• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

Pen : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना गडसंवर्धन करताना सांकशी गडावर सापडल्या तीन पुरातन मूर्त्या



HinduWarta : शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला (Pen) दिलाय तो जपण्यासाठी हे आचरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत. या मोहिमेच्या कार्याची पोचपावती म्हणून यंदा कार्य करताना 3 पुरातन मूर्त्या धारकऱ्यांना सापडल्या. या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी, सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात.

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील 47 वी मोहीम राबवत असता, गडावरील पाण्याचे टाके साफ करत असताना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती अशा 3 पुरातन मूर्त्या टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या.


आजपर्यंत गडावर 46 संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून झाल्या आहेत. त्यामधे गडावरील दगड, माती, गाळ याने भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले आहे. पण आजची मोहीम ही झालेल्या सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेवून जाणारी मोहीम ठरली.

यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण (Pen) करुन गडाला नारळ, हार वाहून पूजा करत होते आणि प्रत्येक जण गडाच्या गड देवतेला साकडं घालत होते. गड संवर्धन कार्य करणाऱ्यांना शक्ती आपल्या कार्याला यश दे, तसेच ज्याप्रमाणे शिवकाळात, मागच्या काळात आपल्या मावळ्यांनी, पूर्वजांनी गडावर आपल्या देव-देवदेवतेची पूजा केली असेल ते भाग्य आम्हाला आजच्या काळात मिळू दे आम्हाला सुद्धा गडावरील देव-देवतांची सेवा करायची, पूजा करायचे भाग्य मिळू दे साक्षात आज सांकशी गडाच्या गड देवतेने आणि आपल्या भगवंतांनी श्री महादेवाच्या रुपात नंदी महाराजांच्या रुपात गड देवतेच्या रुपात दर्शन दिले.

गडावर सर्व देवतांचे अभिषेक घालून पूजा आणि आरती करुन भंडारा उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.


Share:

Amit Shah : मुस्लिम पर्सनल लॉ शरियानुसार असेल तर फौजदारी कायदा का नाही? - अमित शाह




Hinduwarta : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) आणला नाही कारण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घटनात्मक चर्चेच्या समाप्तीनंतर मुस्लिम वैयक्तिक कायदा आणला होता. सर्व धर्मांसाठी एकच कायदा असावा की नाही हे मी काँग्रेस पक्षाला स्पष्ट करण्यास सांगतो. तुम्ही मुस्लिम पर्सनल लॉचे समर्थन करता का? काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले, यापेक्षा मोठी फसवणूक होऊ शकत नाही, त्यांनी हिंदू कोड बिलही आणले. हिंदू न्यायशास्त्राच्या आधारे कायदे व्हावेत असे मला वाटत नाही. परंतु हिंदू संहितेकडे पाहिले तर जुन्या हिंदू न्यायव्यवस्थेचा एकही उल्लेख नाही. "हिंदूंना वाईट वाटू नये म्हणून, समान कायद्याला हिंदू कोड बनवण्यात आले."


तुम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या वर जाऊ शकत नाही

अमित शहा म्हणाले, काँग्रेसने मुस्लिम पर्सनल लॉ आणल्यानंतर तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले. तुम्ही UCC आणू शकत नाही कारण तुम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर उठू शकत नाही. उत्तराखंडमध्ये (Amit Shah) आमच्या (भाजप) सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू केला आहे.


काँग्रेसला मुस्लिमांना ५० टक्के आरक्षण द्यायचे आहे

धर्मावर आधारित आरक्षणावर हल्ला करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “काँग्रेसने खोटे बोलणे सुरू केले की ते आरक्षण 50% पर्यंत वाढवतील. अशी दोन राज्ये आहेत जिथे धर्माच्या आधारावर आरक्षण आहे. हे असंवैधानिक आहे. त्यांना ओबीसींना प्रोत्साहन द्यायचे नाही. त्यांना ५०% मर्यादा वाढवून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे. आम्ही ते धर्म आधारित आरक्षण लागू होऊ देणार नाही.


कलम ३७० हटवलं तर जम्मू-काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, असं काँग्रेस म्हणायची.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “जेव्हा नरेंद्र मोदी 2019 मध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा आम्ही (Amit Shah) कलम 370 आणि कलम 35A संसदेत रद्द केले. जम्मू-काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, असे ते (काँग्रेस) राज्यसभेत म्हणायचे, पण दगडफेक करण्याचे धाडसही कोणात नव्हते. (कलम ३७० हटवल्यानंतर) पहिल्यांदा ३५,००० पंचायत सदस्य निवडून आले. 

स्वातंत्र्यानंतर दोन लाखांहून अधिक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आले, दहशतवादी कारवाया 92 टक्क्यांनी कमी झाल्या, पहाडी, गुज्जर आणि बकरवाल समाजाच्या लोकांना आरक्षण मिळाले, लाल चौकात राष्ट्रध्वज फडकत आहे, चिनाब नदीवरील रेल्वेची सर्वोच्च कमान आहे बांधले जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तुमचे (काँग्रेस) तुष्टीकरणाच्या राजकारणाचे दुकान बंद झाले.

Share:

Delhi Crime : हॉटेलमध्ये जेवताना सावधान! नाज हॉटेलमध्ये किळसवाणी घटना; थुंकुन रोटी बनवण्याचे प्रकार सुरूच!

Hinduwarta : दिल्लीहून गाझियाबादच्या (Delhi Crime) मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नाज हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्याचा किळसवाना प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या एका व्यक्तीने संशय आला म्हणून व्हिडिओ बनवला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्या व्यक्तीने हॉटेल मालकाकडे तक्रार केली असता त्यालाही मारहाण करण्यात आली. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी हॉटेल मालक आणि आरोपीला अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडितेने मोदीनगर पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोटी बनविणाऱ्या अल्पवयीन मुलाला तसेच त्याला मदत करणाऱ्या अबिदला अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मोदीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णा नगर कॉलनीतील गल्ली क्रमांक 2 जवळ नाज चिकन पॉइंट नावाचे हॉटेल आहे. इकडे गोविंदपुरी येथे राहणारा भीम सिंह यांचा मुलगा प्रकाश सिंह त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला असता दीपकची नजर रोटी बनवणाऱ्या (Delhi Crime) व्यक्तीकडे गेली जिथे तो थुंकून रोटी बनवत होता. दीपकने ही माहिती प्रकाशला दिली असता हॉटेल मालकाने त्याला चुकीचे ठरवून मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.


Share:

Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिरच! ४८ वर्षानी मुस्लिम संघटनेचा फेटाळला दावा



कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी (Durgadi Fort) किल्ल्याला तब्बल ४८ वर्षांनी न्याय मिळाला आहे. मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने केलेला दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने अखेर फेटाळला आणि या मंदिराची जागा राज्य शासनाच्या मालकीचीच आहे असे ठामपणे सांगितले. यासोबतच या किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचा दावा कोर्टाने केला आहे. 


या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या संघटनेनी केली होती. परंतु, ही विनंतीही न्यायालयाने फेटाळली. 

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचं ऐतिहासिक मंदिर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ देखील आहे. या किल्ल्यावर (Durgadi Fort) मुजलिसे मुसावरीन औकाफ या संघटनेने ही जागा मुस्लिम धर्माच्या ईदगा आणि मशीद यांच्या मालकीची आहे. त्यांची मालकी घोषित करावी, असा दावा 1974 साली कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  


Share:

Ghatkopar : मोहम्मद युनूसचे नोबल काढून घ्या; बांगलादेशविरोधात घाटकोपरमध्ये एल्गार!




घाटकोपर : गेले अनेक दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंच्या चाललेल्या नरसंहाराविरोधात आता भारतात आणि महाराष्ट्रात हिंदू पेटून उठत आहेत. या नरसंहार आणि स्वामी चिन्मय दास यांच्या अटके विरोधात घाटकोपर येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी काळ्या फिती लावून, हातात मशाल आणि भगवा घेऊन शेकडो हिंदू एकवटले. 


घाटकोपर येथील विक्रांत सर्कल ते घाटकोपर रेल्वे स्टेशन असा हा मोर्चा होता. यावेळी बांगलादेशाविरोधात घोषणा करण्यात आल्या तर मोहम्मद युनूसचे नोबल काढून घ्या, हिंदूंवर बांगलादेशमध्ये होणारे अत्याचार थांबवा, तर हिंदूना न्याय द्या अशा घोषणा आणि मागणी करण्यात आली. 

Share:

सर्वच्या सर्व उमेदवार हे....!? जाणून घ्या-काय म्हणाले संभाजी भिडे?






