मुसलमांनातून पुरोगामी नेतृत्व का उदयास येत नाही?

तीन तलाकच्या मुद्द्यावरुन भारतात अनेक प्रश्नचिन्ह उमटले आहेत. उत्तर भारतात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यावरुन असा मुद्दा समोर आला की मुसलमान भाजपला मते कसे देऊ शकतात? म्हणूनच एक अशी अफवा पसरली होती की मुस्लिम स्त्रीयांनी भाजपला मते दिले असणार. असो. खरे खोटे एव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. पण उत्तर भारतातील मुस्लिम समाजानेही भाजपला पाठींबा दिल्याचे चित्र आता तरी आपल्या समोर आहे. मुस्लिम समाजातील नेत्यांकडून आपण बर्‍याचदा ऐकत असतो की मुस्लिम समाज मूळ प्रवाहात आलेला नाही. त्यांना मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. १९४७ साली भारताची फाळणी झाली तेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या एक दिवस अगोदर पाकीस्तान हे मुस्लिम राष्ट्र स्वतंत्र झाले होते. भारताची फाळणी हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्यावरुन झाली. इतकी वर्षे मोठमोठ्या योद्धांच्या पराक्रमावर अखंड राहिलेला भारत खंडीत झाला. रक्तरंजीत फाळणी झाली. भारतातील काही मुसलमानांनी पाकीस्तानच्या रुपाने वेगळी चूल मांडली. पण ती चूल मांडल्यानंतर आपण आपलं घर व्यवस्थित सांभाळायचं, ते वाढवायचं, आपल्या लोकांना सुविधा द्यायच्या. हे न करता पाकीस्तानने नेहमीच भारतावर कुरघोडी केल्या आहेत. आपला एक डोळा फुटला तरी चालेल, पण शेजारच्याचे दोन डोळे फुटले पाहिजेत, अशीच मानसिकता पाकीस्तानची राहिलेली आहे. आता जो मुसलमान समाज पाकीस्तानात न जाता भारतात राहिला त्यांच्याबद्दल आपण विचार करणार आहोत.
हिंदू धर्मात ज्या कुपद्धती भूतकाळात होत्या व आता नाहीत, अशा गोष्टींची आठवण काढत भारतातील स्वयंघोषित पुरोगामी मंडळी हिंदू धर्मास दोष देत असतात. कदाचित अजूनही काही चुकीच्या गोष्टी हिंदू धर्मात घडत असतील. पण आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की हिंदू धर्मातील वाईट पद्धतींवर हिंदूंनीच रान उठवलं आहे. ज्या ज्या गोष्टी आधुनिक युगासाठी हानिकारक आहेत, त्या त्या गोष्टी हिंदूंनी काढून टाकल्या आहेत. आपल्या ग्रंथात हजारो वर्षांपूर्वी हे लिहिले होते म्हणून जगाच्या अंतापर्यंत त्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे. नाहीतर ईश्वराचा कोप होईल असा अट्टाहास हिंदूंनी धरला नाही. काही अपवाद असू शकतात. पण बहुसंख्य हिंदू समाज सुधारणावादी आहे. दाभोळकरांपासून अनेक मंडळींनी हिंदू धर्मावर ताशेरे ओढलेले आहेत. पण जेव्हा मुस्लिम पंथाचा प्रश्न निघतो तेव्हा सर्व एकाएकी चिडीचुप्प होतात. काही अंशी दाभोळकरांनी मुस्लिम पंथातील अंधश्रद्धेवर आवाज उठवला आहे. पण ती सुधारणा म्हणता येणार नाही. मुस्लिम पंथ आजही दीड हजार वर्षांपूर्वीचाच विचार करीत आहे. मी असं नाही म्हणणार की झाडून सगळेच मुसलमान असा विचार करतात. पण बहुसंख्य मुस्लिम समाज अजूनही एकरुप झालेला नाही. सीमाभागातील मुस्लिम तरुणांचा प्रताप आपण बातम्यांमध्ये पाहत असतो, वर्तमानपत्रांत वाचत असतो. आता ईदच्या मुहूर्तावर श्रीनगरमधल्या ईदगाह, पुलवामा आणि अनंतनागमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यात आले. काश्मीरच्या तरुणांनी