• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

त्याने बलात्कार केला नव्हता....

(मोकदमी मिळण्याबाबत पत्र)
शिवछत्रपतींच्या काळात एक रांझ नावच गाव होत.त्या गावचा एक पाटील होता. त्याच नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर. आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो. तो अनेक ठिकाणी महादाराला बसलेला आहे. तो मोठा माणूस होता. गावच्या पाटलाला महदारात सामावून घेण्याची परंपरा होती. त्याचे उल्लेख अनेक पत्रात आढळतात. पण त्याला शिवछत्रपतींनी चौरंग करण्याची शिक्षा दिली. म्हणजे  त्याचे कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तोडने.
(मोकदमी मिळण्याबाबत पत्र)
हि शिक्षा ताबडतोब अमलात आणली गेली. त्याचा गुन्हा शाबित झाला म्हणून त्याला हि शिक्षा महाराजांनी सुनावली. पण त्याचा गुन्हा काय होता? त्याने बलात्कार केलाच नव्हता, त्याने विनयभंग हि केला नव्हता, त्याने केलेल्या गुन्ह्याचा उल्लेख जो पत्रामध्ये आहे तो म्हणजे ‘बदअमल’ असा आहे. एका नवविवाहिते सोबत बदअमल म्हणजे व्यभिचार केला. शिक्षा करून त्याला सोनाजीच्या दारात टाकण्यात आलं. सोनाजी ने महाराजांना विनंती केली, कि याची मोकदमी(पाटीलकी) मला मिळावी मी याला पोसतो. पुढे त्याला त्याला ती मंजूर झाली. म्हणून त्याचा चौरंग करायची शिक्षा शिवाजी महाराजांनी केली होती. ह्या प्रसंगावर स्व.निनादराव बेडेकर उर्फ निनाद काका म्हणतात कि, "एक सोळा वर्षाचा तरुण हातपाय तोडायची शिक्षा देतो आणि त्यावर तात्काल अमल केला जातो. हे एक सामान्य रक्त नाही. याला वाघाच काळीज लागत. शिक्षा देण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी !"
     चौरंगसारखी शिक्षा करण्यापर्यंत आज हिंदुस्थानकडे तितके धाडस उरलेले नाही. कारण निर्भया हत्याकांड होऊन आज पाच वर्ष पुर्ण झाली(१२ डिसेंबर २०१२) तरीही न्याय लागला नसून त्यानंतर शक्ती मिल, दिल्ली रिपोर्टर बलात्कार आणि कोपोर्डी बलात्कार असे अनेक बलात्कार झाले. याचे एकमेव कारण हिंदुस्थान हा लोकशाहीप्रधान असून इथले कायदे हे संविधानावर अवलंबून आहेत. इथले गुन्हे घडतात ते ह्या संविधानातल्या कायद्यांना धाब्यावर बसवुन. म्हणूनच हा शिवछत्रपतींचा आदर्श हा फक्त आरोळ्यापूर्तीच मर्यादित आहे.
     जर १६ वर्षाचा तरुण केवळ बदअमलसाठी इतकी शिक्षा करू शकतो तर उभ्या हिंदुस्थानने ज्या शिवछत्रपतींना राष्ट्रपुरुष  म्हणून स्वीकारलं आहे त्यानी बलात्कारासाठी तात्काळ ठेचून ठार मारायचा कायदा करायला हवा.  शिवकाळातली न्यायव्यवस्था जर आज अमलात आणली तर भारतात भविष्यात बलात्काराचा विचार हि कोणी करणार नाही.
Share:

हुतात्मा बाबू गेनू सैद...

(हुतात्मा बाबू गेनू सैद)
        ज्या व्यक्तींच्या रक्तात देव देश धर्म मुरलेले असते त्या व्यक्ती  कधीच स्वस्थ बसत नाही. अश्या व्यक्तींना ना घराचे भान असते ना भुकेचे ना शरीराचे...हि माणसं अखंड देव देश धर्माकरिता वाहिलेली असतात. आ.संभाजीराव भिडे  गुरुजी म्हणतात ज्यांची देहावरती माया त्यांची देशाधर्मावर कधीच माया असु  शकत नाही. पुढे ते अस हि म्हणतात कि, जे देहावरची माया थुंकून टाकतात, लाथाडतात ते देशा धर्मावर माया करतात...! असाच एक अवघा  २२ वर्षाचा तरुण देहाची चिंता न करता आज दिनांक १२ डिसेंबर रोजी या भारत मातेसाठी बलिदान देऊन गेला. ज्याला देहापेक्षा देश महत्त्वाचा वाटला असा हा हुतात्मा बाबू गेनू सैद. त्या दिवसाची आज हि आठवण झाली कि आपल्या अंगातील धमन्या या ब्रिटीशांविरुद्ध रागाने विस्फारून उठतात.
       हुतात्मा बाबू गेनू सैद म्हणजे घामाच्या थेबांतुन तयार झालेला  एक सळसळत्या रक्ताचा तरुण. या तरुणाचा जन्म महाराष्ट्रातल्या गरिब शेतकरी घरातला. पुण्यामधील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावी १९०८ साली बाबूचा जन्म झाला. लहानपणीच २ वर्षाचा असताना पितृछत्र हरवले. पुढे दोन भाऊ गावी मजुरी करू लागले. बहिण मुंबईमध्ये लोकांची धुणीभांडी करू लागली तर आई गिरणीत(मिल) मजुरी करू लागली. पुढे बाबू सुद्धा मिल मध्ये मजुरी करू लागला. विदेशी मालामुळे भारताचे होणारे नुकसान त्याला खटकत होते. विदेशी माल बंद झाला तर स्वदेशी माल विकून भारत आर्थिकदृष्ट्या प्रबळ होईल आणि देशाला स्वातंत्र्य मिळेल हे बाबूने जाणलं होत. त्याच्या मनात देशभक्ती जागृत करण्याचे काम त्याचा मित्र प्रल्हाद याने केले. तो बाबुला देशभक्तांच्या गोष्टी सांगत. बाबू हा कॉंग्रेस पार्टीचा सदस्य होता. त्याची महात्मा गांधीवर आस्था होती पण  "आई गेल्यामुळे मी भारतमातेला  स्वतंत्र करण्यास मुक्त झालो" असे उद्गार त्यांनी काढले.
अहिंसा मान्य नव्हती.  १९३० साली वडाळा येथील सत्याग्रहात त्याने कारावास भोगला होता. त्यातून बाहेर पडल्यावर हि तो स्वस्थ बसला नाही. आई वारल्याचे कळल्यावर त्याला दुःख झाले परंतु
      राष्ट्र्भक्तीत भिजलेली लोक हि याच प्रवाहाची असतात. जालियनवाला हत्याकांड,सायमन वापस जावचळवळीत झालेली लाला लजपत राय यांची हत्या, भगतसिंग-राजगुरू- सुखदेव या क्रांतीकारकांची फाशी बाबुला मनोमन टोचत  होती. त्यांच्या त्रासाचे चटके जणू काही बाबुला होत होते.अश्या बाबूची सहनशीलता जणू संपली आणि क्रोधाचे रूपांतर क्रियेत झाले. दिनांक १२ डिसेंबर १९३०, शुक्रावरचा दिवस! मुंबईतील काळबा  देवी परिसरात  विदेशी मालाने भरलेले ट्रक त्या दिवशी येणार होते.हा माल दोन व्यापारांनी विकत घेतला होता. या मालाला अडवण्याची जबाबदारी काँग्रेस पार्टीने बाबू गेनूला  दिली होती. बाबू गेनू आपल्या 'तानाजी पथकाला' सोबत घेऊन  त्या ठिकाणी येऊन सकाळी ७.३० वाजता उभा होता. आंदोलन पाहण्यासाठी तुफान गर्दी होती.  इंग्रज अधिकारी फ्रेजर याला या आंदोलनाची आधीच खबर  होती.  त्यामुळे पोलिसांची तुकडी सुद्धा तिथे हजर होती. मालाने भरलेला ट्रक आला. भारतमातेच्या घोषणा देत मोर्चा ट्रकापाशी वळला. हा मोर्चा पोलिसांनी मागे हटवला. बाबू गेनूची वेळ आली.  इंग्रज अधिकाऱ्याने बाबू गेनू वर ट्रक चालकाला बाबूवर ट्रक चालवण्याचा आदेश दिला.  पण ट्रक चालक हा 'बलवीर सिंह' नावाचा हिंदुस्थानी होता. "मी एक हिंदुस्थानी असल्याने मी एका हिंदुस्थानी व्यक्तीवर ट्रक चालवणार नाही" असे म्हणताच;  इंग्रज अधिकाऱ्याने त्याला ढकलून बाबू गेनू वर ट्रक चढवला. बघताच क्षणी तो  कोवळा देह आणि भूमी रक्ताने माखली. सकाळी ११ वाजता हि घटना घडली. अन सांयकाळी उपचारादरम्यान ४.५० वा.बाबू गेनूने डोळे मिटले.  हा अवघा २२ वर्षांचा देह देश-धर्माकरिता  तळमळत होता.  त्यांच्या अंगातल्या  ह्या  देशभक्तीच्या आगीचे रूपांतर हौतात्म्यात झाले. हुतात्मा बाबू गेनू अखंड स्वदेशीकरिता लढले परंतु आज हा भारत देश विदेशी स्वीकारून त्यांचे बलिदान विसरला आहे. कारण लोकांची माया हि देशावर नसून देहावर आहे....जेव्हा लोक देव देश धर्मावर माया करणार तेव्हा ह्या  २२ वर्षांच्या तरुणाला खऱ्या अर्थी श्रद्धांजली प्राप्त होणार. 
Share:

पुण्यतिथी एका ब्रम्हचैतन्याची

  आध्यात्म आणि परमार्थ या दोहोंकडे वळलेल्या व्यक्ती या काही औरच असतात. मुळात त्यांचा जन्म म्हणजे साक्षात दैवी अवतारच. जन्मापासून मृत्युपर्यंत या व्यक्ती अखंड धर्मसेवा करण्यात गुंग असतात. पण या अलौकिक कार्याचा तिळमात्र गर्व त्यांच्या अंगाला शिवत नाही; म्हणूनच त्यांची छाप हि अखंड मनुष्य मात्रावर पडते. महाराष्ट्र या बाबतीत गर्भश्रीमंत आहे. या हिंदुस्थान भूमीला प्रत्येक शतकात अशी पावले लाभली. अशीच एक व्यक्ती परमार्थिक आणि अध्यात्मिक शिकवण प्रापंचिक जीवनात देऊन कित्येकांचे आयुष्य मार्गी लावून गेले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात; 

प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥

         या ओळीप्रमाणे आपल्या प्रापंचिक जीवनासोबत अनेकांच्या प्रपंचात त्यांनी आध्यात्माची सांगड घातली. मग असे पुण्यस्वरूप व्यक्तिमत्त्व कोणाचे? तर ते आहेत श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज.


जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला | जयाते सदा वास नामात केला |

जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती | 
नमस्कार त्या ब्रम्हचैतन्य मुर्ती ||

