आपण आयुष्य जगत असताना आपल्या हयातीत अनेक महापुरुष योगीपुरुष होऊन जातात.अन् आपल्याला त्यांची ओळख हि होत नाहि. असेच एक संत महात्म्यपुरुष महाराष्ट्राच्या भुमीवर स्वांतत्र्यकाळात होऊन गेले; ज्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुर्ती सिमित नसुन संपुर्ण भारतव्यापक होते.श्रीदत्त उपासक,श्री समर्थ शिष्य ते म्हणजे श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी म्हणजे एक वेगळीच अनुभुती.जी महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारताने हि त्यांच्या शिकवणीचा व पदस्पर्शाचा आनंद घेतला. ह्या महान हस्तीबद्दल आपण जाणुन घेऊया.
समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली ।
जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।
जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा ।
मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।।
(श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी) |
श्रीधर स्वामींचा जन्म हा विधीलिखितच होता.त्यांचे वडिल नारायणराव देगलुरकर हे मुळचे हैदराबादचे. श्रीधर स्वामींची माता कमलाबाई. या दोन्हि दांम्पत्यांच्या देगलुकरकर या घराण्याला सर्पशाप होता. श्रीधर स्वामींच्या जन्माबाबत खरी हकिकत या सर्पशापात होती. देगलुरकरांच्या घरी एक दिवस मोठा नाग निघाला.त्याला मारु नये तो तुमचा रक्षण कर्ता आहे असे अनेकांनी बजावुनहि देगलुरकर घराण्यापैकि एकाने नागाच्या फणावर गोळी मारली व नाग ठार झाला.त्या रात्री एक ब्राम्हण पतकिंच्या पुरुषाच्या स्वप्नात येऊन म्हणाला " आज तुम्हि मला ठार मारले मी तुमचा रक्षणकर्ता होतो पण तुम्हाला ते पहावले नाहि.तुमच्या वंशाचा नाश होईल.ब्राम्हणाचे पाय धरल्यावर त्यांनी उःशाप दिला ह्या कुळाचा उद्धार करणारा बालब्रम्हाचारी संन्यासी तुमच्या घरी जन्म घेईल जो तुमच्या कुळाचा व विश्वाचा उद्धार करील . त्यानंतर देगलुरकर घरण्याला उतरती कळा लागली.अनेक माणसे मेली.या भितीने वंश संरक्षणाला धरुण नारायणराव व कमळाबाई चिंतीत होत्या.त्यांना आधी हि मुलं होती.पण उपाध्यांनी गाणगापुरला जाऊन दत्तगुरुंची कृपा प्राप्ती घ्या. असे सुचवले.स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इ. स. १९०८ साली आजच्या दिवशी झाला,स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, "आम्ही मूळ गाणगापूर येथीचे असे".
स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म...
म्हणून दत्त जयंती च्या दिवशी,गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला..
महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले,तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासून च होती तीच ओढ स्वामींना सज्जनगड ला घेऊन आली..अध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इ.स.१९२७ साली विजयादशमी दिवशी स्वामींचे गडावर आगमन झाले.
सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.
ज्या प्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले त्याच प्रमाणे अवघ्या ३ वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी १९३० च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली.त्यांच्या आज्ञे प्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला.शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला.१९४२ च्या विजयादशमीच्या शुभमुहुर्तावार संन्यास स्विकारला.स्वामीजींनी ब्रम्हचार्यातुन थेट संन्यासाश्रम स्विकारला.
श्रीधर स्वामी म्हणजे नेहमी हसरा चेहरा, प्रसन्न मुद्रा.ते जिथुन चालत त्या रस्त्यावर लोकांना जागीच समाधी प्राप्त होत.स्वामीजींचे कार्य हे मुळ धर्मप्रसाराचे होते.त्यांनी सनातन वैदिक धर्माची जनजागृती केली.हिमालयापासुन कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासुन बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर भारत,मध्य भारत,दक्षिण भारत असा धर्मप्रचार केला.अनेक धर्मसभा घेतल्या.बारा वर्ष आसेतु हिमालय धर्म जागृतीचें कार्य केले त्यानंतर त्यांनी बारा वर्ष भारत भ्रमण केल्यावर एकांतवास भोगला. सन १९६० ते ७३ असा एकांतवास स्विकारला.
मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला.आणि वरील सर्व तीर्थ क्षेत्राचा विकास केला .अनेक ग्रंथ,स्तोत्र रचना स्वामींनी केली.आणि १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली....
स्वामीजींनी आपल्या आयुष्यात लहान मोठे असे चाळिस ग्रंथ लिहिले.श्रीराम पाठ, मारुती पाठ, श्रीसमर्थ पाठ, विवेकोद्य,मुमुक्षुसखा अशी काव्यमय ग्रंथ तर आर्यसंस्कृती नामक पाचशे पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुधर्म,वैदिकधर्म,नितीधर्म,रा ष्ट्रधर्म अश्या अनेक विषयांवर विवेचन हि केले.
समर्थांना सुद्धा दत्तात्रेय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेजघरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधी च्या मागे सिंहासनावर विराजमान आहेत.
जेव्हा-केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तू मध्ये दर्शन घेऊन अध्यात्मिक अनुभूती चा अनुभव नक्की घ्या ..
दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमंत परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत...
स्वामींना एकच मागणे मागू...
व्हावी पूर्ण कृपा गुरू मजवरी प्रारथीत भावे तुला ।
वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया संमोह जो वाढला ।
अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांती पदी बैसवी ।
विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी ।।
© प्रवीणबुवा रामदासी
अतिशय सुंदर आणि समर्पक लेखन..👌👌
ReplyDelete