय असते ते सांगितले,  श्री शिवछत्रपतीच्या मोहिमा त्यांचे युद्धतंत्र आणि युद्धतंत्राचा वापर जगातील मोठं मोठे देश व त्याचे लष्कर सैन्य शिवयुद्धनितीचा कशा प्रकारे वापर करत असे याबद्दल उत्तम  माहिती दिली. तिसऱ्या दिवशी मुक्कामी श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी गोमातेचे महत्त्व सांगितले. फार छान वाटले त्याना ऐकल्यावर माझ्या आयुष्यात गोमातेचे महत्व आजून वाढले. आ. भिडे गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवण्याचा योग मला लाभला.  मोहिमेला आल्याचे मला फळ भेटले. गुरुजींचे दर्शन घेऊन मी तृप्त झालो. त्या दिवशी गुरुजींचे दर्शन झाले, आनंदाने रात्री झोप शांत लागली आणि थंडी पण जाणवली नाही.
     
   चौथ्या दिवशी मुक्कम श्री रायरेश्वराच्या पायथ्याशी होता गुरूजीनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आणि म्हणाले 'उठा , मार्गस्थ व्हा ! असे म्हणताच सर्व धारकरी उठले आणि श्रीरायरेश्वरकडे चाल करु लागले. आज आम्ही ध्वजा सोबतच चालू लागलो.  वाट ऐकेरी असल्याने खूप गर्दी वाढली आणि ध्वज पुढे निघून गेला. डोंगर उतरल्यावर दुपारच्या जेवणासाठी एका गावात धारकऱ्यासाठी भंडारा होता. जेवण इतके छान झाले होती की  मी तर पोट भरून जेवण केले आणि मला ते जेवण खूप आवडले. जेवण करून पुढे जाणार इतकेत पुन्हा गुरुजींचे दर्शन मला झाले. नंतर आम्ही आमच्या सोबतच्या धारकऱ्याची वाट पाहू लागलो पण खूप वेळ झालं तरी कोणी दिसेणा म्हणून आम्ही पुन्हा चालायला लागलो रायरेश्वरच्या दिशेने चालताना आम्हाला सांगलीचे ४ धारकरी भेटले त्याच्या सोबत बोलत त्याचे विचार ऐकत आम्ही रायरेश्वरच्या दिशेने चाललो होतो.
रायरेश्वरच्या पायथ्याशी आजून ३-४ सांगलीचे धारकरी भेटले. त्यांच्या सोबत रायरेश्वरवर जाण्याचा प्रयत्न केला पण गर्दी खूप असल्याने वर जाणे झाले नाही मग आम्ही पायथ्याशीच मुक्काम करायचे ठरवले. आपली शिदोरी सोडली थोडी फार खाऊन झोपण्याची तयारी केली व झोपी गेलो. 
         पाचवा दिवस समारोपाचा दिवस समारोपाच्या ठिकाणी पोहोचताच तेथे पनवेलचे बाकीचे धारकरी भेटले मग आम्ही डोक्यावर फेटे बांधून पनवेलच्या बाकी धारकाऱ्यांसोबत थांबलो, संदीपदादा जायगुडे यांच्या आवाजातील लववेना हे शीर माते हे पद्य त्यातले एकेक शब्द एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं.  थोड्या वेळाने समारोपाचा कार्यक्रम सुरू झाला