श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींनी सकाळी सांगली येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, ''मी नेहमीच प्रत्येक निवडणूकीत मतदान करतो. हे मतदान राजकीय नाही, तर ते देशाच्या समृद्धसाठी आहे. ते मतदान मातृभूमीच्या कल्याणासाठी आणि तिचे उपकार फेडण्यासाठी आहे. आपला देश राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी कोणतीही फालतू कारणे न सांगता आपले कर्तव्य केलेच पाहिजे. लेकरू रडायला लागल्यावर आई त्याला पदराखाली घेते. ते जसे तिचे सहजच कर्तव्य होऊन जाते; तसेच कर्तव्य मतदानाच्या बाबतीत लोकांनी केले पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. निवडणुकीला सगळ्याच पक्षातले लोकं उभी राहिली आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे - आपण सर्व मातृभूमीची लेकर आहोत. आपण मातृभूमीसाठी मिळून कार्य करायचे आहे. हा भाव लक्षात घेऊन अत्यंत आत्मीयतेने आणि बंधुभावाने काम करायचे. कोणी जिंकतील कोणी पराभुत होतील. पण, ते सगळेच मातृभूमीची लेकर आहेत, ते सगळे परमपवित्र भारतमातेसाठीच उभे राहिले आहेत. त्या सर्वांना माझ्या सदिच्छा आहेत''.

भिडे गुरुजींच्या अनेक वक्तव्य आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पाहून अनेक पक्षनेते त्यांच्यावर टीका करतात. परंतु राजकीय स्थितीवर काय वाटते या प्रश्नावर भिडे गुरुजींनी कोणावरही टीका न करता अत्यंत संयमित मत देऊन, सर्वांनी मतदानाचे कर्तव्य केलेच पाहिजे असे आवाहन देखील केले.
Share:

काश्मीरची शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांची शांती भंग करायची आहे...





  'पाकिस्तान अधिकृत कश्मीर' (पीओके)मध्ये असणाऱ्या दहशतवादी कॅम्पमध्ये भारतीय सेनेने हल्ला करून आतंकवादयांना ठार मारण्याची बातमी मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिकही मारले गेले आहेत. आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून चौथ्या कॅम्पचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तो हल्ला करताना पाकिस्तानचे 6 सैनिक मारल्याचेही समजत आहे.

 त्या घटनेबद्दल सांगताना भारतीय सेनेचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले, की ''आतंकवाद्यांचे तीन कॅम्प पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे; त्यामध्ये चौथ्या कॅम्पला खूप मोठे नुकसान पोचले आहे''. जनरल रावत यांनी पुढे असेही सांगितले, की ''जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काश्मीर सीमेवर घूसखोरी आणि हल्ले होत होते. काश्मीरच्या शांततेसाठी हे पाऊल उचलले. राज्यात शांतता आहे तसेच व्यापारही सुरु आहेत. काश्मीरची शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांची शांती भंग करायची आहे''.

Share:

कोणत्या कोणत्या नेत्यांनी भरपावसात सभा घेतली? जाणून घ्या...!




शरद पवार यांनी सातारा येथे मुसळधार पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा प्रचार धुऊन टाकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यासोबतच विरोधी पक्षातून कार्यकर्ते आपल्या नेत्याने घेतलेल्या भर पावसातल्या सभेचे फोटो टाकताना दिसत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणत्या कोणत्या नेत्यांनी भर पावसात सभा घेतल्या आहेत.   

आजही स्व. प्रमोद महाजन यांचे नाव प्रत्येकाच्या मनात नेता म्हंटले की येतेच. कोणतीही राजकीय घटना घडली; की त्यांच्या काही आठवणींचा उजाळा होतोच. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा हा फोटो टाकून पुन्हा एकदा त्यांच्या सभेतल्या क्षणांची आठवण करून दिली आहे.


तरुण तडफदार हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी वाळवा येथे वैभव नायकवाडी यांच्या आमदारकीच्या प्रचारासाठी पावसात सभा घेतली. ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यासाठी झटणारा नेता म्हणून पुन्हा चर्चेत आले आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनीही आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी सातारा येथे भर पावसात सभा घेतली आहे. उदयनराजे यांचा फॅन वर्ग फार मोठा आहे. ते आपल्या चाहत्यांसाठी अशा बेधडक कारणाने फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या खासदारकीनंतर भाजप प्रवेश केल्याने त्यांना पुन्हा आमदारकीची निवडणूक द्यावी लागत आहे.



पावसातल्या सभेच्या चर्चेच्या रिंगणात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचेही नाव आले आहे. त्यांनी गडमुड शिंगी येथे 18 ऑक्टोबरच्या सभेत भर पावसात भाषण केले. त्यांच्या फॅनक्लबने दोघेही बरसले पाऊस आणि बंटीसाहेबसुद्धा अशा आशयाचे फोटो व्हायरल केले आहेत.



आपल्या आजोबांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी सुद्धा सातारा येथे पावसात भाषण केले आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांचे फोटो पाहून केवळ स्टंटबाजी आहे, लोकांसाठी नाही घरातल्यासाठी सोय यासाठी नाटक अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर, एकीकडे त्यांच्या चाहत्यावर्गाने त्यांच्या जिद्दीला सलाम दिला आहे. 