 गोंदवलेकर महाराज हे सातार्यात जिल्ह्यात गोंदवले-बुद्रुक गावी जन्मलेले अद्भुत चैतन्यच जणू. अखंड रामनाम जप मुखी. त्यांची आई गीताबाई महाराजांच्या तीन खूना सांगत त्या म्हणजे, महाराज हे दिसायला मोठे सुंदर, बोलण्यात चतुर आणि तिसरे म्हणजे मुखी अखंड रामनाम. महाराजांच्या घराला वारकरी संप्रदायाचा अखंड वारसा होता. त्यांचे वडील रावजी आणि आई गीताबाई. या दाम्पत्याच्या पोटी  बुधवारी माघ शुद्ध द्वादशी शके (इ.स. १९ फेब्रुवारी १८४५) सूर्योदयी महारांजाचा जन्म झाला. महारांजाचे पाळण्यातले नाव “गणपती”. लहान वयातच त्यांना भगवद् भजनाची ओढ लागली. ते जस जसे मोठे होत होते तस तसे त्यांच्या अंगी असलेले रामनामाचे वेड वाढत गेले. मुंज झाल्यावर उपाध्यांकडून त्यांनी सारी विद्या शिकून घेतली. पण मात्र गुरुशोधाकडे धावू लागल.अखेर या विचाराने व्याकुळ झालेला अवघा नऊ वर्षाचा बालक आपल्या दोन सहकार्यांसह गुरुशोधार्थ पळून गेला. पण लवकरच आईवडिलांच्या हाती लागल्याने सगळे कष्ट वाया गेले. अखेर ११ व्या वर्षी त्यांच लग्न झाले. पण जीव मात्र गुरुशोधासाठी तळमळत होता. शेवटी १२ व्या वर्षी आईला कल्पना देऊन एका लंगोटीवर रात्रीच्या अंधारात ते पुन्हा पळून गेले. आणि गुरुशोधार्थ त्यांनी भारत भ्रमंती सुरु केली. या भ्रमणात महाराजांना अनेक संतांच्या भेटी झाल्या. हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष आण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्रीस्वामी , हुमणाबादचे माणिक प्रभु , काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस, या सर्वांनी प्रेम भावाने जवळ केले खरे पण या कोणाकडेच गुरुलाभ झाला नाही. अखेर गोदातीरी श्रीसमर्थसंप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळेगांवच्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे त्यांनी अविरत गुरुसेवा केली. गुरूंना कठोर परीक्षा घेऊन पटले कि, त्यांची देहबुद्धि पूर्णपणे नष्ट झाली आहे. संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रम्हचैतन्य असे नाव ठेवले. मनासारखा सद्गुरु भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. ’आत्मज्ञान अंगी मुरविण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे’ ही गुरुआज्ञा शिरसावंद्य करून ते निघाले.

         घरी आल्यानंतर माहेरी वाट पाहत असलेल्या पत्नीला घेऊन आले. तिला परमार्थ शिकवला.गुरुदर्शन दिले. परंतु त्या अल्पकाळच राहिल्या. त्याना फार कमी वेळेतच देवाज्ञा झाली. आईच्या हट्टापायी महाराजांनी जन्मतः अंध असणार्या मुलीसोबत लग्न केले पुढे भक्त मंडळी त्यांना आईसाहेब बोलू लागले.
          महाराजांनी गावी येऊन लोकाना प्रपंचात राहून परमार्थ करावयास शिकवला. त्यांचे भक्त वाढत गेले. त्यामुळे त्यांनी १८९० साली आपल्या वाड्यात श्री राम, लक्ष्मण सीता आणि मारुती यांची स्थापना केली. पुढे हि संख्या वाढत असल्यामुळे गावी राममंदिर, दत्तमंदिर आणि शनिमंदिराची स्थापना केली. तसेच धर्मशाळा ही स्थापली.
(श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर )
गोंदवलेकर महाराज म्हणजे उपासना भक्तीचे एक अद्भुत सौंदर्य. पोहणे, पळणे, घोड्यावर बसणे, झाडावर चढणे, उत्तम काव्य करणे. सुंदर हस्ताक्षर, अप्रतिम पाठांतर हे गुण उपजत होतेच. त्यांना बाजरीची भाकरी, पिठले आणि जाड भरडे आवडे. महाराजांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे; त्यांना लहानपणा पासून अन्नदानाची खूप आवड. . इ. स. १८७६ व १८९६ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्रीमहाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचविले.
        प्रपंचात अध्यात्माची जोड असेल तर आपले आयुष्य सुखमय होते हे महारांजानी शिकवलेच पण त्याच बरोबर भगवंत नामाचा हि माहीमा त्यांनी दाखविला. ते अखंड नाम जगले. देह ठेवताना हि त्यांनी नामाचे महत्व सांगितले. सोमवार, मार्गशीर्ष कृ.दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता
“जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.”
हे शेवटचे शब्द उच्चारून, या भगवंत नामी शब्दानेच त्यांनी देह ठेवला. 

साभार :- श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज संकेतस्थळ.

*श्री गोंदवलेकर महाराजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट दया:-
 http://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/wyaktidarshan
Share:

लांडगी डाव - "लव्ह जिहाद"