         गुरुजींनी समारोपाच्या भाषणात सांगितले; "आपली धरती,आपली माती आपली संस्कृती, आपला धर्म, आपले पूर्वज आपल्या परंपरा, आपले आदर्श, आपला इतिहास, याबद्दल आपल्या अंतःकरणात अति अति अति प्रमाणापेक्षा तीव्र अभिमान असला पाहिजे तरच त्या व्यक्ती मध्ये राष्ट्रीयत्व येईल. राष्टीयत्वाची भूक हिंदूंच्या तांबडया-पांढऱ्या पेशीत, डाव्या-उजव्या काळजात,लहान-मोठ्या मेंदूत रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवनं, बिंबवणे आणि निर्माण करणे हे खरं देशाला राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती या गडकोट मोहिमांमध्ये आहे.  ३५० वर्षांपूर्वी श्रीशिवछत्रपतींनी हे काम केलंय ज्यामुळे आज आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत."
         शेवटी इतिहास सांगताना गुरुजींच्या डोळ्यांत आलेलं पाणी आणि आम्ही ऐकत असताना आमच्या अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले गुरुजी जे सांगत होते ते चित्र समोर दिसत होतं सर्जेराव जेधे त्यांचा १८-१९ वर्षाचा मुलगा नागोजी जेधे लढाईत धारतीर्थ पडले हे जेव्हा सर्जेराव जेध्याना कळलं तर ते आले त्यांच्या मुलाच्या अस्ति आपल्या एका मावळ्यासोबत पाठवले आणि ते महाराजांसोबत लढायला मोहिमेत सामील झाले. काय ती निष्ठा, काय तो त्याग. भारत मातेचा विस्कळीत झालेला संसार मार्गी लावण्यासाठी आशा अनेक मावळ्यांनी आपले रक्त या मातीत सांडले आहे आणि आपण मात्र एशो-आरामात आपलं जीवन जगत आहोत, पण आता पुढचं जीवन आपलं घर-दार सांभाळून देव देश आणि धर्मासाठीच देणार असा निर्धार केला आहे. गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे हिंदू धर्मासाठी श्रीशंभूछत्रपतींनी दिलेलं बलिदान आपण विसरता कामा नये आपण जेवढया उत्साहात शिवजयंती साजरी करतो तेव्हढ्याच निष्ठेने शंभूराजे धर्मवीर बलिदान मास पळायचं आहे  जिथं सूर्य उगवतो अशा प्रत्येक गावात ते झालं पाहिजे. आणि त्याचा प्रचार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. उभा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याची उपासना, म्हणजे हिंदुराष्टाची उपासना म्हणून आपण महाराष्ट्र संभाजी महाराजांचं धर्मवीर बलिदान मास पाळणारा समाज  तयार करण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे.




शिवबासंभाजी बीजमंत्र पुरुषार्थदाता ।
गांढयाळ वृत्ती अवती क्षणी भस्मकता ।
हा बीजमंत्र जरी चित्ती क्षणी धरेल कोणी ।
येऊन राहतील उभय उरी खडगपणी ।।


          या मोहिमेतुन भरपूर काही शिकायला मिळालं त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करता येईल याकडे आमचं लक्ष राहील

भगव्या ध्वजास्तव लढू रणी शत्रू मारू ।
झुंझोनी लाख समरे आम्ही धर्म तारू ।।
खाली न खड्ग कधींही कधीं ठेवनार ।
शिवपुत्र पाईक आम्ही जग जिंकणार ।।


श्री मिथुनराव बळीराम म्हात्रे, धारकरी 
पारगाव पनवेल विभाग
Share:

आशीर्वाद देण्यापेक्षा हिंदवी स्वराज्यातील गड मिळवणे हे त्यांना महत्वाचे वाटले.

देव देश धर्मामध्ये झोकून काम करणारी व्यक्ती हि वेगळीच असतात. त्यांचा प्रवाह हा इतिहासापासून वर्तमान नव्हे तर भविष्यकाळापर्यंत वाहतच असतो. संसार-प्रपंचाचा त्याग करून अखंड हिंदू धर्म टिकवणारी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीने पाहिलीच नव्हे तर हि माती त्यांच्या रक्ताने पावन झाली. या मातीचे सौख्य राखणारा राजा व त्याची प्रजा जगाने ३५० वर्षानंतर पाहिलाच नाही. तो राजा म्हणजे साक्षत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. जगाने एकमेव असे छत्रपती पाहिले ज्यांच्या एका शब्दा खातीर त्यांच्या मावळ्यांनी अखंड हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण त्यागले. घरा-दाराचा त्याग करून या हिंदवी स्वराज्याचा पाया या मावळ्यांनी भक्कम केला. शिवछत्रपतींचा हर एक मावळा भावनेपेक्षा कर्तव्याला नेहमी जास्त महत्व देतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे.
  सुभेदार तानाजी मालुसरे  हे मुळचे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावाचे. लहानपणापासून शिवरायांसोबत असल्याने ते शिवरायंचे सवंगडी होतेच पण त्याही पेक्षा  विश्वसनीय मावळा होते. अफजल खानच्या सैन्यावर तुटून पाडण्यामध्ये इतर मावळ्यामध्ये तानाजी मालुसरे हि होते. स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचा हि हात होता. महाराजांनी जेव्हा कोकण प्रांतात संगमेश्वर काबीज केले तेव्हा तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. ज्यावेळी सुर्वे संगमेश्वर चालून आले तेव्हा शत्रू डोळ्यासमोर असताना पिलाजी सारखे पळून जाणे त्यांनी स्वीकारले नाही. अश्या पराक्रमामुळेच रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी त्यांच्यावर सोपविली. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. त्यानंतर त्यांचे नाव स्मरणात राहिले ते एका प्रसंगाने. घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असताना त्याला आशीर्वाद देण्यापेक्षा हिंदवी स्वराज्यातील गड मिळवणे हे त्यांना महत्वाचे वाटले. कारण त्यांना ठावूक होते, जर हे लग्न आधी केले तर भविष्यात हिंदू चा निकाह होईल. हा हिंदू रक्षण्यासाठी इतका मोठा त्याग हा शिवरायांच्या पदरीच पाहायला मिळतो.
         आपला मुलगा रायबा याचे लग्न ठरवून ऐन लग्न काही दिवसावर असताना पत्रिका देयला दरबारी ते पोहचले. आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय उद्गारले, “ आलो असतो पण...”
या ‘पण’ शब्दाला जागून जिजाऊच्या इच्छा आकांक्षापोटी  जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.  “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे” असे धाडस केवळ आणि केवळ देव देश धर्मासाठी वाहिलेली लोकच करु शकतात. त्याग, समर्पण आणि स्वामीनिष्ठा या सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे सुभेदारसाहेबांचे हे शब्द!

या युद्धात तानाजीराव पडले आणि मावळे सैरावैरा पळू लागले. त्यावेळी तानाजीरावांचे कनिष्ठ बंधू सुर्याजीराव यांनी माघारी पळणाऱ्या मावळ्यांना उद्देशून म्हटले, "दोर कापलेले आहेत, कड्यावरून पडून मरण्यापेक्षा इथं लढून मरा." 

आपला सख्खा ज्येष्ठ बंधू काही क्षणांपूर्वीच रणांगणात धारातीर्थी पडलेला असताना सुर्याजीरावांनी उच्चारलेले हे शब्द म्हणजे टोकाच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि धैर्याचे प्रकटीकरण आहे.

तानाजीराव पडले पण सिंहगड स्वराज्यात आला. प्रसंगी प्राणांची बाजी लावून सुभेदारांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला. महाराज तातडीने गडावर आले पण गड जिंकल्याचा त्यांचा आनंद क्षणार्धात मावळला कारण तानाजीरावांच्या बलिदानाचे वृत्त त्यांना समजले. त्यावर महाराज बोलले, "गड आला पण माझा सिंह गेला."

"आधी लगीन कोंढाण्याचं, मंग माझ्या रायबाचं."

"दोर कापलेले आहेत."

आणि "गड आला पण माझा सिंह गेला." 

मराठी भाषेमध्ये वैशिष्ठय प्राप्त झालेले हे तीन उद्गार तानाजीरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवतील आणि येणाऱ्या मराठी भाषिक पिढ्यांना राष्ट्रभक्ती, पराक्रम त्याग आणि समर्पण याचा संदेश देत राहतील यात शंका नाही.

आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला।
मुलाचे त्यजून धाव घेई गडाला।
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला।
मराठा म्हणावे अशा वाघराला।।
- आ. श्री संभाजीराव भिडे गुरुजी (श्लोक)



(श्री पराशरदादा मोने (पुणे ) यांच्या लेखातील काहीसा भाग घेण्यात आला आहे. ) 






-- 

Share:

कर्तव्य म्हणून नाही पण जाणीव म्हणून या...

"बापाचं नातं भीतीशी असतं,
आणि आईचं वेदनेशी.. असं म्हणतात.. 
मला जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा जगण्यासाठी मी भीक मागायचे, आणि आज सुद्धा पदर पसरून सगळ्यांकडे भीक मागते. फरक फक्त एवढाच आहे की, पूर्वी स्वतःसाठी भीक मागत होते आणि आता माझ्या २००० मुलांसाठी"
- सिंधुताई सपकाळ ( माई )
अशा या माईंची खडतर उभारणी व्याख्यानपर मुलाखतीत आपल्या समोर घेऊन येत आहोत, सोहळा इव्हेंट्स प्रस्तुत माई - एक कल्पवृक्षाची सावली


