(हुतात्मा बाबू गेनू सैद) |
हुतात्मा बाबू गेनू सैद म्हणजे घामाच्या थेबांतुन तयार झालेला एक सळसळत्या रक्ताचा तरुण. या तरुणाचा जन्म महाराष्ट्रातल्या गरिब शेतकरी घरातला. पुण्यामधील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावी १९०८ साली बाबूचा जन्म झाला. लहानपणीच २ वर्षाचा असताना पितृछत्र हरवले. पुढे दोन भाऊ गावी मजुरी करू लागले. बहिण मुंबईमध्ये लोकांची धुणीभांडी करू लागली तर आई गिरणीत(मिल) मजुरी करू लागली. पुढे बाबू सुद्धा मिल मध्ये मजुरी करू लागला. विदेशी मालामुळे भारताचे होणारे नुकसान त्याला खटकत होते. विदेशी माल बंद झाला तर स्वदेशी माल विकून भारत आर्थिकदृष्ट्या प्रबळ होईल आणि देशाला स्वातंत्र्य मिळेल हे बाबूने जाणलं होत. त्याच्या मनात देशभक्ती जागृत करण्याचे काम त्याचा मित्र प्रल्हाद याने केले. तो बाबुला देशभक्तांच्या गोष्टी सांगत. बाबू हा कॉंग्रेस पार्टीचा सदस्य होता. त्याची महात्मा गांधीवर आस्था होती पण "आई गेल्यामुळे मी भारतमातेला स्वतंत्र करण्यास मुक्त झालो" असे उद्गार त्यांनी काढले.
अहिंसा मान्य नव्हती. १९३० साली वडाळा येथील सत्याग्रहात त्याने कारावास भोगला होता. त्यातून बाहेर पडल्यावर हि तो स्वस्थ बसला नाही. आई वारल्याचे कळल्यावर त्याला दुःख झाले परंतु
राष्ट्र्भक्तीत भिजलेली लोक हि याच प्रवाहाची असतात. जालियनवाला हत्याकांड,सायमन वापस जावचळवळीत झालेली लाला लजपत राय यांची हत्या, भगतसिंग-राजगुरू- सुखदेव या क्रांतीकारकांची फाशी बाबुला मनोमन टोचत होती. त्यांच्या त्रासाचे चटके जणू काही बाबुला होत होते.अश्या बाबूची सहनशीलता जणू संपली आणि क्रोधाचे रूपांतर क्रियेत झाले. दिनांक १२ डिसेंबर १९३०, शुक्रावरचा दिवस! मुंबईतील काळबा देवी परिसरात विदेशी मालाने भरलेले ट्रक त्या दिवशी येणार होते.हा माल दोन व्यापारांनी विकत घेतला होता. या मालाला अडवण्याची जबाबदारी काँग्रेस पार्टीने बाबू गेनूला दिली होती. बाबू गेनू आपल्या 'तानाजी पथकाला' सोबत घेऊन त्या ठिकाणी येऊन सकाळी ७.३० वाजता उभा होता. आंदोलन पाहण्यासाठी तुफान गर्दी होती. इंग्रज अधिकारी फ्रेजर याला या आंदोलनाची आधीच खबर होती. त्यामुळे पोलिसांची तुकडी सुद्धा तिथे हजर होती. मालाने भरलेला ट्रक आला. भारतमातेच्या घोषणा देत मोर्चा ट्रकापाशी वळला. हा मोर्चा पोलिसांनी मागे हटवला. बाबू गेनूची वेळ आली. इंग्रज अधिकाऱ्याने बाबू गेनू वर ट्रक चालकाला बाबूवर ट्रक चालवण्याचा आदेश दिला. पण ट्रक चालक हा 'बलवीर सिंह' नावाचा हिंदुस्थानी होता. "मी एक हिंदुस्थानी असल्याने मी एका हिंदुस्थानी व्यक्तीवर ट्रक चालवणार नाही" असे म्हणताच; इंग्रज अधिकाऱ्याने त्याला ढकलून बाबू गेनू वर ट्रक चढवला. बघताच क्षणी तो कोवळा देह आणि भूमी रक्ताने माखली. सकाळी ११ वाजता हि घटना घडली. अन सांयकाळी उपचारादरम्यान ४.५० वा.बाबू गेनूने डोळे मिटले. हा अवघा २२ वर्षांचा देह देश-धर्माकरिता तळमळत होता. त्यांच्या अंगातल्या ह्या देशभक्तीच्या आगीचे रूपांतर हौतात्म्यात झाले. हुतात्मा बाबू गेनू अखंड स्वदेशीकरिता लढले परंतु आज हा भारत देश विदेशी स्वीकारून त्यांचे बलिदान विसरला आहे. कारण लोकांची माया हि देशावर नसून देहावर आहे....जेव्हा लोक देव देश धर्मावर माया करणार तेव्हा ह्या २२ वर्षांच्या तरुणाला खऱ्या अर्थी श्रद्धांजली प्राप्त होणार.
No comments:
Post a Comment