त्याने बलात्कार केला नव्हता....

(मोकदमी मिळण्याबाबत पत्र)
शिवछत्रपतींच्या काळात एक रांझ नावच गाव होत.त्या गावचा एक पाटील होता. त्याच नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर. आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो. तो अनेक ठिकाणी महादाराला बसलेला आहे. तो मोठा माणूस होता. गावच्या पाटलाला महदारात सामावून घेण्याची परंपरा होती. त्याचे उल्लेख अनेक पत्रात आढळतात. पण त्याला शिवछत्रपतींनी चौरंग करण्याची शिक्षा दिली. म्हणजे  त्याचे कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तोडने.
(मोकदमी मिळण्याबाबत पत्र)
हि शिक्षा ताबडतोब अमलात आणली गेली. त्याचा गुन्हा शाबित झाला म्हणून त्याला हि शिक्षा महाराजांनी सुनावली. पण त्याचा गुन्हा काय होता? त्याने बलात्कार केलाच नव्हता, त्याने विनयभंग हि केला नव्हता, त्याने केलेल्या गुन्ह्याचा उल्लेख जो पत्रामध्ये आहे तो म्हणजे ‘बदअमल’ असा आहे. एका नवविवाहिते सोबत बदअमल म्हणजे व्यभिचार केला. शिक्षा करून त्याला सोनाजीच्या दारात टाकण्यात आलं. सोनाजी ने महाराजांना विनंती केली, कि याची मोकदमी(पाटीलकी) मला मिळावी मी याला पोसतो. पुढे त्याला त्याला ती मंजूर झाली. म्हणून त्याचा चौरंग करायची शिक्षा शिवाजी महाराजांनी केली होती. ह्या प्रसंगावर स्व.निनादराव बेडेकर उर्फ निनाद काका म्हणतात कि, "एक सोळा वर्षाचा तरुण हातपाय तोडायची शिक्षा देतो आणि त्यावर तात्काल अमल केला जातो. हे एक सामान्य रक्त नाही. याला वाघाच काळीज लागत. शिक्षा देण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी !"
     चौरंगसारखी शिक्षा करण्यापर्यंत आज हिंदुस्थानकडे तितके धाडस उरलेले नाही. कारण निर्भया हत्याकांड होऊन आज पाच वर्ष पुर्ण झाली(१२ डिसेंबर २०१२) तरीही न्याय लागला नसून त्यानंतर शक्ती मिल, दिल्ली रिपोर्टर बलात्कार आणि कोपोर्डी बलात्कार असे अनेक बलात्कार झाले. याचे एकमेव कारण हिंदुस्थान हा लोकशाहीप्रधान असून इथले कायदे हे संविधानावर अवलंबून आहेत. इथले गुन्हे घडतात ते ह्या संविधानातल्या कायद्यांना धाब्यावर बसवुन. म्हणूनच हा शिवछत्रपतींचा आदर्श हा फक्त आरोळ्यापूर्तीच मर्यादित आहे.
     जर १६ वर्षाचा तरुण केवळ बदअमलसाठी इतकी शिक्षा करू शकतो तर उभ्या हिंदुस्थानने ज्या शिवछत्रपतींना राष्ट्रपुरुष  म्हणून स्वीकारलं आहे त्यानी बलात्कारासाठी तात्काळ ठेचून ठार मारायचा कायदा करायला हवा.  शिवकाळातली न्यायव्यवस्था जर आज अमलात आणली तर भारतात भविष्यात बलात्काराचा विचार हि कोणी करणार नाही.
Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive