कन्याकुमारी ते काश्मिर अन् ब्रम्हदेश ते बलुचिस्थान पर्यंत व्यापलेला हिंदुस्थान.म्हणजे भारत. संपुर्ण भुमी हि हिंदु धर्माने पावन झालेली. इथे राहणारे सर्व हिंदु म्हणुन हा हिंदुस्थान. जगाच्या पाठिवर जर सर्वात पवित्र असा देश कोणता? असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्या मुखी हिंदुस्थान म्हणजेच भारत देश हेच उत्तर येईल. पण हा देश पावन केला कोणी? याचे चारित्र्य पवित्र केले कोणी तर या भुमीतील देव देवता, संस्कृती, रक्ताळलेला इतिहास, छ.श्री शिवाजी महाराज,छ.श्री संभाजी महाराज,साधु-संत यांच्या मौल्यवान शिकवणीने व पराक्रमाने. परंतु सद्य परिस्थिती पाहता.भारत हा धर्मनिरपेक्ष आहे.आणि या धर्मनिरपेक्षतेखाली हिंदुची मुस्कटं बंद केली जातात.काहिंच्या मता प्रमाणे भारत हे नाव सर्वधर्म समभावी असल्याचे जाहिर होते. आणि कारण विचारताच 'इंडिया' या इंग्राजळलेल्या अक्षराची फोडणी करुण आम्हि सर्वधर्म समभावी आहोत म्हणुन नारा दिला जातो. याच 'सर्वधर्मसमभावी' या शब्दाखाली मात्र हिंदु धर्म हाच आम्हाला नकोसा झालाय.हिंदु धर्म फक्त राजकारणात मतं घेण्यापुर्ती उरलाय. पण सत्य परिस्थिती पाहता.ज्या 'भारत' या नावाला सर्वधर्म अथवा धर्मनिरपेक्ष हि उपमा दिली जाते. तो शब्दच मुळात हिंदु आहे.आणि हिंदुस्थान पेक्षा हि अतिप्राचिन आहे हे मात्र आम्हि विसरतो. दशरथ राजाला दिलेल्या वरदानाप्रमाणे त्यांच्या पुत्राच्या नामक आपला देश ओळखला जाईल आणि तो आहे 'भारत'..! हो भारतच आणि भारत म्हणजे हिंदुचा देश.
भरतभुमीवर म्हणजे भारतावर प्राचिन काळापासुन प्रत्येक शत्रु ने सत्ताविस्तार आणि राज्यकरण्याच्या हेतुने असंख्य युद्ध केली. आणि युद्धाला हिंदु राजाने सडेतोड उत्तर दिले आहे.याची साक्ष इतिहास आहे.इतिहास नेहमी अहिंसेने शांततेने जन्मभुमी परत मिळवा असे कधीच सांगत नाहि.तर; जर जगात व्यक्ति म्हणुन टिकायचे असेल तर शस्त्र आणि शास्त्र हातात घ्या. हिंदुंची परमदेवता पुण्यशील भगवद् गीतेत हि लिहले आहे धर्मसरंक्षणासाठि अधर्मावर मात करण्यासाठि नेहमी शस्त्र हातात घ्या. मग ते युद्ध रामायण,महाभारतातलं असो वा मुघल साम्राज्यावर छ.शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल हिंदवी स्वराज्य असो.त्याहि पुढे जाऊन स्वांतत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचा रक्तसंग्राम असो वा स्वांतत्र्यलढ्यानंतर आंतकवाद्यांचा केलेला सामना असो.शस्त्र शिवाय विजय हा मुळीच नाहि.
परंतु नेहमी हा इतिहास चुकिचा सिद्ध करण्यासाठि पुरोगामी व एक विशिष्ट वर्ग,संस्था पुढे सरसावतात.अन् त्याला सत्ताकारणासाठि राजकारणी तर अर्थकारणासाठि सामाजिक माध्यांमानी मात्र हिंदुंची गळचेपी केली.अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न पावलोपावली दिसत आहे.मग हिंदुची मंदिरे तोडण्यातुन,इतिहासावर घाणेरडे चित्रपट बनवुन तर खोटि पुस्तके काढुन या कामाला गती दिली जात आहे.हिंदु मात्र षंढ होऊन हे सर्व पाहुन पाश्चिमात्य संस्कृतीच्या नावाखाली मात्र धुमाकुळ घालत आहे. याच पार्श्वभुमीवर हिंदु पर्यंत आपल्याच धर्माचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे हे आपले दुर्दैव.
दुर्दैव म्हणुन हे स्विकारुन आम्हि हिंदु वार्ता नामक ब्लॉग व फेसबुक पेज सुरु केला आहे. या ब्लॉग व फेसबुक पेजवरुन हिंदु धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचे योजिले आहे. या ब्लॉगवर धारातिर्थांचे स्मरण, स्वांतत्र्यलढ्यातील बलिदान, हौतात्म्य,धर्माभिमानी, राजकिय विश्लेषण, हिंदुवार्ता, भौगलिक व्याप्ती या सदर अंतर्गत हिंदुबाबत होणार्या घडामोडी ,बातम्या आणि त्यांचे विश्लेषण तसेच सनावळीनुसार हिंदुचे पराक्रम,बलिदान यांची माहिती देणार आहोत. जो इतिहास दडपुन टाकला आहे तो नव्याने समोर आणने, हिंदुंच्या सत्य परिस्थिती ची जाणिव करुण देणे. हिंदु धर्माचा प्रचारप्रसार करणे हा छोटासा प्रयत्न हिंदु वार्ता च्या माध्यमांतुन आम्हि करणार आहोत.
अभेद्य भारत, अखंड हिंदुस्थान ह्या युक्तिप्रमाणे संपुर्ण भरतभुमीवर हिंदुंचे अस्तित्व टिकवण्यासाठि व त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठि हिंदु वार्ता नेहमीच प्रयत्नशील राहिल.
-हिंदु वार्ता
अप्रतिम उपक्रम आई तुळजाभवानी आपणास उदंड यश देवो.
ReplyDeleteआपला उपक्रम खूप चांगला आहे आणि आम्ही नेहमीच आपला साथ देऊ,हिंदू धर्म वाढी साठी नेहमी सोबत असू,जय श्री राम
ReplyDelete