दिनांक - १० फेब्रुवारी २०१८ शनिवार 
वेळ - सायं ६ वा. 
स्थळ -  ठाणे 
मुलाखतकर्त्या - किन्नरी जाधव ( लोकसत्ता पत्रकार ) 
सन्माननिधी - ३०० रुपये मात्र 
(विद्यार्थ्यांकरिता ५०% सवलत)
⭕ सन्माननिधी स्वरूपातील रक्कम ही सिंधुताई यांच्या 'ममता' आश्रमाला देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी तसेच सन्मानपत्रिकेसाठी संपर्क साधा -

ऋषिकेश मुळे ९७७३५८९७३७
ज्योती आपटे ८१०८८४६०५४
प्रशांत कापडी ९७६३०९५४६०
पूर्वा साडविलकर ८४५१०९०२४७
अपूर्वा आपटे ९७६९८७८५०३
Share:

शक्ती उपासकांचे पुण्यस्मरण

(समर्थ रामदास स्वामी )
(सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे )
आज माघ कृ. नवमी म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी नवमी तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी.  समर्थांनी आपल्या हयातीत राष्ट्र व धर्म संरक्षणासाठी तरून पिढी शत्रूविरोधी लढण्यास  सक्षम बनवण्यासाठी व्यायामचे महत्व ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ११००  च्या वर जागोजागी मठ तसेच व्यायाम शाळा काढल्या. सुभेदार  नरवीर तानाजी मालुसरे शत्रू विरोधी  लढता लढता धारातीर्थ पडले. त्यांचा देह हा जिद्द तसेच इच्छा शक्ती युक्त असा बलवान होता. ह्या दोन महापुरुषांची शिकवण व आठवण म्हणून आज सांगली मधील  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टा शहर यांचेवतीने जोर मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आ. संभाजीराव भिडे गुरुजी हे नेहमी तरुणांना व्यायाम व कुस्तीचे महत्व सांगतातच नव्हे तर आचरणात आणतात.
(स्पर्धेतील क्षण चित्रे )


श्री समर्थ रामदास स्वामी व श्री नरवीर तानाजी मालुसरे हे शक्तीचे उपासक होते म्हणूनच आज त्यांचे पुण्यस्मरण म्हणून आ. संभाजीराव भिडे गुरुजींच्या धारकर्यांनी त्यांच्या शिकवणीला अनुसरून या स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धेत १०० च्या वर युवकांनी सहभाग घेतला. 


स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजवर्धन सुर्यवंशी (१,२१३ जोर) पटकवला तर , द्वितीय क्रमांक प्रशांत जाधव (१,०२५ जोर), तृतीय क्रमांक रोहित भानुसे (१,०१६ जोर) यांनी मिळवला. 
 प्रथम ३ क्रमांकाना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन , तसेच १०० च्या वर जोर मारणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  तसेच लहान गटाने देखील सहभाग दर्शवला.  पहिल्या ३ क्रमांकाना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व १०० पेक्षा जास्त जोर मारणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.


Share:

अंतरस्थिच्या खुणा | अंतर्निष्ठ जाणती ||

(शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ||
कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा | नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ||)

 प्रबल यवन झाले होते
वंदय ह्या महाराष्ट्रात 
आंक्रदत होता धर्म,
परसत्तेच्या दारांत
शौर्य धैर्य रुपले होते,
पर सेवेच्या पंकात
ऐशा वेळी कल्याणी,धीराची केवळ खाणी 
श्री समर्थ सदगुरुवाणी 
दुमदुमली हो सर्वत्र...
जय जय रघुवीर समर्थ...||
      
         ३५० वर्षा आधी वंदनीय अश्या महाराष्ट्रात परसत्तेने धुमाकुळ घातला होता.महाराष्ट्र हा परसत्तेच्या मुठित रक्ताळलेला होता. अश्या महाराष्ट्राला परसत्तेच्या मुठीतून मोकळ करण्यासाठी एका युगपुरुष-साधुपुरुषाने जन्म घेतला. त्यांचा जन्म देशाच्या कल्याणासाठी झाला.त्यांचे सुत्रच होते देशाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ |
          श्री सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी म्हणतात कि,

पंध्राशे शक तीस रामनवमी माध्यान्हीं जे पातले ।
श्रीरामा नच भिन्न मी म्हणूनी की त्याची दिनी जन्मले ।
श्रीनारायण नाम सार्थची असे जाणोनी हो ठेविले ।
विश्वोद्धारी विभू श्री समर्थ जगती त्याची नमी पाऊले ।।