पाकीस्तानचे झेंडे हातात घेत सैन्यावर दगडफेक केले. महत्वाची बाब म्हणजे ईदचा नमाज संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी रस्त्यावर उतरले होते. ही भारतीय मुस्लिम समाजाची समस्या आहे आणि भारतीय मुस्लिम समाजाने भारतावर लादलेली समस्या आहे. काही दिवसांपूर्वी नौहट्टा परिसरातील मशिदी बाहेर मोहम्मद अयूब पंडित या पोलिस अधिकार्‍याला क्रूरपणे ठेचून मारलं. तरी सुद्धा यावर पुरोगामी मंडळी गप्प आहेत. १९४८ साली एका नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली, त्यानंतर कॉंग्रेसने आणि पुरोगाम्यांनी सबंध हिंदू समाजाला नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. भगवा दहशतवाद असे शब्द उच्चारण्यात आले होते. पण याच कॉंग्रेसला आणि पुरोगाम्यांना हा चेहरा कधीच दिसला नाही. कारण डोळे असूनही त्यांनी गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी लावून घेतली होती. असो.
मुस्लिम समाजातील स्त्रीयांसमोरही अनेक प्रश्न आहेत. तीन तलाकसारखे भयानक कायदे आज स्त्रीयांना सतावत आहेत. तीन तलाकबद्दल सांगताना अनेक मुस्लिम विद्वान कुराणात काय लिहिलं आहे, याचा दाखला देतात. कुराणानुसार कशाप्रकारे तीन तलाकची अंलबजावणी करावी, याचे स्पष्टीकरण देतात. पण एकही मुस्लिम विद्वान असं म्हणत नाही की ही प्रथा त्या काळी जरी श्रेष्ठ असली आता मात्र ती बदलायला हवी. असा विचार एकाच्याही मनात येत नाही. कॉंग्रेस सकट सर्व पुरोगामी मंडळी याबद्दल तोंड उघडायला तयार नाहीत. पण हिंदू समाजातील शांतचित्ताने करण्यात येणारी सत्यनारायणाची पूजाही यांना खटकते. कपिल सिब्बलांसारखे मागासलेल्या विचारांचे कॉंग्रेसी वकील तर तीन तलाक ही १४०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा असून ती गैर-इस्लिमिक नसल्याचे सांगतात. जर प्रश्न हिंदू धर्माचा असता तर सगळे एकाएकी तुटून पडतात. पण त्यामुळे हिंदूंना काहीच फरक पडत नाही. हिंदू हा अद्ययावत होत जाणारा धर्म आहे. तो सतत नुतनीकरण स्वीकारतो आणि तरीही आपली पाळेमुळे घट्ट पकडून ठेवतो. हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी अनेक आक्रमक आणि क्रूर राक्षस आले. पण वेळोवेळी शिवरायांसारख्या पुण्यवंतांनी या राक्षसांचा नायनाट केला आहे. शिवरायांनी तर गेल्या ५०० वर्षात कुणालाही जमले नाही असे हिंदूंचे स्वराज्य स्थापन केले. ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. ते हिंदू होते म्हणूनच त्यांनी जाती-पाती व धर्म-पंथात भेदभाव केला नाही व आपल्या प्रजेला सुखात ठेवले. आधुनिक काळातही अनेक कुप्रथा हिंदू समाजसुधारकांनी बंद पाडल्या आहेत. सावरकरांसारखं बहुआयामी व्यक्तीमत्व हिंदू समाजात जन्म घेतं, हे केवढे थोर भाग्य. त्यांनी इंग्रजांशी दोन हात केलेच, अंदामानात कैद्यांना साक्षर केले, तसेच त्यांनी रत्नागिरीत पुर्वस्पृश्यांसाठी मोठी क्रांती केली. महावीर जैन, गौतम बुद्ध, चार्वाक सारखे महामानव हिंदू धर्मातच जन्मले. त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. तरीही हिंदू धर्म अजूनही तग धरुन आहे. नव्हे नव्हे तो तर सतत नुतन होत आहे. इतकेच काय तर या बंडखोर महापुरुषांचा बहुसंख्य हिंदूंनी नेहमीच सन्मान केला आहे. त्यामुळे यापुढे जर काही बदल करायचा असेल, जर कोणताही उपदेश करायचा असेल तर पुरोगामी मंडळींनी हिंदू समाजाला तो न करता, मुस्लिम समाजाला केला पाहिजे. मी तर स्पष्ट म्हणेन की या पुरोगामी मंडळींना मुस्लिम समाज विचाराने मागासलेलाच असायला हवा आहे, मुस्लिम समाजाने मूळ प्रवाहात न येता मागेच राहिले पाहिजे, अशीच पुरोगाम्यांची धारणा आहे. मुस्लिम समाजातील युवकांची डोकी भडकलेलीच असली पाहिजे हेच पुरोगाम्यांच्या राजकारणाचे ध्येय आहे, असे दिसते. पण आता काळ बदलत आहे. उत्तर प्रदेशचा निकाल काही वेगळेच सांगतो आहे. काही मुस्लिमांना स्वतःहून मूळ प्रवाहात येण्याची इच्छा आहे. पण इतकी वर्षे वेगळ्या पद्धतिने राहिल्यामुळे अचानक हा बदल स्वीकारणे अर्थातच कठीण जाईल. आपण नेहमी अशी टीका ऐकतो की धोतर नेसणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे. ते आहे की नाही हा वाद आपण इथे न घालता. बहुसंख्य मुस्लिम समाज नेहमीच त्यांच्या पारंपारिक वेशात वावरत असतात. मग सनातनी कोण आहे? हिंदू समाज की मुस्लिम समाज? का मुस्लिम समाजात पुन्हा हमीद दलवाई जन्माला येऊ शकले नाही? का हा समाज स्वतःला वेगळा भासवत आला आहे? आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत, असे या समाजाला का दाखवायचे असते? आता हिच वेळ आहे मुस्लिम समाजाने जागृत झाले पाहिजे. यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. आजचे सगळे तरुण आधुनिक शिक्षण घेत आहेत किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना आधुनिक जगाचे भान आहे, असे आपण गृहित धरण्यास हरकत नाही. या तरुणांनी आपल्या पंथात असलेल्या कुप्रथा दूर केल्या पाहिजे. मुसलमानांतून आता पुरोगामी नेतृत्व जन्मास यायला हवे, अशी परिस्थीती सध्या उपलब्ध आहे. मुस्लिम समाजाला हिंदूंशी लढवून देशावर राज्य करणारे कॉंग्रेस सरकार आता सत्तेवर नाही. तर मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असलेले भाजप सरकार आता सत्तेवर आले आहे. मोदींना राक्षसाचा दर्जा देणार्‍या कॉंग्रेसींना भारतीय जनतेने धडा शिकवला आहे. आता वेळ आली आहे मुस्लिम स्त्री-पुराषांनी या जगाचा पुन्हा नव्याने विचार करण्याची. आता वेळ आली आहे मुस्लिम समाजातून पुरोगामी नेतृत्व उदयास येण्याची. नाहीतर पुढील अत्याधुनिक काळात या समाजाला स्वतःला जुळवून घेणे कठीण होऊन बसेल.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Share:

1 comment:

  1. विषाच्या विना कां विषाच्या सहित।
    असा भेद मुंगुस न आणि मनात।।
    दिसे त्या क्षणी मारीतो भुजंगास।
    वधा म्लेंच्छ हे सत्य सांगी जगस।।

    वरील गुरुजीनच्या श्लोका प्रमाणे यांचा एकच इलाज आहे,
    राहिला प्रश्न त्यांच्यातून पुरोगामी नेतृत्व उदयास येण्याच्या,तर तो कधीच येऊ शकत नाही,इस्लाम च्या वर जाउन एखाद्या देशाच्या,समाजाच्याकिंवा मनावतेच्या हिता करिता स्वतःहा बदल करने याला इस्लाम तर परवानगी देतच नाही,पन मुस्लिम ही तय जडन घडनी नाही,आणि चुकुन एखड़ी तस्लीम नाजरीन,सलमान रश्दी अथवा तारिक फतेह आलाच तर मग त्याला ते इस्लामिक देश सोडूनच जावे लगते,आणि त्यांचा इलाज करण्यास दाभोलकरांन इतका वेळ त्यांना लागत नाही

    ReplyDelete

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive