आज भारत सरकार आणि भारतातील बहुतेक प्रसार माध्यमे कुलभुषण जाधव आणि परिवार
यांच्या मानवीय आधारावर घडलेल्या भेटित कुलभुषण जाधव यांच्या आई आणि पत्नीनवर झालेल्या
अमानवीय मानसिक छळावर आकांड-तांडव करत असले तरी, हा हल्लकल्लोळ भारताचे परराष्ट्रनीती चे धोरणात्मक अपयश
लपविण्याकरिता चालवलेला आहे. कोणत्याही देशाच्या परराष्ट्रनीतीमध्ये एक वेगळी आणि अव्यक्त अशी ‘शत्रुराष्ट्रनीती’
सहभागी असते. जे राष्ट्र या नितीचा योग्य उपयोग करतात त्यांना या विश्वपटलवार
कधीही मान खाली घालावी लागत नाही.
भारतासमोर ही समस्या आहे की, पाकिस्तान भारतासोबतच्या ‘शत्रुत्वाच्या नात्यास’ सर्वोतोपरि समर्पित असला तरी, भारताने
मनापासून ‘पाकिस्तान हा आपला शत्रु आहे’ असे स्विकारले नाही. आणि जर का
स्विकारले असते; तर पाकिस्तान नावाच्या समस्येचे निराकरण भारताने काही दशकं अधिच
केले असते. कुलभुषण जाधव यांच्या परिवारास झालेल्या
मानसिक छळास भारत सरकार सर्वोतोपरि जबाबदार आहे. मागील सहा महिन्यात कुलभुषण जाधव
यांची सुटका, त्यांच्या जीवंत
असल्याचे प्रमाण आणि परिवाराशी भेट यास लक्ष करुण सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वात
भारताचे परराष्ट्र मंत्रालय ‘मेडिकल डिप्लोमेसी’ चे जे आमिष पाकिस्तानास देत होती, ते अमिष
स्विकारुन पाकिस्तान ने आपल्या जनतेच्या फायदा तर करुण स्वार्थ सिद्धि तर आधीच
केली होती. पण मोबादल्यात जी कुलभुषण जाधव आणि परिवार
यांची भेट भारतास अपेक्षित होती, ती भेट घडवून जाधव यांच्या परिवाराचे अपमान
करुण, पुर्वनियोजित पाकिस्तानी मिडिया ट्रायल चा भडीमार करुण, पुन्हा पुन्हा
जाधव यांचा ‘दहशतगर्द’ आणि ‘पाकिस्तानी आवाम का मुजरिम’ असा उल्लेख करुण नितीगत यश
आपल्या पदरात पाडून घेतले.
मी एक हिंदुस्थानी म्हणुन श्री. जाधव यांच्या
आई आणि पत्नी यांच्या संयमास शतदा नमन करतो. कारण पाकिस्तानी मिडिया समोर त्या ‘ब्र’ जरी
उच्चारल्या असत्या तर पाकिस्तान ने त्या ‘ब्र’ चा ‘ब्रम्हास्त्र’ करुण भारतावरच
डागला असता. हे सगळ होणार याची कल्पना भारतास नव्हती का? किंवा आतंकवादाने भारतास रक्तबंबाळ करणाऱ्या पाकिस्तानवर भारताच्या परराष्ट्र
मंत्रालयास इतका विश्वास होता कि तो भेटीच्या सर्व अटी तंतोतंत पाळेल म्हणुन? की भारतातील मुस्लिम लोकांना भारता विरुद्ध तयार करण्याचे सामर्थ्य असलेला
पाकिस्तान हा महामूर्ख आहे असा समज भारत सरकारचा झाला
होता? पाकिस्तान हा आपला शत्रु आहे. या शत्रु सोबत कधी हा हिंदुस्थान शत्रु सारख वागेल? हीच भेट संयुक्त
राष्ट्रसभेच्या आखात्यारीत्या घडविता आली असती किंवा पाकिस्तान
सोडून इतर कुठल्याही देशात ही घडु शकली असती ! "पकिस्तानवर आमचा विश्वास नाही, आम्ही जेव्हा
