गुरु हा नेहमी आपल्याला लाभदायकच असतो. मग विद्याप्राप्तीसाठी असो ज्ञानप्राप्ती असो वा संपूर्ण आयुष्य हे सुखमय जगण्यासाठी असो. असाच एक गुरु आपल्याला यशप्राप्तीसाठी आज लाभदायक आहे. तो म्हणजे हिंदू धर्मानुसार आज लाभलेला योग "गुरुपुष्यामृत ". याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल; त्यामुळे आज जाणून घेऊया गुरुपुष्यामृताचे महत्त्व.
गुरुपुष्यामृताचे महत्व:
धार्मिक ग्रंथानुसार पुष्प नक्षत्र हे शुभ मानले जाते.कारण या नक्षत्री धनाची देवता लक्ष्मी देवींचा जन्म झाला. गुरुपुष्यामृत हा योग वर्षातून फार कमी वेळा येतो. या दिवशी देवी लक्ष्मीचा घट बसवून पूजा केली जाते. गुरुचरित्र आणि लक्ष्मीव्रत कथाचे वाचन केले जाते. गुरुवारी अथवा रविवारी पुष्प नक्षत्राचा योग येतो; त्यास गुरुपुष्यामृत व रविपुष्यामृत २०१७ ला हा योग अनुक्रमे १२ जानेवारी , ९ फेब्रुवारी, ९ मार्च आणि ९ नोव्हेंबर या दिवशी आला होता. यावर्षीचा शेवटचा योग हा मार्गशीर्ष कृ. ४/५ म्हणजेच आजच्या दिवशी (७ डिसेंबर) आहे. ह्या दिवसाचा मुहूर्त सुर्योदया पासून ते सायंकाळी ७.५३ पर्यंत आहे. ह्या योगाचे महत्त्व दसरा,दिवाळी तसेच अक्षयतृतिया इतकेच आहे.
गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून केली जाणारी शुभकार्य:
पुराणानुसार गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर केलेल्या कार्यांचा लाभ हा आपल्या अपेक्षेपेक्षा दुप्पट होतो. म्हणून त्यास शुभ कार्य असे म्हणतात. या दिवशी आपण पुढील कार्य करू शकतो.- सोने-चांदींची खरेदी
- आपल्या राशीनुसार रत्नाची खरेदी
- एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक
- नवीन घरात गृहप्रवेश
- कला,साहित्य,संस्कृती,शिक्षण,तंत्रज्ञान या विषयावर संशोधन
- गुरुदिक्षा घेणे
- अनुग्रह घेणे
- लग्न कार्य करणे
- परदेश यात्रा
- नवीन व्यवसायाची सुरुवात
- या दिवशी गुरुलाभ मिळविण्यासाठी धार्मिक यात्रा करून अनेक जण अन्नदान करतात.
येत्या वर्षात (२०१८) येणारे गुरुपुष्यामृत मुहूर्त :
- ९ ऑगस्ट
- ६ सप्टेंबर
- ४ ऑक्टोबर
या दिवशी श्री देवी लक्ष्मीची उपासना करून वैयक्तिकच नव्हे तर राष्ट्रकार्याचा हि विचार करा.
No comments:
Post a Comment