         हिंदूस्थानची  फाळणी होण्याचे ठरले. हिंदूना भारताच्या रुपात तर मुस्लिमांना पाकिस्तानच्या रुपात आपापल्या धर्मा नुसार स्वतंत्र राहाण्याची मुभा या फाळणीद्वारे मिळणार होती. त्या नंतर हिंदुनी पाकिस्तानात तर मुस्लिमांनी हिंदूस्थानात ढवळाढवळ करू नये असे अनेकांचे मत होते. परंतु हिंदूवर अन्याय झाला नाही तर कार्य पुरे कसे होईल? त्यातही अनेकांच्या मध्यस्तीमुळे "धर्मनिरपेक्षतेखाली" म्हणा किंवा "सर्वधर्म समभाव" या गोंडस नावाखाली मुसलमानांना या भारतभूवर राहण्याची, आपला संसार थाटण्याची संधी मिळाली. पुढे संविधानानेहि भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे हे जाहीर केले. परंतु स्वातंत्र्यप्राप्ती पासून ते आजतागायत याचे परिणाम भारताने भोगले आहेत. मग ते काश्मिरमधून हकलेल्या हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या रूपाने असो, २००२ साली झालेला  गोधरा हत्याकांड असो, दिल्ली  मध्ये  हिंदूवर होणारे आक्रमण असो, देवदेवतांची विटंबना असो, मंदिरे पाडणे किंवा मग धर्मिक दंगली आणि बरेच काही...
                           १३०० वर्षांपासून हिंदुस्तानवर अशी धार्मिक, आर्थिक लुटीसाठी, स्त्रिया पळवून उपभोगण्यासाठी आक्रमण झाली.हि सगळी आक्रमण झाल्या नंतर ह्या देशावरती सत्ता स्थापनेकरीता आपल्याला वाव आहे हे आक्रमकांच्या लक्षात आलं. आणि मग शेकडो आक्रमणांनी घायाळ झालेल्या या पुण्याभूमीवर संघर्ष सुरु झाला; तो म्हणजे सत्तेचा..! ज्या भूमीला ज्या देशाला स्पष्ट तीन ऋतू विस्तृत भूभाग अथांग समुद्रकिनारा आणि संपन्न वन सृष्टी लाभली आहे. अश्या भूमीवर देशाबाहेरून प्रत्येक आक्रमक सत्ता स्थापनेची स्वप्न पाहू लागला. त्या नंतर या देशाने अनेक लुटालूट करणारे त्सुनामी, लांडग्याने हरिणीची शिकार करावी इतक्या वेगाने स्त्रीच्या शरीराचे लचके तोडणारी लांडग्याची कळप,पाशवी नंगानाच करून हिंदूंची मंदिरे व मुर्त्या तोडणार्या इस्लामी आक्रमकांच्या टोळ्या एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे पूर्ण भारतभर घोंगावत होत्या.
(हिंदू स्त्रियांवरील किंमती)
                   स्वातंत्र्यानंतर अशी आक्रमण वेष पालटून वावरू लागली. कोणी सर्वधर्म समभावाच्या वेशात, कोणी अल्पसंख्यांकाच्या वेशात तर कोणी किशोरवयाच्या वेशात आहे.पण जात तिच; लचके तोडणार्या लांडग्याची.पण हल्ली स्त्रीच्या शरीराचे लचके तोडायच्या प्रकाराला नवीन नाव मिळाले; ते नाव म्हणजे "लव्ह जिहाद". लव्ह जिहाद म्हणजे काही नवीन नाही.  हिंदू वेशात हिंदू स्त्रियांच्या अवतीभोवती फिरून प्रेमाच्या विषारी जाळयात अडकवण्याचे इस्लामी षड्यंत्र म्हणजेच "लव्ह जिहाद". कधी पैशांसाठी तर कधी धर्मांतरासाठी हिंदू स्त्रियांवर प्रेमाचे आमिष दाखवले जाते. तिच्यावर बलात्कार करून तिला मुल झाल्यावर सोडून दिल जात. ह्या साठी गाडी,बंगला,पैसा हा मदरसा व मस्जिद मधून पुरावला जातो. हिंदू स्त्रियांवर जातीप्रमाणे किमंती लावून त्यांच्या शरीराचा बाजार मांडला आहे.परंतु यावर पायाबंद घालणारा प्रबळ कायदा आपल्याकडे नाही.
(शंभू दयाल च्या व्हिडीओबद्दल पाकिस्तानस्थित हिंदूचे मत)
        एकतर कायदा प्रबळ करायचा नाही अन हिंदुनी कायदा हातात घेयाचा नाही. कारण भारतात बॉम्बस्फोट  करणार्या आतंकवाद्यांना धर्म नसतो पण धर्म सरंक्षणासाठी हिंदूनी केलेल्या प्रतिक्रियेला मात्र हिंदू आतंकवाद ठरतो सृष्टी नियमानुसार अती केली कि माती होते. याचे ताजे अन अभिमानस्पद उदाहरण म्हणजे राजस्थानमधील लव्ह जिहादाचा केलेला खून.पुराणात हि लिहील आहे धर्मरक्षण,शीलरक्षण,स्त्रीरक्षण,आत्मरक्षण आणि राष्ट्ररक्षणासाठी केलेली हत्या हि माफ असते.सत्य स्थिती पाहता हिंदुनी हिंदुच्या कार्याचे केलेले समर्थन पाहण्याचे सौख्य आजवर भारतभूला लाभलेले नाही. राजस्थान मध्ये जिहादिवर केलेल्या आक्रमणामुळे आज पुरोगामी आणि मुसलमानांना हिंदुस्थानमध्ये राहणे भीतीदायक वाटत आहे. पण असे वक्तव्य करणार्याना कधी आपल्या आयाबहिणी जिहाद्यांपासून  असुरक्षित वाटल्या नाहीत का? आज असंख्य हिंदू गेले कित्येक वर्ष पाकिस्तानमध्ये क्रूरपणे मरत आहेत.आणि त्यांना मारणे हे मुस्लिमांचे धर्मकर्तव्य, म्हणून इनामे दिली जातात. तेव्हा या पुरोगामी लोकांची तोंड का बंद असतात? याकुब मेनन च्या अंत्ययात्रेवर रडणारे पुरोगामी आणि भारतीय मुस्लीम  या प्रश्नाचा उत्तर देतील का? जर हा देश महात्मा गांधीच्या शांतप्रिय समाजाचा असेल तर त्यांनी अब्दुल रशीद प्रमाणे शंभू दयालला भाई म्हणून माफ करून हिंदू-मुस्लीम भाई -भाई या नावाखाली पुरोगामी आणि इस्लामी बंधुप्रेम जोपासतील का????
Share:

मार्गशीर्ष गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग

गुरु हा नेहमी आपल्याला लाभदायकच असतो. मग विद्याप्राप्तीसाठी असो ज्ञानप्राप्ती असो वा संपूर्ण आयुष्य हे सुखमय जगण्यासाठी असो. असाच एक गुरु आपल्याला यशप्राप्तीसाठी आज लाभदायक आहे. तो म्हणजे हिंदू धर्मानुसार आज लाभलेला योग "गुरुपुष्यामृत ". याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल; त्यामुळे आज जाणून घेऊया गुरुपुष्यामृताचे महत्त्व.

गुरुपुष्यामृताचे महत्व: 
                       धार्मिक ग्रंथानुसार पुष्प नक्षत्र हे शुभ मानले जाते.कारण या नक्षत्री धनाची देवता लक्ष्मी देवींचा जन्म झाला. गुरुपुष्यामृत  हा योग वर्षातून फार कमी वेळा येतो. या दिवशी देवी लक्ष्मीचा घट बसवून पूजा केली जाते. गुरुचरित्र आणि लक्ष्मीव्रत कथाचे वाचन केले जाते. गुरुवारी अथवा रविवारी पुष्प नक्षत्राचा योग येतो; त्यास गुरुपुष्यामृत व रविपुष्यामृत २०१७ ला  हा योग अनुक्रमे १२ जानेवारी , ९ फेब्रुवारी, ९ मार्च आणि ९ नोव्हेंबर या दिवशी आला होता.  यावर्षीचा शेवटचा योग हा मार्गशीर्ष कृ. ४/५ म्हणजेच  आजच्या दिवशी (७ डिसेंबर) आहे. ह्या दिवसाचा मुहूर्त सुर्योदया पासून ते सायंकाळी ७.५३ पर्यंत आहे. ह्या  योगाचे महत्त्व दसरा,दिवाळी तसेच अक्षयतृतिया इतकेच आहे.


गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून केली जाणारी शुभकार्य: 
      पुराणानुसार गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर केलेल्या कार्यांचा लाभ हा आपल्या अपेक्षेपेक्षा दुप्पट होतो. म्हणून त्यास शुभ कार्य असे म्हणतात. या दिवशी आपण पुढील कार्य करू शकतो.

  • सोने-चांदींची खरेदी
  • आपल्या राशीनुसार रत्नाची खरेदी
  • एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक 
  • नवीन घरात गृहप्रवेश 
  • कला,साहित्य,संस्कृती,शिक्षण,तंत्रज्ञान या विषयावर संशोधन
  • गुरुदिक्षा घेणे 
  • अनुग्रह घेणे 
  • लग्न कार्य करणे 
  • परदेश यात्रा 
  • नवीन व्यवसायाची सुरुवात  
  • या दिवशी गुरुलाभ मिळविण्यासाठी धार्मिक यात्रा करून अनेक जण अन्नदान करतात.

येत्या वर्षात (२०१८) येणारे  गुरुपुष्यामृत मुहूर्त :

  • ९ ऑगस्ट 
  • ६ सप्टेंबर
  • ४ ऑक्टोबर
    या दिवशी श्री देवी लक्ष्मीची उपासना करून वैयक्तिकच नव्हे तर राष्ट्रकार्याचा हि विचार करा.
Share:

महाराष्ट्रभरातून हि पद्मावती चित्रपटाला विरोध कायम.....!



   

जगातील प्रत्येक राष्ट्र हे त्याच्या प्रति निष्ठावान व्यक्तींनी केलेल्या सर्वस्वाच्या बलिदानानेच चिरंजीवी ठरते. अनेकवेळा त्यामागे असलेली प्रेरणा ही भूमी/मातृभूमी असते. परंतु हिंदुस्थान असे राष्ट्र आहे जिथे चारित्र्याच्या बाबतीत ही तेवढीच सजगता दिसते.हिंदुस्थान हा असंख्य प्राणांच्या बलिदानाने रक्ताने पावन झालेला देश.अश्या या देशात हिंदु संस्कृती आणि पावित्र्य राखण्यासाठि आपले चारित्र्य अबाधित राखण्यासाठि अनेक शुर वीरांनी प्राणांची आहुती दिली. यामध्ये फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रीयांनी हि आपला जीव पनाला लावुन हिंदुस्थान चे चरित्र हनन होण्यापासुन वाचवले.त्यातलेच एक प्रखर उदाहरण म्हणजे चितोडची राणी पद्मावती. आपल्या १४००० राजपूत माता भगिनींना सोबत घेऊन खिलजी सारख्या स्त्रीलंपट क्रुर इस्लामी आक्रमकाच्या अधिन न जाता जोहार करुन अग्निप्रवेश करुन प्राण त्यागला.राणी पद्मावती हि स्त्रीचेच नव्हे तर हिंदु रणरागिणीचे प्रतिक आहे. जिच्या बलिदानाने राजपुतांची पगडी मानाने त्यांच्या मस्तकावर आहे असे म्हणने गैर ठरणार नाहि.परंतु नेहमी प्रमाणे गोवारिकर नंतर हिंदुची मान खालावेल असे लागोलाग कृत्य केले ते भन्साळी नामक दिग्दर्शाने. खिलजी सारख्या स्त्रीलंपट क्रुर नंपुसकाला राणी पद्मावती सोबत दाखवलेल्या प्रेम संबधांमुळे समस्त हिंदुस्थानमध्ये सध्या असंतोष माजला आहे. ह्या असंतोषाचे वणव्यात रुपांतर झाले आहे.राणीच्या सन्माना करिता भारतात जागोजागी कारणीसेनेला पाठिंबा देत अनेक हिंदुत्ववादि संस्था पुढे सरसावत आहेत.असे असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी महाराष्ट्रातील समस्त धारकर्यांना आदेश दिला कि, जागोजागी या विरोधात मोर्चे काढा. महाराष्ट्रात कुठे हि हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका त्यासाठि आपल्या प्रातांतील वा राज्यातील चित्रपटगृहाला तसेच प्रांताधिकारी,तहसिलदार आणि पोलिस अधिकारी यांना  निवेदन द्या. २ डिसेंबर रोजी सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकर्यांनी या विरोधात मोर्चा काढुन संजय लीला भन्साळीचा पुतळा जाळुन जाहिर निषेध नोंदवला. 
        या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी असं म्हणाले, " राजपुत माता भगिनींनी तीन वेळ जोहार केलाय त्या जोहारातील जी आग आहे ती आग यांना देशात शिल्लक ठेवणार नाहि त्यासाठि यांना पुनर्जन्मा ची वाट चोखाळावी लागेल.महाराष्ट्रामध्ये हि आग भडका घेऊन उठेल संबंध देशात हि आग लावेल.आणि हे चित्रपट निर्माते देशात शिल्लक राहणार नाहित याची खात्री बाळगावी".
Share:

परमहंस श्रीधर स्वामी


      आपण आयुष्य जगत असताना आपल्या हयातीत अनेक महापुरुष योगीपुरुष होऊन जातात.अन् आपल्याला त्यांची ओळख हि होत नाहि. असेच एक संत महात्म्यपुरुष महाराष्ट्राच्या भुमीवर स्वांतत्र्यकाळात होऊन गेले; ज्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुर्ती सिमित नसुन संपुर्ण भारतव्यापक होते.श्रीदत्त उपासक,श्री समर्थ शिष्य ते म्हणजे  श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी म्हणजे एक वेगळीच अनुभुती.जी महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारताने हि त्यांच्या शिकवणीचा व पदस्पर्शाचा आनंद घेतला. ह्या महान हस्तीबद्दल आपण जाणुन घेऊया.
      
समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली ।
जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।
जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा ।
मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।। 
 (श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी)
     श्रीधर स्वामींचा जन्म हा विधीलिखितच होता.त्यांचे वडिल नारायणराव देगलुरकर हे मुळचे हैदराबादचे. श्रीधर स्वामींची माता कमलाबाई. या दोन्हि दांम्पत्यांच्या देगलुकरकर या घराण्याला सर्पशाप होता. श्रीधर स्वामींच्या जन्माबाबत खरी हकिकत या सर्पशापात होती. देगलुरकरांच्या घरी एक दिवस मोठा नाग निघाला.त्याला मारु नये तो तुमचा रक्षण कर्ता आहे असे अनेकांनी बजावुनहि देगलुरकर घराण्यापैकि एकाने नागाच्या फणावर गोळी मारली व नाग ठार झाला.त्या रात्री एक ब्राम्हण पतकिंच्या पुरुषाच्या स्वप्नात येऊन म्हणाला " आज तुम्हि मला ठार मारले मी तुमचा रक्षणकर्ता होतो पण तुम्हाला ते पहावले नाहि.तुमच्या वंशाचा नाश होईल.ब्राम्हणाचे पाय धरल्यावर त्यांनी उःशाप दिला ह्या कुळाचा उद्धार करणारा बालब्रम्हाचारी संन्यासी तुमच्या घरी जन्म घेईल जो तुमच्या कुळाचा व विश्वाचा उद्धार करील .  त्यानंतर देगलुरकर घरण्याला उतरती कळा लागली.अनेक माणसे मेली.या भितीने वंश संरक्षणाला धरुण नारायणराव व कमळाबाई चिंतीत होत्या.त्यांना आधी हि मुलं होती.पण उपाध्यांनी गाणगापुरला जाऊन दत्तगुरुंची कृपा प्राप्ती घ्या. असे सुचवले.स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इ. स. १९०८ साली आजच्या दिवशी झाला,स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, "आम्ही मूळ गाणगापूर येथीचे असे". 
स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म...
म्हणून दत्त जयंती च्या दिवशी,गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला..

  महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले,तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासून च होती तीच ओढ स्वामींना सज्जनगड ला घेऊन आली..अध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इ.स.१९२७ साली विजयादशमी दिवशी स्वामींचे गडावर आगमन झाले.
 सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.
ज्या प्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले त्याच प्रमाणे अवघ्या ३ वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी १९३० च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली.त्यांच्या आज्ञे प्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला.शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला.१९४२ च्या विजयादशमीच्या शुभमुहुर्तावार संन्यास स्विकारला.स्वामीजींनी ब्रम्हचार्यातुन थेट संन्यासाश्रम स्विकारला.
     श्रीधर स्वामी म्हणजे नेहमी हसरा चेहरा, प्रसन्न मुद्रा.ते जिथुन चालत त्या रस्त्यावर लोकांना जागीच समाधी प्राप्त होत.स्वामीजींचे कार्य हे मुळ धर्मप्रसाराचे होते.त्यांनी सनातन वैदिक धर्माची जनजागृती केली.हिमालयापासुन कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासुन बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर भारत,मध्य भारत,दक्षिण भारत असा धर्मप्रचार केला.अनेक धर्मसभा घेतल्या.बारा वर्ष आसेतु हिमालय धर्म जागृतीचें कार्य केले त्यानंतर त्यांनी बारा वर्ष भारत भ्रमण केल्यावर एकांतवास भोगला. सन १९६० ते ७३ असा एकांतवास स्विकारला.
      मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला.आणि वरील सर्व तीर्थ क्षेत्राचा विकास केला .अनेक ग्रंथ,स्तोत्र रचना स्वामींनी केली.आणि  १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली....
      स्वामीजींनी आपल्या आयुष्यात लहान मोठे असे चाळिस ग्रंथ लिहिले.श्रीराम पाठ, मारुती पाठ, श्रीसमर्थ पाठ, विवेकोद्य,मुमुक्षुसखा अशी काव्यमय ग्रंथ तर आर्यसंस्कृती नामक पाचशे पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुधर्म,वैदिकधर्म,नितीधर्म,राष्ट्रधर्म अश्या अनेक विषयांवर विवेचन हि केले. 

समर्थांना सुद्धा दत्तात्रेय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेजघरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधी च्या मागे सिंहासनावर विराजमान  आहेत.
जेव्हा-केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तू मध्ये दर्शन घेऊन अध्यात्मिक अनुभूती चा अनुभव नक्की घ्या ..

दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमंत परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत...

स्वामींना एकच मागणे मागू...

व्हावी पूर्ण कृपा गुरू मजवरी प्रारथीत भावे तुला ।
वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया संमोह जो वाढला ।
अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांती पदी बैसवी ।
विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी ।।

© प्रवीणबुवा रामदासी 
Share:

श्रीपाद श्रीवल्लभ

                
                                                  

          
     हिंदु धर्म संस्कृतीनुसार मार्गशिष मास हा अतिपवित्र मानला जातो.कारण या महिन्यात गुरुवारी देवीचे घट बसवले जातात तर मार्तंड भक्त म्हणजेच शंकर भक्तांसाठि चंपाषष्ठि मुळे आनंदत्सोव असतो. अन् सर्वात मोठा आनंदत्सोव हा श्री दत्त सांप्रदायासाठि साजरा केला जातो.कारण या महिन्यात मार्गशीष पौर्णिमेला श्री दत्त जयंती साजरी केली जाते. त्यामुळे हा मास भक्तांसाठि फार आनंदात जातो.

      कृते जनार्दनोः त्रेतायाम रघुनंदनः
      द्वापारे रामकृष्णः च कलौ श्रीपादश्रीवल्लभः

     कृतायुगात अधर्मावर जनार्दनांनी ,त्रेताय युगात श्री रामांनी तर द्वापारयुगात श्री रामकृष्णांनी धर्मावर विजय मिळवला.त्याच प्रमाणे कलियुगात श्री विष्णुंनी श्रीपादश्रीवल्लभ रुपात अवतार घेतला. मार्गशीष पौर्णिमेला श्री दत्तांनी ब्रम्हदेवांचे मानसपुत्र अत्रिऋषींच्या कुळी जन्म घेतला.म्हणुन दत्तात्रेय असे नाम पडले.  कपिलमुनींच्या बहिणीच्या दारी ज्या अत्री ऋषींच्या धर्मपत्नी अश्या पतिव्रता अनुसयाच्या घरी तीन साधु पाहुणे म्हणुन आले. हे तीन साधु दुसरे तिसरे कोणी नसुन अनुसयाची परिक्षा घेयाला आलेले साक्षात त्रीदेव ब्रम्हा-विष्णु- महेश होते. आलेल्या अतिथींचा पाहुणचार करणे हे स्त्रीधर्माचे मुख्य कर्तव्य. आलेल्या तीन साधुपुरुषांनी भुक लागले आहे परंतु आम्हाला नग्न(न- अग्न) असे जेवण हवे. अनुसया स्वयंपाक गृहात जाऊन अत्री ऋषींचे मनोमन स्मरण करते. 'असेल माझ्या पतीचे तपफळ, काय करेल मन्मथखळ' असे बोलुन विवस्त्र अन्न घेऊन बाहेर येते. बाहेर आल्यावर त्या तीन साधुपुरुषांना पाहुन ती चकित होते.कारण त्या तिन्हि अतिथींची लहान बालके झालेली असतात. त्यांना स्तनपान(न- अग्न म्हणजेच ज्याला अग्नीचा स्पर्श नाहि असे जेवण) करताना अत्रि ऋषी घरी येताच चकित होतात.झालेला सर्व प्रकार समजताच; लहान बालकांचे रुपांतर ब्रम्हा- विष्णु- महेश या देवांमध्ये होते. तेव्हा अत्रि ऋषी अनुसयाला हवा तो वर मागण्यास सांगतात.तेव्हा अनुसया या तिन बालकांना आपल्या घरी माझे पुत्र म्हणुन राहण्यास सांगते.यावर तिन बालके अनुसयाची पुत्र म्हणुन अत्रिऋषी आणि अनुसयाच्या कुटित राहतात.ब्रम्ह देवांचे नाव चंद्र, विष्णुंचे नाव दत्त तर इश्वराचे म्हणजेच शकरांचे नाव दुर्वास ठेवण्यात येते. चंद्र आणि दुर्वास आपण आपल्या अवतार कर्तव्यासाठि आपल्या लोकात जातो अन् तुमच्या पदरी श्री दत्त अवतार स्वरुपात राहतील असे सांगुन परतात.अश्या प्रकारे श्री दत्तांचा जन्म अनुसया  व अत्री ऋषींच्या दारी झाला. 

         गुरुब्रम्हा गुरुर्विष्णुः
         गुरुर्देवो महेश्वरः
         गुरुः साक्षात परब्रम्हा
         तस्मै श्री गुरुवे नमः 

   श्री दत्तांचा अवतार केवळ विष्णुमय नव्हता तर श्री ब्रम्हा-विष्णु-महेश यांचा अलौकिक मिलन होता.त्यामुळे त्यांना परब्रम्हा स्वरुप म्हंटले जाते.      
      श्री दत्तांचे कार्य हे कलियुगात मुल्यवान ठरते. श्री दत्तांनी आपल्या अवतार कार्यात कधीच उच्च- नीच भेदभाव केला नाहि.शुद्राच्या दारी हि त्यांनी भरभराट आणली तर राजाला हि शिष्य म्हणुन स्विकारले.तसेच असुर व ब्रम्हराक्षसावर सुद्धा त्यांनी आपली कृपाशक्ति दाखवली. मानवजातीच्या प्रत्येक स्तरात त्यांनी संसार-प्रपंच- परमार्थाची शिकवण दिली.काम,क्रोध,मद,मत्सर,संशय,चिंता यावर विजय मिळवण्याची शिकवण दिली.धर्म- कर्माचे उत्तम प्रतिक म्हणजे श्री दत्तात्रेय स्वारी. समर्थ रामदास स्वामी ग्रंथराज श्रीमत् दासबोधामध्ये ज्या प्रमाणे गुरु- शिष्यांचा संवाद सांगतात त्याच प्रमाणे गुरु-शिष्यांचे दर्शन श्री दत्त अवतरात होते.  वृद्धांपासुन बालकापर्यंत तर मानवापासुन असुरापर्यंत प्रेमाने वागणुक दिली.श्री गुरुचरित्रामध्ये याची अनेक उदाहरणं आढळतात. 
         श्री दत्त अवतार हे काहि साधे पुरुष नव्हते तर साक्षात विष्णुअवतार होता.ज्यांनी ज्यांनी श्री दत्तांची उपासना मनापासुन केली त्यांच्यावर श्री दत्तांची कृपादृष्टि कायम राहिली. दत्त, अवधुत, गुरुदेव आणि श्रीपाद अशी त्यांची अनेक नामे.तर श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ अशी त्यांची रुपे. क्षेत्र गाणगापुरी श्री दत्त निवासस्थानी होते.औदुंबर वृक्षाखाली त्यांनी निवास केला. सृष्टिच्या चराचरातील प्राण्यांवर त्यांची माया होती. श्री दत्तांच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमेत त्यांच्या जवळ कुत्रा,साप,मोर,कोकिळ, गाय असे अनेक प्राणी तर योगमुद्रेत बसलेले श्री दत्त दिसतात. त्यांच्या मुख्य पादुका या बेळगावला आहेत. त्यांच्यावर श्री गुरुचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य,गुरुलीलामृत,नवनाथ भक्तिसार,दक्षिणमुर्ती संहिता आणि दत्तसंहिता असे ग्रंथ उपलब्ध आहेत.
         श्री दत्तांनी समाधी न घेता आपल्या अवतारात ते लुप्त झाले.आज हि कलियुगात त्यांची मनापासुन भक्ति,उपासना केली कि त्यांचा साक्षात्कार हा त्यांच्या भक्तांना होतो.श्रीपाद श्री वल्लभ नामाचा जप केल्यास त्यांची कृपादृष्टि आपल्यावर होते.श्री दत्त अवतार अजुन हि सृष्टिच्या चराचरात आढळतो.हि अंधश्रद्धा नव्हे तर आपण जसे देवाला भजु तसा तो पावतो.हि श्रद्धा आहे. श्री दत्त सांप्रदायात श्री दत्त जयंती हा उत्सव मोठ्या भक्तिभावे साजरा केला जातो. हिंदुस्थानावर होऊन गेलेल्या साधुसंतांमध्ये श्री दत्तांचा अंश होता असे मानले जाते.श्री दत्त अवतार हि काहि साधीसुधी गोष्ट नाहि तर त्यांचे चरित्र वाचल्यास अंगाला घाम फुटतो, कंप फुटतो. पण जेव्हा आपण त्यांच्या भक्तिच्या अधिन जातो तेव्हा आपले मन फुलांच्या कळीप्रमाणे फुलुन जाते. 
     - नेहा जाधव.
     - संदर्भ:- सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र
Share:

प्रस्तावना

              

         कन्याकुमारी ते काश्मिर अन् ब्रम्हदेश ते बलुचिस्थान पर्यंत व्यापलेला हिंदुस्थान.म्हणजे भारत. संपुर्ण भुमी हि हिंदु धर्माने पावन झालेली. इथे राहणारे सर्व हिंदु म्हणुन हा हिंदुस्थान. जगाच्या पाठिवर जर सर्वात पवित्र असा देश कोणता? असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्या मुखी हिंदुस्थान म्हणजेच भारत देश हेच उत्तर येईल. पण हा देश पावन केला कोणी? याचे चारित्र्य पवित्र केले कोणी तर या भुमीतील देव देवता, संस्कृती, रक्ताळलेला इतिहास, छ.श्री शिवाजी महाराज,छ.श्री संभाजी महाराज,साधु-संत यांच्या मौल्यवान शिकवणीने व पराक्रमाने. परंतु सद्य परिस्थिती पाहता.भारत हा धर्मनिरपेक्ष आहे.आणि या धर्मनिरपेक्षतेखाली हिंदुची मुस्कटं बंद केली जातात.काहिंच्या मता प्रमाणे भारत हे नाव सर्वधर्म समभावी असल्याचे जाहिर होते. आणि कारण विचारताच 'इंडिया' या इंग्राजळलेल्या अक्षराची फोडणी करुण आम्हि सर्वधर्म समभावी आहोत म्हणुन नारा दिला जातो. याच 'सर्वधर्मसमभावी' या शब्दाखाली मात्र हिंदु धर्म हाच आम्हाला नकोसा झालाय.हिंदु धर्म फक्त राजकारणात मतं घेण्यापुर्ती उरलाय. पण सत्य परिस्थिती पाहता.ज्या 'भारत' या नावाला सर्वधर्म अथवा धर्मनिरपेक्ष हि उपमा दिली जाते. तो शब्दच मुळात हिंदु आहे.आणि हिंदुस्थान पेक्षा हि अतिप्राचिन आहे हे मात्र आम्हि विसरतो. दशरथ राजाला दिलेल्या वरदानाप्रमाणे त्यांच्या पुत्राच्या नामक आपला देश ओळखला जाईल आणि तो आहे 'भारत'..! हो भारतच आणि भारत म्हणजे हिंदुचा देश.
     भरतभुमीवर      म्हणजे भारतावर प्राचिन काळापासुन प्रत्येक शत्रु ने सत्ताविस्तार आणि राज्यकरण्याच्या हेतुने असंख्य युद्ध केली. आणि युद्धाला हिंदु राजाने सडेतोड उत्तर दिले आहे.याची साक्ष इतिहास आहे.इतिहास नेहमी अहिंसेने शांततेने जन्मभुमी परत मिळवा असे कधीच सांगत नाहि.तर; जर जगात व्यक्ति म्हणुन टिकायचे असेल तर शस्त्र आणि शास्त्र हातात घ्या. हिंदुंची परमदेवता पुण्यशील भगवद् गीतेत हि लिहले आहे धर्मसरंक्षणासाठि अधर्मावर मात करण्यासाठि नेहमी शस्त्र हातात घ्या. मग ते युद्ध रामायण,महाभारतातलं असो वा मुघल साम्राज्यावर छ.शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल हिंदवी स्वराज्य असो.त्याहि पुढे जाऊन स्वांतत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचा रक्तसंग्राम असो वा स्वांतत्र्यलढ्यानंतर आंतकवाद्यांचा केलेला सामना असो.शस्त्र शिवाय विजय हा मुळीच नाहि.
          परंतु नेहमी हा इतिहास चुकिचा सिद्ध करण्यासाठि पुरोगामी व एक विशिष्ट वर्ग,संस्था पुढे सरसावतात.अन् त्याला सत्ताकारणासाठि राजकारणी तर अर्थकारणासाठि सामाजिक माध्यांमानी मात्र हिंदुंची गळचेपी केली.अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न पावलोपावली दिसत आहे.मग हिंदुची मंदिरे तोडण्यातुन,इतिहासावर घाणेरडे चित्रपट बनवुन तर खोटि पुस्तके काढुन या कामाला गती दिली जात आहे.हिंदु मात्र षंढ होऊन हे सर्व पाहुन पाश्चिमात्य संस्कृतीच्या नावाखाली मात्र धुमाकुळ घालत आहे. याच पार्श्वभुमीवर हिंदु पर्यंत आपल्याच धर्माचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे हे आपले दुर्दैव.
          दुर्दैव म्हणुन हे स्विकारुन आम्हि हिंदु वार्ता नामक ब्लॉग व फेसबुक पेज सुरु केला आहे. या ब्लॉग व फेसबुक पेजवरुन हिंदु धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचे योजिले आहे. या ब्लॉगवर धारातिर्थांचे स्मरण, स्वांतत्र्यलढ्यातील बलिदान, हौतात्म्य,धर्माभिमानी, राजकिय विश्लेषण, हिंदुवार्ता, भौगलिक व्याप्ती या सदर अंतर्गत हिंदुबाबत होणार्या घडामोडी ,बातम्या आणि त्यांचे विश्लेषण तसेच सनावळीनुसार हिंदुचे पराक्रम,बलिदान यांची माहिती देणार आहोत. जो इतिहास दडपुन टाकला आहे तो नव्याने समोर आणने, हिंदुंच्या सत्य परिस्थिती ची जाणिव करुण देणे. हिंदु धर्माचा प्रचारप्रसार करणे हा छोटासा प्रयत्न हिंदु वार्ता च्या माध्यमांतुन आम्हि करणार आहोत.
          अभेद्य भारत, अखंड हिंदुस्थान ह्या युक्तिप्रमाणे संपुर्ण भरतभुमीवर हिंदुंचे अस्तित्व टिकवण्यासाठि व त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठि हिंदु वार्ता नेहमीच प्रयत्नशील राहिल.


-हिंदु वार्ता
Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)