Share:

कमलेश तिवारी यांच्या हत्येत इसीसचा सहभाग? गुजरात मध्ये तीन संशयित आरोपी ताब्यात...!



हिंदू महासभाई कमलेश तिवारी यांची काल हत्या करण्यात आली. आज त्या केससंदर्भात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी बिजनौर येथून आरोपी मौलाना अनवारुल हक याला अटक केली आहे. मौलाना अनवारुल हक याने 2015 साली कमलेश तिवारी यांचा खून करण्यासाठी 51 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. सोबतच त्या केससंदर्भात गुजरातमध्ये एटीएसने 6 लोकांना अटक केली आहे.  
          कमलेश तिवारी यांचा मृतदेह 'नाका
हिंडोला' येथील 'खुर्शीद बाग' या ठिकाणी ते वास्तव्यास असलेल्या घरी मिळाला. त्यांना दोन व्यक्ती दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यास आले होते. त्या दरम्यान  कमलेश यांनी आपल्या सहकार्याला पान आणण्यास पाठवले. जेव्हा त्यांचा सहकारी पान घेऊन परत आला; तोपर्यंत कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. कमलेश तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. कमलेश तिवारी हत्याकांड संदर्भात राज्य शासनाने रात्री उशिरा लखनऊचे पोलीस महानिरीक्षक एस के भगत यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष शोध टीम तयार केली आहे. त्यामध्ये लखनऊचे पोलीस अधिक्षक दिनेश पुरी आणि एसटीएफचे क्षेत्राधिकारी पीके मिश्र यांचाही समावेश आहे. डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले की ही असैंविधानिक घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास लवकरात लवकर करतील. 


         ज्या लोकांनी कमलेश यांची हत्या केली; त्यांची ओळख पटत आहे. हल्ल्याआधी ते लोक अर्धा तास कमलेशसोबतच होते. कमलेश यांना गेल्या काही महिन्यापासून सुरक्षा दिली जात होती. घटनेवेळीही सुरक्षारक्षक त्यांच्या घराखाली तैनात होता. त्याने हत्यारांना थांबवले आणि कमलेश यांना विचारूनच आत सोडले. पोलिसांना सीसीटीवी फुटेज आणि अन्य पुरावांच्या आधारे ठोस पुरावे मिळाले आहेत. तसेच स्पेशल टास्क फोर्सचीही मदत घेतली जात आहे. कमलेश यांनी पूर्वी मोहंमद पैगंबर यांच्यावर अपमानास्पद टिपण्णी केली होती. त्यातून ते निर्दोष मुक्तही झाले.

          कमलेश यांच्या पत्नी किरण यांनी त्या
प्रकरणामध्ये मुफ्ती नईम काजमी, अनवारुल हक आणि एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.किरण यांचे आरोप आहेत, की काजमी आणि हक याने कमलेश यांचे शीर कापण्यासाठी 51 लाख आणि दीड करोड रुपये बक्षीस घोषित केले होते. ''त्याच लोकांनी माझ्या पतीला मारले आहे'', असा आरोप किरण यांनी केला आहे. त्यासोबतच कमलेश तिवारी यांच्या नातेवाईकांनी कुटुंबांतील 2 सदस्यांच्या नोकरीची मागणी केली आहे. कमलेश यांच्या काही मित्रांचे म्हणणे आहे; या प्रकरणात इसीसचाही हात असल्याची शक्यता आहे.

Share:

हजारो तरुण भगवे फेटे घालून कोणासाठी निघाले ?? ते निघाले फक्त....

दिनांक 17 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकरता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेला महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण राज्यात याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्या सभेचे लक्ष वेधून घेतले ते भगव्या फेट्यात आलेल्या 10,000 युवकांनी. 

ते युवक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत पदभ्रमण करत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानवंदना देण्यासाठी सभास्थळी पोचले. त्या तरुणांनी जमलेल्या लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते लाखो तरुण कोणाच्या नेतृत्वाखाली जमले होते हे ऐकून तुम्हाला धक्काच  बसेल. 