जेव्हा यांच्यावर विश्वास केला तेव्हा तेव्हा पाकिस्तान ने आमच्या पाठित खंजिर खुपसले
आहे" असे रडगाने युनायटेड नेशन काउंसिल समोर गायलो असतो. काय झाले असते अजुन
काही महीने लागले असते भेट व्हायला ! पण भारत सध्या ज्या नामुष्कीला सामोरे जातोय, त्यापासुन तर
वाचलो असतो, आणि जर संयुक्त
राष्ट्रा समोर इतर देशात
ही भेट घडली असती तर पकिस्तानाची खरी दोन दमड़ी ची लायकी विश्वा
समोर आपण पुन्हा प्रतिपादित करुण भरगोस नितीगत यश प्राप्त केले असते. पण हे करणार
कोण? "ते केवळ पाठीचा कणा ताठ असलेल्यांनाच शक्य होते" शत्रु सोबत शत्रु सारखे वागण्यात
लाज वाटणार्यांना हे शक्य नाही. श्रद्धेय श्री.संभाजीराव भिडे गुरुजी आपल्या एका श्लोकात म्हणतात,
इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।
ठेचु शकला यवना जरी व्हाल जागे ।।
संपूर्ण नाश अरीचा जरि ना कराल ।
विश्वात राष्ट्र म्हणुनी कधी ना टिकाल ।।
पण दुर्दैव हे की आजही या देशाच्या नेतृत्वाची इतिहासापासुन शिकण्याची
मानसिकता दिसत नाही. ९०० वर्षा पुर्वी ज्या चुका वीर पृथ्वीराज चौहान यांनी घोरी
बाबतीत केल्या त्याच चुका आधी काँग्रेस चे आणि आता वर्तमान सरकार पाकिस्तान बाबतीत
करत आहे. कुलभुषण जाधव प्रकरण हाताळण्यात
वर्तमान सरकारची मानसिकता स्पष्ट सांगत आहे की या आधीच्या आणि आताच्या सरकार मध्ये
खुप असे अंतर नाही. गांधी नेहरूंच्या कृपेने पाकिस्तान अस्तित्वात आल्या पासुनच
पाकिस्तान भारतासोबत ‘युद्धनीति’ नुसारच वागतोय. पण भारत तथाकथित ‘कुटनीती’ म्हणा
वा ‘फोलनीती’ ने वागतोय. ज्या पाकिस्तान ची मानसिकता
तुमचा समूळ विनाश करण्याची आहे आणि त्याकारिता तो सतत युद्धस्थ आहे; जेव्हा शक्य तेव्हा
संधी साधून तो सिमेवर तुमच्या सैनिकांसोबत लढतोय, शांतिकाळात तो दहशतवादी तुमच्या सिमेत पाठवून लढतोय, आपल्या देशात डाव्यांची, फुटीरतावादी, राष्ट्रद्रोहयांची संख्या वाढवून तो लढतोय. अश्या पाकिस्तानकडून
श्री. जाधव यांच्या प्रकरणात
योग्य आणि न्यायसंगत वर्तनाची अपेक्षा ठेवणे म्हणजे पराकोटीची मुर्खता आहे. गरज
आहे भारताने आता विषाची पुन्हा पुन्हा परीक्षा घेणे बंद करावे. गरज आहे ती
"पाकिस्तान हा भारताचा शत्रु आहे" हे
काया, वाचा आणि मनाने स्वीकारून
त्याच्या समूळ आणि स्थायी नायनाटाकरिता सिद्ध होण्याची..!
अहि चावता प्राण जातो खचित ।(अहि-साप)
तया देखता मारणे हे उचित ।।
तसे देश शत्रू टिचोनी वधावे ।
तरी राष्ट्रगाडा यथोचित धावे ।।
- - धारकरी विशालराव शर्मा,
-
श्री शिवप्रतिष्ठान
हिंदुस्थान (मलकापूर विभाग)
जयस्तु हिंदु राष्ट्र
ReplyDeleteजय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय उदयनराजे