           शके १५३० साली रामनवमीच्या दिवशी देशाचे सार्थक करण्यासाठि विश्वाचा उद्धार करण्यासाठी समर्थ पाऊले जमिनीवर अवतरली. समर्थ अन् श्री राम हे वेगळे नव्हेच...! मग असे हे समर्थ कोण? तर साक्षात श्रीरामाचा दास रामदास....
श्री समर्थांचा जन्म जांब या गावी झाला. समर्थांचे संपुर्ण नाव नारायण सुर्याजीपंत ठोसर. पुर्वजांनी स्थापन केलेल्या राममंदिरात समर्थांचे बालपणी चे दिवस जात. विश्रामांसाठि येणाऱ्या साधुंकडुन समर्थ यवनांच्या आक्रमणाच्या बातम्या ऐकत व त्यांच्या मनात प्रचंड देशाबद्दल चिंता सतावत. वयाच्या सहाव्या वर्षापासुन जगाची तळमळ त्यांच्या मनी होती. चिंता करितो विश्वाची असे म्हणणारे समर्थ फक्त सहा वर्षाचे होते. समर्थ म्हणायचे चिंतेने उर फाटतो. असा हा बालक खरचं जगाच्या कल्याणाचा विचार लहानपणापासुनच करत. लहानपणीच जग हे नश्वर आहे याची जाणीव झाली. हनुमंत स्वामी आणि श्रीरामांचे नाव अखंड मुखी. बालपणीच अश्या समर्थांना श्रीरामांनी दर्शन दिले. व अनुग्रह दिला.
(मोगर्यांच्या फुलांनी सजवलेली श्री समर्थ समाधी) 
         आपल्या जन्माचा त्रास हा सोबतीला होऊ नये म्हणुन बारा वर्षाचे असताना सावधान हा शब्द ऐकुन विवाह मंडपातुन पलायन केले. तिथुन देशकार्यासाठि आणि धर्मकार्यासाठी जीवनदान दिले. समर्थांनी १२ वर्ष गोदावरी नदीकाठी तपश्वर्या केली. त्यानंतर टाकळी येथे शहाजीराजांना त्यांचा पुत्र शिवाजी महाराजांस भारत भ्रमंती झाल्यावर शिष्य स्विकारण्याचे वचन दिले व भारत भ्रमंती सुरु केली.
    समर्थांना भारत भ्रमंती करताना अनेक अनुभव आले त्यापैकी एक अनुभव म्हणजे शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग हे आपल्या सैन्यासह हिमालयात श्रीनगरला भेटले. ते धर्मगुरु असुनहि १००० फौज आणि कंबरेला तलवार. यावर समर्थ बोलतात कि ,"क्यु माया नहि त्येजी ?" त्यावर धर्मगुरु उत्तरतात कि, त्येजी पर अदंरसे..तो फिर ये दो तलवार किसलिये हरगोंविद म्हणतात कि एक मिरी के लिए एक पिरी के लिए म्हणजे स्त्री अन् धर्म सरंक्षणासाठि. मग समर्थ विचारतात ये फौजफाटा किसलिए? तेव्हा हरगोविंदसिंग छान उत्तर देतात आगे चलकर तुम्हे भी ये हि करना होगा क्योंकी सशस्त्र रखे बिना हिंदुस्तान आजाद् नहि होगा..! 
     सशस्त्र क्रांतीचा विचार तेव्हा पासुन त्यांच्या मनी आला. त्यामुळे त्यांनी नेहमी प्रबळ चतुर अश्या सैन्य बाळगण्याचा शिवाजीराजांना संदेश दिला आहे. शिवाजी महाराजांच्या विजयाचा विजय हा समर्थांचा आहे. तुमचे देसी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाहि घेतले. या पत्रातील वाक्यानंतर चाफळला शिवसमर्थ भेट घडली. अन् खऱ्या हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली.
    समर्थांनी अखंड जीवनात  राजकारणाला भर दिला. राजकारण हा प्रथम शब्द समर्थांचा.

मुख्य ते हरिकथा निरुपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे ते सावधपण |
सर्वांविषयी ||

 राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे तर राजा करण्यासाठीचे कारण होय. 'राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे' हे सुत्र नेहमी महाराजांच्या अंगी समर्थांनी रुजवले.आणि याच शिकवणीतुन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले
   समर्थांचे शिष्य परंपरेचे कौतुक करावे तेव्हढे कमीच. आ. संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात कि,

(श्री समर्थ शिष्य कल्याणस्वामी )
 गुरुं शोधतां शोधतां ऊर फाटे।
मना सारखा अन्य आहे न कोठें।।
मनाच्या तळी ठान मांडून राहूं।
भवाचा निधी पार लंगून जाऊं।।

असा गुरु जर शिष्याला लाभला तर जिवनाचे सार्थक नक्कीच होईल. समर्थांनी देह ठेवण्याच्या सहा वर्ष आधी सज्जनगडावर वास्तव्य केले. समर्थ एक उत्तम उत्कृष्ट लेखक हि होते. शिवरायांची जितकी छान स्तुती पत्राद्वारे समर्थांनी केली आहे तितकी स्तुती कोणाला करणे शक्य नाही. कारण ती स्तुती केवळ स्तुती नसून त्या प्रत्येक वाक्यात दुसर्याला उपदेश आहे. लेखनात स्तुती नक्कीच होती पण गर्व येऊ नये यासाठी देणे इश्वराचे यासारखे पत्र हि लिहिले आहेत. दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवथरघळीला लिहिलेला समर्थांचा ग्रंथ ग्रंथराज श्रीमत दासबोध. आजच्या युगातील मानवी देहाच्या जन्मापासुन मृत्युपर्यतच्या जीवन चालवण्याचे सुत्र समर्थांनी त्याकाळी लिहुन ठेवला. हजारो पेक्षा जास्त मारुतीरायांची मठ व व्यायामशाळा समर्थांनी स्थापन केली त्यामागे हि परमार्थ तसेच देश कल्याण हाच हेतु होता. आरत्या, श्लोक, करुणाष्टके आज हि त्यातील प्रत्येक ओवी मंत्रमुग्ध करतात.
   आपल्या आयुष्यात त्यांनी आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थ विवेका || हा उपदेश दिला तसेच यासाठि अखंड उपासनेची जोड ठेवली त्यासाठि समर्थ म्हणतात,
  विवेक पहाणे बरा, खरा विचार तो करा |
  उपासकांसी सुचना उपासना उपासना ||
  समर्थ म्हणजे जिवनाची अनुभुती साक्षात परब्रम्हा ! त्यांच्या बद्दल अजुन काय लिहावे...त्यांच्या ओवीत सांगायचे झाले तर इतकंच सांगेन...
  म्हणौन सदगुरु वर्णवेना |
   हे गे हेचि माझी वर्णना |
   अंतरस्थिच्या खुणा |
   अंतर्निष्ठ जाणती ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

- नेहा जाधव.
Share:

मी कुणी नाहीच; फक्त.....

(श्री क्षेत्र सज्जनगड वर स्थित समर्थ  श्री रामदास स्वामी समाधी ) 




न पवसि मजसि का रे, म्या तुझें काय केले?


किती सुंदर कल्पना आहे हो ही ! स्वामी-भृत्य संबंधांचें अतिशय प्रेमळ उदाहरण ! डोळ्यांतून पाणी आणणारे, भावूक करणारे.
   बारा वर्षांची घनघोर तपश्चर्या, पुरश्चरण ! त्यानंतर बारा वर्षे तीर्थाटन ! प्रभु रामचन्द्रांचा हा परमभक्त, "मी कुणी नाहीच; फक्त रामाचा दास, रामदास" असे अभिमानानें मिरणवणारा हा समर्थ सद्गुरू, जीवनभराच्या या दगदगीनें दमून गेला, थकला होता. आता तर त्याच्या लाडक्या व "कित्येक दुष्ट संहारणार्या" प्रिय शिष्यानें गुरूमाऊलीच्या नित्य निवासाकरिता सज्जनदुर्ग दिला होता, कशाची म्हणून कमी नाही, पण तो तर विरक्तच ना ! त्यास काय करायच्या या सुखलोलूपतेच्या गरजा ?
असो..! वय झाले होते आता. युवावस्थेत सुप्तरूपात असणार्या कफानें आता चांगलेच डोके वर काढले. त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. तो थांबावा म्हणून नाना उपाय झाले, विडा खाण्याचा सल्ला वैद्यांनी दिला. ते बिचारे लेकरू कल्याण; रोज उर्वशीचे पाणी कावडीनें आणत असे, माऊलीस वाहते जल हवे म्हणून ! पण कफाची वेथा कमी होइना.
एके दिवशी कहरच झाला, दुखणे पराकोटीस गेले, त्रास वाढू लागला. आता औषधानेही आराम पडेना, काय करायचे, शिष्य मंडळी चिंतातूर झाली. आका-वेणांच्या तर डोळ्यांतील पाणी खळेना.
आणि एकदम काय झाले कोण जाणें, समर्थ स्वामी उठले, व तडक चालत गडावरीसल धाब्याच्या महारूद्र हनुमंतरायांच्या मंदिरात आलेे. एकटक मारूतीरायाकडे पाहू लागले. युवावस्थेतील नमस्कारांनी पिळदार बनवलेला तो देह, ती जबर शरिरयष्टी खंगू लागली होती, आणि ते तेजस्वी पाणीदार डोळे महारूद्राशी संवाद साधत होते.
" आंजनेया, कपिवर्या, महारूद्रा, का रे असा अंत पाहतोस ? कफास उतार नाही पडत, हा काय हौशीने लावून घेतलाय् का मी ? गुरूमाऊली प्रभु रामचन्द्र व तुझेंच कार्य केले ना ? धर्मकार्यच केले ना ? देशजागृती करून शिवबास हातभार लावला ना, त्या दगदगीनेच हे दुखणे जडले रे ! मला माझी काळजी नाही वाटत, पण माझी बाळं बघ, कल्याण एवढेसे तोंड करून बसलाय, आका-वेणा रडताहेत मला त्यांचेकडे पाहवत नाही रे ! सर्व औषधे सुरूयेत, पण उतार नाही ! हे रामहृदयधना, शिवशंभोच्या रूद्रा, हा कफ उतरव रे !.."
अशी प्रार्थना केली व नकळत एक करूणाष्टक स्फुरू लागले, समर्थ गुरूमहाराज ते करूणेनें गाऊ लागले.

फणीवर उठविला, वेग अद्भूत केला।
त्रिभुवनजलोकी किर्तीचा घोष गेला।।
रघुपति उपकारें दाटले सर्व भारे।
परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे।।


"लक्ष्मणास उठविणार्या, मनोजवं वेगवान् मारूतीराया, माझ्या कफास उतार पाड रे, तुझ्यावीना मला कोण आहे? तुला ठावूक आहे ना, प्रभु रामचन्द्रांनी माझी काळजी घ्यावयास तुला नियुक्त केले आहे ! मला तुला निरविले आहे हे आठवतेय् ना, मग माझ्याकडे का लक्ष देत नाहीस रे??"

तुजवीण मज पाहे, पाहता कोण आहे।
म्हणवूनीं मन माझें रे तुझी वास पाहे।।
मज तुज निरविले, पाहीजे आठविले।
सकळीक नीजदासांलागी सांभाळविले।।


एवढी प्रार्थना केली, पण मारूतीरायांस आपल्या या ब्रह्मचर्य शिरोमणी अंशाची अजून गंमत करावीशी वाटत असावी, एवढे झाले तरी उतार पडेना !
आता समर्थ जरासे रागावले, अर्थात् पुत्र पित्यावर जसा लटका रागावतो तसा. काहीसे रागातच समर्थ म्हणाले,
"कपिंद्रा, करूणेचा मेघ तुझ्या अंतरीं वास करतो ना ! मग तुला माझी कणव का रे येत नाही? का चित्त पाषाणवत् कठोर केलेस रे? मला, या तुझ्या भक्ताला पावत नाहीस, मी तुझे काय केले आहे रे? (मी तुझे काय घोडे मारले आहे?)
जलधर करूणेचा अंतरामाजी राहे।
तरीं तुज करूणा रे का न ये सांग पाहे।।
कठीण हृदय जाले, काय कारूण्य गेले।
न पवसि मजसि का रें, म्या तुझें काय केले??।।


आता मात्र मारूतीराय गहीवरले, दाटून आले त्यांना ! नको माझ्या बाळाची ही अवस्था, नको त्यास ही दगदग! किती काकूळतीस आला आहे ! मनोमन मारूतीराय हसले, आणि-आणि-आणि-
पुढल्याच क्षणी घसा स्वच्छ झाला की मंडळी ! कफ कुठल्या कुठे पळून गेला ! एकदम पुर्वीसारखी निरोगी न तेजस्वी देहयष्टी बनली! अगदी निरोगी! सगळ्यांना आनंदीआनंद झाला! उध्दव कल्याण आका वेणा आनंदाश्रू ढाळू लागले ! समर्थ त्याच पूर्वीच्या भारदस्त आवाजात गरजले-
महारूद्र हनुमान की जय ||
जय जय रघुवीर समर्थ ||


मग मनांतच हितगुज सुरू झाले महारूद्रांशी. "मारूतीराया, अखेर करूणा आलीच ना तुज माझी??


बहुतचीं करूणा या लोटली देवराया।
सहजची कफ गेला, जाहली वज्रकाया।।
परम सुख विळासे, तेवीं दासानुदासे।
पवनतनुज तोषें वंदिला रामदासे।।


धन्य ते मारूतीराय, धन्य ते रामराय धन्य ते कल्याणादि शिष्यगण, धन्य तो सज्जनगड आणि धन्य ती तुमची माझी परात्पर सद्गुरूमाऊली, धन्य ती ब्रह्मचर्य व भक्तीभावाची अनवरत गंगा!! 


|| जय जय रघुवीर समर्थ ||
लेखक - सुधांशू सुधीर कविमंडन
Share:

मोहीम मांडली मोठी....

नमस्कार,
  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजित धारातिर्थ गडकोट मोहिम नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली आहे. यंदाची मोहिम हि श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर(मार्गे जावळी अरण्य) अशी होती. हि मोहिम केवळ गड-किल्ले फिरणे नसुन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच धारातिर्थ मावळ्यांच्या रक्ताने पवित्र पावलेल्या मातीत देव-देश-धर्मासाठी जगण्या-मरण्याचे धडे घेणारा मार्ग आहे. या मोहिमेत अनेकांना वेगवेगळे अनुभव येतात. धारकरयांना  जगण्याचा दृष्टिकोन बदलतात, देश धर्मा ची व्याख्या  उमजते, वाईट संगती तर  व्यसन सुटतात, काहिंना जगण्याचा हेतु स्पष्ट होतो. हे असे अनेक अनुभव उराशी घेऊन आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजींचा धारकरी देव-देश-धर्मासाठी जगत असतात. हे अनुभव इतरांना हि समजावे. इतरांना हि त्यातुन देव-देश-धर्माप्रती प्रेम, आस्था, कर्तव्य जागृत व्हावी. म्हणुन हिंदु वार्ता धारकरयांसाठी एक सदर घेऊन येत आहे. या सदरचे नाव आहे, 'मोहीम मांडली मोठी'
दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ हा दिवस  ‎नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीचा आहे तसेच १३ फेब्रुवारी २०१८ या दिवशी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी ६ मावळ्यांसह आत्मयज्ञ केला. त्यांच्या बलिदानाचे पुण्यस्मरण म्हणुन आम्हि हा सदर दोन आठवडे सुरु केला आहे. या अंतर्गत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकर्यांनी आपल्याला आलेल्या या मोहिमेच्या अनुभवाचे वर्णन आपल्या शब्दात करायचे आहे. तुमचा हा लेख काहींचे मन परिवर्तन करणारा ठरेल. त्यामुळे लेख पाठवुन आम्हाला सहकार्य करा.
 धारातिर्थ मावळ्यांचा आदर्श आणि पुण्यस्मरण म्हणुन आपला अनुभव आमच्या पर्यंत पोहचवा. जेणे करुण इतर शिवपाईकांना पुढच्या वर्षी मोहिमेत येण्याची आवड निर्माण होईल. धारातिर्थ मोहिमेत सहभाग वाढवण्याचा हिंदु वार्ताचा हा छोटासा प्रयत्न राहिल.

टिप-

* अनुभव आम्हाला हिंदु वार्ताच्या ई-पत्त्यावर पाठवा.

* ‎अनुभव आम्हि तुमच्या नावानिशी प्रसारित करु.

*तुमचा अनुभव तुम्हि तुमच्या शब्दात मांडा.

*शुद्धलेखनाची अथवा प्रमाण भाषेची अट नाही.

*शब्द मर्यादा किमान १०० ते अमर्याद.

*अनुभवासोबत तुमचा फोटो, नाव, पत्ता, व्यवसाय, विभाग,संपर्क पाठवणे. 

*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मध्ये किती वर्ष कार्यरत आहात हे जोडणे. (किमान एक मोहीम झाली असेल तरी आपण अनुभव पाठवू शकता.)

*तुमच्या अनुभवा सोबत तुमचा मोहिमेतील फोटो असल्यास अतिउत्तम.*दिनांक ९ फेब्रुवारी पर्यंत आम्हाला लेख पाठवणे.


-हिंदु वार्ता

hinduwarta001@gmail.com

Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)