ती आश्चर्याची बाब म्हणजे त्या भगव्या फेट्यातल्या तरुणांचे नेतृत्व चक्क संभाजीराव भिडे गुरुजींनी केले. महामहिम पंतप्रधान आणि भिडे गुरुजी यांचे नाते सर्वश्रुत आहेच. पंतप्रधान भिडे गुरुजींच्या आदेशावरून रायगड येथे गेले असल्याचे पंतप्रधानांनी स्वतः सांगितले आहे. त्या जमावाला पाहून ती गोष्ट पंतप्रधान मोदी यांच्यासाठीही धक्कादायकच होती. विशेष म्हणजे याही वेळी भिडे गुरुजींनी आपले व्यासपीठावर न जाण्याचे धोरण कायम ठेवले आणि छत्रपतींची मानवंदना पूर्ण होताच त्यांनी तिथून आपल्या पुढील सभा व बैठकांकरता
                                                  धारकर्यांसहित  मार्गस्थ झाले.
सभा संपल्यावर पत्रकारांनी छत्रपती उदयनराजेंना गुरुजींच्या उपस्थितीबाबत विचारले असता; ते म्हणाले, की "भिडे गुरुजी कायमच आदरणीय-वंदनीय आहेत. त्यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली." मोदींनी भिडे गुरुजींना दिल्लीला येण्याचा निमंत्रण दिल्याची सामान्य वर्तुळात चर्चा आहे. परंतु अजून ही दोन्ही गटांकडून याची पुष्टी मात्र झालेली नाही. 
Share:

हिंदू महासभाई नेत्याची गळा चिरून हत्या.!


कमलेश तिवारी हे व्यवसायाने वकिली करत होते, तसेच हिंदू महासभेच्या माध्यमातून 
भारतमातेच्या चरणी आपली सेवा करत होते. तसेच त्यांनी स्वतः हिंदू समाज पक्षाची स्थापना करून राजकीय पातळीवर सक्रिय कार्य करत होते. आज अचानक काही जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याची बातमी समोर येतेय. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कमलेश तिवारींची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली आहे, आरोपी दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाई देण्यासाठी आलोय असे कारण सांगून कार्यलयात भेटायला आले होते.  आरोपींबाबत पोलिसांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही. पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत.





 देशभरातून या हत्येचा निषेध नोंदवला जातोय. हिंदू वार्ता परिवाराकडून कमलेशजी ना भावपूर्ण श्रद्धांजली.
Share:

संभाजी भिडेचें सत्य समोर आले ...



                ( महाराष्ट्र सरकार ने संभाजीराव भिडे यांच्या वरील ६ गुन्हे मागे घेतले )




शकील अहमद शेख या आरटीआय कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र राज्यशासनाने कोणते गुन्हे माफ केले? हे जाणून घेण्यासाठी या संदर्भात महाराष्ट्र राज्यशासनाकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या उत्तरामध्ये राज्यशासनाने एकूण ४१ राजकीय गुन्हे माफ केल्याचे उघडकीस केले आहे.
(शकील अहमद शेख)
              यामध्ये शिवसेना-भाजप या राजकीय कार्यकर्त्यांसोबतच श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक - अध्यक्ष संभाजीराव भिडे  यांच्यावरील ६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. संभाजीराव भिडे यांच्या वरील गुन्हे मागे घेण्याची पुष्टी जरी राज्यसरकार ने केली नसली तरीही ते कोणत्याही गुन्ह्यात दोषी सापडले नसल्याची माहिती आरटीआय ने दिली आहे.
           महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अहवालाबाबत बोलताना सांगितले की, "संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे हे केवळ त्यांच्यावरील गुन्हे नसून ते शेकडो सांगलीकरावरील गुन्हे होते, त्यातलेच एक संभाजी भिडे होते." 
             अश्या प्रकारे संभाजीराव भिडे यांच्यासोबतच  अनेक राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना न्यायालयीन खटल्यातून तात्काळ दिलासा मिळाला आहे. तसेच संभाजीराव भिडेंचा मास्टर माईंड समजल्या जाणारा भगवान श्री कृष्ण याचीच जणू कृपा त्यांच्यावर झाली असे अनेक सामान्य लोकांचे मत आहे. 
    

Share:

शत्रुराष्ट्रनीति

चीन का ग्वादर पोर्ट जाने का रास्ता बलूचिस्तान होकर जाता है और चीन वहाँ पर पाक सेना की सहायता से जनता को मारने का सिलसिला चला रखा है और साथ ही लगभग दो अरब डॉलर का निवेश भी कर रहा है।

अभी चीन को पता चल रहा है कि NSG मुद्दे पर चीन ने भारत को हल्के में लेकर कितनी भारी गलती की है। एक ओर चीन साउथ चाइना सी पर अपनी प्रतिष्ठा की लड़ाई लड़ रहा है I

पिछले दो वर्षो की खामोशी के बाद मोदी जी ने भारत के सभी राजनैतिक दलों को विश्वास में लेते हुए अचानक ही बलूचिस्तान और पाक अधिकृत कश्मीर (POK) पर बयान दिया, POK को भारत का अभिन्न अंग भी बता दिया I प्रधानमंत्री बनने के बाद पिछले दो वर्षो से मोदी जी UNO (संयुक्त राष्ट्र संघ) और NSG में स्थाई सदस्यता के लिए कोशिश कर रहे है, पर चीन हर बार अड़ंगा लगा रहा हैI ऊपर से चीन भारत को कमजोर करने के लिए पाकिस्तान का साथ भी दे रहा है और POK और बलूचिस्तान में अपने लाभ और भारत को घेरने के लिए निर्माण कार्य भी कर रहा हैI
अन्तराष्ट्रीय न्यायलय में एशिया क्षेत्र में साऊथ चाइना सी वाला हिस्सा (अधिकार) भी हार गया है, और अब वो चाहता है की भारत उसका साथ दे, इसीलिए चीन ने अपने विदेश मंत्री वांग यी को दिल्ली भेजा, और साथ में सन्देश भी भेजा कि NSG के मार्ग अभी बंद नहीं हुए हैंI

भारत के वर्तमान नेतृत्व ने इसी समय का लाभ उठाया, और POK (पाक अधिकृत कश्मीर) को भारत का अभिन्न अंग बता दिया और बलूचिस्तान के हितों की रक्षा करने और पाकिस्तान से आजाद करवाने के लिए विश्व को संदेश भी दे दिया। और चीनी विदेश मंत्री भारत दौरे पर ग्वादर पोर्ट सिलसिले में समर्थन माँगने पहुँचे, वही दूसरी और मोदी जी ने सीधे POK की बात उठा कर चीन को बता दिए की NSG छोडो, POK पे हमारा समर्थन करो।

हिंदुस्थान के इस कुटनीतिक निर्णय से पूरी दुनिया हैरान है, चीन चारो और से फंस गया है। चीन NSG के बदले समर्थन की उम्मीद कर रहा था लेकिन जो दांव  भारत की शत्रुराष्ट्रा नीति ने चला है, उससे चीन गले में हड्डी अटक जाने का अनुभव कर रहा हैं ।
POK पे समर्थन का मतलब ग्वादर को भूल जाओ। और भारत से नाराजगी मतलब वियतनाम जापान जैसे अन्य देशों को भारत का समर्थन और साउथ चाइना सी से चीन का अधिकार समाप्त।

बलूचों ने उखाड फेंका पाकिस्तानी झण्डा।

चाणक्यनीति : जब शत्रु कमजोर हो तब उस पर वार करो।

वर्तमान नेतृत्व की सोची समझी रणनीति।

अब चाइना असमंझस में पड़ गया कि POK को पाकिस्तान का अंग बता कर पाकिस्तान की सहायता की जाए या NSG मे भारत की स्थाई सदस्यता देकर अपने साउथ चाइना सी विवाद को सुलझाया जाए, भविष्य में जो भी कुछ हो। पर मैं इतना जानता हूँ कि भारत का वर्तमान नेतृत्व  मुँह से चाहे कुछ न बोले पर अपने दुश्मन को कब कैसे और कहाँ मारना है वो ये अच्छी तरह जानते है। इसको कहते है जले पर नमक छिड़कना।

जो कांग्रेस ६० वषों मैं नहीं कर सकी ,भारत के वर्तमान नेतृत्व ने २ वर्षों में कर दिया, परराष्ट्रनिति एवं शत्रुराष्ट्रनीति का उचित उपयोग करने के लिए वर्तमान सरकार को मेरा ..!! 
साधुवाद

                                                                                                                                      विशाल सुरेश शर्मा 
Share:

जीता जागता राष्ट्रपुरुष है...



(आज पासून 'हिंदू वार्ता' वर हिंदीतून हि लेख वाचायला मिळतील )



(प्रजातांत्रिक व्यवस्था का अनन्यसाधारण महत्व अटल जी के लिए था,संघ स्वयंसेवक के रूप "राष्ट्र सर्वोपरि" की विचारधारा अटल जी आत्मसात कर चुके थे)


एक चारित्र्यवान हिंदू, राष्ट्रधर्म भक्ती को अपने अंतरमन में संजो कर औऱ सनातन हिंदू धर्म एवं संस्कृत के मुल्यों का संवाहक बन जब राजनीती में आता है, तब उस व्यक्ती को वही स्थान प्राप्त होता है जो आज आदरणीय अटलबिहारी वाजपेयी जी को प्राप्त है, गांधी और नेहरू परिवार द्वारा भारत के राजनैतिक नेतृत्व को एकाधिकार मान वंशवाद, परिवारवाद एवं अपने व्यक्तिगत मूल्यों को राष्ट्र से ऊपर मानने वाली मानसिकता को अटल जी के सक्रिय राजनैतिक प्रवेश ने एक बहोत बड़ी चुनोती प्रस्तुत की, अटल जी मे यह चुनोती दे पाने का सामर्थ्य तत्कालीन परिस्थितियोने कूट कूट कर भर दिया था, अटल बिहारी वाजयेपी १९४२ में उस वक्त राजनीती में आए, जब भारत छोड़ो आंदोलन के दौरान उनके भाई २३ दिनों के लिए जेल गए। स्वतंत्रता प्राप्ति हेतु क्या मुल्य हम हिन्दुस्थानियों को चुकाना पड़ा है इस बात का ज्ञान युवा अवस्था मे ही अटल जी को हो चुका था, इस कारण उस अर्जित स्वतंत्रता  एवं उसके द्वारा प्रदत्त प्रजातांत्रिक व्यवस्था का अनन्यसाधारण महत्व अटल जी के लिए था, संघ स्वयंसेवक के रूप में "राष्ट्र सर्वोपरि" की विचारधारा अटल जी आत्मसात कर चुके थे। १९५१ में वाजपेयी जी ने आरएसएस के सहयोग से भारतीय जनसंघ पार्टी बनाई जिसमें श्‍यामा प्रसाद मुखर्जी जैसे नेता शामिल हुए। १९५७ में अटलजी बलरामपुर संसदीय सीट से चुनाव जीतकर संसद पहुंचे। १९६८ में वो राष्‍ट्रीय जनसंघ के राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बने। यह वो समय था जब पं. दीनदयाल उपाध्याय एवं श्यामाप्रसाद मुखर्जी के पुण्यप्रताप के बल से भारत की मलिन राजनीती को राष्ट्रनीती में परिवर्तित करने का प्रयास अटलजी द्वारा होने लगा था। 





 अटलजी के राजनैतिक जीवन का उद्देश्य क्या था यह समझने के लिए उनका यह कथन पर्याप्त है कि
        "सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आऐंगी जाऐंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी,  मगर ये राष्ट्र रहना चाहिए यह प्रजातंत्र अमर रहना चाहिए"।
राष्ट्रीयचारित्र्य विहीन राजनीति को इस राष्ट्र का महत्व समझाते हुए, "हिंदुत्व अर्थात राष्ट्रीयत्व" के भाव से सराबोर अटल जी ने जब 

भारत जमीन का टुकड़ा नहीं,
जीता जागता राष्ट्रपुरुष है।
हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है,
पंजाब और बंगाल दो कंधे हैं।
पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघायें हैं।
कन्याकुमारी इसके चरण हैं, सागर इसके पग पखारता है।
यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,
इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।
हम जियेंगे तो इसके लिये
मरेंगे तो इसके लिये...

इस तरह अपने राष्ट्र का मुल्य समझाया तब इस राष्ट्र की राजनीती में, राष्ट्रोद्धार राष्ट्रोन्नती जैसी संकल्पनाएँ अस्तिव में आने लगी ।
अटल जी अपना राजनैतिक जीवन ऐसे अजातशत्रु की तरह जिये कि उनके प्रबल विरोधियों को भी उनसे मोह होने लगता था । अटल जी के राष्ट्रवाद का स्तर क्या था?
    १९७२ के युद्ध में विपक्ष में होने के बाद भी अटल जी तत्कालीन सत्तापक्ष के साथ राष्ट्रहित में एक सहयोगी की भूमिका में नजर आए, वहीं नरसिम्हाराव सरकार ने अपने विरोधी राजनैतिक दल के नेता अर्थात श्री अटलजी को
 संयुक्तराष्ट्र सभा में भारत का प्रतिनिधित्व करने के लिए भेजा, ऐसे अनगिनत प्रसंग हैं जहाँ विपक्ष में होने के बाद भी अटल जी ने तत्कालीन सरकार के उन सभी मुद्दों का समर्थन किया, जो देशहित में थे और यही कारण है कि आज विरोधी राजनैतिक दल का प्रत्येक नेता यह निर्विवाद स्वीकार करता है कि अटलजी की राजनीति का मूलाधार राष्ट्रहित था।
   मुझे लगता के भविष्य में इस राष्ट्र की राजनीती को हिंदुत्व को आधार मानकर ,राष्ट्रनीती में परिवर्तित करने का प्रयास यदि हो तो अटल जी द्वारा परिभाषित-
            "हिन्दू धर्म के प्रति मेरे आकर्षण का मुख्य कारण है कि यह मानव का सर्वोत्कृष्ट धर्म है। हिंदू धर्म न तो किसी एक पुस्तक से जुड़ा है और न ही किसी एक धर्म प्रवर्तक से जुड़ा है, जो कालगति के संग असंगत हो जाते हैं। हिन्दू धर्म का स्वरूप हिन्दू समाज द्वारा निर्मित होता है और यही कारण है कि यह धर्म युग-युगांतर से संवर्धित और पुष्पित होता जा रहा है।" 
-विशाल सुरेश शर्मा, मलकापूर  


Share:

तुमची गरज आहे ..!!!



(आपल्याला तिथे जाणे शक्य नसले तरी त्यांच्या मार्फत आपण काही वस्तू पोहचवु शकतो)


गेल्या काही दिवसांपासून आपल्या शेजारील राज्यावर मोठी आपत्ती आली आहे. ती आपत्ती म्हणजे 'केरळ महापूर'. यासाठी सरकारने संपूर्ण यंत्रणा तत्काळ कार्यरत केली आहे. परंतु या देशाप्रती आणि समाजाप्रती आपण ही काहीतरी देणे लागतो. नेहमी आपण माणुसकी धर्म महत्त्वाचा अश्या प्रकारचे वक्तव्य सहज करतो. पण ज्यावेळी ते सत्यात उतरवण्याची वेळ येते त्यावेळी मात्र मागे सरतो. आज केरळ मध्ये महापूर आल्यावर अशीच सामाजिक जाणिवा असलेले व्यक्ती पुढे सरसावतात. अश्याच एका व्यक्तीने आज आपले कर्तव्य पूर्ण करण्यास एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचे नाव आहे, डॉक्टर रविंद्र मराठे. ते फूड आर्मी एनजीओ मार्फत सोमवारी संध्याकाळ पर्यंत मदत पोहचवणार आहेत. सोमवारी काही वस्तूसकट एनजीओ केरळमध्ये मदत करण्यास जाणार आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यास तयारी दाखवली पण आपले काय? 
    आपल्याला तिथे जाणे शक्य नसले तरी त्यांच्या मार्फत आपण काही वस्तू पोहचवु शकतो. त्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. खाली दिलेल्या फोटो प्रमाणे त्यांना खाद्यपदार्थचे पाकीट पोहचवावे. 


अधिक माहितीसाठी संपर्क- 
डॉक्टर रविंद्र मराठे
 ९२२११०७२३६

Share:

खाली राख नाही वर धूर नाही....

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या  पवित्र स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली देताना त्यांच्या राष्ट्रीप्रेमाविषयी सांगताना पुढील उद्गार काढून श्रद्धांजली अर्पण केली. 
''हे अति अति अति दुःखाची गोष्ट आहे. ही वार्ता ऐकल्यानंतर संबंध देशातल्या सगळ्याच लोकांच्या अंतकरणाला आपल्या घरातलं कोणीतरी गेला असच वाटतंय. आयुष्य ते जगले ते भारतमातेच्या पूजेसाठीच जगले. त्यांचा असा विश्वास होता की देशसेवा आणि भारतमातेची सेवा याच्यात फरक नाहीये. 
जे कशासाठी वेली तरू फुल घ्यावे ।
स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावे ।।
असंख्यात पुष्पे हवी पूजनाला ।
म्हणा अर्पिला देह हा मायभूला ।। 
या कठोर व्रताच आचरण करणारं त्यांच जीवन होतं. ते कर्मवंत होते, ज्ञानवंत होते, शिलवंत होते, बुद्धिवंत होते, आणि मुख्य म्हणजे भारतमातेचे विलक्षण कर्तबगार असे सुपुत्र होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गानी हा देश नेण्याचं उत्तरदायित्व भगवंताने तुम्हा आम्हा सर्वांवरती सोपवलेला आहे. 
अग्नी कर्पूराचे मेळी । काय उरली काजळी ।।
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ।। 
अग्नी आणि कापूर एकत्र आल्यानंतर खाली राख नाही वर धूर नाही, प्रकाश आणि सुंगध देऊन निघून जावं तसच त्यांचं जीवन आपल्यासमोर प्रत्यक्ष ते जगले ते आपण पाहतो. तो आदर्श घेऊन  भविष्यात सगळ्या उगवत्या पिढीतल्या तरुणांनी जगावं आणि या भारतमातेला विश्वाचा बाप बनण्याची ताकद द्यावी असं भगवंताच्या पायाशी मागून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. विनम्र प्रार्थना करतो. "
असं म्हणून त्यांनी या देशाचे माजी पंतप्रधान व भारताच्या राजकारणात भीष्म पितामह तसेच अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणारे अटल  बिहारी वाजपेयी यांना दाटलेल्या कंठानी भावपूरनी आदरांजली अर्पण केली.
Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)